कालच एक मला मिपा का आवडते? ह्या विचारांवर धागा काढला होता.
त्या लेखाला प्रतिसाद म्हणून "बिरुटे सरांचे" एक वाक्य होते.
"मिपा" हे पण एक आभासी जग आहे.
मला तर कधीच ते आभासी जग वाटले नाही.त्यामुळे वेळ मिळाला की मी सरळ मिपाकरांशी गाठभेट घ्यायचा प्रयत्न करतो.
स्नेहांकिता ताईंचा प्रतिसाद आला, की "एक जोरदार मिपा कट्टा व्हायला पाहिजे." त्याला मितान आणि अजया ह्यांचे अनुमोदन पण मिळाले.
तर मिपाकरांनो, एक जोरदार मिपाकट्टा करू या का?
कट्ट्याला आम्ही कधीच नाही म्हणत नाही.
कट्टा कुठेही असला आणि मला वेळ असेल तर, घरदार सोडून मी कट्ट्याला हजेरी लावतो.
एक ठिकाण सुचवतो,
कर्जत जवळ "कशेळी" म्हणून एक गांव आहे.
बर्यापैकी झाडी आहे, छान पैकी ४०-५० माणसे बसू शकतील अशी जागा आहे.जवळच एक छोटे तळे आणि बाजूला लेणी-गुंफा पण आहेत.आधी ऑर्डर दिली तर तिथेच जेवणाची सोय पण होवू शकते.
मी कंजूस ह्यांचा हात धरून गेलो होतो.त्यामुळे कुणी कुठून कसे यायचे ते माझ्या पेक्षा कंजूसच जास्त सांगू शकतील.
एका दिवसात होणारी ट्रिप असल्याने, मुंबईत आणि पुण्यात , राहणार्या सर्व मिपाकरांना एकदम योग्य जागा.माणशी जास्तीत जास्त २०० ते २५० रुपये खर्च होतील आणि ते पण येण्या-जाण्याच्या खर्चासकट.
हा धागा फक्त ठिकाण निश्र्चीती आणि दिनांक ठरवायलाच आहे.
मला २८ फेब्रुवारी किंवा १ मार्च चालेल.
धागा काथ्याकुटातला असल्याने भरपूर काथ्या कुटावा.
इथे माझा सहभाग संपला.
विषय आणि माझा प्रतिसाद मूळ धाग्यातच गुंफला आहे.ह्या चर्चेच्या गुर्हाळातून जे काही ठिकाण आणि दिनांक ठरवल्या जाईल, त्याला माझी मान्यता आहे.
कशेळी बद्दलची जास्तीची माहिती कंजूस सांगतील.
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा वा !
शब्द दिल्याप्रमाणे धागा आला की !
कशेळी इथे बसने कसे जायचे व पुण्याहून किती वेळ लागतो ? आणि तारीखही ठरवा पटापट .
येणार !
येणार !
येणार.
येणार.
शक्यतो येईनच.
शक्यतो येईनच.
येणार येणार येणार!
तारीख थोडी अलिकडे घेता येईल का? बोर्ड एक्झाम सुरु होतात ३ मार्च पासुन.
कशेळी वनविहार का? कर्जत मुरबाड रस्ता?कोंडाणे लेण्याजवळ?छान जागा अाहे.पण स्वतःचे वाहन असल्यास सोयीचे होईल असे वाटते.
राजमाचीवरुन उतरताना एकदा
In reply to येणार येणार येणार! by अजया
राजमाचीवरुन उतरताना एकदा कोंडाणे लेणी पाहिली होती.
तारीख थोडी अलिकडे घेता येईल का?
In reply to येणार येणार येणार! by अजया
बोर्ड एक्झाम सुरु होतात ३ मार्च पासुन."
नक्कीच घेता येईल.
कारण मी माझी साधारण तारीख सांगीतली.
इतर मिपाकर काय म्हणतात ते बघू.
एकदम ब्यास कल्पना
अशा कट्ट्याची कल्पना मी मा. इस्पिक एक्का यांच्याकडे बोललो होतो. सोयिस्कर प्रवास , जवळचे ठिकाण व मर्यादित खर्च हे एकत्र आले तर अनेक मिपाकर हौशीने येतील.
