Skip to main content

कामाचे आणि बिनकामाचे छोटे मोठे प्रश्न आणि विचार - भाग २

लेखक arunjoshi123 यांनी रविवार, 23/11/2014 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर कितीतरी विषयांची उथळ/सखोल माहिती असलेले अनेक उत्साही सदस्य, सदस्या आहेत. एक सहसदस्य, सहसदस्या म्हणून त्यांना आपल्या एका मित्राला, मैत्रिणीला हलकी फुलकी माहितीची मदत पुरवायला आवडेल असा अंदाज आहे. तेव्हा या धागामालिकेत, सदस्य, सदस्या घरगुती कामाचा, ऑफिसकामाचा, संगणकविषयक, संसार चालवणे विषयक, शेतीविषयक, लैंगिक, करीअरविषयक, काऊंसेलिंगविषयक, सामान्य ज्ञानविषयक प्रश्न पोस्ट करू शकतात. अश्या प्रश्नाचे उत्तर इतरांसही कामास येऊ शकते. या व्यतिरिक्त, आपण बर्‍यापैकी मध्यम वर्गाच्या आसपासचे असल्याने, आपल्या मनात बरेच राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, साहित्यिक, ऐतिहासिक, भौगोलिक, भाषिक, कौटुंबिक, अध्यात्मिक, धार्मिक, मानववंशशास्त्रसंबंधित, उत्क्रांतीसंबंधित, इ इ अनेक प्रकारचे छोटे मोठे कामाचे वा बिनकामाचे १-२ ओळींचे विचार येतात. तितकी एक ओळ, विचार लिहिण्यासाठी धागा काढणे इष्ट वाटत नाही. तेव्हा असे प्रश्न नि विचार इथे एकेका प्रतिसादाच्या रुपाने सदस्यांनी टाकावेत. आता कोणी म्हणेल इंटरनेट, गुगल, विकिपिडिया असताना याची काही गरज नसावी. अर्थातच हे खरे आहे. याची ८०% गरज इंटरनेट भागवू शकते. पण तरीही खालील काही निरीक्षणे नोंदवतो. १. इंटरनेटवर आपण मशिनला प्रश्न विचारत असतो. मशिन भाव पोचला आहे का हे बर्‍याचदा कळत नाही. २. नेटवर आलेल्या शोधांना वाचून पाहून उर्जा कधी कधी इतकी घालावी लागते कि आपण ते कुतुहल "राहू देतो". ३. विकिपेडिया खूप छान आहे पण तो संज्ञा खूप वापरतो आणि अशा नव्या संज्ञांचे खूप सारे संदर्भ, लिंका देतो. ४. हवी असलेली माहिती जालावर नसू शकते. आपण सगले एकाच क्लोजली नीट मराठी संस्कृतीचे लोक असल्याने आपले क्लिशे ज्ञान पश्चिमाभिमुख जालावर कधीकधी नसू शकते. ५. उत्तर मिळत असताना जालाशी पुढे संवाद करता येत नाही. केल्यासही त्याला मिपीय संवादाचा फ्लेवर नसेल. अजून एक - असे बरेचशे प्रश्न असतात कि ते गुगलसाठी नसतातच. अशा प्रकारचे प्रश्न नि विचार मिपासारख्या "परिचितांच्या" मधे मांडले कि, आमच्याकडच्या भाषेत, डोक्याची निचिंती होते. सध्याला आपण या इनिशिएटिवबद्दल काय म्हणू इच्छिता ते सांगा वा आपले प्रश्न विचारा, विचार प्रकट करा वा इतरांचे प्रश्न उत्तरा वा विचारांवर भाष्य करा. आपल्या विचारावरचे एखादे थर्ड पार्टीचे सहमतीपूर्ण भाष्य पाहिले कि दिवस फार चांगला जातो असे जनरल निरीक्षण आहे. ----------------------------- अर्थातच मिपा काय विचारले जात आहे, त्याचे काय उत्तर दिले जात आहे नि त्याधारित कृतींचा काय परिणाम होत आहे याला जबाबदार नसेल.

वाचने 49550
प्रतिक्रिया 149

प्रतिक्रिया

भाग २ मधे (इतर सार्‍या प्रश्नांखेरिज) मिपाकरांबद्दल चांभारचौकश्या करायला आवडेल. मिपावर किती जणांचे लहानपण गावात गेले आहे? तिथे काय काय आधुनिक सुविधा नव्हत्या?

