प्रस्तावना :
णमस्कार लोक्स,
पुन्हा नेहमी प्रमाणे शनिवार संध्याकाळचा एक कंटाळवाणा टाईम आला. अशा वेळेस काहीही सुचत नाही. पण काही दिवसांपुर्वी आपल्या शाळेतले दिवस आठवले, आणि पुन्हा 'ते'दिवस आणि 'हे' दिवस सुरू झाले. आठवलं आपलं आयुष्य (माफ करा, लै मोठा शब्द आहे पण आता आर्ध संपलं त्यामुळे संदर्भापुरता वापरायला हरकत नाही) कसं बदलंत गेलं ? विचारचक्र उलटे फिरायला लागतात, मग आठवतात, ..............
* जॉब लागण्यापुर्वीचे दिवस ,त्यावेळी रेझ्युमे बनवने, टेक्निकल , ऍप्टिट्युड प्रिपेयर करणे, इंटरव्युची तयारी करणे हे अजुन ताजंच असतं, आणि जोवर कमवू जॉब चेंज करू तोवर चालत रहाणार.
* त्या आधी कॉलेजचे दिवस , त्यावेळी, प्रोजेक्ट्स, असाइनमेंट्स इत्यादी बरोबर , प्रॅक्टिकल्स/ओरल्स, पि.एल्स. मधला रट्टामारू अभ्यास, मग रिझल्ट लागायच्या आधी वाढणारं अँड्रिनलीन ..
* त्याआधी उच्च माध्यमिक शाळा (१०-११-१२वी) नुकतंच मिसरूड फुटून कॉलेजला जातोय याचा अभिमान, मराठी मिडियम मधून सायंसला असाल तर उचाच बायो-फिजिक्स-केमेस्ट्रीची (त्यावेळी) भलीमोठी वाटणारी इंग्रजी पुस्तकं नाकावर धरून आई-बापाला लै मोठा आय.ए.एस. होणार च्या थाटात केलेली शोबाजी.त्यावेळी सुद्धा एक साचेबद्ध अभ्यास.. रट्टामारूपणा आलाच.
* आता आंगणवाडी पर्यंत नेऊन हाताला शेबूड पुसून किंवा भोकाड पसरून बोर नाही करत. मला आठवतात शाळेतले दिवस.इथ मराठी माध्यमातली बरिच असतील. त्यावेळेस आपला शैक्षणिक अभ्यासक्रम कसा होता? पुस्तकांत मस्त मस्त चित्र असत.बालभारतीच्या पुस्तकात मस्त धडे असत.. आपल्या पुलंचा एक धडा आवर्जुन असे. ज्ञानेश्वरांची कविता असे. आपण आपलं आवडतं मराठीचं पुस्तक शाळा सुरू होण्या आगोदरच वाचून काढत असू. त्यावेळी १०जुनला शाळा सुरू झाली की मस्त नवी कोरी पुस्तकं आणि वह्या मिळायच्या. बाबांबरोबर स्टेशनरी शॉपिंगला जाताना उर का भरून येई कळत नसे. मग पहिला महिना त्या पावसाळ्याच्या सादळलेल्या वातावरणात वह्या-पुस्तकांचा वास घेण्यात कित्ती आनंद मिळे हे अवर्णनिय आहे. आत्ता पुस्तके मिळतील, वासही मिळेल, पण ती बालबुद्धी नाही मिळू शकत .. आपण शहाणे झालो ना !! आता का आपण पुस्तकांचा वास घेऊन प्रफुल्लित होउ ? त्यावेळी आपल्याला १-२री चाचणी, सहामाही, ३-४थी चाचणी ,वार्षीक बरोबरच एक खास दिपावली अभ्यासिका मिळे. त्या अभ्यासिकेत आपल्याला प्रश्न वगैरे सर्व छापिल मिळे फक्त उत्तर लिहीण्यासाठी लाईन्स ठेवलेल्या असतं .. आणि अभ्यासिका पुर्ण करताना लै लै आनंद होत असे, हुरूप येउन अभ्यास होत असे. आणि तुझं किती झालं रे ? माझं संपलं .. असं सागंताना एक वेगळाच आनंद होत असे, तो आनंद आपण आता वयोमानाने विसरलो, आपण मोठे झालो ना.. :)
विषयः
विषय आहे पत्रलेखन.आता काय ? इ-मेल्स चा जमाना, फोन आले, मोबाईलही आले, आता कोण डोंबलाचं पत्र लिहीतो का? आता आपण जी विद्युत-पत्र लिहीतो ति ही इंग्रजाळलेली. प्रोफेशनल पत्रांच ही तेच. तुम्हाला शाळेच्या दिवसंपर्यंत घेउन जाण्याचा एकच हेतू. आपण आज कशी पत्र लिहीतो, आणि बालपणात शाळेत आपणास आठवत असेल तर एक प्रश्न असे, पत्रलेखन.
काहीसे विषय आठवतात, जसे,
१) शाळेची सहल आयोजित करायची आहे, एस.टी.संचालकांस एस.टी.च्या मागणीविषयी पत्र लिहा.
२) मोठा भाऊ नोकरीसाठी बाहेरगावी आहे, त्याला खुशालीचे पत्र लिहा.
३) आजोबांना दिवाळीत गावी येणार आहोत ,असे पत्र लिहा.
४) शाळेच्या मुख्याध्यापकांना (आय'म ग्रेट, आजही हा शब्द आठवला) कसलीशी विनंती करणारे पत्र लिहा, इ.इ.
