कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
लेखनप्रकार
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ २-४७
भगवंत म्हणतात:
१. माणसाला कर्म करण्याचा अधिकार आहे
२. कर्मफळ माणसाच्या हातात नाही.
३. कर्मफळाची आशा न ठेवता अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे.
भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातल्या ह्या श्लोकाला वाचताना मनात गोंधळ हा निर्माण होतोच. बहुतांना असे वाटते हा श्लोक माणसाला कर्मापासून परावृत्त करून भाग्यवादी बनवितो. पण हे खरे नाही. आपल्याला नेहमीच असे वाटते, आपण जर कर्म केले तर त्याचे फळ मिळायलाच पाहिजे. हेच योग्य आणि न्यायपूर्ण. जर कर्माचे फळ मिळणार नसेल तर कर्म कशाला करायचे, असा प्रश्न मनात येणारच. मग भगवंतांनी गीतेत कर्म फळावर, कर्म करणार्याचा अधिकार नाही, हे का म्हंटले आहे? हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
आपण पाहतोच मुलाने उत्तम अभ्यास केला तर त्याला परीक्षेत उत्तम गुण मिळतात. उत्तम अभ्यास = उत्तम गुण सहज सोपी नियम आहे. पण नेहमीच असे होत नाही. कुणी विद्यार्थी आजारी पडतो आणि पेपर देऊ शकत नाही. कुणाला अपघात होतो, परीक्षा केंद्रावर पोहचू शकला नाही. कुणाला पेपर तपासताना क्वचित होणाऱ्या चुकी मुळे ९० च्या जागी ०९ मार्क मिळतात. तो चक्क नापास होतो. SSCचा टायपिंगचा पेपरात नेहमीचेच आहे, प्रत्येक केंद्रात २-३ परीक्षार्थी केवळ टाईपरायटर खराब झाल्या मुळे अयशस्वी होतात. त्यांना सरकारी नौकरी मिळत नाही. त्यांची तैयारी व्यर्थ जाते. शेतकरी ही उत्तम बियाण्यांची पेरणी करतो, शेतात जातीने लक्ष देतो, खत, पाणी व मशागत सर्व उत्तम प्रकारे करतो, पिक ही भरपूर येते, पण कित्येकदा गारपीट, अवेळी पावसामुळे त्याचे अतोनात नुकसान होते. त्याला ही पाहिजे तसे फळ मिळत नाही.
वरील उदाहरणांनी एक बाब स्पष्ट होते, सर्वांनी उत्तम कर्म केले पण तरी ही त्यांना फळ मिळाले नाही. कर्म करणे माणसाच्या हातात आहे, पण आपल्या कर्मावर प्रभाव टाकणाऱ्या इतर बाबींवर आपले नियंत्रण नसते. देश, काळ, राजनीतिक परिस्थिती एवं इतरांच्या कर्मांचा प्रभाव ही आपल्या कर्मांवर पडतो. समर्थांनी या आपल्या कर्मांवर प्रभाव टाकणार्या इतर बाबींचे वर्णन, "अध्यात्मिक ताप" (देह, इंद्रिय आणि प्राण यांच्या संयोगाने होणारे ताप - शारीरिक व मानसिक व्याधी इत्यादी ) आणि "आधिभौतिक ताप" ( सर्व पंचभूतांच्या संयोगाने जे त्रास होतात अर्थात सर्व प्रकारचे बाह्य कारणे - अपघात, सर्पदंश, चोरी, डकैती, आग, अतिवृष्टी, पूर, परचक्र, राजा एवं अन्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून छळ इत्यादी) [दशक ३, समास ६ आणि ७] असे केले आहे. या सर्व बाबींवर कर्म करणार्याचे नियंत्रण नसते, म्हणूनच भगवंतानी म्हंटले आहे, कर्मफळावर कर्म करणाऱ्याचा अधिकार नाही, केवळ कर्मावर त्याचा अधिकार आहे.
कर्मांचे फळ मिळाले नाही तर माणूस निराश होतो. आज ह्या मुळेच अनेक शेतकरी आत्महत्या करतात, पेपर मध्ये नापास झाल्याने विद्यार्थी ही आत्महत्या करतात. किंवा लोक कर्म करणे सोडून देतात. मृत्युलोकाला 'कर्मलोक' ही म्हणतात, इथे कुणाला ही कर्म चुकलेले नाही. कर्म हे करावेच लागणार, त्या शिवाय या लोकात कुणी जगू शकत नाही. म्हणूनच भगवंतानी गीतेत म्हंटले आहे, अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे. असे कर्म केल्याने आपल्या कर्माचे आपल्याला पाहिजे तसे फळ मिळाले नाही तरी ही आपल्याला त्याचा जास्त त्रास होणार नाही.
कर्माची अपेक्षा न ठेवता उत्तम रीतीने कर्म करणे, हे जर शेतकरी राजाला कळले, तर तो कुठल्या ही परिस्थितीत निराश होणार नाही. आत्महत्या न करता पुन्हा पुढच्या पिकाच्या तैयारीला लागेल. विद्यार्थी ही पुन्हा जोमाने अभ्यास करून, परीक्षेत उत्तम गुण मिळविण्याचा प्रयत्न करेल. हेच भगवंताना गीतेत सांगायचे असेल.