In reply to by arunjoshi123

किती ते माहित नाही. पण मी आहे. कु़काणे तालुका नेवासा जिल्हा अह्मदनगर. तिथे बहुतेक सर्व आधुनिक सुविधा होत्या. फक्त पाण्यासाठी वणवण करायला लागायची...

In reply to by असंका

मी बुगेवाडी, ता पारनेर जी अहमदनगर. आजही एसटी जात नाही गावात. लाईट आहे १९८८ पासुन. त्याआधी कंदील. पाण्याची जानेवारीनंतर बोंबच असते. बाकी अ़कौंटंट कुकाण्यात आमचा एक मित्र होता संपत. त्याचा भाउ मुकेश.दोघेही नगर कॉलेजला होते १९८६-८८. आडनाव विसरलो आता. ख्रिश्चन होते. त्यांच्याबद्द्ल काही माहीती आहे का?

In reply to by विलासराव

असं दिसतंय कि आजही गावात राहणारा कोणी मिपाकर नाही. त्यावरून गावात नेट कितीचालते याची कल्पना यावी. मी उस्मानाबाद जिल्ह्यात तेरखेडा आणि इटकूर येय्जे राहिलो आहे. लातूर जिल्ह्यात तोंडार आणि निटूर येथे राहिलो आहे. एकूण भेट दिलेली गावे ५०-६० च्या वर निघतील. भेट दिलेली म्हणजे किमान एक दिवस राहिलो अशी.

In reply to by arunjoshi123

माझे सासरे खेड्यात रहातात. अर्धा लीटर दूध जास्तीचं हवं असेल तर किमान ३ किमि चालावं लागतं. घरात विजेच्या व्होल्टेज फ्लक्चुएशन्समुळे कोणतीही उपकरण टिकत नाही. एक टीव्ही, एक ल्यापटॉप आणि ३/४ मोबाईल्स आतापर्यंत बळी पडलेत. पेपर रोज मिळत नाही. तोही ३ किमि चालत जाऊन आणावा लागतो. मोबाईल नेटवर्क ३जी २जी सोडूनच द्या. तिथून फोन लागला तर साखर वाटावी लागेल अशी अवस्था आहे. बीएसएनएल, टाटा, व्होडाफोन, आयडिया, एअरटेल सगळे ट्राय करून झाले. आयडिया कधीतरी चालतं. त्यामुळे तिकडे जाण्यापूर्वी मी ८ दिवस गायब होणार आहे असं सगळ्यांना सांगूनच जाते. लँडलाईन फोन महिन्याचे २० दिवस बंद असतो. लाईट रोज एकदा तरी जातोच. हे गाव कुठे आहे माहीत आहे? रत्नागिरी जिल्ह्यात आणि राष्ट्रीय हमरस्त्यावर. आता बोला!

In reply to by इरसाल

मी जेव्हा गावी असतो तेव्हा वोडाफोन चे २जी नेटवर्क वापरतो. आमचे गाव (स्वामी नरेन्द्र महाराज आश्रमाच्या जवळ )नाणीज नजिक असल्याने तिथे बर्यापैकी चांगले नेटवर्क मिळते . तसेच इतरत्र ग्रामीण भागात फिरताना देखील वोडाफोन २जी वर ६० ते ११० केबीपीएस पर्यन्त स्पीड मिळतो !

In reply to by पैसा

वा वा .. असे गाव कोकणातील समुद्रकिनारी असेल , छान नारळाची झाडं, मस्त वातावरण असेल तर मला आवडेल अशा ठिकाणी काही दिवस रहायला. ३ किमी साठी सायकल वापरेन. सायकल पंक्चरचे दुकान असेलच ना ?

In reply to by arunjoshi123

मी एका अशुद्ध गावात राहतो पण बहुतेक सगळे नातेवाईक शुद्ध गावात राहतात. मी लहान असतानापासूनच माझे गाव बऱ्यापैकी विकसित(?) झालेले पण मामा मावशीकडे हीच परिस्थिती होती, आताही बऱ्यापैकी आहे. अजून 2G नेटवर्क वर अडकलेत. मामाकडे पोहायला शिकलो, नदीत मासेही पकडलेत लहानपणी, खैराचं डिंक शोधून खाल्लंय, चिंचा बोरं तर विचारू नका, बैलगाडी हाकणे, जनावरं चरायला नेणे हे सगळं केलंय.

गुगल क्रोम मधे ऐसी अक्षरे आणि मिसळपाव येथे टाईप करताना कधी कधी बॅकस्पेस वापरावे लागले तर नंतर एक कळ दाबली असताना कितीतरी अक्षरे उमटतात. मिटवलेली सारी अक्षरे प्रत्येक कळीला पून्हा येऊ लागतात. त्यामुळे इंटर्नेट एक्सप्लोरर वापरावा लागतो.एरवी फक्त क्रोमच वापरू इच्छिणार्‍या मला या समस्येमुळे दोन्ही ब्रावझर वापरत राहावे लागते. ही समस्या का येत आहे?

In reply to by arunjoshi123

असं व्हायला लागलं की त्या text box च्या बाहेर क्लिक करून मग परत लिहायला लागावं. किंवा alt tab दोनदा दाबून टंकन पुढे चालू ठेवावं.

In reply to by arunjoshi123

अजुन १ उपाय- एकदा बॅकस्पेस आणी एकदा स्पेस प्रेस करा. सोप्पंय.

In reply to by आदूबाळ

अरे वा! उपाय सांगितल्याबद्दल धन्यवाद. मलाही तोच प्रश्न येत आहे. आता तुम्ही सांगितल्यानुसार करून बघते.

In reply to by arunjoshi123

  1. दोनदा स्पेस दाबणे. मिपा प्रतिसाद दाखवताना (बहुधा सेव्ह करतानाच) फक्त एकच स्पेस ठेवतो. हा प्रतिसादही असाच लिहीला आहे.
  2. जीमेलमधे मराठी टंकनाचा पर्याय आहे तो वापरून तिथे लिहून इथे चोप्यपेस्त करणे.

In reply to by लंबूटांग

गूगल इनपुट टूल्स वापरून बघा. मी मिपावर लेख लिहिताना आधी एम एस वर्ड वर याच्या मदतीने टाईपतो आणि मग मिपावर कॉपी पेस्ट करतो. महत्वाचं म्हणजे हे ऑफलाईन चालतं.

कित्ता प्रश्न विचारते तुम जोशी साब. असेल रिकामा वेळ तर होऊद्या टाइमपास खेळ. (अग्नीकोल्हा प्रेमी) जेपी

In reply to by जेपी

बालवाडी, शाळा, कॉलेज,कंपनी सर्वत्र माझे सर्वात जास्त प्रश्न विचारणारा असे रेकॉर्ड राहिले आहे. ते इथेतरी का घालवावे? तरीही मी उत्तरे देणारांची कीव करत ५० प्रश्न सुचल्यावर त्यातला फक्त एक विचारत असतो. लोकांच्याइतके क्लिअर कंसेप्ट्स नाहीत हो आपले, काय करणार?

मायक्रोवेव्ह ओव्हनमधले ऑटो कुक मेनु खरेच कामाचे असतात का? १०१ ऐवजी १५१ मेनु असतील तर ११००० ऐवजी १५००० रु. देणे योग्य आहे का?

In reply to by असंका

मुळीच नाही. मायक्रोवेव्ह हा प्रकारच भारतातल्या पदार्थांना उपयुक्त नाही. असेलच तरी ५-१० मेन्यु सेटिंन्ग्ज पुरावीत. १२००० ला ठीक वाटतो, मजकडे ओनिडाचा आहे, वर्षातून तीनेकदा वापरतो.

मिपा सदस्यांपैकी कोण कोण स्वतःस इथे "आहे तसे" प्रकट करतात? कोण कोण पोलिटिकली करेक्ट राहायचा प्रयत्न करतात? जनरली अशा करेक्शनचे स्वरुप काय असते. सार्वत्रिक कि फक्त एखाद्दुसर्‍या गोष्टीत?

In reply to by arunjoshi123

या प्रश्नाचं उत्तर नेहमी "मी प्रामाणिकपणे लिहितो/लिहिते" असंच येणार. कारण प्रामाणिक असो, की पोलिटिकल दोघेही हेच उत्तर देतील. माझ्या बाबत साधं उत्तर आहे की नेहमी प्रामाणिकपणे बोलावे. (कारण आपण कोणाला काय खोटं सांगितलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा ते सोपं असतं.) :D :P :-/ खोडसाळ नसलेल्या माणसांना दुखवायचं मात्र मी शक्यतो टाळते. त्यांना साखरेच्या आवरणात कडू गोळी द्यायचा प्रयत्न करते.

In reply to by पैसा

त्यांना साखरेच्या आवरणात कडू गोळी द्यायचा प्रयत्न करते.
सं.मं. नथुगुग्गुळाचा एक डोस दिला की भले भले जागेवर येतात असं ऐकलय. =)) मागे एक कोण ते विचारजंत होते त्यांना नथुगुग्गुळाची मात्रा बरोबर लागु पडली असं ऐकीवात आहे =))

मांजरांना पाणी अजिबात आवडत नाही. म्हणजे त्यांचे पूर्वज पाण्यात उतरून मासे पकडत असतील असं वाटत नाही. मग त्यांना मासे इतके का आणि कधी आवडायला लागले असतील? तेच दुधाबद्दल. मांजर गायीचं दूध काही काढू शकणार नाही! =))

In reply to by पैसा

आपण नागरी वस्तीत जे मांजर पाहतो ते पाळीव किंवा माणसाच्या वस्तीजवळ राहणारे मांजर आहे म्हणजे शतकानुशतके ते तसेच असावे कुत्रा , मा़ंजर, आणि इतर काही पशू (गाय , शेळी ई) सुद्धा फक्त मानवी वस्तीच्या जवळपासच राहतात असे मला वाटते. थोडक्यात त्यांचे 'नॅचरल हॅबिटॅट' म्हणजे मानवी वस्तीच; जंगलात हे प्राणी आढळणार नाहीत (त्यांचे जंगली अवतार असतील , जसे रानमांजर वगैरे पण ते वेगळे) . त्यामुळे त्यांच्या सवयी / आवडीनिवडी या मानवाच्या सवयीप्रमाणेच विकसित झाल्या असाव्यात. अर्थात मी या विषयातील तज्ञ नाही, पण मिपावर असे एक दोन तज्ञ आहेत बहूधा, त्यांनी उत्तर द्यावे ही विनंती.

In reply to by बॅटमॅन

सध्या 'नेपथ्य' या शब्दाचा 'पडद्यापुढे निर्जीव असे जे जे काही असेल ते' असाही अर्थ प्रचलित आहे. म्हणजे स्टेजवरचे सेट्स, मांडणी, प्रॉपर्टी वगैरे.

@ इतिहासतज्ञ नानासाहेब पेशवे आणि नानासाहेब फडणवीस - मेन फरक काय आहेत?

In reply to by arunjoshi123

नाव सोडलं तर काहीच सेम नाही. नानासाहेब पेशवे म्हणजे पहिल्या बाजीरावाचा पहिला मुलगा. (१८५७ वाल्याचे नावही हेच आहे, पण तो वेगळा) त्याचे नाव बाळाजी बाजीराव. हा बाजीरावाच्या मरणोत्तर पेशवा झाला. याच्या कारकीर्दीत मराठा साम्राज्याने आपला सर्वोच्च पॉइंट पाहिला (अटकेपार स्वारी) आणि लोवेस्टही (पानपत युद्ध इ.). याचा मृत्यू १७६१ नंतर लगेचच झाला. नाना फडणवीस (नानासाहेब म्हणत नाहीत त्यांना) म्हणजे पेशव्यांच्या दरबारचा एक प्रख्यात मुत्सद्दी. आडनाव भानू. १८०० साली वारला. पानपतोत्तर काळात याच्या कारस्थानाची मराठी राज्याला फार मदत झाली. पानिपत युद्धाच्या वेळी याचे वय १८-२० वर्षांचे होते. थोरला माधवराव पेशवा थेऊरास वारल्यावरती काका मला वाचवा इ. नंतर सवाई माधवराव पेशव्याच्या वेळेस नाना, हरिपंत फडके, महादजी शिंदे, इ. लोकांनी मराठेशाही टिकवून धरली.

In reply to by बॅटमॅन

नानासाहेब फडणवीस आणि १८५७ चे बंड, इ दूरदर्शनवर ऐकले नि कंफ्यूज झालो.

In reply to by arunjoshi123

नानासाहेब नेफळे हे पूर्वजन्मीचे नानासाहेब पेशवे कि नाना फडणवीस....???

आमच्या कडे एक जुना TV आहे. थोड्या रेपेअरने चित्र पांढुरकं न दिसता नीट दिसेल आनी आवाजही निट येऊ शकतो.. तर ह्याचे नक्की काय करावे? भंगारातच घालावा लागेल का? जसं की जुन्या बाईक्स वगैरे स्क्रॅप करण्यसाठी विकता येतात.. तसं कुणी विकत घेत नाही का TV वगैरे?

In reply to by पिलीयन रायडर

पिक्चर ट्युब चांगली असेल तर -आतले सर्किट बदलून आणखी पाच सात वर्षे चालेल खर्च रू २हजार हे सर्किट ८शे रुपयात मिळते आमचा बिन रिमोटचा फिलिप्स होता (अजून आहे)आठ वर्षाँपूर्वी सर्किट टाकले त्यात २३०चानेल+रिमोट आहे. पि॰ट्युब गेली असल्यास मात्र भंगार (कानडीत बंगार =सोने)!

एच टी एम एल , इ ओपन सोर्स असेल तर तिचा मेन कोड (मंजे त्यात कोणत्या कमांडस, व्हेरियेबल्सचे टाईप्स, आणि संगणकाच्या भाषेचे इतर अनेक गुणधर्म) काय आणि किती असावा हे कोण ठरवते? अक्षरे बोल्ड करण्यासाठी ऐवजी करायचे असेल तर हा बदल कोण करेल आणि तो सर्वमान्य कसा होईल. कि फक्त "अधिकची फिचर्स" मनाप्रमाणे बदलता येतात, आणि कोर तीच ठेवावी लागते?

W3SCHOOLS dot com वर HTML चे CSS धडे आहेत ते वाचून बऱ्याच गोष्टी करता/लिहिता येतात .अक्षरे बोल्ड/ठळक करण्याचा कोड देवनागरीवर कधीकधी काम नाही करत BOLD ?ठळक झाले का ? आता इथे ठळक झाले का या वाक्यावर कोड काम करत नाहीये पण इंग्रजी BOLDझाले.

In reply to by कंजूस

अहो, मी ओपनसोर्स सॉफ्टवेअरची (कोडींग लँग्वेजचीच) मालकी कुणाची असते असा प्रश्न विचारला आहे. आता एच टी एम एल चे आज जे काही स्ट्रक्चर आहे त्यात समजा एक बदल करायचा आहे (समजा एक नवे फंक्शन टाकायचे आहे किंवा नवी व्हेरियेबलची टाईप टाकायची आहे किंवा तसलं काहीही. व्हीबी ५ आणि व्हीबी ६ मधल्या फरकांसारखे फरक करायचे आहेत)तर कोण करतं. तो बदल नक्की कसा करावा (म्हणजे नव्या फंक्शनचे नाव अ ठेवायचे का ब, इ इ ) यात "लोकांत" दुमत असले तर शेवटी कोणाच्या म्हणण्याप्रमाणे बदल होतो? उदा. अँड्रॉईडची वर्जन्स आहेत. नवे वर्जन कोण आणते? कि ओपनसोर्स मधला ओपन भाग सिमित असतो नि बाकीचा कॉपीरायटेड असतो? ओपनसोर्स आहे म्हणून मी उद्या च्या जागी असा प्रोग्रामिंग लँग्वेजमधेच बदल करू शकतो का?

१)एचटीएमेल चे जे स्टैँडर्ड रेफ्रन्स WCमध्ये मान्य झालेले असतात तेच क्रोम, आइइ, ऑपरा इ॰ ब्राउजरकडून अमलात आणले जातील/जातात आणि त्यातली 'एलमेंटस' ओळखली जातील. आता तुमची नवीन एलमेंटस ब्राउजर ओळखतील आणि त्या आज्ञा अमलात आणतील असं तुम्हाला वाटतंय का ? बरोबर ? २)AOSP =हे ANDROID चे सध्या जेलिबिन नवीनतम अवतरण आहे . हेच ओपन सोर्स वापरून नोकिआने android वर चालणारे X सिअरिज फोन बनवले आहेत परंतू गुगलने काही हातचे राखून ठेवले आहे ते रॉईल्टि दिल्याशिवाय नाही मिळणार.

१. सोन्यावर व्हॅट आहे का? महाराष्ट्रात किती % आहे? प्रतिष्ठित रजिस्टर्ड व्यापारी आणि काळा व्यवहार करणारे किरकोळ व्यापारी यांच्या दरांत इतका फरक असतो का? २. सध्याला कस्टम ड्यूटी आहे का? किती? कोणकोणत्या परदेशांतून सोने आणले तर ही ड्यूटी द्यावी लागणार नाही? साधारणपणे कायदेशीरपणे परदेशी भेट देणारा माणूस असे किती सोने विना-ड्यूटी आणू शकतो? ३. महाराष्ट्रात दागीन्यांचे सोने किती कॅरेटचे असते? हा कॅरेट प्रेफरन्स प्रत्येक राज्यात वेगवेगळा असतो असे आहे का? पूर्वोत्तर भारतात जवळजवळ २४ कॅरेटचे दागीने बनतात म्हणे. किती किती कॅरेटचे सोने ग्राहकांत कॉमन आहे? ४. गुंतवणूकीचे सोने (घरी ठेवायला घेतात ते बिस्किट) २४ कॅरेटचेच असते का? त्यावर शून्य मेकिंग चार्ज असतो का? ५. स्फटिक चिटकावलेले असताना त्यात सोने किती आहे हे कसे वजन करतात? ६. दागीने बनवण्यासाठी किती शुद्धतेच्या अधिकची शुद्धता चालत नाही. ७. मेकिंग चार्जेस किती % असतात. दागीना बनवणे किती अवघड आहे (डिजाईन किती कठीण आहे) यावर ते अवलंबून असते काय? ८. दुकानात मेकींग चार्ज घेतात. मित्रांकडून घेताना (ती डिजाईन मोडून दुसरी बनवायची असेल तर, इ) घेतात का? ९. तोळ्यात किती ग्राम असतात हे देखिल राज्यागणिक बदलते का? कुठे कुठे ११.क्ष ग्रामचा तोळा असतो म्हणे. १०. गुंतवणूक करायची असल्यास बिस्किटे घेऊन बँकेत व्याजी "डिपॉझिट" म्हणून ठेवता येतात काय? ११. सोने किती कॅरेटचे आहे हे ओळखायची शास्त्रीय पद्धत काय? कारण ते दुकानदाराला लगेच करावे लागते कोणी सोने विकण्यासाठी आणल्यास. १२. मेकिंग चार्जेस वजा जाता सोने खरेदी आणि विक्रीचा दर यांत फरक असतो काय? १३. हॉलमार्क, इ जिथे आहे तो भाग खराब करून सोन्याची विश्वासार्हता घालवता येते का? १४. सोने शुद्ध (म्हणजे सांगीतलेल्या कॅरेटचेच) आहे हे कळायचा ग्राहकासाठी मार्ग काय? १५. सोन्याच्या कॅरेटप्रमाणे त्याच्या कांतीत फरक पडतो काय? तो दिसू, भासू शकतो इतपत असतो का? १६. सोन्याचे भाव कडकायचा विशिष्ट महिना भारतात आहे काय? १७. कोणकोणते इतर बाजार त्यांच्या इंट्रिंसिक कारणांमुळे पडले तर सोन्याचा भाव वाढतो? १८. भारतात सध्याला सोन्याची एकही चालू खाण नाही काय? १९. सोन्याचे आयसोटोप्स असतात का? २० @ स्त्रीया - सोने न आवडणार्‍या स्त्रीया नगण्य मानता येतील काय? २१ @ ज्यांना सोने आवडते त्या स्त्रीया - तुम्हाला काय आवडते - सोन्याचे मूल्य कि रूप?

In reply to by arunjoshi123

तुमच्या "२१ अपेक्षित प्रश्नसंच" चे उत्तर मी देवु शकेन अस वाटतय. कारण मी त्याच क्षेत्रात आहे.

२१@स्त्रीया.. तुम्हाला सोनं घालतात त्या स्त्रीया अावडतात का लिहिलंय की काय वाटलं एकदम वाचताना!! तुमच्या त्या प्रश्नाचे उत्तर-सोन्याचे रूप आणि त्या रुपात दिसणारे मूल्य ^_~

In reply to by कंजूस

भौतिकशास्त्राच्या (आणि कामशास्त्राच्या सुद्धा बहुतेक ;) ) नियमांप्रमाणे वजनदार गोष्टी हलक्याने घेता येतात.

मराठी आंतरजालावरील पहिला (शोधला गेलेलाच अर्थात !) डुआयडी कोणता होता?

In reply to by बॅटमॅन

हा :) पण मोहिनी आधी का राहू-केतू आधी???