नक्षत्रांचे देणे
लेखनविषय:
काल नक्षत्रांचे देणे बघताना शांता शेळकेंच्या ओळी ऐकत होतो..
जुन्या आजोळाची आता
पार झाली पडझड
ओटी अंगण ओसरी
एक राहिले ना धड
हरवले बाळवय
खोल जिव्हारी लागले
उठे मुकाट तिथून
मन शिणले भागले
क्षणभरही वळून
नाही पाहिले मी मागे
काय राहिले तिथेच
काय आले मजसंगे
काय राहिले तिथेच, काय आले मजसंगे? विचार करता करता हे काहीसं सुचलं. कितपत जमलंय माहित नाही:
मजसंगे आला काही
जुन्या आठवांचा मेळा
माझे सांत्वन कराया
जेव्हा दाटलासे गळा
याच आठवांनी दिले
उभे राहण्यास बळ
आली संकटे तरीही
जरा कमी झाली झळ
आले माझ्यासंगे सारे
चाफ्या अनंताचे वास
आले भावंडांसवेचे
छोटेमोठाले प्रवास
आला आजीचा बटवा
आली तुपाची तामली
मागे वळून पाहता
दूर नजर थांबली
वाटे संगे आले सारे
तरी राहिलेच काही
जुन्या मामाच्या गावाची
सर नव्या घरा नाही!!
-२५-०९-२०१४
वाचने
6659
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
क्या बात!
In reply to क्या बात! by एस
+1
झक्कास!!
In reply to झक्कास!! by किसन शिंदे
तसे ते हळूच.....
In reply to झक्कास!! by किसन शिंदे
+++१११ टू किसनदेव!!!
अप्रतिम रचना!
अप्रतिम!
खूपच छान. सु रे ख!
भावपूर्ण.
छान आहे ..थोड स्मरणरंजन ही !
मस्त
आवड्ली
खुपच सुंदर रे
सुंदर !!!
!
बघावं ते एकेक नवलच!
कवितांकडे शक्यतो फिरकत नाही.
फारच सुंदर,
आवडली कविता!
छान
वाह सुरेख
अप्रतिम..!!!
सुरेख!! छान जमलीये
शांता शेळके
एक नंबर रे! लय आवडलं.
सुरेख !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काजळमायालहान असताना आजोळी गेलो होतो
सर्व प्रतिसादकांचे आभार !!
सुरेख
वा, सुरेख!
छान कविता
सुरेख !
अंहं! मस्त!!
धाडसी आहात ...
अत्यंत सुंदर!
In reply to अत्यंत सुंदर! by चतुरंग
(No subject)
उत्तम
हे असं काहितरी कसदार लिहा
कविता आवडली!