नमस्कार मंडळी,
आज मिपावर माझा पहिला लेख टाकताना खूप आनंद होत आहे. खर तर काही लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, तेव्हा जुन्या जाणत्यांनी समजून घेऊन मार्गदर्शन करावे हि विनंती.
गेली जवळपास दिढ वर्ष मी मिपाचा नियमित वाचक आहे. तेव्हा वेगवेगळ्या विषयावरचे एक से बढकर एक लेख वाचताना वाटायचं आपण हि प्रयत्न करून बघावा. आता तो योग जुळून आला आहे, परवा माझा वाढदिवस झाला त्यावेळी केलाला एक संकल्प कि - बाकी काही नाही तरी प्रवासवर्णन लिहावे. तर मग करूया सुरुवात. गणपती बाप्पा मोरया!
गेल्या दिढ वर्ष्यात मिपावर बरीच प्रवासवर्णन वाचली (मी इस्पिकचा एक्का सरांचा खूप मोठा पंखा आहे), ट्रेकिंग च्या मोहिमा बघितल्या पण कर्नाल्याविषयी वाचनात आल नाही तेव्हा जरा वेगळ्या ठिकाणाविषयी लिहिताना बर वाटतंय.
मी आणि माझा मित्र राहुल जो कि सदा न कदा कुठ न कुठ फिरत असतो याने राजमाचीला नाईट ट्रेकिंग चा प्लान बनवला होतो पण बाकीचे कुणी तयार होईनात तेव्हा ठरलं कि दोघच जाऊ कुठ तरी जवळ वन डे ट्रेक ला आणि कर्नाळ्याचा प्लान फिक्स केला. कर्नाळा हे मुंबई - गोवा हायवे वर पनवेल पासून १३ किलोमीटरवर आहे.
आम्ही ऐरोली, नवी मुंबईकर. त्यामुळे ऐरोलीहून सकाळी ६.२८ ची लोकल पकडून पनवेलला गेलो. पनवेल रेल्वे स्थानकापासून पायी १० मिनिटावर पनवेलच बस स्थानक आहे. तिथून अलिबाग किंवा पेनकडे जाणार्या बस कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या गेट वर सोडतात.
ट्रिपला सुरुवात करण्यापूर्वी काही उपयुक्त माहिती जाणून घेवूया –
तेथील मुख्य आकर्षण १) अर्थातच पक्षी अभयारण्य २) घनदाट जंगल ३) थम्ब्स अप च्या आकाराचा डोंगर आणि त्यावरील छोटासा किल्ला.
पक्षी अभयारण्य दिवस उगवल्यापासून ते मावळेपर्यंत सुरु असते. ऑक्टोबर ते एप्रिल हा चांगला काळ आहे भेट देण्यासाठी. पक्षी निराक्षणासाठी आभाळ निरभ्र असलेल चांगल.
कर्नाळा किल्ल्याचा थोडा इतिहास –
सकाळी १० च्या सुमारास आम्ही गेटवर पोहचलो. तेथे प्रत्येकी तीस रुपयाच तिकीट काढावे लागते, जर तुमच्या बरोबर प्रोफेशनल क्यामेरे असतील तर त्याची सेप्रेट फी द्यावी लागते आणि हो जर तुम्ही तुमच्या मैत्रिणीला घेऊन आला असाल तर तुम्हाला ओळखपत्र दाखवाव लागत.
गेटवरच अभयारण्याचा मोठा नकाशा लावला आहे तो बघून आम्ही सुरुवात केली.
उजवीकडून आत मध्ये गेल्यावर पक्ष्यांचा आवाज ऐकू येवू लागला पण एकही पक्षी दिसेना. बरीच हौशी मंडळी मोठमोठ्या दुर्बीण, क्यामेरे घेऊन आले होते, त्यांच्याकडील फोटो पहिले. पण आमच्या मोबाईल क्यामेर्यावर काही दिसेना तेव्हा म्हणल कमीत कमी आवाज तरी रेकॉर्ड करावा. त्याचा हा एक प्रयत्न –
पक्ष्यांचे आवाज
आम्ही पायवाटेने जसजस आतमध्ये गेलो तशी वाट गायब होत गेली. थोड पुढ गेल्यावर आम्हाला एक गाईड भेटले, त्यांनी सांगितली कि हा रस्ता किल्ल्यावर जात नसून न्यचरल ट्रेलचा भाग आहे जो कि खास पक्षी निरक्षणासाठी आहे.
