✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पं. भीमसेन जोशी यांना भारत रत्न, मिपावर अजून एकदा दिवाळी साजरी होणार... श्री. तात्या अभ्यंकर

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Tue, 11/04/2008 - 23:01  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11265 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

ल
लिखाळ Tue, 11/04/2008 - 23:05 नवीन

वा

वा खरंच आनंददायक बातमी आहे... पं. भीमसेनांचे अभिनंदन आणि त्यांना अभिवादन. पुण्याच्या कीर्तीमध्ये अजून भर पडली म्हणून अजून आनंद झाला :) --लिखाळ.
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Tue, 11/04/2008 - 23:08 नवीन

आनंदाची बातमी

वा खरंच आनंददायक बातमी आहे... पं. भीमसेनांचे अभिनंदन आणि त्यांना अभिवादन. माझ्याकडून सुध्दा :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
स
सर्वसाक्षी Tue, 11/04/2008 - 23:16 नवीन

सादर अभिनंदन!

बातमी ऐकताच सर्वप्रथम तात्याला हाळी दिली. तात्या उचलत नव्हता - बहुधा फटाक्याची माळ लावायला गेला असावा. पंडितजी हे आमच्या तात्याचे एक श्रद्धास्थान!
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 11/04/2008 - 23:20 नवीन

अभिनंदन आणि अपार आनंद

पंडितजींचे अभिनंदन आणि त्यांना भारतरत्न मिळाल्याने अपार आनंद झालेल्या माझ्यासारख्यांचेही! (आनंदित)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 11/04/2008 - 23:32 नवीन

सहमत

अतिशय छान बातमी. आपला (अमेरिकारत्न) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ऋ
ऋषिकेश Wed, 11/05/2008 - 09:07 नवीन

असेच म्हणतो

पंडितजींचे अभिनंदन आणि त्यांना भारतरत्न मिळाल्याने अपार आनंद झालेल्या माझ्यासारख्यांचेही! -(अत्यानंदीत) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
र
राघव Wed, 11/05/2008 - 12:34 नवीन

असेच

म्हणतो! (अत्यानंदीत) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
र
रेवती Tue, 11/04/2008 - 23:21 नवीन

छान झाले.

श्री. भिमसेन जोशींचे अभिनंदन! तात्यांना भयंकर आनंद होणार तर! रेवती
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Tue, 11/04/2008 - 23:29 नवीन

वा..

वा.. पंडीतजींचे अभिनंदन.. खरच आज भारतरत्नाला किंमत आली!
  • Log in or register to post comments
स
साती Tue, 11/04/2008 - 23:31 नवीन

आनंदाची बातमी.

पंडितजींना भारतरत्न मिळाल्याचा आनंद तर आहेच आहे पण तात्यांना किती आनंद आणि अभिमान वाटेल हा विचार करून आणखीनच आनंद झाला. साती
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 11/04/2008 - 23:31 नवीन

आनंद झाला

आज खरंच 'भारतरत्न' पदवीला किंमत आली आहे असे वाटते. असेच बातमीचा मथळा वाचताना वाटले...
  • Log in or register to post comments
च
चकली Tue, 11/04/2008 - 23:31 नवीन

आनंद

खुप आनंद झाला. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 11/04/2008 - 23:35 नवीन

विठ्ठलाच्या पायी थरारली वीट!

त्या सावळ्यालाही आनंदाचे भरते आले असेल तिथे तुमची आमची अवस्था तर वेड्यासारखी होणारच! पंडितजींचे त्रिवार अभिनंदन! अभिजात संगिताचाच हा सत्कार आहे असे मी मानतो!! (इतकी परमानंदाची बातमी पोचवल्याबद्दल बिपिनदा आणि आण्णांचे मानसशिष्य तात्या ह्यांचेही अभिनंदन) चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 11/04/2008 - 23:40 नवीन

यथोचित !

उत्तम बातमी ! अतिशय आनंदाची ! चतुरंग यांचे पोस्ट अतिशय अर्थपूर्ण !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
स्वाती दिनेश Wed, 11/05/2008 - 00:11 नवीन

असेच..

पंडितजींचे त्रिवार अभिनंदन! अभिजात संगिताचाच हा सत्कार आहे असे मी मानतो!! चतुरंग यांच्यासारखेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
छ
छोटा डॉन Wed, 11/05/2008 - 00:15 नवीन

आजी सोनियाचा दिनु ...

