खरेतर भाताच्या या प्रकाराला व्हेज बिर्याणी म्हटले पाहिजे असे काहि नाहि. रेसिपी बिर्याणीची आहे, पण मी माझ्या पद्धतीने त्यात थोडे फ़ेरफ़ार केले आहेत.
साहित्य:
भातासाठी:
१. २ वाटी बासमती तांदुळ,
२. १ वाटी फ़ुलकोबी
३. १ किसलेले गाजर,
४. १/२ वाटी मटार,
५. २-३ फ़रसबी तोडुन त्याचे तुकडे करुन घ्या
६. १/२ बटाट्याचे तुकडे
ओला मसाला:
१. ३-४ हिरव्या मिरच्या
२. ३ पाकळ्या लसुण
३. थोडेसे आले (आले म्हणजे अद्रक)
४. १/२ लहान कांदा
कोरडा मसाला
१. २-३ लवंग
२. दालचिनी पावडर
३. जीरा पावडर
४. धणे पावडर
५. हळद
६. तिखट
७. गरम मसाला
इतर साहित्य
१. मीठ
२. दीड वाटी दही
३. १ कॅरमलाईज़्ड कांदा. (कॅरमलाईज़्ड याला मराठी प्रतिशब्द काय आहे?)
कृती:
१. फ़ुलकोबी, गाजर, वाटाणा,फ़रसबीचे तुकडे, बटाट्याचे तुकडे अर्धकच्चे शिजवुन घ्यावे.
२. तांदुळाच्या अडिचपट पाणी घेउन त्यात तांदुळ घालावे. वरुन झाकण ठेवुन तांदुळ शिजवावा. उरलेले पाणी काढुन टाकावे. तयार भात परातीत मोकळा करुन ठेवावा.
३. ओला मसाला :
मिरच्या, लसुण, कांदा, अद्रक एकत्र करा. त्यात २ चमचे दही घालावे आणि हे मिश्रणा वाटुन एकजीव करावे.
४. एका भांड्यात थोडे तेल घालावे. तेल गरम झाल्यावर त्यात ओल्या मसाल्य़ाची पेस्ट टाकुन परतावे.
५. पेस्ट गुलाबी रंगावर परतुन त्यामध्ये लवंग, १/२ टीस्पून दालचिनी पावडर, १ टीस्पून जीरा पावडर,
१ टीस्पून धणे पावडर, १/२ टीस्पून हळद, १ टीस्पून तिखट, १ टीस्पून गरम मसाला घालावा.
१ मिनीट परतुन घ्यावे.
६. दीड वाटी दही आणि अर्धकच्च्या भाज्या घालुन २ मिनीट शिजवावे.
७. भात आणि कॅरमलाईज़्ड कांदा त्यात घालावा. सगळे पदार्थ व्यवस्थीत एकत्र करावेत.
८. २ मिनीट वाफ़वुन घ्यावे.
बिर्याणी तयार.
कांदा कॅरमलाईज़्ड कसा करावा?
१. कांद्याचे उभे बारीक काप करावे.
२. तव्यावर थोडे (२-३ चमचे) तेल घालावे. तेल तव्यावर सगळीकडे पसरेल याची काळजी घ्या.
तेल गरम झाले कि त्यावर कांदा परतवावा.
३. कांदा थोडा परतल्यावर २ चिमटी मीठ आणि १/२ टीस्पून साखर घालावी.
४. कांदा चांगला लालसर रंगावर परतुन घ्यावा
===========================================================
"मिपावर हे माझे पहिलेच लेखन.
हीच रेसिपी मी माझ्या ब्लोग वर पण लिहिली आहे.
मुविंनी दिलेल्या प्रोत्साहनाने मी हि रेसिपी मिपावर टाकतोय. मुवि, प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.
फोटो काढायचे लक्षात न आल्याने , फोटो नाहीत :(
रेसिपीचे फोटो इतके सुंदर येऊ शकतात हे मला मिपावरच कळले. (ह्या वाक्यात अज्जिब्बात अतिशयोक्ती नाहीय)
फोटो नसल्याची चूक माझ्याकडे. त्याबद्दल नावे ठेवा, अर्थात त्यासाठी मिपाकरांना माझ्या परवानगीची गरज नाही
पुढच्या वेळेस माझी रेसिपी आठवणीने फोटोसह लिहून ठेवीन."
वाचने
16977
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
पा.क्रु. मस्त...
आणि हो....
फोटो नसला तरी पाकॄ एक्दम
आईने सुरुवातीला अंदाजे ,
In reply to फोटो नसला तरी पाकॄ एक्दम by पिलीयन रायडर
मस्त रेसिपी
In reply to आईने सुरुवातीला अंदाजे , by अनन्त अवधुत
आमच्या विदर्भात पण
In reply to मस्त रेसिपी by मितान
आपल्या मराठवाड्याशी फार जवळचे
In reply to मस्त रेसिपी by मितान
छान आहे
पाकृ आवडली. पुढच्या वेळी फोटो
आणखिन एक
In reply to पाकृ आवडली. पुढच्या वेळी फोटो by मधुरा देशपांडे
.
धन्यवाद. चांगली कल्पना आहे.
In reply to . by hitesh
http://www.maayboli.com/node/12868
पान पाहता येत नाही
In reply to http://www.maayboli.com/node/12868 by hitesh
वेज बिर्याणी
In reply to पान पाहता येत नाही by अनन्त अवधुत
मस्त पाकृ
पटतंय
In reply to मस्त पाकृ by सस्नेह
हे आणि एक अ.अ.
कुरकुरीत कांदा
In reply to हे आणि एक अ.अ. by स्पंदना
+१
In reply to हे आणि एक अ.अ. by स्पंदना
येवा महाराजा
In reply to +१ by एस
फोटो ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लोकमान्य { एक युगपुरुष } Releasing 2nd January, 2015फोटो
In reply to फोटो ? by मदनबाण
मस्तच
बिर्याणी मसाले भात करणे कधीच
छान
व्यवस्थित
तोन्दला पानि सुतले
कय म्हन्तय हे असं कधि पसुन
In reply to तोन्दला पानि सुतले by यमगर्निकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions US opening of oil export tap widens battle for global marketअत्तच वत्ले असेल
In reply to कय म्हन्तय हे असं कधि पसुन by मदनबाण
अरे बाबांनो....
In reply to अत्तच वत्ले असेल by टवाळ कार्टा
व्हेज बिर्याणी
मस्त
In reply to व्हेज बिर्याणी by अनुपमा स्वप्निल
बिर्यानि मधे पुदिना व
कोथिंबीर ठीक आहे पण
In reply to बिर्यानि मधे पुदिना व by palambar