इतर काही मिपाकरांनी उत्तरे द्यायला सुरवात केलीच आहे.मी मागे पडू नये म्हणून माझ्या आधीच्या प्रश्नाला उत्तर मिळायचे असूनही इथेच उत्तरे लिहितो :)
३. मदर ऑफ तालिबान, डॉटर ऑफ ईस्ट असे कुणाला म्हणतात !
बेनझीर भुत्तो
४. लारकाना मतदारसंघाशी कोण संबंधित आहे
झुल्फिकार अली आणि बेनझीर भुत्तो
५. राज्ये किती आहेत आणि सर्वात मोठे राज्य(सुभा) कोणते
पंजाब
६. या सर्वात मोठ्या राज्याने देशाचा किती टक्के भाग व्यापला आहे
मला वाटते ५०% पेक्षा जास्त. नक्की आकडा बघायला हवा.
७. हिंदू लोक तिथे आहेत का
आहेत ना.
९. पाकिस्तानात विलिन झालेले असे संस्थान सांगा जिथला राजा हिंदू आणि प्रजाही बहुसंख्य हिंदूच होती
असे कोणते संस्थान प्रत्यक्षात पाकिस्तानात विलीन झाले की नाही माहित नाही. बिकानेरच्या राजाला त्याचे संस्थान पाकिस्तानात विलीन करायचे होते.पण सरदार पटेलांनी अर्थातच तो डाव उधळून लावला असे वाचल्याचे आठवते.
१०. नवाझ शरीफ कितव्यांदा देशाचे पंतप्रधान बनले आहेत
तिसर्यांदा
११. इम्रान खानच्या पक्षाचे नाव काय
तेहरीक-ए-इन्साफ
१२. त्याच्या पक्षाकडे कोणत्या राज्याची सत्ता आहे
खैबर पख्तुनिखा (वायव्य सरहद्द प्रांत)
१६. पाकिस्तानने भारताचा जो भूभाग बळकावलेला आहे त्यामधील प्रदेशांची नावे सांगा... जमतील तेवढी
मुझफ्फराबाद, गीलगीट
१८. बांगलादेश आणि पाकिस्तान वेगळे होण्याचे एखादे कारण सांगता येइल का
पश्चिम पाकिस्तानातील राज्यकर्त्यांची दडपशाही, उर्दू भाषेची सक्ती
१९. अशी एखादी सुधारणा सांगा जी भारतात झाली. पाकिस्तानात मात्र आजही होवू शकली नाही
लोकशाही :)
२०. पाकिस्तानतल्या एखाद्या पत्रकाराचे नाव सांगा
नजम सेठी, आर्देशीर कावसजी
२३. १९४७ पूर्वी वा नंतर पाकिस्तानी प्रदेशात जन्मून भारतात येऊन नाव कमावलेले कलाकार सांगा
राज कपूर, दिलीप कुमार, सुनील दत्त, साहिर लुधियानवी
२४. पाकिस्तानातल्या दोन वर्तमानपत्रांची नावे सांगा
९. पाकिस्तानात विलिन झालेले असे संस्थान सांगा जिथला राजा हिंदू आणि प्रजाही बहुसंख्य हिंदूच होती
असे कोणते संस्थान प्रत्यक्षात पाकिस्तानात विलीन झाले की नाही माहित नाही. बिकानेरच्या राजाला त्याचे संस्थान पाकिस्तानात विलीन करायचे होते.पण सरदार पटेलांनी अर्थातच तो डाव उधळून लावला असे वाचल्याचे आठवते.
