खूप दिवसांपासून नवीन पदार्थ करण्याचे डोक्यात घोळत होते. आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो पदार्थ बनवला आणि झक्कास जमून आला. त्याला आम्ही नाव दिले बदाम एक्का. हा पदार्थ heavy duty dessert या विभागात मोडेल. तर पाहूया त्याची कृती.
साहित्य: (१० जणांसाठी)
४ वाट्या बदामाची भरड
पाउण वाटी तूप
पाव वाटी खवा /मावा
दीड वाटी milk powder
सव्वा वाटी साखर
२ वाट्या दूध
२ चमचे वेलची पूड
कृती:
१. प्रथम बदाम कढई मध्ये किंवा microwave मध्ये हलकेसे भाजून घ्यावेत. गार झाल्यावर mixer वर त्याची जाड भरड करावी.
२. कढई मध्ये तूप गरम करावे व त्यावर बदाम भरड घालून मंद आचेवर भाजावे. भरड खमंग भाजली की त्यात खवा घालावा व ५-७ मिनिटे मिश्रण भाजावे.
३. नंतर या मिश्रणामध्ये milk powder आणि दूध घालून छान एकत्र करून घ्यावे.
४. ३-४ मिनिटांनी त्यात साखर घालावी व मिश्रण ढवळत राहावे.
५. सर्वात शेवटी gas बंद करून वेलची पूड घालावी.
बदाम एक्का आस्वाद घेण्यास तयार आहे.
काही महत्वाचे:
१. gas नेहमी मंद आचेवर ठेवावा आणि मिश्रण सतत ढवळत राहावे. नाहीतर ते करपेल.
२. बदाम आणि खवा व्यवस्थित भाजून घ्यावा म्हणजे खमंगपणा येतो.
३. दूध आपल्याला हव्या त्या consistency नुसार कमी जास्त करावे. सैलसर हवी असल्यास दूध थोडे वाढवावे.
माझ्या ब्लॉगवरच्या या रेसिपीचा दुवा


वाचने
8624
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्हॉहोव्व्
भिजले तर ते भरड वाटले जाणार
In reply to व्हॉहोव्व् by एस
खतरनाक आहे. मला एक वाटी जरी
मस्त डिश....
.
मस्त डिश..खरोखर heavy duty
सॉल्लिड!
(No subject)
फोटो ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floodsबघूनच समाधान मानावं !!
धन्यवाद!
अक्रोड हलवा साधारण असाच बनवतात
धन्यू
In reply to अक्रोड हलवा साधारण असाच बनवतात by टक्कू