इथली माझी पहिलीच पोस्ट आहे . . काही चुकलं असल्यास सांभाळून घ्या .
ऑफिसचं फुकटचं इंटरनेट वापरून चांगली गाणी / सिनेमा डाउनलोड करणे . आणि ते तिथेच बघत/ ऐकत बसणे या पेक्षा दुसरी मजा नाही . . त्यातही तो कुठला डब केलेला तमिळ / तेलगु सिनेमा असेल . तर मग . . आहाहाहा . काल हि हेच चाललं होतं . .आणि तेवढ्यात . फोन वाजला . कोण आहे हे न बघता मी उचलला . आणि मी काही बोलायच्या आतच . समोरून आवाज आला . " घरी येणार आहेस कि नाही आज . कि तिथेच गादी टाकून दिलाय तुमच्या मालकाने . घर आहे म्हणावं मला . " आणि फोन कट .
माझा चेहरा बघून माझा HOD म्हणाला . " मा का फोन था क्या ? .
मी म्हणलो . " हा . " आणि वेळ बघितली . . ९ वाजले होते. ७ वाजता पोचलो पाहिजे होतो मी घरी . . बॉस ला म्हटलं उरलेला सिनेमा उद्या बघू . .. .
गडबडीत निघालो . . आणि मग एक सिग्नल . .
सिग्नल ला थांबलो होतो. मागे एक होंडा सिविक वाले काका . आणि त्या मागे ' के एस आर टी सी ' .
आणि भारतीय प्रथे प्रमाणे . शेवटचे १० सेकंद असतानाच . कार वाल्याने जोर जोरात होर्न मारायला सुरुवात केली . या अपेक्षेने कि मी निघेन. पण . फक्त मागे बघितलं त्याच्याकडे . एक विचित्र चेहरा केला . . आणि तिथेच थांबलो . .
शेवटचे ६ सेकंद . . त्याने आपली गाडी जवळपास माझ्या गाडीला आणून लावली होती . खिडकीतून हात काढून काही तरी बडबडत होता . डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे मला फार काही ऐकू आलं नाही . . उगाचच बैला सारखी . एकदा होय म्हणून . एकदा नाही म्हणून मुंडी हलवली . आणि त्याला इशारा केला . जायचं असेल तर डोक्यावरून जा . सिग्नल सुटे पर्यंत मी नाही हलणार .
झक मारत बसला शांत . सिग्नल हिरवा झाला . आणि मी आरामात निघालो .या विचारात कि जाताना एखाद्या हॉटेलात "थाळी" ओरपावी . कि आपलं गप्प घरी जाऊन वरण भात खाउन सुखी राहावं . आणि एकदमच . एक सिविक माझ्या उजव्या बाजूला होती . डाव्या बाजूला सरकत होती . एक वेळ अशी आली कि मी अडकलोच होतो पूर्ण . थांबवली गाडी .
साहेब उतरले सिविक मधून . . मी तर गाडीवरच होतो . त्यानंतरचं संभाषण असं काहीसं झालं .
तो :- (प्रचंड चिडलेला . आणि आवाज रागामुळे टिपेला पोहोचलेला ) स्वतःला हरिश्चंद्राची औलाद समजतोस काय बे . . पुढे का नाही गेलास . उगाच थांबून काय उखडत होतास . .
मी (त्याच्या या वाक्यामुळे मला राग कमी आणि हसू जास्त येत होतं . . आवाजात थंडपणा ) :- तुम्ही काय सेबेस्तियन वेटेल चे वडील आहात का . ३ सेकंद वेळ झाला तर रेस हरणार आहात का.
तो (बहुतेक वेटेल कोण हे माहित नसावं . ) :- फोकलीच्या . उलटून बोलतोस . तुझ्या बापाच्या वयाचा आहे मी . .
मी :- म्हणूनच अजून पर्यंत आवाज नाही चढलेला . . गप्प निघ आता इथून . एक तर भूक लागले . घरी जायला वेळ होतोय मला .
तो :- च्यायला . बापाच्या पैशावर गाडी घेऊन माज करतोस होय रे भाड्या . साल्या तुझ्या अक्ख्या गाडीच्या किमतीत माझ्या गाडीचं बम्पर पण येत नाही .
मी ( हा कुठला विषय कुठे नेतोय हा विचार करत . ) :- म्हणूनच सांगतोय . गप्प निघ इथून . उगाच गाडीवर खर्च करायला लागेल नाही तर . आणि हो . राहिला विषय मी माज करतो याचा . तर बाप माझा आहे . आणि पैसे पण माझे आहेत . त्याचं मी काहीही करेन . आता निघ इथून . आणि मला पण जाऊदे . डोकं नको फिरवू . मारामारी करायचा मूड नाहीये अजिबात .
तसा तो थोडा काटक होता . त्यामुळे . जरी काही झालं तरी सांभाळू शकेन एवढी खात्री होती . एव्हाना गाडीवरून उतरून मी समोर थांबलो होतो त्याचा . उंचीला पण कमी होता . त्यामुळे . कमीत कमी स्वतःला वाचवू तरी शकलो असतोच आरामात .