माझ्या माहिती प्रमाणे हैदराबाद हे संस्थान तिथले निज़ाम पाकिस्तान मधे विलीन करणार होते. पण सरदार पटेलांनी तो डाव उधळून लावला
'प्रधानमंत्री'च्या पहिल्या काही भागात यातल्या काही प्रश्नांची उत्तरे मिळतील. चांगली सिरीज आहे.
https://www.youtube.com/watch?v=S_3i0Hf8KMI
https://www.youtube.com/watch?v=tUJPsKDYimg
https://www.youtube.com/watch?v=SBKn6TFDVxQ
९.बलुचिस्तानमधल्या कालात (कलत) संस्थानात हिंदू लोक होते/ आहेत.
१८.कारणे अनेक आहेत- भाषा, अंतर, one unit scheme
२५. चीन आणि पाकिस्तानच्या मैत्रीत अमेरिका खो घालू शकते.
९. पाकिस्तानात विलिन झालेले असे संस्थान सांगा जिथला राजा हिंदू आणि प्रजाही बहुसंख्य हिंदूच होती
थोडासा क्लू... बादशहा अकबर... आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे संस्थापक
अगदी बरोबर क्लिंटन.
उमरकोट. पूर्वीचे नाव अमरकोट. सांगायची गोष्ट संस्थानातल्या प्रजेच्या इच्छेवर विलिनीकरण अजिबात अवलंबून नव्हते. ते पूर्णपणे तिथल्या राजाच्या मर्जीवर अवलंबून होते. म्हणून जम्मू-काश्मीरबद्दल जो घोळ घातला जातो. त्याला काहीच अर्थ नाही. महाराजा हरिसिंग यांनी ते भारतात विलीन केले. तिथेच विषयाला पूर्णविराम मिळाला.
अमरकोटच्या राजाचे जोधपुर(बहुधा) संस्थानाशी वाकडे होते. त्यामुळे त्याचा निर्णय जोधपुरवर अवलंबून होता. जोधपुर पाकिस्तानात तर अमरकोट भारतात राहील. जोधपुर पाकिस्तानात गेल्यास अमरकोट भारतात राहील असा अमरकोटच्या राजाचा पवित्रा होता.
गंमत अशी की त्या संस्थानिकाची काही नातवंडे नंतर जोधपुरात येऊन स्थायिक झाली.
२६. व्हिसा पासपोर्टविना भारतातून पाकिस्तानात गेलेली व्यक्ती सांगा
स्वातंत्र्यानंतर काही काळ (बहुदा वर्ष-दीड वर्षापर्यंत) दोन देशांमध्ये प्रवास करायला व्हिसा-पासपोर्टची गरज नव्हती. नंतरच्या काळात भारतातून हेर म्हणून पाकिस्तानात गेलेल्यांनी अर्थातच व्हिसा-पासपोर्ट वापरलेले नव्हते. पुढील व्यक्तींनी पाकिस्तानात जाताना नक्कीच व्हिसा-पासपोर्ट वापरला नव्हता---
१. चुकीने पाकिस्तानात गेलेले सरबजीत सिंग सारखे लोक
२. सुरजित सिंग, कश्मीरसिंग, किशोरीलाल शर्मा यांच्यासारखे हेर
३. रविंदर कौशिकची कहाणी तर अगदीच विलक्षण आहे. पाकिस्तानात हेर म्हणून गेलेल्या या रॉच्या एजन्टने कराची विद्यापीठात प्रवेश मिळविला आणि तिथून डिग्री पूर्ण केली.इतकेच नव्हे तर तो पुढे पाकिस्तानी सैन्यात भरती झाला आणि मेजर पदापर्यंत पोहोचला.तिथून आतल्या बातम्या द्यायचे काम त्याने दहा-बारा वर्षांपर्यंत केले. पुढे त्याला पाकिस्तानात पकडले गेले आणि अत्यंत हालहाल करून त्याला अनेक वर्षे तुरूंगात ठेवले गेले.
