साहित्यः ४ लहान वांगी, १ मोठा बारिक चिरलेला कांदा, बारिक चिरलेली कोथिंबीर, तेल, तिखट, हळद, मोहरी, गोडा मसाला, कांदा लसुण मसाला, चवीपुरती साखर (आवडीनुसार), मीठ, दाण्याचा कुट (साधारण पाउण वाटी), ताज दही अथवा लिंबू
कॄति: प्रथम वांगी भरण्याचा मसाला तयार करुन घेणे. त्यासाठी दाण्याचा कुटामध्ये दही किंवा लिंबू घालावे, मग कांदा लसुण मसाला, तिखट, गोडा मसाला, मीठ आणि चवीपुरती साखर घालावी व ते व्यवस्थित मळुन घेणे. हे सईल नसावे. आता वांग्याना उभी चिर देऊन त्यात हे मिश्रण भरावे. आता कढईत २ चमचे तेल घ्यावे. गरम झाले की मोहरी घालावी व थोडी कोथिंबीर घालावी. कोथिंबीरीचा सुगंध दरवळला की वांगी सोडावीत. अंदाजे पाणी टाकावे व कढईवर झाकण ठेऊन त्यावर पाणी टाकून मध्यम आचेवर शिजवावे.
पर्यायी लहान कुकर मध्येही ही भाजी छान होते. एक शिटटी पुरेशी आहे. फक्त पाणी जास्त घालू नका.
ही भाजी, भाकरी किंवा पोळी बरोबर खायला दया. त्या बरोबर कांदा...वा वा...झकास बेत!!! :W
माफ करा, फोटो नाही आहे सध्या!!
वाचने
9095
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच .
धन्यवाद!
In reply to मस्तच . by शितल
मी यात..
छान!
मी
ही भाजी,
माझी आई
व्वा!
भरलेलि वन्गि...................