सर्वप्रथम मिपाकरांना २०१५ च्या पहिल्या दिवशी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आता आमचे नवे वर्ष गुडीपाडव्याला सुरु होते किंवा दिवाळीला सुरु होते इ. इ. चर्चा नको. :) तर सांगण्याचा मुद्दा असा की दरवर्षीप्रमाणे याहिवर्षी तुम्ही नवीन वर्षाचे तडीस (न) जाणारे संकल्प केले असतीलच. मागच्या वर्षी एखादा संकल्प केला आणि तो पुर्ण केला असेही काही घडले असेल. तर मंडळी येउद्या तुमचे अपडेटस. मी अजून काही संकल्प केला नाही. हजारो संकल्प ऐसे की हर संकल्प पे दम निकले.
पण बघूया, मिपाकरांच्या सुचनेतून काही आवडले तर नक्कीच अनुकरण केले (मिपाच्या भाषेत केल्या जाईल) जाईल.
वाचने
15212
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
संकल्प न करण्याचा संकल्प
यंदा संकल्प न करण्याचा संकल्प केला होता, तो पूर्णपणे तडीस नेला!!! ;)
अभिनंदन !
In reply to संकल्प न करण्याचा संकल्प by सुनील
अकर्म देखील एक कर्मच आहे. संकल्प पुर्ण केल्याबद्दल आपले अभिनंदन !
पॅरडॉक्स.
In reply to संकल्प न करण्याचा संकल्प by सुनील
पॅरडॉक्स. =))
गेल्या पाच वर्षात पूर्ण न
गेल्या पाच वर्षात पूर्ण न झालेल्या संकल्पांची लीस्ट मोठी हाय !! :)
ह्या वर्षी पण जमतील तितके कट्टे करणार...
आता उरलो फक्त कट्ट्या पुरता...
मुवि म्हणे
swimming शिकणार
आणी बिझनेस वाढवणार
माझा संकल्प
न मरता आणि विना अपघाताचा जिवंत राहणार या ३१ डिसेंबरपर्यंत. तोपर्यंत जगलो वाचलो तर हाच संकल्प पुढील वर्षीही....
लैच आशावादी बॉ तुम्ही
In reply to माझा संकल्प by बॅटमॅन
लैच आशावादी बॉ तुम्ही. :) देवाकडे प्रार्थना की पुढच्यावर्षी हाच संकल्प पुढे कॉपी पेस्ट करण्यास येथे हजर असाल.
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
जे जे उत्तम आहे... ते पाहण्याचा, वाचण्याचा आणि ऐकण्याचा मानस व्यक्त करतो. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shiva Tandava Stotram { Amazing }
२०१५ चे संकल्प
२०१४ चे संकल्प काय काय होते बुवा आठवायचे
मी नाय संकल्प केला!
पण आज फेसबुकवर एक छान संकल्प पाहिला, "मी वाहतुकीच्या सगळ्या नियमांचे पालन करीन. स्वतः दुचाकी/चारचाकी चालवत असताना रस्त्यावर पादचार्यांच्या पहिल्या हक्काचेही कसोशीने पालन करीन!" वाचून बरं वाटलं. जास्तीत जास्त लोकांनी असा संकल्प केला तर किती छान होईल!
+ १
In reply to मी नाय संकल्प केला! by पैसा
सहमत
रस्त्यावर पादचार्यांच्या
In reply to मी नाय संकल्प केला! by पैसा
पादचार्यांसाठी पदपथ असतात. कित्तेक पाद्चारी पद्पथ असतानासुध्दा रस्त्याच्या मधुन चालत वाहनांचा खोळंबा करतात्.झेब्रा क्रॉसिंग असताना सुध्दा कुठुनाही कसेही रस्ता क्रॉस करतात.
आपल्याकडे बर्याच ठीकाणी पदपथ हे चालण्यासाठी मोकळे नसतात त्यामुळे रस्त्यामधुन चालावे लागते ही वस्तुस्थिती असली तरी जिथे पद्पथ असतील तिथे पदपथावरुनच चालावे.