न्यचरल ट्रेल-१,
न्यचरल ट्रेल-२,
न्यचरल ट्रेल-३,
न्यचरल ट्रेल-४,
तसं पण ह्या उंचच उंच झाडांवरती दुर्बिनाविना आम्हाला काही दिसत नव्हते म्हणून आम्ही माघारी फिरून डावीकडून किल्ल्याची वाट धरली. गेटपासून किल्ल्याचं अंतर जवळपास २.५ किलोमीटर आहे, तास-दीड तास लागतो किल्ल्यावर जायला. निम्म्यापर्यंत चढण जराशी अवघड आहे पण नंतर पुढे रस्ता सरळ आहे.
हळूहळू वर जाताना मला सारखं माथेरानमध्ये फिरत असल्यासारखे वाटत होत पण एक फरक होता कि इतर ठिकाणापेक्षा हे पर्यटनासाठी वेल म्यानेजड वाटलं (ठिकठिकाणी पक्षी निराक्षणासाठी मचाण उभारली आहेत, प्रसाधनगृहे आहेत) आणि माथेरान मध्ये एखाद्या बागेतून फिरल्यासारख वाटत पण इथे एक प्रकारचा वाईल्ड फील येतो. इथे झाडांवर मोठमोठी कोळ्यांची जाळी आहेत (ती पण आमच्या क्यामेर्यात आली नाहीत).
वाळवीची /मुंगळ्याची घरटी,
वारूळ,
जंगली मशरुम,
झाडावरील बांडगुळची नक्षी,
दगडांवरील शेवाळाची रांगोळी,
झाडांच्या मुळांचा गुंतावळा
आणि हो हा झोका
अजून काही फोटोज –
फुलपाखरू १,
फुलपाखरू २,
पाथ टू हेवन,
आमचा फराळ,
ह्याने आम्हाला नाष्टा नाही करून दिला,
डोंगरावरील देवीच देऊळ,
पनोरमा,
किल्ला १,
किल्ला २,
किल्ला ३,
किल्ला ४,
कर्नाळा माची,
कर्नाळ्याची स्फिंक्स,
आमची आवडती जागा.
बर्याच वेळा आपण फोटो काढायच्या नादात मूळगोष्ट विसरतो कि फोटो हे दुसर्यांना दाखवण्यासाठी असतात, जे काही आहे ते आपण आपल्या डोळ्यात साठवून घ्यावं. इथं आम्ही २-३ तास बसलो होतो, मस्त गार वारा सुरु होता. तिथं असलेल्या शांततेचा आणि समोरच्या निसर्गाचा आम्ही मनमुराद आस्वाद घेतला. त्यावेळी एकदमच मनात आल कि फोटोप्रमाणे हे क्षण पण साठवता आले तर किती बर होईल. पण शेवटी ३.१९ ची लोकल पकडायची होती म्हणून नाईलाजाने उठून याव लागल.
खाली एक गेस्ट हाउस आहे तिथे जखमी पक्षी उपचारासाठी ठेवले आहेत आणि सर्व प्रकारची (फुलझाड, फळझाड आणि शोभेची झाड) छोटी रोपटी विक्रीस ठेवली आहेत. तेथेच महिला बचत गटाचे एक छान कॅन्टीन आहे, तिथ आम्ही हातपाय धुवून पुन्हा एकदा ताजतवान झालो परतीच्या प्रवासासाठी आणि मुंबईतल्या कलकलाटासाठी.
तर असं हे मुंबईकरांसाठी जवळ असलेले एक वेगळे, शांत आणि वेल ३ इन १ ठिकाण. नक्की भेट द्या आणि हो लेखनाविषयी मार्गदर्शन करावे हि विनंती.