वाचने
79996
वाचनखूण
प्रतिक्रिया
136
हेल्मेट आहे ना?
श्लोकाच्या चौथ्या चरणात
गीतेच्या दृष्टीनी कर्म म्हणजे
In reply to गीतेच्या दृष्टीनी कर्म म्हणजे by अत्रुप्त आत्मा
लेख आवडला.
In reply to लेख आवडला. by सतिश गावडे
प्रत्येक वर्णानी
In reply to प्रत्येक वर्णानी by अत्रुप्त आत्मा
कर्मफळ
In reply to प्रत्येक वर्णानी by अत्रुप्त आत्मा
अतृप्त आत्मा जी.
In reply to अतृप्त आत्मा जी. by विवेकपटाईत
@अश्या वेळी माणूस निराश होतो.
In reply to अतृप्त आत्मा जी. by विवेकपटाईत
विपरीत परिस्थितीत ही नियत कर्म करत राहावे,
In reply to गीतेच्या दृष्टीनी कर्म म्हणजे by अत्रुप्त आत्मा
कर्माची व्याख्या अगदी साधी
In reply to कर्माची व्याख्या अगदी साधी by आनन्दा
तुझा जो धर्म आहे, त्याला
In reply to तुझा जो धर्म आहे, त्याला by सतिश गावडे
सगा...
In reply to सगा... by मुक्त विहारि
कशाला भूतकाळात जगायचे?
In reply to कशाला भूतकाळात जगायचे? by सतिश गावडे
भुतकाळात हजारो वर्ष...
In reply to तुझा जो धर्म आहे, त्याला by सतिश गावडे
ओ सत्या बाबा
एक गावठी प्रश्न
In reply to एक गावठी प्रश्न by मारवा
म्हणजे काय?
In reply to म्हणजे काय? by कवितानागेश
हेलमेट हेल-मेट म्हणजे?
In reply to एक गावठी प्रश्न by मारवा
.
In reply to . by hitesh
गीतेचा लेखक
In reply to गीतेचा लेखक by आयुर्हित
त्यांना ष्टेनोग्राफर नकोय,
In reply to त्यांना ष्टेनोग्राफर नकोय, by बॅटमॅन
त्यांना ष्टेनोग्राफर नकोय,
In reply to त्यांना ष्टेनोग्राफर नकोय, by बॅटमॅन
ष्टेनोग्राफर (टंकनिक) वरुन
In reply to गीतेचा लेखक by आयुर्हित
गीतेचा लेखक गणपती आहे.
जैसे कर्म तैसे फल.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?In reply to जैसे कर्म तैसे फल. by मदनबाण
मोक्षाची आस ही सुद्धा एक
In reply to मोक्षाची आस ही सुद्धा एक by सतिश गावडे
मोक्षाची आस ही सुद्धा एक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?In reply to मोक्षाची आस ही सुद्धा एक by मदनबाण
अच्छा. मोक्ष ऐहीक नसून
In reply to मोक्षाची आस ही सुद्धा एक by सतिश गावडे
मोक्षाची आस ही सुद्धा एक आसक्तीच नाही का?
In reply to मोक्षाची आस ही सुद्धा एक आसक्तीच नाही का? by मुक्त विहारि
मोक्ष मिळण्यासाठीच आम्ही
In reply to मोक्ष मिळण्यासाठीच आम्ही by सतिश गावडे
(No subject)
In reply to मोक्ष मिळण्यासाठीच आम्ही by सतिश गावडे
आम्ही त्यांना काय मोक्षाचा मार्ग दाखवणार?
In reply to आम्ही त्यांना काय मोक्षाचा मार्ग दाखवणार? by मुक्त विहारि
आज सगा पेटलाय
In reply to आज सगा पेटलाय by टवाळ कार्टा
आलास लगेच काडी सारायला....
In reply to आलास लगेच काडी सारायला.... by मुक्त विहारि
चायला मग तुमच्या सल्ला
In reply to चायला मग तुमच्या सल्ला by टवाळ कार्टा
काळजी करू नको. मी त्या
In reply to काळजी करू नको. मी त्या by सतिश गावडे
पण त्या दीक्षाला मला
In reply to पण त्या दीक्षाला मला by टवाळ कार्टा
वाट पाहण्याचे कर्म करत राहा.
In reply to वाट पाहण्याचे कर्म करत राहा. by सतिश गावडे
वरचा प्रतिसाद अश्लिल आहे का?
In reply to वरचा प्रतिसाद अश्लिल आहे का? by टवाळ कार्टा
श्लील अश्लील असं काही नसतं.
In reply to श्लील अश्लील असं काही नसतं. by सतिश गावडे
(No subject)
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
डोळा मारणे हे एकेकाळी अश्लील
In reply to डोळा मारणे हे एकेकाळी अश्लील by प्रसाद गोडबोले
पण मग पाखरांना डोळा मारलेले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?In reply to मोक्षाची आस ही सुद्धा एक आसक्तीच नाही का? by मुक्त विहारि
वेगळा मोक्ष
आपल काय करु शकतो?