धत्ताड धत्तड धत्तड !!! धत्ताड धत्तड धत्तड !!! धत्ताड धत्तड धत्तड !!! धत्ताड धत्तड धत्तड !!! वाजवा रे ढोल ताशे वाजवा, गुलाल उधळा ... आज भारतरत्न पुरस्काराचाच सन्मान झाला आहे ...
पंडितजींचे त्रिवार अभिनंदन! अभिजात संगिताचाच हा सत्कार आहे असे मी मानतो!!
अगदी अगदी, अगदी असेच म्हणतो ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्रमोद देव Tue, 11/04/2008 - 23:35 नवीन

भारत रत्न किताबाचा सन्मान!

पंडीत भीमसेनांना हा किताब मिळाल्यामुळे त्या किताबाचाच सन्मान झालाय!
  • Log in or register to post comments
क
कुंदन Tue, 11/04/2008 - 23:41 नवीन

असेच म्हणतो...

अतिशय आनंदाची बातमी ! पं. भीमसेनांचे अभिनंदन आणि त्यांना अभिवादन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 11/05/2008 - 10:18 नवीन

आनंदाची बातमी

पंडीत भीमसेनांना हा किताब मिळाल्यामुळे त्या किताबाचाच सन्मान झालाय! अशाच भावना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
य
यशोधरा Tue, 11/04/2008 - 23:36 नवीन

आज खरंच

आज खरंच 'भारतरत्न' पदवीला किंमत आली आहे असे वाटते. अगदी, अगदी!! खुशीची बातमी एकदम!!
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Tue, 11/04/2008 - 23:50 नवीन

सोनियाचा दिवस आजि अमृते पाहिला

सोनियाचा दिवस आजि अमृते पाहिला अण्णांचे हार्दिक अभिनंदन. भावना व्यक्त करायला शब्द नाहीत. क्षमा असावी. आपला, (भारावलेला) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Tue, 11/04/2008 - 23:55 नवीन

अवघियांचे काळे केले तोंड

अण्णांविषयी काहीबाही बोलणार्‍यांना, तुकाराम महाराजांच्या शब्दात आणि अण्णांच्या सुरात सांगावेसे वाटते:- तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे अवघियांचे काळे केले तोंड आपला, (भीमसेनी) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 11/04/2008 - 23:56 नवीन

आमच्या

आमच्या अण्णांना भारतरत्न मिळावं यापरिस दुसरी आनंदाची गोष्ट ती कोणती? :) त्यांचा मला भरपूर सहवास लाभला, खाजगी तसंच जाहीर मैफलीतलं त्यांचं अगदी भरपूर गाणं ऐकायला मिळालं, गाण्याविषयी चार मोलाच्या गोष्टी त्यांच्या पायाशी बसून शिकता आल्या हे माझं भाग्य! चला, आता लौकरच पुण्याला जायला हवं, आणि जातांना त्यांना आवडणारी साजूक तुपातली जिलेबी न्यायला हवी! :) आपला, (अण्णांचा भक्त) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 11/05/2008 - 00:01 नवीन

जा, जा लगेच जा पुण्याला तात्या!

आणि आम्हा समस्त 'मिपाकरांच्या' सद्भावना आण्णांपर्यंत पोचवा! त्यांना आयुरारोग्य लाभो हीच कानडा विठ्ठलूचरणी प्रार्थना! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 11/05/2008 - 00:05 नवीन

आमच्यातर्फे...

तात्या, मगाशी तुला म्हणलं तसं, तू पेश्शल पुण्याला जा, समस्त मिपापरिवारातर्फे त्यांना साष्टांग दंडवत घाल. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
वाटाड्या... Wed, 11/05/2008 - 00:05 नवीन

अण्णांच्या प्रति..

अण्णांच्या तब्येतीबाबत चिंतातुर इकडे ऐकायला येतयं.... अशात अण्णांसाठी फक्त एकच.. उठ (संगीत)पंढरीच्या राया...वाढ वेळ झाला... थवा (संगीत)वैष्णवांचा दारी आला... अण्णांना त्रिवार वंदन...अण्णांच्याच आवाजातला 'जो भजे....' ची प्रचिती आली. भारतरत्नाची किंमत वाढली....अण्णांना अभिनंदन... आपल्या सगळ्यांच आभार व अभिनंदन.. मुकुल
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 11/05/2008 - 00:07 नवीन

आनंदाचे डोही आनंद..