वाचने
17635
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
मित्रा दिप्स
फोटो दिसत नाहीत
In reply to मित्रा दिप्स by दिपक.कुवेत
फोटो अपलोडसाठी हा धागा वाचा -
In reply to फोटो दिसत नाहीत by दिप्स
तुम्ही पेस्ट केलेल्या लिंक्स
In reply to फोटो दिसत नाहीत by दिप्स
धन्यवाद
In reply to तुम्ही पेस्ट केलेल्या लिंक्स by डॉ सुहास म्हात्रे
मला अजूनही फोटो दिसत नाहीत.
In reply to धन्यवाद by दिप्स
दोन चार फोटोंच्या लिंक मला
मिपावर स्वागत
गुगलपेक्षा फोटेबकेटची लिंक
नाही दिसत फोटो अजून.
एक फोटो दिसेल तर शप्पत!
माझा अजूनही गणेशाच आहे.
प्रथमतः
फोटो दिसले...
फाईल नेम चा प्रोब्लेम होता.
In reply to फोटो दिसले... by मुक्त विहारि
चलता हय...
In reply to फाईल नेम चा प्रोब्लेम होता. by दिप्स
छाण!
दिप्स तुमचे मिपावर स्वागत.
शेवटी गड काबीज केलाच
छान लिहिलंय.
आत फोटो छान दिसत आहेत.
धन्य झालो.
In reply to आत फोटो छान दिसत आहेत. by डॉ सुहास म्हात्रे
स्वागत
मस्त लिहिले आहे, आणि फोटो पण
छान वर्णन. शुभेच्छा
यायचंय..
In reply to छान वर्णन. शुभेच्छा by सुधांशुनूलकर
नक्कीच
In reply to यायचंय.. by निखळानंद
दोन-तीन दिवसात सांगतो.
In reply to नक्कीच by सुधांशुनूलकर
डिसेंबरमध्ये जायचा विचार आहे.
In reply to छान वर्णन. शुभेच्छा by सुधांशुनूलकर
च्या मारी माचा परम मित्र
In reply to छान वर्णन. शुभेच्छा by सुधांशुनूलकर
नुलकर काका २५ ला जमतंय का पहा
In reply to छान वर्णन. शुभेच्छा by सुधांशुनूलकर
कर्नाळा भटकंती ठरल्यास मलाही
In reply to छान वर्णन. शुभेच्छा by सुधांशुनूलकर
कर्नाळ्याच काही ठरलं का ?
In reply to छान वर्णन. शुभेच्छा by सुधांशुनूलकर
छान फोटो.. खूप वर्षापूर्वी
सगळ्यांचे खूप खूप आभार.
छान !
छान केलीये भटकंती! तुम्ही आता
स्वागत!
छान आहेत फोटो
धन्यवाद.
In reply to छान आहेत फोटो by हुकुमीएक्का
मी आज आपटा मार्गे कर्नाळयाला
उत्सुकता असेल तर लिहितो.
In reply to मी आज आपटा मार्गे कर्नाळयाला by कंजूस
नक्की लिहा आणि सगळे फोटो टाका
In reply to उत्सुकता असेल तर लिहितो. by मुक्त विहारि
ओ काक,रसायनीकडून कर्नाळ्याला
काल मी वरच्या खिंडीत होतो
अच्छा,रसायनी रेल्वे स्टेशन
आज सकाळपासून माझे फोटोबकेट
खुपच छान.....
एकच नंबर!!!! कर्नाळा पाहणे
अर्नाळा वसईमधले एक गाव आहे.
In reply to एकच नंबर!!!! कर्नाळा पाहणे by बॅटमॅन
ओह अच्छा, धन्यवाद.
In reply to अर्नाळा वसईमधले एक गाव आहे. by किसन शिंदे
विरारच्या पूर्वेला डोंगरावर
अच्छा, म्हणजे नुसते गावच नाही
In reply to विरारच्या पूर्वेला डोंगरावर by कंजूस
कारण शहरातले लोक जिथे बघायला
कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे
रानपक्षी हे काही बगळे नाहीत