नॉन लेव्हल प्लेइंग गेम
क्रीडा स्पर्धा कोणतीही असो तेथे धर्म,जात व वंश या गोष्टींना थारा नसतो.अपवाद फक्त लिंगाचा,कारण स्त्री व पुरुषातील शारीरिक ठेवण व नैसर्गिक सामर्थ्यातील फरक हाच त्यामागील उद्देश असावा.स्पार्धा समान पातळीवर व्हावी या उद्देशाने अनेक क्रिडा प्रकारांचे गट पाडले गेले.उदा: मुष्ठीयुद्धात खेळाडूच्या वजनाप्रमाणे हेवी वेट व लाईट वेट असे गट पाडले गेले.कोणत्याही गटातील खेळाडूला आपले वजन कमी जास्त करून संबंधित गटात भाग घेता येतो. येथे वजन हे प्रमाण मानले गेले आहे. या उलट उंच उडी ,लांब उडी आणि धावण्याच्या स्पर्धेत वजन आणि उंचीचे बंधन नसते.कोणत्याही व्यक्तीची उंची ठराविक वयापर्यंत वाढते त्यानंतर ती स्थिर राहते.त्यामुळे कोणालाही आपल्या उंचीमध्ये नैसर्गिकरित्या फेर-फार करता येत नाही आणि येथेच काही कमी उंचीच्या खेळाडूंवर अन्याय होतो. कमी उंचीच्या खेळाडूंची जास्त उंचीच्या खेळाडूंबरोबर स्पर्धा लावल्याने खेळाडूच्या नैसार्गिक सामर्थ्याची कसोटी लागत नाही.
सारख्याच उंचीच्या दोन खेळाडूत एकाचे पाय लांब व कमरेवरील धड लहान व दुसर्याचे पाय छोटे व धडाची उंची जास्त असू शकते. अशा वेळी उंच उडी लांब उडी व धावण्याच्या खेळात लांब पाय असलेल्या खेळाडूला छोटे पाय असलेल्या खेळाडूपेक्षा कमी श्रम व अधिक फायदा होतो.सारख्याच उंचीच्या खेळाडूंनी दोन पायात समान कोन ठेवून धावले असता लांब पायाचा खेळाडू हा छोट्या पायाच्या खेळाडूपेक्षा अधिक आंतर कापतो.दोघानाही समान कोन साधण्यासाठी सारखेच श्रम लागतात, परंतु पावलातील अंतरातील फरकामुळे बरोबरी साधण्यासाठी छोट्या पायाच्या खेळाडूला पायांची जास्त हालचाल करावी लागते, त्यामुळे शरीरातील जास्त उर्जा खर्च पडते उदा: १० पावलात उंच पायाचा खेळाडू ३० फूट अंतर कापत असेल ( पावलातील अंतर ३ फूट धरू ) तर छोट्या पायाचा खेळाडू १० पावलात २५ फूट अंतर कापेल ( पावलातील अंतर २.५ फूट धरू ) म्हणजे छोट्या पायाच्या खेळाडूला बरोबरीने धावण्यासाठी ३० फुट अंतर कापण्यासाठी २ पावले अधीक टाकावी लागतील,यासाठी त्याला अधिक वेगाने पायांची हालचाल करावी लागेल अधिक हालचाल म्हणजे अधिक उर्जा,अधिक उर्जा खर्च झालामुळे अधिक थकवा त्यामुळे खेळाडूच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.येथे २ खेळाडूंच्या शरीरातील समान उंची परंतु पायाच्या असमान उंचीमुळे या खेळाडूंवर खेळामध्ये समान पातळीवर स्पर्धा होते असे मला तरी वाटत नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बरोबर आहे
Anthropometry data collect
योग्यच
माल्कम ग्लॅडवेलच्या
खेळात पण आरक्षण ठेवायचं
वजनानुसार
बुद्धिबळाच्या
ज्युडिथ पोल्गर?
माल्कम ग्लॅडवेलचे
>>दोघानाही समान कोन
मोमेंट ऑफ इनर्शिया
वजन कंट्रोल करणे ठराविक
वजन व पायांच्या
एवढी गुंतागुंत बघून लोक या
जर उन्चीमुळे कोणी या खेळात
डी एन ए सारखे असणे हा निकष
डीएनए सारखे असणे या निकषालाच
ठ्ठो!!! =))
उंच खेळाडुच जिंकतात
छान प्रतिसाद
नाही पटले
तुमच्या लॉजिक प्रमाणे आता
जगात नवीन गट-तट आणि
मार्मिक गोडसेंची प्रतिक्रिया