एका सामान्य माणसाची आत्मकविता-
सांगा असतो का कधी मी माझा?
----------------------
नाही नसतोच कधी मी माझा!
नाही नसतोच कधी मी माझा!
असतो मी शिक्षकांचा,
असतो जेव्हा शाळेमध्ये!
असतो मी सवंगडी अन भावंडांचा,
खेळतो जेव्हा अंगणामध्ये!
असतो मी बाॅसचा,
असतो जेव्हा आॅफिसमध्ये!
असतो मी कस्टमरचा,
असतो जेव्हा व्यवसायामध्ये!
असतो मी बायको मुलांचा,
असतो जेव्हा घरामध्ये!
असतो मी आई वडीलांचा,
असतो जेव्हा घरामध्ये!
असतो मी मित्रांचा,
बसतो जेव्हा त्यांचेमध्ये!
असतो मी सैतानाचा,
करतो जेव्हा पापकृत्ये!
असतो मी देवाचा,
करतो जेव्हा पुण्यकर्मे!
सांगा मग जन्म ते मृत्यू या मध्ये
असतो का कधी मी माझा?
मृत्यूनंतर सुद्धा असतो मी
आठवणीत सर्वांच्या!
मग सांगा असतो का कधी मी माझा?
मग सांगा असतो का कधी मी माझा?
कधी सापडेल मला माझे,
हरवलेले मीपण?
की मीपणाच्या मनातसुद्धा,
बसलेले असेल दुसरेच कोण?
ते दुसरे कोण सुद्धा,
हरवून बसलेले असेल का त्याचे मीपण?
मीपण हरवलेले आपण सर्वजण,
एकाच वाटेवरचे प्रवासीगण!
चला मिळून शोधू हरवलेले मीपण
चला मिळून शोधू हरवलेले मीपण...
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी माझा तर माझा कुणाचा!!!
मी माझा तर माझा कुणाचा!!!
संदर्भ -सुर्यकांत खोकले.
मी माझा तर माझा कुणाचा!!!
In reply to मी माझा तर माझा कुणाचा!!! by जेपी
मस्त एकदम.
वल्ली कडुन ऐकले होते तेंव्हा खो खो हसलो होतो.
मस्त कल्पना..
कल्पना मस्त आहे कवितेची.. पण 'असतो' हा शब्द खुप वेळा आला आहे त्यामुळे थोडी लय बिघडते आहे.
कविता वाचुन एक विचार आठवला ..
जो नसतो स्वताचा कधी..
..तोच कदाचीत सामान्य माणुस असतो..
जो फ्लॅट चे EMI भरता भरता म्हतारा होतो
आणि आपल्या मुलांच्या हातात चाव्या ठेवुन
त्याच प्लॅट मध्ये कोणाड्यात राहतो.. तोच कदाचीत सामान्य माणुस असतो..
जो दिलेले सर्व काम वेळेत पुर्ण करुन हि
दूसर्यांचे काम करता करता
रात्र ऑफिसात घालवतो. तोच कदाचीत सामान्य माणुस असतो.
पोरीवर लाईन मारता मारता
पोरगी वेगळी लाईन पकडते
तरी झुरत जगणारा.. कदाचीत सामान्य माणुस असतो.
सुखा पेक्षा दु:ख जास्त भोगुनही
त्यास सामोरे जाताना
उगा हसत हसत जगतो ..तोच कदाचीत सामान्य माणुस असतो.
केला बदल.. जस्ट २ मिनिट्स
असतो मी शिक्षकांचा,
शिकतांना शाळेमध्ये!
असतो मी सवंगडी अन भावंडांचा,
खेळतांना अंगणामध्ये!
असतो मी बाॅसचा,
काम करतांना आॅफिसमध्ये!
असतो मी कस्टमरचा,
विकतांना व्यवसायामध्ये!
असतो मी बायको मुलांचा,
जगतो जेव्हा घरामध्ये!
असतो मी आई वडीलांचा,
जगतो जेव्हा घरामध्ये!
असतो मी मित्रांचा,
बसतो जेव्हा त्यांचेमध्ये!
मस्त आहे
In reply to केला बदल.. जस्ट २ मिनिट्स by निमिष सोनार
मस्त आहे
.
विडंबनाची कळ आलीय....
पीतो मी नेहमी स्लाईस किंवा मिरींदा..
मग सांगा पीतो का कधी मी माझा?
ह.घ्या.
WHAT ????
In reply to . by स्वप्नज
WHAT ????
अश्लील
In reply to . by स्वप्नज
अश्लील =))
लिहीताना जरा तरी विचार करावा
In reply to . by स्वप्नज
लिहीताना जरा तरी विचार करावा माणसानं !! =))))
:-)
In reply to लिहीताना जरा तरी विचार करावा by सूड
अय्यो राम पाप....
शिव शिव शिव....
माझा... आवडलं
In reply to . by स्वप्नज
=))
(No subject)
*shok*
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा ||
विडंबना च्या कळा येताहेत .. पण
विडंबन ची डिलिव्हरी कधी होईल ...?? :-)