Skip to main content

गृहकर्जाबद्दल माहिती आणि मदत

लेखक पीनी यांनी गुरुवार, 11/12/2014 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी अडीच वर्षांपूर्वी एल. आय. सी. कडून गृहकर्ज घेतले होते. तेंव्हा इंटरेस्ट रेट साधारण १० च्या आसपास होता. आता तो वाढत वाढत ११.२५ झाला आहे. मला एल. आय. सी. ऑफिसमधून असे कळले की माझे कर्ज ज्या योजनेमध्ये मंजूर झाले त्या योजनेनुसार हे बरोबर आहे आणि बाहेर अथवा एल. आय. सी.मध्येच कितीही कमी इंटरेस्ट रेट असला तरी मला हाच रेट असेल. कर्जाची रक्कम बरीच जास्त असल्याने व इतर काही घरगुती अडचणींमुळे कर्ज डाउन पेमेंट करुन लवकर भरणे ३-४ वर्षात शक्य नाही. आता माझ्यापुढे तीन पर्याय आहेत. १. काही पर्याय न शोधता जास्त रेटने कर्जफेड करत रहावे. २. एल. आय. सी. मधूनच टॉप-अप कर्ज घ्यावे. याचा रेट १०.१०% असेल + प्रोसेसींग फी ०.५%. पण तेही २ वर्षांनी १२ %पर्यंत जाउ शकते असे मला एल. आय. सी. ऑफिसमध्ये सांगितले. ३. एस. बी. आय.ची मॅक्स गेन योजना. याचा रेट १०.१० आहे. पण प्रोसेसींग फी १% + इंशुरन्स मिळून १ लाख जास्त भरावे लागतील. सगळीकडे आर्थिक नुकसान आहेच याची जाणिव मला आहे. याशिवाय काही दुसरा पर्याय आहे का? किंवा यातच कमी तोट्याचा पर्याय कोणता असेल? यासाठी कोणी सल्लागार असतात का? धन्यवाद.

वाचने 29449
प्रतिक्रिया 82

प्रतिक्रिया

गावठाण भागात घर घेताना काय बाबी तपासायला हव्यात? त्यावर थोडेफार लोन होते असे मला समजले आहे तर ते किती ? भविष्यात काय त्रास होउ शकतो? घर मला रहायला घ्यायचे आहे, गुंतवणुन म्हनौन नव्हे. सानपाडा, बेलापुर ,खारघर येथे गावठाण एरीया आहे.

In reply to by विलासराव

घर रहायला घ्यायचे तर गावठाण का शहरठाण कशाला पहायचे ? जसजसे शहर वाढत जाईल तशी गावठाणालाही जास्त एफ एस आय मिळेल्च . अआपल्याला घराची गरज आहे तशी सरकारला इतकी लोकसंख्या अशी अ‍ॅकोमोडेट करायची याची चिंता असेलच . त्यामुळे भविष्यात चांगलि डेवलपमेंट होईलच. :) घर घेणे वाअधिकारस्ते ! मा गावठाण चिन्ता कदाचन. ... श्री भगवान काऊ मुनी उवाच

In reply to by hitesh

घर घेणे वाअधिकारस्ते ! मा गावठाण चिन्ता कदाचन. ... श्री भगवान काऊ मुनी उवाच
अर्रेच्या...तुम्ही तर गीता टाकाउ आहे म्हणालात ना

In reply to by टवाळ कार्टा

त्यांना... ... श्री भगवान टाकाऊ मुनी उवाच असं म्हणायचं आहे काय ? त्यांचं टंकनकौशल्य यथातथा असल्याचं दिसतं बर्‍याचदा :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

टा - काउ मुनी !

In reply to by विलासराव

हिंदुत्वाचा अब्यास वाढवावा. पांडवानी खांडववन घेतले तेंव्हा तिथे गावठाणच काय जंगलठाण होते. नंतर भगवंताच्या कृपेने तिथे इंद्रप्रस्थ उभे राहिले. http://www.misalpav.com/node/29565

In reply to by hitesh

काव काव ये ... चिव चिव ये.... धागा काढ... प्रतिसाद दे... आणी...भुर्र्रर्रर्रर्रर्र ऊडुन जा.....

गृहकर्जच नव्हे तर इतर कुठल्याही कर्जाच्या बाबतीत वर क्लिंटन साहेबांनी सांगितलेली PMT,(EMI किती) PPMT (EMI मधले Principal किती), nper(no of EMI) याचे गणित स्वतः करता येते. तसे केल्यास आपण घेतो तो निर्णय योग्य किेवा बरोबर याचा व्यवस्थित अंदाज बाधता येतो. इन्शुरंस घेणे आवश्यकच नसते. बँकाचे एजंट ते लादतात. लोन मधून जे पैस मिळतात त्यातून विमा काढायचा असल्याने आपण तयार होतो परंतु त्यात बऱ्याच अटी असतात. मला बंगलोरला घर घेताना ICICI च्या माणसाने विमा काढावाच लागेल वगेरे सांगितले, मी काढला पण मला त्या विम्याचा फारसा फायदा झाला नाही. तुम्ही एसबीआय मधे प्रयत्न करा, प्रोसेसिंग फी च्या बाबतीत बारगेन करा. लोनची रक्कम जास्त असेल तर प्रोसेसिंग फी सवलत मिळतेच. विमा आधी काढलेला असेलच तर परत का काढावा लागतो हे कळले नाही. गृहकर्जाविषयी व्यवस्थ्त माहीती आणि शेवटपर्यंत बारगेन करायची इच्छा असेल तर प्रश्न लवकर सुटतो.

एस बी आय मधे 31 डिसेंबर पर्यंत प्रोसेसिंग फिज आकारण्यात येणार नाही. संपर्क :-Chief ManagerState Bank of IndiaPune Main BranchContact No. 020-66456119/6001

मी आयडीबीआय मध्ये होम लोन अप्लाय करतोय. प्रोसेसिंग फिज नाहित. पण नतंर इन्शुरंस घ्यावा लागेल आणि मोर्ट्गेज इन्टिमेशन पण करावा लागेल अस एजंट ने सांगितलय. मला मोर्ट्गेज इन्टिमेशन नाही माहित, म्हणजे मी अगोदर एस बी आय मधून होम लोन घेतले होते तेव्हा मोर्ट्गेज इन्टिमेशन वगैरे केले नव्ह्ते. कुणी सांगेल का मोर्ट्गेज इन्टिमेशन काय भानगड आहे??