असे मिपाकट्टे वारंवार होवो व
In reply to एकदम ब्यास कल्पना by चौकटराजा
असे मिपाकट्टे वारंवार होवो व या विश्वे प्रेमभाव वाढो ही तो श्रींची इच्छा आहे... आम्ही केवळ ती परत सांगणारे आणि सहमत होणारे भारवाही हमाल, बस. :)
अवांतर : "मा. इस्पिक एक्का" मधले ते "मा." काय आहे ??? त्या शब्दाने अनेक श्या सुरू होतात, म्हणून आम्हाला शिंपल "इस्पीकचा एक्का" किंवा अतिशिंपल "एक्का"च ज्यास्त आवडते याची माननियांनी दखल घ्यावी. ;)
हेच विचारणार होतो
In reply to असे मिपाकट्टे वारंवार होवो व by डॉ सुहास म्हात्रे
हेच विचारणार होतो =))
ते "मा." पुढारीलोकांसाठीच असूदे ;)
अरर्र
In reply to असे मिपाकट्टे वारंवार होवो व by डॉ सुहास म्हात्रे
ते टंकायला चुकलेले दिसतेय मागे अशा शब्द लिहिताना मा. असे आली आरे हां स्वारी बरं का !
आता ही स्वारी कशाला ? तुमी
In reply to अरर्र by चौकटराजा
आता ही स्वारी कशाला ? तुमी स्वारी घोड्या-उंटावर करा, नायतर हत्तीवर. आमाला नको तुमची स्वारी. ;) पुढच्या कट्ट्याला लवकरच भेटू आणि मस्त गफ्फा मारू, वाटल्यास दोन दोन कालसर्पनिवारक फलरस पिऊ, काय म्हंताव ? :)
ठिकाण :वनविहार ,
ठिकाण :वनविहार ,
ही एक फलोद्यान सहकारी(बागाईत शेतीचे प्लॉट) संस्था आहे. त्यात राहणे, जेवण इत्यादिची व्यवस्था एका प्लॉटमध्ये आहे. श्री शिवाजी ते करतात.
काय आहे: लेणी(विहार), नदी, वन, मागे भिमाशंकर डोंगर, जवळ कोथळीगड (पेठचा किल्ला).
प्रवेश फी :नाही.
जेवण :नाश्ता, चहा, जेवण (वेज नॉनवेज).
पार्किँग :भरपूर.
राहणे :तीन खोल्या ४०० ते६००रु.
संपर्क 9226093034 शिवाजी
0214683313
जावे कसे :नेरळ स्टे -१२किमी कशेळे जाणाऱ्या ६सिटर शेअररिक्षाने -कशेळे-१५रु+१२किमी जामरुघ जाणाऱ्या रिक्षाने १५रु -वनविहार.
पुण्याच्या मिपाकरांना १२ ते ४ इतका कट्ट्यावर वेळ मिळेल.
पुण्याकडून :सकाळची सह्याद्री थेट नेरळलाही थांबते. १०.००वाजता तिथून रिक्षा करून जागेवर ११.३०होतील. परत जाण्यासाठी कर्जतहून ६.००प्रगति/ डेक्कन क्वीन मिळेल.
मुंबईकडून :नेरळसाठी खूप लोकल ट्रेनस आहेत.
कोणीही अगोदर जाऊन खात्री करू शकता.
राजमाचीवरून कोंडाणेला उतरल्यावरचे श्री अनिल/वसंत गोगटे यांचे वनविहार वेगळे आहे. तिथे आता त्यांनी एक अंबेजोगाईचे देउळ बांधले आहे.
कर्जत-कशेळे-मरबाड या रस्त्याला नेरळ -कशेळे -जामरुघ रस्ता क्रॉस जातो. कशेळेहूनच आणखी एक रस्ता खांडस (भिमाशंकरसाठी)जातो.
मी नक्की येणार...रात्रीचा
मी नक्की येणार...रात्रीचा मुक्कामाचा बेत असेल तर मग धमाल
रात्रीचा मुक्कामाचा बेत असेल तर मग धमाल...
In reply to मी नक्की येणार...रात्रीचा by टवाळ कार्टा
ओके
हा पण मुद्दा विचारात घेण्याजोगा आहे.
पण तिथल्या खोल्या फार सुंदर नाही आहेत.
त्यामुळे राहण्याची फार अपेक्षा करू नकोस.
पण जेवण मस्त असते.
मिपाकर असताना कोण खोल्यांची
In reply to रात्रीचा मुक्कामाचा बेत असेल तर मग धमाल... by मुक्त विहारि
मिपाकर असताना कोण खोल्यांची रंगसंगती बघतोय (वल्लीबुआंबद्दल माहित नाही ब्वॉ)
पत्त्यांचे क्यॅट...चिकन...रंगीत पेय (हे असावेच असे काही नाही)...गप्पा...आणखी काय हवे रात्र जागवायला
चालेल
In reply to मिपाकर असताना कोण खोल्यांची by टवाळ कार्टा
मस्त झब्बु, चॅलेंज खेळत बसू...
