माझे आजोबा आटगांवला असताना त्यांच्या कडे एक नेपाळी गुरखा खानसामा होता,तो अशी भाजी करायचा. अशी बाबा त्यांच्या लहानपणीची आठवण सांगतात.
साहित्य-
४,५ बटाटे,२ टे-स्पून तेल,हळद१/२ चहाचा चमचा
मिरपूड १ चहाचा चमचा,१/४ चमचा तिखट,मीठ चवीनुसार,कोथिंबीर
कृती-
बटाटे साले काढून लांब चिरा(फ्रेंच फ्राइज सारखे).तेल तापत टाका,त्यात हळद घाला,बटाटे घाला,मिरपूड घाला,तिखट घाला.परता, झाकण ठेवा,बटाटे शिजत आले की मीठ घाला.अधून मधून परता नाहीतर बटाटा खाली लागतो.कोथिंबीर घालून सजवा.
पोळी/फुलक्यांबरोबर खा.
मी २ टे-स्पून लिहिले आहे पण या भाजीला तेल थोडे जास्त लागते.भाजी झाली की कढईतून दुसर्या वाडग्यात काढून उरलेल्या तेलात आमटी होते इतके तेल लागते,नाहीतर भाजी खाली लागते. नॉनस्टीक पॅन मध्ये कमी तेल लागेल.

वाचने
7040
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
बट्टा भाजी
+१
In reply to बट्टा भाजी by सहज
स्वाती ताई परत एक छान रेसिपी
बटाट्यचा अजुन एक प्रकार
सुरेखच
धन्यु स्वातीताई
मस्तच..
बटाटा ---- प्रेमचंदांची कथा ---- आणि Routing Algorithm
फरच भारि
बटाटा हे
बटाट्याचं काय बी