सध्या बिहार या ना त्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आहे. आजवर बिहारच्या संदर्भात असलेल्या माहितीचे आदान प्रदान व्हावे या हेतुने हा लेख प्रपंच करत आहे. माहितीत त्रुटी असेल तर ती कळविणे / दुरुस्त करणे. (स्वैर विचार मंथन आहे.)
१.भारत आणि पाकिस्तान यात काय साम्य आहे असे जर विचारले तर अनेक साम्यस्थळांपैकी एक साधर्म्य म्हणजे बिहारीची या देशात समान असलेली स्थिती. स्वातंत्र्यपूर्व काळात अंदाजे १० लाख बिहारी मुसलमान पाकिस्तान मध्ये विस्थापित झाले. तेथील स्थानिक जनतेने त्यांना मुजाहिद ( परके) असा ठप्पा लावला आणि पंजाबी, सिंधी, बलुची आणि पठाणी लोकांनी त्याना कधीही आपलेसे केले नाही. आजही त्यांचे वंशज झोपडपट्टीत अत्यंत हलाखिचे जीवन जगत असतात.
भारतात महाराष्ट्राने ( विशेषता) तरुणांनी सध्या त्यांच्या विरुद्ध मोहिम उघडली आहेच, त्याचबरोबर गोवा, दिल्ली आणि वंगवासियांचा त्यांच्या विरुद्ध रोष आहे असे माध्यमाच्या बातम्यावरुन कळते.
२. याचा मागोवा घेतला असता ( १५० वर्षापूर्वी) इंग्रजांनी अनेक संस्थाने जिंकली, खालसा केली. परंतु त्यात्या समाजाचे मात्र त्यांचे स्नेहाचे / आपुलकीचे संबंध राहिले. उदा. मराठे, पंजाबी, बंगाली, मुसलमान प्रजा इत्यादी. त्यांनी या समाजाला आपल्या सैन्यात मानाच्या जागा, प्रशासनात मानाचे हुद्दे दिले. शिक्षणात मदत केली. मात्र त्यांनी बिहारीमाणसाला आपला रामागडी ( बटलर ) चे स्थान दिले. नकळतच सर्वच समाज अजून मागासलेल्या ठिकाणी पोहोचला.
३.१९६० च्या सुमारास ५० वर्षानंतर भारत कोठे असेल याचा आढावा घेण्यासाठी काही चाचण्या, माहिती गोळा करण्यात आली. खनिज संपत्ती, त्या प्रदेशाची माणसे, त्यांच्या विकासाच्या संध्या इत्यादी इत्यादी. त्यात त्या समितीचा असा निष्कर्ष असा होता की बिहार ५० वर्षानंतर अग्रगण्य राज्य असेल, वस्तुस्थिती आपण जाणत आहातच.
४. भ्रष्टाचाराचा जर विचार केलातर सर्वच राज्यात भ्रष्टाचार आहेच. बिहारमध्ये तो आहेच, मग इतर राज्यं मात्र पुढे आहेत आणि बिहाराची अधोगती असे का? बरे बिहार मध्ये देशभक्ती नाही असे म्हणावे तर स्वातंत्र्य आंदोलनात अनेक नेते बिहारचेच होते, उदा. राजेंद्र प्रसाद, जयप्रकाश नारायण, कृपलानी इत्यादी.
इतके असताना बिहार मागे का आणि त्याच बरोबर आपल्या देशात अश्या प्रांतवाद, भाषावाद, वंशवाद या आधारे फुटीची कल्पना पसरत गेली तर आपला एकसंध देश खर्या अर्थाने एकसंध राहिल का? एक सुजाण नागरिक म्हणून काय करता येऊ शकते याबद्दलचे माझे विचार पुढच्या लेखात....तो पर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.
वाचने
6444
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुजाहिद
मला वाटतं मुहाजीर!!!
In reply to मुजाहिद by आजानुकर्ण
अलिकडच्या
In reply to मला वाटतं मुहाजीर!!! by पिवळा डांबिस
ते मुहाजीर असे हवे ...
In reply to अलिकडच्या by विसोबा खेचर
बिहारींचे मागासलेपण आणी इंग्रज
विचार मंथन चालू आहे.
In reply to बिहारींचे मागासलेपण आणी इंग्रज by भास्कर केन्डे
मनूष्यबळ
ते सध्या बोलायचे नाही..
In reply to मनूष्यबळ by स्वामि
अफूची गोळी
बिहार हे
एक विनोद !
In reply to बिहार हे by विसोबा खेचर
मानलं........!
In reply to एक विनोद ! by मुक्तसुनीत
काय फायदा
भारतात
एकेकाळी जगाला शिक्षणाचे धडे देणारी
एक विनोद
दुसरा विनोद
In reply to एक विनोद by गणा मास्तर
माझ्या एका
बिहार का मागासलेला??
अवांतर -
In reply to बिहार का मागासलेला?? by अभिरत भिरभि-या
होईलच.
In reply to अवांतर - by विसोबा खेचर
समर्थ रामदास
In reply to होईलच. by कलंत्री
कोणता बिहारी