आयला लाईन चुकली राव!!!
नुकतेच एक पुस्तक हाती आले.आजकाल पुस्तके घरी येत असतात, पण वाचायला वेळ मिळेलच असे नाही. मिळाला तरी सलग पुस्तक वाचुन होत नाही. रोज थोडे थोडे वाचुन लिंक लागतेच असे नाही.तरी वाचायची हौस काही जात नाही. जित्याची खोड....
तर ह्या पुस्तकाचे नाव निसर्गपूर्ण. कोणी एक लेखक नाही पण दोन संपादक. पुस्तकाची टॅगलाईनच सांगते की निसर्गाच्या विशिष्ट पैलूंचे अभ्यास आणि जतन करणार्या निसर्गप्रेमींचे आत्मकथन.पुस्तक हाती आले आणि एकामागुन एक प्रकरणे वाचत गेलो. प्रत्येक प्रकरणाचा लेखक त्याच्या विषयात मास्टर. कोणी निसर्गमित्र,पर्यावरणस्नेही, कोणी प्राणीअभ्यासक,वनस्पतीशास्त्रज्ञ,फॉरेस्ट ऑफिसर, कोणी देशोदेशीच्या विविध प्रकल्पांमध्ये काम केलेला,कोणी आपल्याच पदराला खार लावुन नोकरीधंद्याचा व्याप सांभाळुन काम करणारा तळमळीचा कार्यकर्ता एक ना अनेक.
नुसती नावांची यादी बघितली तरी कल्पना यावी. ऑलिव्ह रीडली जातीच्या कासवांचे संवर्धन करणारे भाउ काटदरे, वनस्पतीतज्ञ श्रीकांत इंगळहळ्ळीकर,बँकेची नोकरी सांभाळुन पक्ष्यांच्या २००च्या वर प्रजातीं चा डेटा गोळा करणारे शरद आपटे,कास पठार आणि राधानगरी जंगल वाचवण्यासाठी झटणारे मधुकर बाचुळक र प्राण्यांच्या पोटातील परजीवींवर संशोधन करुन महत्वाचे निष्कर्श काढणारे मिलिंद वाटवे आणि सर्पतज्ञ अनिलकुमार/निलमकुमार खैरे असे अनेक.
माझे या सगळ्या बाबतचे ज्ञान अगाध असल्याने पुस्तकाचे फार डीटेल्स ईथे देउ शकत नाही आणि तसेही हे सर्व पुस्तकातच वाचण्याएव्हढे रंजक आहे.एक मात्र आहे की मेडीकल,इंजिनीअरींग,सी.ए. आणि तत्सम "चलती" विषय सोडुन ईतर क्षेत्रांमध्ये भरपूर वाव आहे आणि त्यात वर्षानुवर्षे काम करणारे आणि जागतिक पातळीवर मान मिळवलेले लोकही आपल्या आसपास आहेत हे अशी पुस्तके वाचुन समजते.
कधीकाळी मी सुद्ध बी. एस्सी नंतर एम.एस्सी करण्याचे स्वप्न पाहात होतो आणि अशाच एखाद्या विषयात झोकुन देउन काम करु ईच्छीत होतो.पण मार्केट डिमांड म्हणा, विचारात बदल म्हणा किंवा मार्गदर्शनाचा अभाव म्हणा ईंजिनीअरींग केले आणि पोटापाण्याला लागलो.
मात्र अशी पुस्तके वाचनात येतात आणि मना पासुन वाटते आयला लाईन चुकली राव!!!
याद्या
3416
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
खरय अगदी
छान आहे.
ऊर्जा प्रकाशन
In reply to छान आहे. by सस्नेह
धन्यवाद खेडुत
In reply to ऊर्जा प्रकाशन by खेडूत
बायको बाबतही असेच होते का?
लग्नाला २८ वर्षे झाली तरी ही
In reply to बायको बाबतही असेच होते का? by सत्याचे प्रयोग
.
In reply to बायको बाबतही असेच होते का? by सत्याचे प्रयोग
नक्कीच विकत घेईन..
पुस्तक मिळवून वाचेन तसंच
+१
In reply to पुस्तक मिळवून वाचेन तसंच by सतिश गावडे