४. मागच्या वर्षी पेपरमध्ये वाचले होते की २००४ मध्ये मुंबईतल्या (पार्ल्यामधील) एका इंजिनिअरच्या डोक्यावर परिणाम झाला आणि त्या झटक्यात तो अमृतसरला गेला.पुढे तो समझौता एक्सप्रेसमध्ये चढला (कसा काय कोणाला माहित. त्याला तोपर्यंत कोणीच कसे अडवले नाही) आणि तो लाहोरला पोहोचल्यानंतर त्याला पकडले गेले. मागच्या वर्षी तो भारतात परत आला. तसेच शाळेत असताना वाचलेली गोष्ट आठवते.अट्टारी रेल्वे स्थानकातील हमालाने कोणा प्रवाशाचे सामान चढविले पण नक्की किती पैसे द्यायचे या भांडणात वेळ गेला आणि गाडी सुटली. तो गाडीतून उतरू शकला नाही आणि त्याला लाहोर रेल्वेस्टेशनवर पकडले गेले. नाव नक्की आठवत नाही.
१९. अशी एखादी सुधारणा सांगा जी भारतात झाली. पाकिस्तानात मात्र आजही होवू शकली नाही
याच्या उलट काही असेल तर तेही वाचायला आवडेल. अशी 'सुधारणा' जी पाकिस्तानात झाली आणि भारतात नाही झाली.
सुधारणा = स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरेंवर आधारित काहीतरी. किंवा काही असे अधिकार जे बहुतांश जगाने मान्य केलेले आहेत.
भूदान चळवळीकरता विनोबा भारतभर हिंडले. पुढे त्यांनी आपल्याच देशाच्या दुसर्या भागात(पाकिस्तानात) जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना सीमेवर अडवण्यात आले. पण विनोबा भारत पाकिस्तान भेद मानत नसावेत. त्यांनी आपला आग्रह सोडला नाही.
शेवटी त्यांना पाकिस्तानातही प्रवेश मिळाला.
उत्तरे?
२५
२०. पाकिस्तानतल्या एखाद्या
...
In reply to २०. पाकिस्तानतल्या एखाद्या by टवाळ कार्टा
तुमको समझ्याच नै
In reply to ... by आशु जोग
...
In reply to तुमको समझ्याच नै by टवाळ कार्टा
...
In reply to तुमको समझ्याच नै by टवाळ कार्टा
हा हा हा..
In reply to २०. पाकिस्तानतल्या एखाद्या by टवाळ कार्टा
उत्तरे इथे चालतील
काही उत्तरे
९. पाकिस्तानात विलिन झालेले
In reply to काही उत्तरे by क्लिंटन
हैद्राबाद
In reply to ९. पाकिस्तानात विलिन झालेले by अमित मुंबईचा
...
In reply to काही उत्तरे by क्लिंटन
'प्रधानमंत्री'च्या पहिल्या
९.बलुचिस्तानमधल्या कालात (कलत
...
In reply to ९.बलुचिस्तानमधल्या कालात (कलत by विशाखा पाटील
...
आशू
In reply to ... by आशु जोग
अजून पण जणारे असतीलच...
In reply to आशू by माईसाहेब कुरसूंदीकर
...
In reply to आशू by माईसाहेब कुरसूंदीकर
उमरकोट
In reply to ... by आशु जोग
...
In reply to उमरकोट by क्लिंटन
व्हिसा-पासपोर्टशिवाय पाकिस्तानात
In reply to ... by आशु जोग
२१. एखाद्या लेखकाचे नाव सांगा
१९. अशी एखादी सुधारणा सांगा
१५. पाकिस्तानात सामील झालेली
ह्याच्या ५०% माहीती भारता
...
In reply to ह्याच्या ५०% माहीती भारता by प्रसाद१९७१
(No subject)
In reply to ... by आशु जोग
...
...
२६. व्हिसा पासपोर्टविना
...
In reply to २६. व्हिसा पासपोर्टविना by चावटमेला
२६. व्हिसा पासपोर्टविना
...
In reply to २६. व्हिसा पासपोर्टविना by पिंपातला उंदीर