तुम्हाला माहित नसेल कदाचित
In reply to रस्त्यावर पादचार्यांच्या by मराठी_माणूस
पण अनेक रस्त्याना पदपथ नसतात. राष्ट्रीय हमरस्ते आणि ऑटोमेटेड सिग्नल्स असलेली व्यवस्था सोडून इतर रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग असो नसो, पायी चालणार्यांचा पहिला हक्क असतो. सिग्नल्स नसलेल्या शहरांमधे पोलीस हजर असला तर सगळे ट्रॅफिक थांबवून रस्ता ओलांडणार्यांना मदत करतो. काल बाजारात एका झेब्रा क्रॉसिंगवर पोलीस हजर नसल्याने मला रस्ता क्रॉस करण्यासाठी १० मिनिटे थांबावे लागले. तरीही गाड्या थांबेनात. शेवटी दोन्ही बाजूच्या गाड्यांना पोलिसांसारखे 'थांबा' असे हात करून सरळ रस्ता ओलांडला. किती वेळ वाट बघणार?
राष्ट्रीय हमरस्ते आणि
In reply to तुम्हाला माहित नसेल कदाचित by पैसा
ह्याला काही आधार आहे का ?
.
In reply to राष्ट्रीय हमरस्ते आणि by मराठी_माणूस
हे चालणार्याला माहीत असुन काय फअअयदा ? गाडीवाल्याला हे ठाउक नसेल तर तो गाडी अंगावर घालेल की.
सर्च करा
In reply to राष्ट्रीय हमरस्ते आणि by मराठी_माणूस
सगळ्या जगभरची भरपूर उदाहरणे मिळतील.
बादवे
In reply to सर्च करा by पैसा
तुम्ही कुठच्या शहरात रहाता ते सांगा, म्हणजे तिथे चालताना मी नक्की पोलीस बरोबर असताना चालेन! कारण तुम्ही गाडी पायी चालणार्यांच्या अंगावर मुदाम घालणार्यांपैकी वाटत आहात! =))
उदाहरणे निश्चित मिळतील , पण
In reply to सर्च करा by पैसा
उदाहरणे निश्चित मिळतील , पण आखुन दिलेले नियम आहेत का ज्या मधुन पहीला हक्क कोणाचा ते समजेल
भारी मुद्दा काढलात की. असा
In reply to उदाहरणे निश्चित मिळतील , पण by मराठी_माणूस
भारी मुद्दा काढलात की. असा नियम लिखित स्वरूपात असणं जरा अवघडच दिसतंय. रस्त्यावर सगळ्यांचा सारखाच हक्क असला पाहिजे.
पण लेखी जरी नसलं तरी प्रॅक्टीकली पादचारी हे असुरक्षित असल्याने त्यांचाच हक्क पहिला हे गृहित धरून वाहन चालवणं श्रेयस्कर...
तमिळनाडूतली पोझिशन अशी असावी-
https://www.trafficwardens.in/traffic_logic.html
पादचारी हे असुरक्षित असल्याने
In reply to भारी मुद्दा काढलात की. असा by असंका
...
बरोबर, म्हणूनच त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी जिथे पदपथ असतील तिथे त्याचा वापर करावा.
हे बरोबर
In reply to पादचारी हे असुरक्षित असल्याने by मराठी_माणूस
पण लहान शहरात पदपथ नसतातच ना! तिथे काय रस्त्यावर यायचंच नाही का? मग मी झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यावरून शिस्तीत ट्रॅफिक थांबवून रस्ता क्रॉस करते. नाहीतर घरी पोचताच येणार नाही कधी!
पहिला हक्क
In reply to हे बरोबर by पैसा
रस्ता वापरण्याचा 'हक्क' सर्वांना आहे, तर वाहन चालकाला रस्ता वापरायला 'परवाना/ लायसेंन्स' घ्यावे लागते. म्हणून रस्त्यावर पहिला हक्क पादचार्याचाच असतो.
- स्वधर्म
असे जर असेल तर कित्येक
In reply to पहिला हक्क by स्वधर्म
असे जर असेल तर कित्येक ठीकाणी वहाने जाउच शकणार नाहीत. उदा. लोकल स्टेशन्स , जिथे लोकांची सतत येजा चालु असते. अशा ठीकाणी वहान इंचभर पुढे सरकणे सुध्दा दुरापास्त.
तात्पर्य , वहाने आणि पाद्चारी ह्यांनी तारतम्य ठेउन ये जा करावी.
सायकलला लायसेन्स लागत नाय....