पण . काय झालं काय माहित . फिरला परत तो . गाडीत बसता बसता पुटपुटला . "आजकालची मुलं . उलटून उत्तर देतात मोठ्यांना . . आई बापाने काही शिकवलं नाही वाटतं . इत्यादी इत्यादी .
गाडी चालू करता करता मी ओरडलो . "आज कालचे मोट्ठे . सिग्नल पण पाळता येत नाही . . .
आता तो चिडून मला मारायला येतोय असं वाटत असतानाच . ट्राफिक पोलिस आला . त्याने हे सगळं पाहिलं होतं.
कार वाल्याला मागे ओढलं . आणि मला म्हनला . "मनेग होगो मगने . झगडा माडतान रस्ते मेले . कत्ती " (घरी जा . रस्त्यात भांडत बसलाय गाढव )
त्याला उत्तर दिलं तर मी पण अडकलो असतो . . तिथून जी सुटलो तो डायरेक घरीच .
तर . नमनाला घडा भर तेल घालून आणी मूळ प्रश्न विचारायचं सोडून हजार कडे भटकून आल्यानंतर हा प्रश्न . .
शेवटचे ५-६ सेकंद थांबायला काय जातं लोकांच . ?
एवढे पण पेशन्स नाहीत का ? कि ५ सेकंदाने का होईना . पण कायदा मोडतोय राजरोस . आणि आपल्याला कोणी काही करू शकत नाही याची खात्री वाटते . कि याचा कुठे तरी अभिमान वाटतो ?
वाचने
12548
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुडंट अग्री मोर. इवरु दोड्ड
मराठी संस्थळावर अगम्य भाषेत
In reply to कुडंट अग्री मोर. इवरु दोड्ड by बॅटमॅन
हे तुम्ही माताडावे यातच खरी
In reply to मराठी संस्थळावर अगम्य भाषेत by यसवायजी
होउदु . खरे इष्टे कन्नड
In reply to कुडंट अग्री मोर. इवरु दोड्ड by बॅटमॅन
@बॅटमॅन-काय लिवलय?
भाषांतर
In reply to @बॅटमॅन-काय लिवलय? by जेपी
(असे कधीतरी करायला मिळावे अशी
In reply to भाषांतर by बॅटमॅन
तिथेच असूनही असा चान्स काही
In reply to (असे कधीतरी करायला मिळावे अशी by टवाळ कार्टा
इन्शागणपती >>
In reply to तिथेच असूनही असा चान्स काही by बॅटमॅन
"इन्शागणपती" हा शब्द आवडल्या
In reply to तिथेच असूनही असा चान्स काही by बॅटमॅन
कर्नाटकात ( बेंगलोर ? )
तुम्ही चेन्नैचे/च्या का ओ?
In reply to कर्नाटकात ( बेंगलोर ? ) by सिरुसेरि
बाकी कर्नाटकात ( बेंगलोर ? )
In reply to कर्नाटकात ( बेंगलोर ? ) by सिरुसेरि
नाही . बेळगाव . .
In reply to कर्नाटकात ( बेंगलोर ? ) by सिरुसेरि
हं!
आपल्या गाडीचा क्रमांक
हे होतंच जवळपास सगळी कडे .
In reply to आपल्या गाडीचा क्रमांक by आयुर्हित
भाग्यदा लक्ष्मी बारम्मा
आदरे येन माडोन अंतीरा?
In reply to भाग्यदा लक्ष्मी बारम्मा by hitesh
ननगे कन्नड बुर्गेदील्ला.
In reply to आदरे येन माडोन अंतीरा? by यसवायजी
पहिलाच लेख आहे होय? चांगलं
माहित नाही । पण जेवढे नियम
In reply to पहिलाच लेख आहे होय? चांगलं by असंका
ग्रेट! अभिनंदन....
In reply to माहित नाही । पण जेवढे नियम by अद्द्या
मी असंच करतो. नेहमी. करत
स्वतःच्या सुरेक्षेचे नियम
In reply to मी असंच करतो. नेहमी. करत by वेल्लाभट
चुकताय....
In reply to स्वतःच्या सुरेक्षेचे नियम by अद्द्या
सिग्नल्स असे हवेत
मला हा लेख वाचून 'संक्षिप्त
कृपया
In reply to मला हा लेख वाचून 'संक्षिप्त by प्यारे१
चालतंय.
In reply to कृपया by सस्नेह
म्हणजे नक्की काय ?
In reply to मला हा लेख वाचून 'संक्षिप्त by प्यारे१
समदा उलगडून सांगायचा काय रे
In reply to म्हणजे नक्की काय ? by अद्द्या
व्वा !
.
In reply to व्वा ! by मितान
मी कुठे तसं म्हणाले ?
In reply to . by hitesh
त्यांना 'तसंच' वाटलं
In reply to मी कुठे तसं म्हणाले ? by मितान