Skip to main content

मुळ्याचा ठेचा

लेखक इशा१२३ यांनी गुरुवार, 25/12/2014 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
m साहित्यःमुळा चकत्या १ मोठी वाटी मुळ्याचा पाला १ मोठी वाटी कोथिंबिर २ चमचे मिरच्या ७ ते ८ (आवडिनुसार) लसुण ३ पाकळ्या जिरे १/२ चमचा लिंबु रस १ चमचा मीठ साखर तेल m1 कृती: मुळ्याच्या चकत्या आणि मुळ्याचा पाला ठेचुन घ्यावा.ठेचायला शक्य नसेल तर मिक्सरवर जाडसर एकत्र वाटुन घ्या. कोथिंबिर्,जिरे,मिरच्या आणि लसूण एकत्र वाटुन घ्या. कढईत मोहरी,हिंग,हळदिची फोडणी करून त्यात मिरचीचे वाटण घाला.एकदा परतुन घ्या. त्यात ठेचलेला मुळा आणि मुळ्याचा पाला टाकावा. पाला भरपुर परतुन झाल्यावर मीठ्,किंचीत साखर टाकावी एक वाफ आल्यावर लिंबाचा रस घालावा.छान एकत्र केले कि मुळ्याचा ठेचा तयार. हा ठेचा थोडा तिखटच असावा.गरम भाकरी,घट्ट दहि आणि मुळ्याचा ठेचा थंडित मस्त लागतो. mt

वाचने 27430
प्रतिक्रिया 49

प्रतिक्रिया

मस्त प्रकार , आजच करुन पाहते

मस्त प्रकार! आणि ते ताट काय सॉल्लिड दिसतंय!

हे मिश्रण वापरून पराठे पण रापचिक होतात! दह्याबरोबर अफलातून लागतात!

छान

मुळ्याची मुळ चव आवडत नाही पण हे असे इतर चवींचे संस्कार करुन खाऊ शकते. त्यामुळे नक्की करणार.

हा वेगळा प्रकार करुन पहाते. नशिबाने परड्यात मुळे आलेत! :)

'मुळातच ठेचा' असे नाव वाचले गेल्यामुळे हा लेख पाकृमध्ये आल्याचे नवल वाटले. हा लेख 'धोबीपछाड' मध्ये येणे अपेक्षित होते. असो, मस्त पाकृ, तोंपासु.

करून बघणार. आम्ही कोणत्याही ठेच्याची सामग्री शक्यतो अगोदर तव्यावर परतून घेतो आणि मग ठेचतो. एकदा असा करून पाहिला पाहिजे.

मस्त प्रकार , आजच करुन पाहते

एक शंका. मुळा मिक्सरमधून काढल्यावर परतताना गोळा होत नाही का ?

नक्की करून पाहतो. फ़ोटो आणि वर्णनावरून छान पदार्थ आहे असे वाटते.

पा.कृ चविष्टं वाटते आहे. पण मुळ्याचा वास .. जो , त्यावर कितीही संस्कार केले तरी जाता जात नाही, त्या मूळे कराविशी वाटत नाहीये.

हिवाळ्यात दिल्लीत मिळणारे मुळे गोड असतात. कालच मुळ्याचे परांठे केले होते. मुळ्याची दही घातलेली कोथिंबीर ही मस्त लागते. सरसों च्या साग बरोबर किसून त्यात वरती पसरवलेला मुळा, मस्त स्वाद येतो. मुळा, मुळ्याचा पाला, बेसन लाऊन ही भाजी मस्त होते. शिवाय धिरडे ही मस्त लागतात. कोवळा आणि मध्यम आकाराच्या मुळ्याचे वरचे साल काढून, त्याला अर्धी चीर देऊन त्यात चाट मसाला व वरून लिंबू पिळून ठाकले कि मस्त स्वाद येतो. दिल्लीत ठेल्यांवर हे मुळे खायला मिळतात. आम्ही घरी सुद्धा मुळे कापून त्यात चाट मसाला आणि लिंबू लाऊन सलाड सारखे खातो. असो.

In reply to by विवेकपटाईत

अहो एव्हढ लिहीलत पण, एखादा शब्द ही पाककृती कशी वाटतेय, त्याबद्दलही येउ दे. की मुळा पुराणात विसरुन गेलात?

In reply to by विवेकपटाईत

मुळ्याची दही घातलेली कोथिंबीर ही मस्त लागते.
पदार्थाच्या आठवणीने लिहीता लिहीता 'श' चा 'थ' झालाय का? ;)

थंडी मधे अश्या अस्सल करंट देणार्‍या पाककृती(विशेषतः शेवटच्या फोटूं सारखे ,फोटू टाकून! :-/ ) टाकू नयेत, अशी विणम्र सुच्णा करुण आम्मी आम्चे दोण श्ब्द संपवितो..धण्यवाद!

याला आम्ही मुळ्याचा भगरा म्हणतो. ज्वारीच्या भाकरीबरोबर चांगला लागतो. आम्ही नेहमी करतो परंतू चवीला साखर आणि लसूण घालत नाही. माझ्या मते दोन शहाणे एकत्र नांदत नाहीत (मुळा आणि लसूण दोन दर्पवाले पदार्थ एकाच भाजीत).

आणखी पौष्ठिक करायाचे असेल तर त्यात कणिक [गव्हाचे पीठ ] आणि ईतर पीठे उदा. ज्वारीचे, बाजरीचे, तांदुळाचे पीठ व चणा डाळीचे पीठ पण घालु शकता.

काल केला . मस्त आहे रेसिपी. एक नवीन पदार्थ Ad झाला. धन्यवाद. सुदैवाने घराजवळ काही कच्छी लोक भाज्या पिकवतात, पाणि चांगले आहे. त्यामुळे मूळे ताजे मिळाले. हा ठेचा वापरून परोठे करायचा विचार आहे.

@भ ट क्या खे ड वा ला..करून बघितलात आणि पोच दिलीत त्याबद्दल धन्यवाद! @ चिजय..हो हा ठेचा वापरून थालीपीठ्,पराठे छान होतात.

तुझा नाव इशा १२३ बदलून ठेचा १२३ ठेवायला हवं . ठेच्यांचा भांडार आहे तुझ्याकडे. मुळा मला मनापासून आवडतो आणि तुझ्या फोटो मुले अजून च टेम्प्ट व्हायला झालंय. तशी माझ्याकडे पण खूप मोठी लिस्ट आहे ठेच्ण्यासारख्या गोष्टींची :P तुझ्याकडे पाक्रु असली तर दे ;)

कुणाला ठेचायचे आहे त्यावर कृती ठरेल.तु सांग तशी पाकृ देतेच.=b :tongue: