बरेच दिवस झाले राजकारणाबद्दल कोणी लेख लिहिला नाही. विधानसभा निवडणुका झाल्या,त्यानंतर भरपूर आडवणुका पण झाल्या. पण त्यावर कुणी काही लिहेना "राजकारण" हा सगळ्यांच्या आवडीचा विषय जरी असला तरी तो जरा संवेदनशील पण आहे त्यामुळे त्याकडे वळताना थोडी भीतीच वाटते.
निवडणुकांनंतर तर या लोकांनी सर्कसच सुरु करून सामान्य लोकांची काही दिवस करमणूक केली खरी,पण नंतर मात्र "रोजच मरं,त्याला कोण रडं ?" अशी तऱ्हा झाली आणि मग सगळेच त्या चर्चेकडे दुर्लक्षच करू लागले. त्यात राष्ट्रवादीने आपला विदुषकाचा खेळ करून दाखवला. उद्धवरावांनी लहान मुल जसं हातपाय झाडून रडून - पडून दाखवतं तस करून पाहिलं.याच काळात शिवसेनेनी मात्र "मराठी अस्मिता" हा त्यांच्या पणजोबांपासून चालत आलेला शब्द काढला लोकांना पेटवण्याचा प्रयत्न केला,'शेठजी आणि भटजींच्या हाती सत्ता देणार का ?' असा प्रचार करणारी शिवसेना जातीच राजकारण खेळली.
त्यामुळे त्यांनी त्यांच्या वरचा विश्वास मात्र गमावला. इकडे राष्ट्रवादीवाल्यांनी 'सत्ता आमच्या हाती आम्ही प्रचंड आशावादी' असा प्रचार करून साहेबांना वर उचललं (परवा शिवसेना सहभागी होणार अशी अंतर्गत माहिती कळल्यावर साहेब पडले असावेत.)
भा.ज.प.वाले आणि त्यांना मत देणारे लोक तर रोज बी.पि.च्या गोळ्या खात होते. या सगळ्यात एक मात्र छानच झालं,लोकांनी ज्या उत्साहात सत्ताधाऱ्याना निवडून दिलं त्याच्या एकदम उलट सत्ता स्थापनेच झालं,तेवढाच ढिसाळपणा लोकांची कामे करण्याला झाला आणि त्यासाठी कारणही ठरलेलं होतं "मंत्रिमंडळाचे खातेवाटप राहिले आहे"!
आता काल अचानक शिवसेना सत्तेत सहभागी झाली, अगदी अचानक ! यात विशेष करून कमी आणि साधी खाती मिळाली.
"युद्धात जिंकले अन तहात हारले "! हि म्हण सार्थ ठरवत शिवसेनेनी मराठी बाणा आणि अस्मिता मात्र टिकवली. आता या सत्ता सहभागामागे काय काय 'अर्थ' आहे हे सांगणे न लागे.
एक मात्र खर कि माझ्यासारख्या राजकारणाकडे अपेक्षेने पाहणाऱ्याचा म.न.से. भ्रम निरास झाला आहे आणि माझी अवस्था कोणीच आईकून घेत नाही आणि कोणी लक्षही देत नाही अश्या उद्द्वीघ्न अश्या काँग्रेस सारखी झाली आहे.
-एक अपक्ष माणूस
वाचने
9947
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
अस्मिता जपणे महत्वाचे.
शिवसेनेने ६३ जागा जिंकून देखील...
रोचक आयडी आहे. त्यामागची
In reply to शिवसेनेने ६३ जागा जिंकून देखील... by खेकडताणीसिंह
शाळेतील मित्र ...
In reply to रोचक आयडी आहे. त्यामागची by बॅटमॅन
स्वागत आहे खेकडताणीसिंहसाहेब
In reply to शाळेतील मित्र ... by खेकडताणीसिंह
बाय द वे,माझे खालील राजकीय विनोदी(?)लेख वाचले नसल्यास जरूर वाचणे
'तिकडे' बसणारा कोणीही येवो तो
आम्ही अशी टिकवितो " मराठी