खर्याचा जमाना आता राहीला नाही. पावलोपावली अबला स्त्रीची फसवणूक होताना दिसते आहे. आजचा स्वार्थी पुरुष एखाद्या विवाहीत वा अविवाहीत स्त्रीच्या भोळेपणाचा फायदा घेऊन तिला लग्नाचे अमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढतो आणि अत्याचार करतो. काय चाललंय हे... कुठे नेऊन ठेवला...
काश्मीरातला एक कॉलेज युवक, तिथलीच एक कॉलेज युवती. युवतीला त्या युवकाकडे पाहून 'लव्ह अॅट फर्स्ट साइट' झाले. ती प्रेमात पडली. प्रकरण घरच्यांपर्यंत गेले. घरच्यांचा विरोध नव्हता. मात्र त्यांनी आधी शिक्षण पूर्ण करा असा सल्ला दिला. त्याप्रमाणे दोघेही पुढील शिक्षणासाठी पुण्यात आले. पुण्यात आल्यावरही प्रेम टिकून होते. पण नंतर युवतीच्या आयुष्यात बरोबर शिकणारा आणखी एक नवा युवक आला. पुन्हा 'लव्ह अॅट फर्स्ट साइट' झाले. पहिला अडचण ठरू लागला. एके दिवशी नवा
युवक आणि युवती यांनी पहिल्याला कुठलातरी प्रसाद दिला. पहिला थेट देवाकडेच गेला. मार्गातली जुनी अडचण दूर झाली.
एक विवाहित तरुणी वय असेल २७ वर्षे. दोन मुले असलेली. नर्स म्हणून हॉस्पिटलमधे कामाला लागली. तिथेच जवळ एक पानटपरी होती. जाता येता पानटपरीवरच्या तरुणाबरोबर(वय २२ वर्षे) नजरानजर होऊ लागली. कामामधून वेळ काढून दोघे जवळच्या लॉजमधे जाऊ लागले. दोघांच्याही घरच्यांना या गोष्टी माहीत झाल्या. एक दिवस दोघे दुपारच्या वेळी लॉजमधे गेले. तरुण लग्नाचा आग्रह करु लागला. पण पतीपरमेश्वराला सोडून येणे या विवाहीतेला शक्य नव्हते. जग काय म्हणेल ही भिती होतीच. तिने नम्र नकार दिला.
दुसर्या दिवशी दोघेही लॉजच्या खोलीत संपलेले आढळले आणि बातमी बाहेर आली.
आणखी एक घटना. एक विवाहीता. दोन मुले. पतीपरमेश्वर सकाळी कामाला जात असे. ही घरीच घरकाम करीत असे. वय २८ वर्षे. घरासमोर एक तरुण वय २१ वर्षे रहायला आला. ओळख वाढायला लागली. एक एक टप्पा पुढे सरकू लागले. पुढे तिच्या लक्षात आले हे जग आपल्या या प्रेमाला मान्यता देणार नाही. त्यांनी ठरवले हे दुष्ट जगच सोडून जाऊया. हातात हात घालून दोघेजण
रेल्वे रूळावर जाऊन....
एकत्र जगता येणार नाही पण मरता तरी येइल असा त्यांनी विचार केला.
एक अबला स्त्री पोलिस स्टेशनला आली. भितीने थरथर कापत होती. पाण्याने भिजली होती. स्त्री म्हटल्यावर पोलिसांनी तिला सहानुभूती दाखवली, तिची आस्थेने विचारपूस केली. तिने खरोखरच भितीदायक कहाणी सांगितली.
२ वर्षांपूर्वी तिला एक तरुण भेटला. तिला त्याच्यावर 'लव्ह अॅट फर्स्ट साइट' झाले. त्यालाही ती पसंत होती. दोघांचा प्रेमविवाह झाला. लग्नानंतर दोघे अनेकदा गाडीवरून फिरायला जात. नदीवरच्या पूलावरून जाताना कधी कधी हा तरुण गाडी थांबवून
पूलावरून हातात हात घालून चालत जाण्याचा आग्रह करीत असे. किती रोंमँटिक आयडीया ना... पण बरोबर जाताना तो तिला नेहमी नदीच्या बाजूला ठेवी. याची नजर सदैव नदीकडे असे. हिला पाण्यात ढकलून देण्याच्या संधीची तो वाटच पाहत होता. असा संशय या तरुणीला आला. त्याचे एका दुसर्या स्त्रीबरोबर प्रकरण आहे असा तिचा अंदाज होता आणि त्यासाठी हिला तो
वाटेतून दूर करू इच्छित होता.
