बुद्धीबळाच्या या धाग्याच्या निमित्ताने मला मला इथलेच व्यासंगी चतुरंग यांचा खास उल्लेख करून त्यांचे आभार मानायचे आहेत. गेली काही वर्षे नियमितपणे त्यांनी ज्या आत्मीयतेने बुद्धीबळाविषयी लेख लिहून आणि जागतिक बुद्धीबळ स्पर्धेच्या अनुषंगाने विश्लेषणात्मक चर्चा घडवून आणली, आणि बऱ्याच हौशी पाठीराख्यांना या खेळाचा आनंद घ्यायला लावला, त्याला तोड नाही. आणि त्यांनीच इथल्या बऱ्याच लोकांना मदतीला घेऊन चिकाटीने आंतर्जालावरील पहिल्याच अशा आगळ्या-वेगळ्या 'बुद्धीबळाचे नियम' या पुस्तिकेचं संकलन आणि प्रकाशन केलं. या पुस्तिकेचा दुवा मी पुढे या धाग्यात दिलेला आहे. त्यांनी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी मला हा उपद्वयाप करायचा विचार करायला उद्युक्त केलंय. या ऑनलाईन बुद्धीबळाच्या धाग्यासाठी नीलकांत यांच्या पाठिंब्याबरोबरच संपादकांनीही मदत केली आहे, अपर्णा अक्षय, पैसाताई, किसन शिंदे, प्रा डॉ, वल्लीशेठ हे त्यांपैकी काही; प्रभाकर पेठकर, मुक्तविहारी आणि संजय क्षीरसागर यांनीही प्रोत्साहन दिलं, त्या सर्वांचे आभार!
तांत्रिक अडचणी न येता शक्य झाल्यास जानेवारी १० ते जानेवारी २५ या कालावधीत खुली बुद्धीबळ-स्पर्धा घेऊन २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी विजेते घोषित करण्याचा प्रयत्न आहे.
मिसळपाव
प्रतिक्रिया
बुद्धीबळ अजिबात खेळता येत नाही.....
बहुगुणी तुम्ही तुमचे नाव सार्थ केले...
हो, पूर्ण झालेल्या सामन्यातील खेळी पहाता येतात
In reply to बहुगुणी तुम्ही तुमचे नाव सार्थ केले... by ज्ञानोबाचे पैजार
किती जणांनी भाग घेतला?