एखादी शेकोटी पेटवू...
अजुन कुणी येणार असेल तर फारच उत्तम...
आयला मला वाटले तुम्ही
In reply to चालेल by मुक्त विहारि
आयला मला वाटले तुम्ही मेंढीकोट, रम्मी, पोकर अशी नावे घ्याल ;)
तुला पोकर येतो...
In reply to आयला मला वाटले तुम्ही by टवाळ कार्टा
मला नाही येत...
मला शिकव
शिकवतो की
In reply to तुला पोकर येतो... by मुक्त विहारि
शिकवतो की
पुण्याचे दोन चारजण अगोदर येऊन
पुण्याचे दोन चारजण अगोदर येऊन पाहून गेलात तर कल्पना (=IDEA) येईल आणि कायमचं एक {गुप्त}कट्टयाला ठिकाण 'भेटेल'. धडपड्यांसाठी पेठचा किल्ला ,भिमाशंकर आहेच. फोटोग्राफीसाठी रानपक्षी(नंदन नाचण ,भृंगराज मोठा शेपटीवाला कोतवाल कांचन, टकाचोर सोनपाठी सुतार )आहेतच.
लै भारी. तारीख सांगा आपली
लै भारी. तारीख सांगा आपली हजेरी आत्ताच पक्की समजा.
अहो भाऊ
In reply to लै भारी. तारीख सांगा आपली by विजुभाऊ
तुम्ही तुमच्या सोयीची एखादी तारीख सांगा की...
८ किंवा१५ फेब्रुवारी? रविवार
८ किंवा१५ फेब्रुवारी? रविवार आहे.
मस्तच!
मुलांच्या परीक्षा कधी असतील माहित नाही. पण तसे काही नसेल तर नक्की येणार!
७ फेब्रुवारी किंवा १४
७ फेब्रुवारी किंवा १४ फेब्रुवारी चालेल. दोन्ही दिवशी शनिवार ला जोडून रविवार आहे आहे.
!
In reply to ७ फेब्रुवारी किंवा १४ by विजुभाऊ
शनिवारला जोडुन फक्त रविवारच येतो असे किमान आमच्यातरी शाळेत शिकवले होते. रविवार सोडुन आणखी कुठला वार येऊ शकतो हे माहितच नव्हते!
विजुभाऊ, कृ. ह. घ्या. :)
शनिवारला जोडून शुक्रवार पण
In reply to ! by भाते
शनिवारला जोडून शुक्रवार पण असतो असे आमच्या शाळेत आम्हाला शिकवले होते ;) :)
बरोब्बर. दुसरी एक शक्यता
In reply to शनिवारला जोडून शुक्रवार पण by डॉ सुहास म्हात्रे
बरोब्बर. दुसरी एक शक्यता म्हणजे एखादे दिवशी तिथी लय असेल तर,,,,,,,,,,,,WinkSmile
१४ फेब्रुवारीला आधीच ठरलेले
१४ फेब्रुवारीला आधीच ठरलेले प्लान्स असणार बावा ;)
मिळाली वाट्टं कंपनी ?
In reply to १४ फेब्रुवारीला आधीच ठरलेले by टवाळ कार्टा
मिळाली वाट्टं कंपनी ?
कृपया विनोद ह घेणे ! *biggrin*
येणार!
येणार म्हणजे येणार!
१४ फेब्रुवारी उत्तम...
मग हीच तारीख नक्की करू या का?
नक्को...मग माझे नक्की नाही
In reply to १४ फेब्रुवारी उत्तम... by मुक्त विहारि
नक्को...मग माझे नक्की नाही ;)
हॅहॅहॅ...
In reply to नक्को...मग माझे नक्की नाही by टवाळ कार्टा
हॅहॅहॅ...
व्यालेंटाइन डेला मिपाकरांबरोबर टीपी केला तर सासूबाईंना वाईट वाटेल.
तुम्ही दोघेही बावळटच आहात...
In reply to हॅहॅहॅ... by अनुप ढेरे
उलट तुमच्या गर्ल फ्रेंडला पण मिपाकर बनवा...(आम्ही पण आमच्या बायकोला मिपाकर करून घेतले आहे.मिपा ही तिची लाडकी सवत आहे.)
आणि
सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून तिथेच तुमचा प्रेमदिवस साजरा करा...
मिपाकर कट्ट्यात दंग असल्याने तुमच्याकडे कुणाचे लक्ष जाणार नाही...
