कृष्ण की राधा?
आजकाल स्त्री भृणहत्या हा विषय चांगलाच चर्चेत आहे.स्त्रीला समाजात सन्माननीय स्थान मिळावे या साठी सगळ्यांचीच खटपट चालली आहे.
एका बाजूला आपण पाहत आहोत हल्ली एक मुलगी असलेले पालक सुद्धा दुसऱ्या अपत्याची वाट न पाहता मुलीला उच्च शिक्षण मिळावे म्हणून धडपडत असतात, (समाजातील हा बदल नक्कीच लक्षवेधक आहे.)
तर दुसऱ्या बाजूला पाहतो मुलगा होण्याची वाट पाहण्यात, संगोपन करण्याची आर्थिक परिस्थिती नसतानाही मुली जन्माला घातल्या जातात.(शेवटास मुलगा होतो कि नाही देव जाणे.)
जास्त मुली असणाऱ्या मातेला उगाच अपराधी वाटत असे. (तिचा दोष नसूनही)
एक काळ असा होता की समाज काय म्हणेल या भीतीने मुलीला अडवले जात होते.हे करू नको,ते करू नको,इथे जाऊ नको,तिथे जाऊ नको.
बर हे सर्व सांगणारया .बहुदा स्त्रियाच असत.म्हणजे ,स्त्रीला मागे खेचणारी ही स्त्रीच असते असे चित्र निर्माण होत असे..कधी ती आई असे,तर कधी सासू,नणंद,शेजारीण असे..प्रसंग निरनिराळे असत.पण उद्देश स्त्रीला मागे खेचण्याचाच असे. (आता खुपसे चित्र बदलले आहे.आता ह्याच नातलग वा शेजारणी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसतात,)
आणि तरीही समाजातील काही बोलक्या घटना पहा.
मी दवाखान्यांमध्ये बघितले आहे बऱ्याच वेळा असे चित्र दिसते मुलगा झाला कि बाळंत झालेल्या बाईसाठी स्पेशल रूम घेतात,आणि मुलगी झाली कि जनरल वार्ड घेतात.प्रत्यक्षात पाहिले तर प्रसव वेदना दोन्ही वेळी सारख्याच असतात.मग हा फरक कशासाठी?
त्या आधीही म्हणजे गर्भारपणी पती पत्नीला प्रेमाने सांगतो,जर मुलगा झाला तर तुला अमुक दागिना करीन. ह्या मी पाहिलेल्या घटना आहेत,(अर्थात सगळेच असे असतात असे नाही.)
अजून त्याही अगोदर आपण पाहिले, म्हणजे गर्भधारणा निश्चित होते त्यावेळी सगळे आनंदित होऊन एकमेकांना आनंदाची बातमी देताना म्हणतात,'आपल्याकडे कृष्ण येणार आहे"
मला मान्य आहे कृष्ण सर्वांचा आवडता आहे त्याच्या बाललीला सगळ्यांना मोहवतात.पण असं का म्हटलं जात नाही की आपल्याकडे 'राधा' येणार आहे...
आणि माझ्यासारख्यांनी असं म्हटलं तरी ते किती जणांना आवडेल?.................
याद्या
8902
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपा च्या चेपुवर
जुळं
बरोबर लिहिलं आहेत भिंगरीताई.
आता ज्यांचे डोळे उघडलेत त्यानी तो पर्यन्त पत्ते खेळु नयेत
+१
In reply to आता ज्यांचे डोळे उघडलेत त्यानी तो पर्यन्त पत्ते खेळु नयेत by काउबॉय
राधा आली
अभिनंदन
In reply to राधा आली by भिंगरी
अभिनंदन.
In reply to राधा आली by भिंगरी
राधा नाव म्हणजे सो
In reply to अभिनंदन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भिंगरीताई, एक राहूनच गेलं..
In reply to राधा नाव म्हणजे सो by काळा पहाड
धन्यवाद
In reply to भिंगरीताई, एक राहूनच गेलं.. by काळा पहाड
ओके
In reply to राधा नाव म्हणजे सो by काळा पहाड
फोटो?
अभिनंदन
अभिनंदन ! आमच्याकड पण मुलगीच.
वा!
भिंगरी ताई, घरात लक्ष्मी आली,
लक्ष्मी आली
ज्या दिवशी मला नात झाल्याचे
In reply to लक्ष्मी आली by भिंगरी
आपण खूश असलो की झाले...दुनीया
In reply to ज्या दिवशी मला नात झाल्याचे by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to आपण खूश असलो की झाले...दुनीया by भिंगरी
हाहाहा
In reply to ज्या दिवशी मला नात झाल्याचे by टवाळ कार्टा
लगेच विचारायचे...तुमच्या
In reply to ज्या दिवशी मला नात झाल्याचे by टवाळ कार्टा
लगेच विचारायचे...तुमच्या पालकांनी काय पाप केलेले+१००ह्म्म्म्म
मला मुलगी झाली तेव्हा मी
एकदम खरं आहे
In reply to मला मुलगी झाली तेव्हा मी by आनन्दा
अभिनंदन हो !!!
पण आपल्याक्डे दत्तक प्रोसेस...
In reply to अभिनंदन हो !!! by अर्धवटराव
हो मुलं योग्य घरी जावीत,
In reply to पण आपल्याक्डे दत्तक प्रोसेस... by मुक्त विहारि
सखी ताई...
In reply to हो मुलं योग्य घरी जावीत, by सखी
हो...
In reply to हो मुलं योग्य घरी जावीत, by सखी
भिंगरी आज्जी...
धन्यवाद!!!!!!!!!!
हाबिणंदन!!
अभिनंदन!
भिंगरी आज्जे आभिनंदन.
धन्यवाद!!!!!!!!!!
कोल्हापूरच्या होय आपण? आम्ही
कोल्हापूर नाही
करेक्ट...! म्हणून कोल्हापुरात
In reply to कोल्हापूर नाही by भिंगरी
धन्यवाद!!!!!!!!!!