In reply to आपल काय करु शकतो? by Sandipdada
गीता नावाच्या पुस्तकामधील
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China? संदर्भ :-मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?मोक्ष ऐहीक नसून पारलौकीक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?In reply to मोक्ष ऐहीक नसून पारलौकीक by मदनबाण
कुठलीही आस-न ठेवता जगणे हा
In reply to कुठलीही आस-न ठेवता जगणे हा by सतिश गावडे
स्थितीला लय असतो.
In reply to स्थितीला लय असतो. by मदनबाण
इथे मी थांबतो. तुम्ही
In reply to इथे मी थांबतो. तुम्ही by सतिश गावडे
तुम्ही आत्म्याची संकल्पना
In reply to तुम्ही आत्म्याची संकल्पना by प्रसाद गोडबोले
तू अभद्र वाणी उच्चारली आहेस.
In reply to तू अभद्र वाणी उच्चारली आहेस. by सतिश गावडे
तू अभद्र वाणी उच्चारली आहेस
In reply to तू अभद्र वाणी उच्चारली आहेस by प्रसाद गोडबोले
कोणती कविता???
In reply to कोणती कविता??? by टवाळ कार्टा
अकुंचा मॅटिनी शो!
या श्लोकानं भारतीय मानसिकतेत द्वंद्व निर्माण केलंय
In reply to या श्लोकानं भारतीय मानसिकतेत द्वंद्व निर्माण केलंय by संजय क्षीरसागर
:)
In reply to :) by क्लिंटन
खालच्या प्रतिसादातला गोंधळ उपप्रतिसादातून
लेख आवडला
In reply to लेख आवडला by क्लिंटन
सुरेख ज्योक !
स्टीव्हन कोव्हे ने ७ हॅबिट्स
In reply to स्टीव्हन कोव्हे ने ७ हॅबिट्स by विजुभाऊ
एक शंका
एका मर्यादेपर्यंत श्लोकाचा
In reply to एका मर्यादेपर्यंत श्लोकाचा by बाळ सप्रे
तसा अर्थ अभिप्रेतही नाही
In reply to तसा अर्थ अभिप्रेतही नाही by क्लिंटन
क्लिंटनभाऊ, श्लोकाचा शाब्दिक
In reply to क्लिंटनभाऊ, श्लोकाचा शाब्दिक by सतिश गावडे
हेच म्हणतो..
In reply to तसा अर्थ अभिप्रेतही नाही by क्लिंटन
शाब्बास!
धागा तद्दन फालतु
In reply to धागा तद्दन फालतु by प्रसाद गोडबोले
मी तुम्हाला ह्या सगळ्यातुन मुक्त करेन , लय टेन्शन घेवु नका .
In reply to मी तुम्हाला ह्या सगळ्यातुन मुक्त करेन , लय टेन्शन घेवु नका . by संजय क्षीरसागर
ही सिद्धी संपादकत्व प्राप्त
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?In reply to धागा तद्दन फालतु by प्रसाद गोडबोले
सर्वधर्मान परित्यज्य मामेकं
In reply to सर्वधर्मान परित्यज्य मामेकं by सतिश गावडे
मीही
In reply to मीही by प्रसाद गोडबोले
यावर मिपावरच कोणीतरी धागा
ह्या निमित्तने काही प्रश्न ...
In reply to ह्या निमित्तने काही प्रश्न ... by sagarparadkar
तत्वज्ञान हे असं कापड आहे जे
कर्माचे फल नव्हे तर "कर्म हेच फल"
In reply to कर्माचे फल नव्हे तर "कर्म हेच फल" by ज्ञानोबाचे पैजार
हाच अर्थ योग्य आहे!
अजून पुरेसा पेटला नाही धागा.
In reply to अजून पुरेसा पेटला नाही धागा. by कवितानागेश
नेफळे अन माईसाहेब आले तर
In reply to नेफळे अन माईसाहेब आले तर by प्रसाद गोडबोले
कोण?
In reply to कोण? by बॅटमॅन
तिथे शुध्द अद्वैत आहे .
In reply to तिथे शुध्द अद्वैत आहे . by प्रसाद गोडबोले
हा हा हा, अगदी अगदी
मज्जंय. चालू द्या. तो पर्यंत
काही ठरलं का?
In reply to काही ठरलं का? by प्यारे१
अहो तुमचीच वाट बघताहेत सगळे
In reply to अहो तुमचीच वाट बघताहेत सगळे by प्रसाद गोडबोले
आमची आधीची प्रवचनं अभ्यासा.
In reply to आमची आधीची प्रवचनं अभ्यासा. by प्यारे१
जिलब्या त्याच त्या असतात हो.
In reply to जिलब्या त्याच त्या असतात हो. by बॅटमॅन
आगे जाओ आगे जाओ!
In reply to आमची आधीची प्रवचनं अभ्यासा. by प्यारे१
खी:खी:
In reply to खी:खी: by प्रसाद गोडबोले
(No subject)