आधी बनू तर दे
In reply to तुम्ही दोघेही बावळटच आहात... by मुक्त विहारि
आधी बनू तर दे ;)
म्हणूनच्च मी सासूबाई
In reply to हॅहॅहॅ... by अनुप ढेरे
म्हणूनच्च मी सासूबाई बनवणारच्च नै कोणाला :P
मुविंचा त्रिवार निषेध
हे असे कट्ट्यांचे धागे काढतात, वर ते यशस्वी करुन दाखवतात आणि मग जळवणारे फोटु/वॄतांत येतात.....जल्ला ईनो चा पन काय ईफेक्ट होत नाहि. मुवि मी आल्यावर जर एखादा कट्टा केला नाहित तर याद राखा....
मित्रा...
In reply to मुविंचा त्रिवार निषेध by दिपक.कुवेत
"मी आल्यावर जर एखादा कट्टा केला नाहित तर याद राखा...."
ह्यावेळी तुमच्याबरोबर उरण कट्टा करायचा बेत आहे.
रविवार ठेवा मग १५ चा.हाकानाका
रविवार ठेवा मग १५ चा.हाकानाका.
मला चालेल...
अजून कोणाला काही आक्षेप?
रैवार ब्येष्ट ! सुट्टी आस्तीय
रैवार ब्येष्ट ! सुट्टी आस्तीय सगळ्यान्ला :)
रैवार पेक्षा शनिवार बरा पडेल.
रैवार पेक्षा शनिवार बरा पडेल. रैवारी दंगा करून दुसर्या दिवशी हापिसाला जायाला लै वंगाळ वाटतं
विजुभाउ...
In reply to रैवार पेक्षा शनिवार बरा पडेल. by विजुभाऊ
खरा दंगा शनिवारी रात्री करू...
हाकानाका.
तुम्ही बासरी घेवून या...
(प्लॅनिंग डॅमेजर) मुवि
हे बेश्ट
In reply to विजुभाउ... by मुक्त विहारि
हे बेश्ट
माझं ऐका दोन चार जण येऊन तिथे
माझं ऐका दोन चार जण येऊन तिथे पाहून गेलात तर ठरवायला सोपे जाईल. शनिवारी काही जण आलात तर खासकरून पुणेकरांस भरपूर वेळ मिळेल. मुंबईचे रविवारी सकाळी ९ वाजता येऊ शकतात.
अनुमोदन...
In reply to माझं ऐका दोन चार जण येऊन तिथे by कंजूस
कारण फक्त माझ्या आणि कंजूस ह्यांच्या अनुभवावर जावू नका.
कारण आमच्या कडून पण काही चूक होवू शकते.
थांबा ..
In reply to अनुमोदन... by मुक्त विहारि
जरा त्या टकाला विचारतो...
(नाहीतरी उगाच टाइमपास करत बसलाय...लावु या कामाला)
चालेल की...आम्ही एक छोटा
In reply to थांबा .. by मुक्त विहारि
चालेल की...आम्ही एक छोटा कट्टा करु ;)
कंजूस भाऊ
In reply to चालेल की...आम्ही एक छोटा by टवाळ कार्टा
तुम्ही पण टकाला घेवून जावून याल का?
नक्कीच. या रविवारी नको. छोटा
नक्कीच. या रविवारी नको. छोटा ट्रेक कर्नाळा पक्का आहे. कोणाला यायचे असेल तर सांगा. भटक्या खेडवाला, हु एक्का येत आहेत.
१४-१५ बिझी असणार आहे,
१४-१५ बिझी असणार आहे, त्यामुळे शक्य नाही. त्यातही फायनल झाली तारीख की कळवा, मग मी काय ते सांगतो.
आँ ?
In reply to १४-१५ बिझी असणार आहे, by सूड
पंदराला बी बिजी ? का चौदाला यित्का बिजी की १५ ला येनं शक्य न्हाई ? १४ ला काय धा मईल चालनार हैस का "गड्या" ?
अग्गागा...यावर आणखी एक लिहिले
In reply to आँ ? by चौकटराजा
अग्गागा...यावर आणखी एक लिहिले असते पण...च्यायला हा पण मधे येतो :(
हायला, लिव की!! पर मंग म्या
In reply to अग्गागा...यावर आणखी एक लिहिले by टवाळ कार्टा
हायला, लिव की!! पर मंग म्या काय उत्तर दिलं तं त्ये बी चालवून घ्याचं, कसं?
