मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Calligraphy: मराठी सुलेखन

मदनबाण · · मिपा कलादालन
Su1 स्केच पेन ने देखील सुलेखनाचे वेगळे प्रयोग करता येतात. Su2 Su3 Su4 Su5 Su6 "अक्षर गंध" या संस्थेचे संस्थापक सुलेखनकार निलेश बागवे {निलेश B+ अशीच स्वतःची ओळख हे करुन देतात. :) } यांच्या सुलेखनाच्या प्रात्येक्षिकाला मी हजर होतो,तेव्हा काही सुलेखनाचे फोटो काढले होते ते वरती दिले आहेत.स्केच पेन वापरुन सुरु झालेले हे प्रात्येक्षित बोरु पर्यंत चालले,अगदी दाढीचा ब्रश वापरुन सुद्धा हे करता येते. :) स्वॅप्स यांचे विशेष आभार ! त्याच्या Calligraphy: देवनागरी सुलेखन तक्ता या धाग्यामुळे जवळपास एक-दीड वर्षा पूर्वी काढलेले हे फोटो आठवले आणि इथे द्यावे वाटले. :) कॅमेरा :- निकॉन डी-१०० *फोटो कंप्रेस केल्यामुळे कलर शेड मधे फरक पडतो. {हौशी फोटोग्राफर} :) मदनबाण.....

वाचने 9320 वाचनखूण प्रतिक्रिया 18

एस Fri, 12/05/2014 - 23:07
मस्तच. नीलेश B+ यांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. चौथ्या फोटोत ब्रश पकडण्याची जी पद्धत दिसते तशीच मी माझ्या धाग्यात वापरलेली आहे. इथे खूपच तिरकी आहे, नेहमीच्या देवनागरी सुलेखनासाठी साधारणतः ४५ अंशात ब्रश तिरपा धरतात.

In reply to by एस

मदनबाण Fri, 12/05/2014 - 23:10
संपादक मंडळी वरती माझ्या या धाग्यात "स्वॅप्स " यांच्या नावा ऐवजी "स्पा" असे चुकीचे टंकले गेले आहे त्यात बदल करावा ही विनंती.

खटपट्या Fri, 12/05/2014 - 23:11
वा !! जमल्यास अच्युत पालवांच्या वर्कशॉपला हजेरी लावा. अजुन मजा येइल. मिपावर बरेच जण सुलेखनाचे चाहते आहेत हे बघून आनंद झाला.

मदनबाण Fri, 12/05/2014 - 23:14
चौथ्या फोटोत ब्रश पकडण्याची जी पद्धत दिसते तशीच मी माझ्या धाग्यात वापरलेली आहे. इथे खूपच तिरकी आहे, नेहमीच्या देवनागरी सुलेखनासाठी साधारणतः ४५ अंशात ब्रश तिरपा धरतात. मला या विषयातले काहीच माहित नाही. माझ्या फोटोच्या अँगलमुळे पण ते तसं दिसत असावं ! [ अर्थात तुम्हाला ते जास्त योग्य माहित असेल. :) } मला वाटतं निलेश बागवे हे सुलेखनकार अच्युत पालव यांचे शिष्य आहेत,पण या बद्धल खात्रीने सांगत नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;)

मुक्त विहारि Fri, 12/05/2014 - 23:19
आमच्या डोंबोलीत पण एकजण ह्या कलेत खूप माहीर आहेत.(आमच्या मेंदूतली हार्ड-डिस्क परत गंडली.) बाद्वे, चित्रकला, फोटोग्राफी आणि सुलेखन ह्या कला हातात हात घालूनच चालतात का?

चौकटराजा Sat, 12/06/2014 - 18:38
सुलेखनाची कला किती अगाध आहे याची एक लहानशी झलक म्हणजे वरचे प्रात्यक्षिक. मी आठवण्याचा प्रयत्न केला पण कमल शेडगे यांच्या नावाबरोबर अच्युत पालव यांचे नाव विसरलो. ते ही ग्रेट आहेत या कलेत !

In reply to by मदनबाण

नाखु Tue, 12/09/2014 - 15:36
संदर्भा दुव्याबद्दल बद्दल दोन शब्दः
  • या निर्माण कर्त्याला मराठी कवीता/ओवी रचना यांची चांगली जाण आहे
  • तसेच काही सुलेखन दिनविशेष आणि अनवट बाबींसाठी केले आहे त्याला सलाम
  • माझा या कलाकाराशी अजिबात परिचय नाही.असंख्या अज्ञात वाचकांमधला मी एक वाचक

गणपा Tue, 12/09/2014 - 17:12
बाणा फोटू आवडले रे. एकंदर मिपावर सुलेखनाचे चहाते आहेत तर. कुणाला संगणकावर सुलेखन कसं करायचं या बद्दल काही महिती आहे का? मी प्रयत्न केलाय संगणकावर पण कागदावर हात जितका स्थिर असतो तितका माऊसवर रहात नाही. त्यामुळे अक्षरांची वळणं नीट जमत नाहीत. जाणकारांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.

भीमराव Fri, 04/01/2016 - 19:05
लहानपनी चित्रकलेत अक्षरलेखन असायचे, आमच्या मास्तुरे नं फळ्यावर जाड व हडकुळा हे दोन शब्द अशाप्रकरे ऊतरवले कि बासच, रच्याकने, अक्षरांचा उपयोग करुन गणपती काढने/बारीक अक्षरे वापरुन व्यक्तीचित्र बनवने हे यातच येते कि वेगळे आहे?