पोलिस स्टेशनमधे तिने ही सगळी हकीकत सांगितली आणि आज तर रात्रीच्या वेळी तो तिला नदीवरच्या पूलावरून चालत जाताना पाण्यात ढकलून देण्यात यशस्वी झाला होता. ती पाण्यात पडली. रात्रभर कशीबशी हातपाय मारत जिवंत राहिली. केव्हातरी पाण्याबाहेर आली. नवर्याच्या घरी जाण्याचा प्रश्नच नव्हता. जवळच नवर्याच्या मित्राचे घर होते. त्याच्या मदतीने पोलिस स्टेशनला हजर झाली.
तक्रारीप्रमाणे नवर्याला ताब्यात घेण्यात आले.
सर्वांनाच या अबलेबद्दल सहानुभूती होती. एक पोलिस कर्मचारी मात्र थोडासा शंकित होता. त्याने तपास केला. या तरुणीची केव्हातरी नवर्यामुळेच नवर्याच्या मित्राशी ओळख झाली. त्या मित्राबरोबर 'लव्ह अॅट फर्स्ट साइट' झाले. नवर्यावर खूनाच्या प्रयत्नाचा आरोप ठेवून त्याला तुरुंगात धाडणे शक्य होते. त्यानंतर ही अबला नवर्याच्याच
मित्राबरोबर आरामात....
पोलिसाच्या काठीने साप मारण्याचा बेत होता.
अशीच एक काश्मिरी तरुणी. नवरा गेल्यावर पुण्यात नोकरी धंदा शोधण्यासाठी आली. एके ठिकाणी मुलाखतीला गेली असता तिला एक तरुण भेटला. पुण्यात नोकरी मिळवण्यासाठी तो उपयोगी पडेल असे तिला वाटले. मैत्री वाढवली. त्यानेही नोकरी मिळवून देण्याचे तिला आश्वासन दिले. पण नोकरीचे अमिष दाखवून तो कित्येक महिने ती राहत होती त्या लॉजवर येऊन तिच्या भोळेपणाचा गैरफायदा घेत राहीला. पुढे तिला नोकरी मिळाली. भोळेपणा संपला. तिला नोकरी नसताना झालेल्या अन्यायाची जाणीव झाली. त्याप्रमाणे तिने पोलिसात तक्रार दिली. तरुणाला अटक झाली. अबलेच्या भाबडेपणाचा फायदा उठवण्याची बरी शिक्षा मिळाली.
तर सध्या लग्नाचे अमिष दाखवून बरेच प्रकार होत आहेत.
वाचने
25768
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
हं !
बोला....छापा की काटा?
होय. अश्या गोष्टी सर्रास
.
कुठे नेऊन ठेवला युयुत्सु माझा
In reply to . by hitesh
युयुत्सु
In reply to कुठे नेऊन ठेवला युयुत्सु माझा by अत्रुप्त आत्मा
वयाच्या मानाने बरेच जुने आठवते कि पुर्वजन्मीचे आठवते आहे....
In reply to युयुत्सु by कपिलमुनी
मटामधील एक बातमी.
अभिनंदन
In reply to मटामधील एक बातमी. by सतिश गावडे
चांगली लिंक आहे रे धन्या
In reply to मटामधील एक बातमी. by सतिश गावडे
पाटील आणि देशमुख म्हणजे वेगळे
In reply to मटामधील एक बातमी. by सतिश गावडे
रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर
In reply to पाटील आणि देशमुख म्हणजे वेगळे by काळा पहाड
जैन म्हणजे हिंदूच हो. जैन असा
In reply to रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर by प्यारे१
बास्स का????
In reply to जैन म्हणजे हिंदूच हो. जैन असा by काळा पहाड
असहमत
In reply to जैन म्हणजे हिंदूच हो. जैन असा by काळा पहाड
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार!
तिरकसपणा आवडला...
हे लग्नाचं आमिष कसं दाखवायचं
त्याआधी इथले "जाणकार" कोण ते
In reply to हे लग्नाचं आमिष कसं दाखवायचं by काळा पहाड
(No subject)
In reply to त्याआधी इथले "जाणकार" कोण ते by टवाळ कार्टा
पुन्हा
In reply to हे लग्नाचं आमिष कसं दाखवायचं by काळा पहाड
जाणकार=?
अनुभवी (प्रॅक्टिकल) जाणकार
In reply to जाणकार=? by तुषार काळभोर
एरवी ठीक होतं, इथे नव्हे.
In reply to अनुभवी (प्रॅक्टिकल) जाणकार by काळा पहाड
इथे पहा
पांडेवर लग्नाचे आमिष दाखवून
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार
खरंय
In reply to लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार by nishapari
सहाय्यक पोलीस निरीक्षकाने