खूप चांगली बातमी. खर्‍या रत्नाला आज भारत रत्न मिळालं आहे. भारत रत्न हे नाव खरंच सार्थ झालं आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मिंटी Wed, 11/05/2008 - 09:56 नवीन

सहमत......

प्राजुशी एकदम सहमत...... खरच आज पंडितजींना भारतरत्न पुरस्कार देऊन भारतरत्न हे नाव सार्थ केलं सरकारनी..... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
क
कपिल काळे Wed, 11/05/2008 - 00:13 नवीन

भारत रत्न चा सन्मान

हा तर भारत रत्न ह्या किताबाचा सन्मान. ह्या वेळी सवाईपर्यन्त पुण्याला परतायचा विचार होता. तो आता दृढ झाला आहे. ह्या वर्षी सवाइत चंगळ असणार. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 11/05/2008 - 00:15 नवीन

ही बातमी

ही बातमी ऐकायला आज आमच्या वत्सलावहिनी हयात असायला हव्या होत्या..! तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अमित.कुलकर्णी Wed, 11/05/2008 - 00:30 नवीन

अतिशय

अतिशय आनंदाची बातमी! भीमसेनजींचे अभिनंदन आणि त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो ही प्रर्थना. अमित
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Wed, 11/05/2008 - 02:04 नवीन

अभिवादन

संगीताच्या सूर्याला आमचे त्रिवार अभिवादन!!!! हा स्वरभास्कर आपल्या असीम तेजाने अखिल जगत प्रकाशमान करत राहो हीच जगन्नियंत्याकडे प्रार्थना!!! -भटोबा
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 11/05/2008 - 02:34 नवीन

मिपा ने बातमी सांगीतली . .

अतिशय आनंदाची बातमी! सकाळी नेहेमीप्रमाणे कार्यालयात आल्या आल्या मिपा उघड्ले अन् लगेच ही गोड बातमी पाहीली. लगेचच काही मराठी पेपर च्या संकेतस्थळावर जाउन बघु लागलो तर काही दिसले नाही. आता दोन तासांनी सकाळ वर बातमी पाहीली. मिपा म्हणजे आमचे न्युज चॅनेल झाले आहे. धन्यवाद. पंडितजींचे अभिनंदन !! सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 11/05/2008 - 04:26 नवीन

किताब पावन जाहला!

मिळणार की नाही, मिळणार की नाही अशा वावड्या उठत. न मिळाल्याचे पाहून वाईट वाटे. पण आजच्या दिवशी ते सगळे विसरलो... धुंद झालो. खरेच आज तो किताब पावन झाला. खरोखरीच्या भारत रत्नाला प्राप्त झाल्याबद्दल. आपण आज पेढे वाटणार (आणि खाणार पण)! आपला, (भारावलेला) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 11/05/2008 - 07:37 नवीन

सनई चौघडे वाजवा!

अतिशय आन॑दाची बातमी! सकाळी रेडिओवर ऐकल्यावर मन जणू थुई थुई नाचायलाच लागले.. घरातल्याच व्यक्तीचा अत्युच्च सन्मान झाल्यासारखे वाटले.. मी मनात म्हटल॑च, मिपावर पुन्हा एकदा दिवाळी साजरी होणार! सरकारने आमच्या मनासारखा निर्णय उशिरा का होईना घेतल्याबद्दल त्या॑चेही आभार. मराठी पाऊल पडते पुढे..
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 11/05/2008 - 07:46 नवीन

अण्णांचे अभिनंदन !!

खर्‍या रत्नाला आज भारत रत्न मिळालं आहे!! चलो !! मिपा वर पून्हा एकदा दिवाळी साजरी करुयात !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Wed, 11/05/2008 - 09:04 नवीन

मानाचा मुजरा !

स्वरभास्करांना मानाचा मुजरा ! योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची अशीच चांगली बुध्दी विधाता भारत सरकारला देवो ही त्याच्या चरणी प्रार्थना -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
र
रामदास Wed, 11/05/2008 - 09:20 नवीन

चलो, देर आये दुरुस्त आये.