आवाहन :
त्यावेळी पत्र कसं लिहायचो ते आठवा , आणि एक पत्र इथं ही त्याच शैलीत लिहा. काही विशिष्ट मराठी शॉर्टकट्स असायचे, ते आपण अंमळ विसरलो असू, आपली पत्र लिहीण्याची परंपरा काळाआड गेलिये , जरा हवा आन् दो भाई..
मी आत्ताच पिडा भाउंना अशीच खरड केली, त्यातुन ही कल्पना सुचली आहे.
घोषणा (मराठीत डिक्लेरेशन) :
१.ही कोणतीही स्पर्धा नाही.
२. विषय :विनोदी, गंभीर(अगदी कोणा क्ष च्या दहाव्याची बातमी देणारंही चालेल),व्यवसायिक, आणिक कसलंही चालेल. प्रेमपत्रांना हरकत नाही पण जर त्यातुन काही वाद झाले तर हा धागा,धाग्याचा लेखक आणि मिपा यास जबाबदार असणार नाही. आपण पत्र कोणत्याही मिपाकराला पाठवू शकता.
३. पत्र ज्याला पाठवायचं ती व्यक्ती शक्यतो मिपाकर असावी (हट्ट नाही).
४. उत्तम पत्र लिहीणार्याच्या खरडवहीत आणि याच धाग्याला एडिट करून खाली , कोणतीही डेडलाइन न देता, मोठ्या अक्षरात "आपण उत्तम पत्रलेखक आहात" असा शेरा मारण्यात येइल.
५. कोणीही परिक्षक नाही.
६. कॉपी करू नये , (केली तर मी काही करू शकत नाही :) )
पहिला ट्राय मीच करतो.
माझे पत्र :
प्रिय काकाशिरोमणी पिवळा डांबिस,
पाचवी फांदी,पिंपळझाड कॉलनी,
हाडके कब्रस्तान,कॅलिफॉर्निया,
अमेरिका-१२३४५
विषयः शनिवार संध्याकाळी बोर झाल्यावर आपल्या प्रिय व्यक्तिलाही बोर करणारे पत्र लिहा.
सा.न.वि.वि.
पत्र लिहीण्यास कारण की, शनिवार संध्याकाळी बाहेर जाण्याचा मुड नसल्याने आपल्याला खरड टाकित आहे. आमच्या येथे अंमळ बोर होत आहे. यंदाच्या वर्षी मंडळाने क्लबांत जाणे कटाक्षाने टाळले आहे. आत्ताच गावजेवणाचा कार्यक्रम झाला. सुमारे २५ कोंबड्या, १२ कुकर भात , आणि १५० तंदुरी रोट्यांचा अल्पसा अन्नदान(की भक्षण?) चा कात्यक्रम स्वहस्ते यशस्वी पार पाडला . आपले काय कुशल? दारूगोळा घरी आणून ठेवल्याचे कळाले. शिवास (की शिवा'ज) रिगल घरी आणून ठेवली आहे, ती शिळी होऊन विषारी तर होणार नाही ना? आणि कट्टारी लोकांना विषबाधा तर होणार नाही ना ? आपणास कट्ट्याच्या टारझन मित्र मंडळातर्फे शुभेच्छा! आपला कट्टा यशस्वी होतो आणि सगळं पब्लिक शुद्धीत आणि सुखरूप घरी जाओ अशा आशयाचे पत्र सोमरसेश्वराला पाठवलं आहे.
अजुन काय लिहू ? दामण्णाच्या गायीला वासरू झालेलं आहे, ते अंमळ येडझवं दिसतंय, मोराक्काच्या म्हशीचं दुध प्यायला पळतं.. आपला शेर्या कुत्रा पिसाळला आहे, गावातील गुरांच्या डॉक्टरला चावून फरार आहे, अचानक रात्री कोणालाही चावतो म्हणून कोणी बाहेर झोपत नाहीये. आपल्याकडे हिवाळ्याची फारच थंडी पडते आहे, आम्ही सगळे काड्या न कागदं गोळा करून शेकोटी करतो.आईने जाळासाठी लागणार्या कचर्यासाठी उकिरडे चाळतो म्हणून थंडीत कान गरम केला. नारायण सरपंच सकाळी ओढ्याकडे तुळस लावायला जाताना पाय घसरून पडले, आता बरे आहे.
छोट्या डांबिसला गोड पापा, डांबिस काकुंना साष्टांग दंडवत.
कळावे ,
लोभ असावा,
आपला पुतण्या,
पिवळा टारझन
मौजे कंपाला, युगांडा खुर्द,
अफ्रिका-९८७६५ (पुर्व)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
नविन चोच्यांसाठी सुचना : माहित नसेल तर नाक खुपसू नका, पिवळा डांबिस एक आदरणिय मिपाकर आहेत.
उत्तम पत्र लेखक :
१. विजुभाउ सातारवी
वाचने
36204
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा!
टार्या
हा हा हा!
हा हा हा
टार्या,
अंमळ?
In reply to टार्या, by यशोधरा
हहपुवा!
In reply to अंमळ? by पिवळा डांबिस
ज ह ब ह र्या
In reply to अंमळ? by पिवळा डांबिस
बाकी त्से
In reply to ज ह ब ह र्या by टारझन
मग कुणाला माहीत ?
In reply to बाकी त्से by पिवळा डांबिस
मोठा
माझेही एक पत्र
माझं फक्त "कॉपी आणि पेस्ट" हो!!!
In reply to माझेही एक पत्र by विजुभाऊ
एक पत्र असही
पत्रास उत्तर!!!
विश्लेषण
In reply to पत्रास उत्तर!!! by पिवळा डांबिस
काकांच्या
In reply to विश्लेषण by टारझन
़़़़़़
In reply to काकांच्या by पिवळा डांबिस
:)
In reply to ़़़़़़ by टारझन
>>>सोबत