मेथी कोथींबीर इत्यादी काही भाज्यांचे बाजारभाव उत्पादन खर्चा पेक्षा खाली पडताहेत हि बातमी दै सकाळमध्ये वाचली. अशा बातम्या सहसा वाचून सोडून द्यावयाच्या असतात तशी मी वाचून सोडून दिली होती, कारण शेतकर्याला किंमत कोसळते पण शहरातील ग्राहकाला त्याचा लाभ होतो असे नाही. पण काल जवळच्या भाजीमंडईतील एक भाजीवाला पावला आणि बातमीतल्या भाज्या अपेक्षेपेक्षा बकळ रिझनेबल मिळाल्या. आज या भाज्यांचे मिक्स व्हेज सूप बनवले. या पुर्वी मी केवळ फळ भाज्यांचे मिक्सव्हेज सूप बनविले होते. या वेळी पालाभाजी + फळभाजी असा मिक्सव्हेज सूप प्रयोग मला स्वतःलाही नवा होता.
सूपाचे साहित्य येणे प्रमाणे झाले (अर्थात साहित्याची निवड करताना समोर उपलब्ध होते ते एवढा एकच विचार केला होता. साहित्याचे घटक पाहून मुलींनी सकाळी बहिष्कार टाकला होता पण सायंकाळी मिटक्या मारत सूप पिले आणि सूपची छायाचित्रे व्हाट्सअॅप केली यात सारे आले)
* पालक : १० - १२ पाने
* मेथी पाने : पालकाच्या एक चतूर्थांश क्वांटिटी अंदाजे
* कोथींबीर : पालकाच्या एक चतूर्थांश क्वांटिटी अंदाजे
* पुदीना पाने : पालकाच्या एक चतूर्थांश क्वांटिटी अंदाजे
* बिटरूट मोठा: १
* टोमॅटॉ मोठे २ ( मध्यम चार असावेत)
* फ्लॉवर अंदाजे १०० ग्राम
* भेंडी अंदाजे ५० ग्राम
* बीन्स अंदाजे ५० ग्राम
* मूळा (पांढरे मूळ) अंदाजे ५० ग्रामचा तुकडा
* आले खिसून चवी पुरते
* साखर, जीरे पावडर १-१ चमचा
* मीठ तीखट चवी पुरते
* १ चिमूट हळद
* कृती खालील प्रमाणे केली:
फ्लॉवर, भेंडी, बीन्स, मूळा आवडीच्या आकाराचे तुकडे बारीक चिरून एकीकडे चुलीवर उकळत ठेवले. दुसरीकडे पालक, मेथी कोथींबीर पुदीना पाने ५ मिनीटे मायक्रोव्हेव केली. बीटरूट कूकरला शिजून आधीपासून रेडी होता बीटरूट आणि टोमॅटोचे बारीक काप करून फळ भाज्यांसोबत आणि मायक्रोव्हेव करावयाच्या पालेभाजी गटात समसमान टाकले होते. आले दोन्ही कडे खिसून टाकले होते. मीठ तीखट हे पदार्थ चवी नुसार मी प्रत्येक गटात प्रत्येक स्टेजवर चवीनुसार टाकत अॅड्जस्ट करत जातो तसे ते केले. मायक्रोव्हेव केलेला पालेभाजी गट मिक्सरवर बारीक करून घेतला आणि मोठ्या पातेल्यात गॅसवर ठेवला त्यात उकळत आलेल्या फळभाज्या घातल्या साखर जीरे पावडर आणि चिमूटभर हळद टाकली. १५ मिनीटे सूपाला उकळी आणली आणि ...........सूप ओरपले :)
भात, साधेवरण, सूप, पापड आणि सोबतीला अंब्याचे लोणचे प्रयोग स्वतःवर केला आणि मला स्वतःस आवडला !
इति सूप आख्यान सफल संपूर्ण . वाचणारे अतृप्त होवोत, खाणारे तृप्त होवोत आणि करून खाऊ घालणार्यांवर देवी लक्ष्मीचा आशिर्वाद असो !


वाचने
12084
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
वॉव सुप दिसतय तर फारच
तिखट एवजी काळी मीरी पावडरचा
In reply to वॉव सुप दिसतय तर फारच by दिपक.कुवेत
ऑं..धक्का बसला .
आँ ?
In reply to ऑं..धक्का बसला . by जेपी
आख्या खान-दानात एकटाच मिपाकर
In reply to आँ ? by सस्नेह
विकिपेडीया वर आहे का ही
@माहितगार-साहेब,
प्रतिसाद हलकेच घ्या लिवायच
In reply to @माहितगार-साहेब, by जेपी
मस्तच...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaarमला फोटु दिसत नाहीये
का बरे ? .jpg फॉर्मॅट आहे.
In reply to मला फोटु दिसत नाहीये by पियुशा
मस्त
म्हणूनच मुळा खूप कमी घातला
In reply to मस्त by सविता००१
मस्त दिसतंय सूप
भेंडी उकळून घातल्यावर तार येत
In reply to मस्त दिसतंय सूप by सस्नेह
कोवळी होती हे तर आहेच
In reply to भेंडी उकळून घातल्यावर तार येत by माहितगार
ओक्के हे माहित नव्हते.
In reply to कोवळी होती हे तर आहेच by सविता००१
मस्त
रोचक पाकृ
सुरेख
मस्त!