लिवा की वो...हकूना मटाटा
In reply to हायला, लिव की!! पर मंग म्या by सूड
लिवा की वो...हकूना मटाटा :)
काका, तुमास्नी आपल्या
In reply to आँ ? by चौकटराजा
काका, तुमास्नी आपल्या कंपूच्या व्यनित सांगतो. ;)
हुम्म्म
कशेळ्यापासुन १३ किमी वर आंबिवली गाव आहे तिथेच पेठचा किल्ला आहे आणी जवळच बौद्ध कालीन स्तुप पण आहेत.
कशेळ्यासाठी नेरळ किंवा मग कर्जतही व्यवस्थित राहिल.
नेरळ-कळंब-सुगवे-कशेळे (२९ किमि)(शक्यतो टाळा)नेरळ-कोल्हिवली-वाकस-कशेळे (१३ किमि) (विक्रम असतात खुप)
कर्जत-कडाव-कशेळे (१४ किमि)(कडाव ला गणपतीचे प्रशिद्ध मंदिर आहे एस्टी स्टँडच्या मागेच)
कशेळ्या जवळच लालवाडी आहे जिथे वेतापासुन फर्निचर बनवले जाते इच्छुक असाल तर जावु शकता तिथेच नैसर्गिक पदार्थ जसे मध वगैरे आणी तत्सम वस्तुपण मिळतात
माहिती बद्दल धन्यवाद...
In reply to हुम्म्म by इरसाल
ह्या फेब्रुवारीत थोडा व्यस्त आहे.
पुढचा कट्टा बडोद्याला करायचा बेत आहे.
(कट्टेकरी) मुवि
नक्कीच
In reply to माहिती बद्दल धन्यवाद... by मुक्त विहारि
कधीही या बडोद्यात तुमचे स्वागतच आहे.
खूप दिवस झाले आणि
In reply to नक्कीच by इरसाल
बर्याच वेळा आपण ठरवले पण राहूनच जातंय...
पण आता ह्या वर्षी भेटू याच..
मिपा कट्यावर मी येणे योग्य राहिल काय..
हे यासाठी विचारतोय की मला असे वाटतेय की मी तुमच्यात सर्वात लहान असेल.माझे वय 23 आहे.
वयाचा आणि कट्ट्याचा काय संबंध?
In reply to मिपा कट्यावर मी येणे योग्य राहिल काय.. by चेतन677
ये बिंधास्त...
भेटू या.
मिपाकर शारिरीक वयाने जितके
In reply to मिपा कट्यावर मी येणे योग्य राहिल काय.. by चेतन677
मिपाकर शारिरीक वयाने जितके मोठे तितका जास्त दंगा करतात :)
+ १
In reply to मिपाकर शारिरीक वयाने जितके by टवाळ कार्टा
सहमत
या इथे प्रत्येकासाठी वेगळी
या इथे प्रत्येकासाठी वेगळी आव्हाने आहेत.
.
मी येणार नाही
माहित आहे...काहितरी नवीन
In reply to . by hitesh
माहित आहे...काहितरी नवीन सांगा की राव...म्हणजे हितेस हा अवतार येणार नाही का सगळेच अवतार येणार नाहीत ;)
वे क्नोव थत, तेल्ल उस
In reply to . by hitesh
वे क्नोव थत, तेल्ल उस सोमेथिन्ग नेव दुदे!!
१५ फेब्रुवारीनंतर असेल तर
१५ फेब्रुवारीनंतर असेल तर अस्मादिकांची हजेरी लागू शकते.
स्पार्टाकस
In reply to १५ फेब्रुवारीनंतर असेल तर by स्पार्टाकस
तुम्ही केंव्हा येत आहात?
त्यावेळी परत एका कट्ट्याचे आयोजन करण्यात येईल.
३० जनेवारीनंतर कुठेही
३० जनेवारीनंतर कुठेही केव्हाही असुदेत, यावेळी मात्र मी येणारच आहे..........
मी पण येणार त्या निमित्ताने
मी पण येणार त्या निमित्ताने आभासी जगातील मिपाकरांची व्यक्तिशः भेट होईल
ओ तारीख बघाकी जरा
In reply to मी पण येणार त्या निमित्ताने by प्रणवजोशी
ओ जोशी साब.. तारीख बघा की जरा...झाला की हा वनविहार कट्टा आणी वर्णने पण आली होती...
तात्या, दोन वर्षापूर्वीचा
In reply to मी पण येणार त्या निमित्ताने by प्रणवजोशी
तात्या, दोन वर्षापूर्वीचा धागा आहे हा!!
तरीच म्हटलं मुवि मध्येच कुठे कट्टा करतायत...
In reply to मी पण येणार त्या निमित्ताने by प्रणवजोशी
कंफूज झालो ना राव......