उड उड रे
उड उड रे, उड उड रे, म्हारा काला रे कागला
माझ्या एका राजस्थानी मित्राच्या घरी गेलो असतांना त्याने एक राजस्थानी लोकगीत लावले होते. अस्सल ग्रामीण ढंगाचा ठेका वगेरेमुळे लक्ष वेधले गेले. भाषा माहित नसल्याने अर्थ कळेल असे वाटत नव्हते पण एकदम वाटावयास लागले की, "अरे, हे गाणे आपल्या परिचयाचे आहे," मित्राच्या मुलीला सांगितल्यावर तिने ते लिहून दिले व वाचल्यावर लगेच लक्षात आले कीं असे कां वाटत होते ! राजस्थानी गीत असे :
उड उड रे, उड उड रे, उड उड रे म्हारा काला रे कागला !!
कद म्हारा पियुजी घर आवे,कद म्हारा पियुजी घर आवे !
आवे रे आवे, उड उड रे, उड उड रे !!
खीर खांडरो जींमण जीमाऊं, सोनानी चोच मढाऊं, म्हारा कागा,
जद म्हारा पियुजी घर आवे !!
पगल्याने थारे, बांधुरे घुंगरा,गलेमे हार पैराऊं, म्हारा कागा !
जद म्हारा पियुजी घर आवे !!
आंगलियामे थारे अंगुठी कराऊं, चांदीका पांख लगाऊं, म्हारा कागा !
जद म्हारा पियुजी घर आवे !!
जो तू उडैने सगून बतावे,थारो जनम जनम गुन गाऊं, म्हारा कागा !
जद म्हारा पियुजी घर आवे !!
आवे रे आवे, जद म्हारा पियुजी घर आवे !!
कद--केंव्हा, जद-- जेंव्हा,खीर खांडरो-- साखरेची खीर, जीमण जीमाऊं --जेवूं घालीन. पाख--पंख
आता तुमच्याही मनांत गुंजी घालावयाला सुरवात केली असेल श्री. ज्ञानेश्वरांच्या विराणीने
पैल तोहे काऊ कोकताहे, शकून गे माये सांगताहे !
उड उड रे काऊ,तुझे सोन्याने मढवीन पाऊं !
पाहुणे पंढरीराऊ, घरा कै येती !!
दही भाताची उंडी, लावीन तुझे तोंडी !
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी !!
दुधे भरूनी वाटी,लावीन तुझे ओठी !
सत्य सांगे गोठी विठू येईल कारे !!
अंबिया डहाळी, फ़ळे चुंबी रसाळी !
आजिचीरे काळी शकून सांगे !!
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणे !
भेटती पंढरीराणे शकून सांगे !!
दोनही रचनांमध्ये काय साम्य आहे पहा .कुठे मारवाडमधील पतीची वाट पाहणारी गृहिणी आणि कुठे महाराष्ट्रातील विठूची वाट पहाणारा भक्त ? एक भेटीची आर्तता सोडली तर दोघांमध्ये कुठलीही समान गोष्ट शोधूनही सापडणार नाही. पण नाही तरी कसे म्हणावे ? दोघांनाही शकून विचारण्यासाठी एकच पक्षी सापडला-- काळा कावळा ! दोघेही त्याला "लाडिगोडी" करण्यास सारखेच तत्पर. दोघेही त्याला नुसते खावावयास गोड पदार्थ करून थांबावयास तयार नाहीत तर सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी त्याला मढवावयास सज्ज ! कावळ्याने झाडावर येऊन नुसते कोकायचे नाही तर परत उडून जावयाचे आहे. एकच धावा; उड ऊड रे, उड उड रे ! जणु दोघांनीही शेजारी शेजारी बसूनच धावा केला.
हे तर शक्यच नाही.स्थळ-काळात प्रचंड अंतर. मग काय चमत्कार आहे हा ?
लोक्गीत-विराणीच्या निर्मितीच्या काळाच्या फ़ार फ़ार मागे जा. आदीम काळात हिंदुस्तानभर,सर्वत्र,जनमानसात एक धृढ भावना रुजलेली होती. कावळा ओरडत उडाला तर प्रियकर घरी येणार. या समुजतीला स्थळ, काळ,भाषा कशाकशाचे बंधन नव्हते. शोध घेतला तर इतर भाषांमध्ये अशा रचना सापडणार नाहित कां ?
जरा शोधाना !
याद्या
3874
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
मीरा भजन -
सुपर्ब!
In reply to मीरा भजन - by शेखर काळे
हे फार रोचक आहे
सुंदरच!
अरे वा !मला उत्सुकता आहे तो
एकेरी रुचली नाही
In reply to अरे वा !मला उत्सुकता आहे तो by कंजूस
ते 'माईमोड'मध्ये तल्लीन झाले
In reply to एकेरी रुचली नाही by योगेश पाडेकर
+१
In reply to ते 'माईमोड'मध्ये तल्लीन झाले by प्यारे१
अशाच अर्थाच एक पंजाबी लोकगीत...
गदर: एक प्रेमचोथा
In reply to अशाच अर्थाच एक पंजाबी लोकगीत... by मनिम्याऊ
प्रेमचोथा??????? =))
In reply to गदर: एक प्रेमचोथा by बोका-ए-आझम
मस्त.
In reply to गदर: एक प्रेमचोथा by बोका-ए-आझम
वा!
भारीच!