हुरड्याचे थालीपीठ
यंदाच्या हिवाळ्यात गावी जाऊन मस्त हुरडा खाऊन झालाय ,आणि आता येथे मुंबईत परत आल्यावर नवऱ्याला एका ठिकाणी ताजा कोवळा हुरडा दिसला मग तो घेऊन आला ,आता नुसताच भाजून खाण्यापेक्षा त्याचे काहीतरी वेगळे बनवावे असा विचार आला .मग थोडी शोधमोहीम केली आणि त्याचे थालीपीठ बनवले .अप्रतिम चव होती .पहिल्यांदाच बनवले आणि चांगले झाले .पुन्हा बनवते वेळी यात आवश्यकतेप्रमाणे काही बदल करू शकते असे वाटले .तूर्तास आज बनवले त्याची रेसिपी बघूया .
साहित्य : २ वाट्या हुरडा , घरात असलेली भाजणी एक दीड वाटी,कोथिम्बिर ,मीठ, आवडीप्रमाणे ,चीलीफ्लेक्स एक चमचा ,लसुन मिरची ची भरड एक चमचा .तेल ,पाणी
कृती : सर्व प्रथम हुरडा ,कोथिम्बिर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे .(पाणी न घालता)ताटात काढून त्यात सगळे पदार्थ आणि भाजणी टाकून साधारण थालीपीठ साठी भिजवतो तसे भिजवून घ्यावे .अर्धातास झाकून ठेवून द्यावे .
नंतर तव्यावर तेल सोडून त्यावर पाण्याच्या हाताने थालीपीठ थापून ,दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे .
दही आणि लोणच्याबरोबर गरमागरम खावे .
टीप : यातील पदार्थांचे प्रमाण आपापल्या आवडीप्रमाणे कमीजास्त करू शकता .
भाजणी ऐवजी घरात असलेली ज्वारी,बाजरी ,चणाडाळ पीठे हि वापरू शकतो .
हुरडा जास्त बारीक वाटल्या जात नाही त्यामुळे भिजवलेले मिश्रण जर सरबरीत असते त्यामुळे थापताना जर सांभाळून थापावे लागेल ,नाहीतर थालीपीठाचे तुकडे होतील .
वाचने
12120
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
खमंग पाककृती!
In reply to खमंग पाककृती! by एस
+१
आता हुरडा शोधणे आले.
In reply to आता हुरडा शोधणे आले. by सूड
हुरडा.
अहाहा....
मस्तच
मस्त पाकृ.महालक्ष्मी सरस
In reply to मस्त पाकृ.महालक्ष्मी सरस by अजया
.
In reply to . by hitesh
लिलावती हाॅस्पिटलसमोर.बांद्रा
अगदी वेळेवर दिलीस रेसिपी.
अहाहा..
मस्त!
In reply to मस्त! by पैसा
हुरडा
In reply to हुरडा by हरकाम्या
त्याहून सोपा उपाय!
नका हो थंडीत अश्या पाककृती
मस्त
हा हुरडा म्हणजे गुजरातमध्ये
In reply to हा हुरडा म्हणजे गुजरातमध्ये by बोका-ए-आझम
हो आणि नाही. पोंक ज्वारीचीच
हुरडा कधी खाल्लाच नाही.
खमंग पाकृ
In reply to खमंग पाकृ by सस्नेह
+१
कंपुने) मंडळाने आजच मेमो पाठवलाय - मिळाला असेलच :)अतिशय सुंदर!
आहाहा... हुरडा खाल्ला आहे,पण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- BHO SHAMBHO SHIVA SHAMBHO SVAYAMBHOअहाहा
+१
अहाहा. . . . तोंपासु!
मिपा वर
मस्त हं ! लैक. करून बघण्यात
हा धागा दिसला की 'हृदयाचे