In reply to पहिला हक्क by स्वधर्म
सायकलला लायसेन्स लागत नाय.....मग सायकलवाल्याचा हक्क पैला की पादचार्याचा?
झेब्रा क्रॉसिंगवर पादचार्
In reply to हे बरोबर by पैसा
झेब्रा क्रॉसिंगवर पादचार्यांना प्राधान्य आहे. वाहनचालकाने झेब्रा क्रॉसिंगवरून पुढे जाताना कुणी पादचारी क्रॉस करत नाहियेत हे बघून मगच पुढे जाणे अपेक्षित आहे.
याआधी संकल्प वगैरेला पास होता
याआधी संकल्प वगैरेला पास होता. पण आता ठरवलं आहे की पूर्वीपेक्षा जास्त आणि नियमित आर्थिक बचत करेन.
होउदे खर्च!!! :)
नवीन वर्षातील संकल्प
२०१४ च्या दिवाळीपासून " पालि " भाषेचा अभ्यास सुरु केला होता , त्याकडे थोडे दुर्लक्ष झाले होते
आता जून २०१५ पर्यंत पुर्ण करणार , म्हणजे करणारच ! !
छान संकल्प!
In reply to नवीन वर्षातील संकल्प by जयन्त बा शिम्पि
तुम्हाला खूप शुभेच्छा! त्यानंतर पाली भाषेतील वाङ्मयाची मिपावर जरूर ओळख करून द्या!
यावर्षी मोडी लिपी चा अभ्यास
यावर्षी मोडी लिपी चा अभ्यास करणे.
मागील वर्षी एका मिपाकराने दिलेली मोडी शिकण्याबद्दल दिलेली इपुस्तक अर्धीच वाचुन झालीत.
आता मात्र वेळ काढुन मोडी शिकण्यात येईल.
मोडी लिपी
In reply to यावर्षी मोडी लिपी चा अभ्यास by जेपी
मी मोडी लिपी साठी चार तीमाही मासिके जमविली आहेत व तिचाही अभ्यास करणार आहे, पण ती तितकीशी पुरेशी नाहीत
याची मला जाणीव आहे म्हणून विनंती कि तुमच्याकडे असलेले इ - मोडी लिपीचे पुस्तक फॉर्वर्ड करता येइल काय ? किंवा लिन्क पाठवता येइल काय ?
जयन्त शिम्पी
क्रुपा करुन मला ईपुस्तक
In reply to यावर्षी मोडी लिपी चा अभ्यास by जेपी
क्रुपा करुन मला ईपुस्तक फॉरवर्ड करु शकाल काय ?
रोज सूर्यनमस्कार
सूर्यनमस्कार घालणे आणि तब्येत जssssरा सुधारणे...किमान सर्दी तापापासुन दुर राहण्यापुरती
ऑफिसमधुन मिळालेल्या व्हाऊचर चा उपयोग करुन १-२ सर्टीफिकेशन पूर्ण करणे.
सुप्रभात
सुप्रभात
१)जुनी जैन हस्तलिखितं पाली भाषेत आहेत ना ?
२)पाली, अर्धमागधि, ब्राह्मि यावर लेखाची लिंक पाहिजे. ३)या मोडिसारख्या लिपी आहेत का भाषा? ४)युनिकोडमध्ये नसणार मग याचा फोटो टाकावा लागेल का ?
बौद्ध
In reply to सुप्रभात by कंजूस
जैन नव्हे, बौद्ध.
जुनी जैन हस्तलिखिते अर्धमागधीत आहेत.
भाषा आणि लिपी
In reply to सुप्रभात by कंजूस
पाली अर्धमागधी या प्राकृत भाषा आहेत. सुरुवात म्हणून त्यांच्याबद्दलची विकि पाने बघा. मिपावरचे श्री जयंत कुलकर्णी आणि प्रास या भाषांचे अभ्यासक तज्ञ आहेत.
ब्राह्मी ही लिपी आहे. तिच्यावरही विकि पान आणि अन्य माहिती जालावर उपलब्ध आहे. माझ्या आठवणीप्रमाणे वल्लीने या लिपीचा अभ्यास सुरू केला होता. त्याला जास्त माहिती विचारा.
मी संकल्प करतो, मी कुठला ही
मी संकल्प करतो, मी कुठला ही संकल्प करणार नाही आणि केला तरी तो कधीच पाळणार नाही.