सरकारी किताब फार उशीरा येतात. यावेळी हा उशीर झाला नाही म्हणून आनंद झाला. पंडीतजींना आरोग्य आणि दिर्घायुष्याच्या शुभेच्छां. अभिनंदन आणि अभिवादन.
  • Log in or register to post comments
प
पक्या Wed, 11/05/2008 - 09:25 नवीन

आनंदाची

आनंदाची बातमी! स्वरभास्करांना दंडवत आणि त्यांचे हार्दिक अभिनंदन !!!
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 11/05/2008 - 09:38 नवीन

धंदड

धंदड त्तत्तड, धंदड त्तत्तड, धंदड त्तत्तड, धंदड त्तत्तड,........... (आनंदाने नाचणारी स्मायली) अत्यंत आनंदाची बातमी. :) आज सकाळी चहा पित पित पेपर पाहिला आणि आणि मन नाचु लागल. काहि महिन्यांपुर्वीच भारतरत्न ह्या पदवीसाठी असलेल राजकारण क्षणभर आठवल आणि आताच समाधान कैक पटीने वाढल. खरच योग्य निर्णय थोडा उशीरा का असेना. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
व
विजय आचरेकर Wed, 11/05/2008 - 10:05 नवीन

पं. भीमसेनांचे अभिनंद

पं. भीमसेनांचे अभिनंद
  • Log in or register to post comments
व
वेताळ Wed, 11/05/2008 - 10:28 नवीन

पंडीतजी चे हार्दिक अभिनंदन

आज हा अभिजात संगिताचा सत्कार झाला आहे. पंडीतजीना व तात्याना परत एकदा हार्दिक शुभेच्छा. वेताळ
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 11/05/2008 - 15:28 नवीन

पंडीतजीना

पंडीतजीना व तात्याना परत एकदा हार्दिक शुभेच्छा. अरे मला कशाला रे शुभेच्छा? :) मला त्यांचा चांगला सहवास लाभला, चांगलं गाणं कशाला म्हणावं याबाबतचे त्यांचे विचार खूप जवळून ऐकायला मिळाले इतकंच.. एरवी अण्णांचे लाखो चाहते आहेत त्यापैकीच मीही एक. त्यांना हा पुरस्कार देऊन सरकारने आपल्या सर्वांचाच सन्मान केला आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
व
विसुनाना Wed, 11/05/2008 - 10:42 नवीन

पं. भीमसेन जोशी

अत्यंत खडतर तपश्चर्येतून पुढे आलेला स्वयंसिद्ध गायक. खर्‍या अर्थाने गुरु-शिष्य परंपरेचा पाईक. त्यांचे गायन ऐकताना आणि पाहताना 'गायकाला स्वर दिसतात' म्हणजे काय? त्याची भौतिक आणि अधिभौतिक प्रचिती येते. अशा या महान गायकाला भारताचा सर्वोच्च सन्मान मिळावा हेच अपेक्षित होते. बातमी काल रात्रीच ऐकली. खूप आनंद झाला. या भारतरत्नाला दीर्घायु आणि अरोग्य लाभो ही सदिच्छा.
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 11/05/2008 - 12:22 नवीन

+१

सहमत आहे. अतिशय आनंदाची बातमी!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
म
मनस्वी Wed, 11/05/2008 - 11:08 नवीन

--* परत एकदा दिवाळी *--

खूपच छान वाटलं बातमी ऐकून. देर आए पर दुरुस्त आए|
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत Wed, 11/05/2008 - 11:47 नवीन

भारतरत्न

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना आदराचे अभिवादन. - अभिजीत
  • Log in or register to post comments
क
केशवराव Wed, 11/05/2008 - 12:52 नवीन

मन आनंदुन नाचू लागले .

आमच्या भिमाण्णांना 'भारत रत्न' मिळाले; काल रात्री ११-३० पासुन एस्.एम.एस. यायला लागले. मी तर अण्णांच्या सि.डी. ऐकत बसलो आहे.[ सध्या बागेश्री चालू आहे.] मन थूई थूई नाचत आहे. अण्णांचा पागल - - - - - - केशवराव.
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Wed, 11/05/2008 - 13:26 नवीन

छान बातमी

खूपच छान बातमी. भारतरत्न पं. भीमसेन जोशी याना मनापासून शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुध्द Wed, 11/05/2008 - 14:51 नवीन

अभिनंदन

'भारतरत्न' मिळाल्याबद्दल पंडितजींचे त्रिवार अभिनंदन!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा