Skip to main content

मला कसा हा म्हणतो मेला....

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 20/12/2007 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा अगस्ती यांची कविता हात तुझा हातात...... मला कसा हा म्हणतो मेला.... क्षणभर दे मजला लाज वाटते अता तुला तर....नंतर दे मजला नकोस बांधू कुंपण कारा स्वतः भोवती तू भेटण्यास जर वेळ नसे तर, ...... नंबर दे मजला सत्ता संपत्ती अन लौकिक काय करू देवा?? आनंदाने जगण्यासाठी.... भरपुर दे मजला विस्कळीत पत्ते अजूनी हातामध्ये माझ्या संपव माझा डाव एकदा...जोकर दे मजला कसे जमावे माझे आता माझ्या पत्नीशी? माय तिची ही कटेल केव्हा...उत्तर दे मजला किती पहावी वाट सखे तू सांग जरा मजला असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला 'संध्या'काळी आचमनाला बसला हा ' केश्या' दे ! दे ! साकी आज जरा ... नवसागर दे मजला ----केशवसुमार
लेखनविषय:

वाचने 6535
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

झक्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्आस......................वा

विस्कळीत पत्ते अजूनी हातामध्ये माझ्या संपव माझा डाव एकदा...जोकर दे मजला क्या बात है केशवा! झकास लिहिले आहेस... तात्या.

केशवसुमार मस्तच रे :) आपलाच, मन्या

वा वा वा वा वा वा, मित्रवर्य केशवसुमार, अप्रतिम विडंबन. झक्कास झाले आहे. एकदम सुंदर. मतला, मक्ता आणि दुसरा शेर तर फारच वरचा झालाय. लय म्हणजे लय म्हणजे लयच भारी. माझी गझल सार्थकी लागली. अगस्ती

असेच लिहीत राहा.

विस्कळीत पत्ते अजूनी हातामध्ये माझ्या संपव माझा डाव एकदा...जोकर दे मजला सुरेख विडंबन. जिकले आम्हाला. आपला मयुर