एक किस्सा (बाल दिन स्पेशल)
लेखनविषय (Tags)
एक किस्सा (बाल दिन स्पेशल)
गांजवे चौकात एक छोटेसे ६-१० स्के .फुटाचे भडभुंज्याचे दुकान आहे
भेळ शेव चुरमुरे आदी पदार्थ मिळतात....मालक त्याची बायको व छोटी मुलगी दुकानात असते.....
दुकानातली "शेंगदाण्याची भजी" मला आवडतात रुची पालट म्हणून मी १०-१५ रु ची घेत असायचो/असतो
२-३ वेळा मात्र" माल तयार केला नाही... उद्या नक्की करतो" अशी उत्तरे मिळाली ..मी पण फारसे मनावर घेतले नाही
पुढे एके दिवशी स्टेट ब्यांकेत खाते/ डिपॉझिट असल्याने पास बुक जुळवून घेण्यासाठी ब्यांकेत जायचे ठरले व चेक बुक/कार्ड पासबुक असलेले "पाऊच "घेऊन ब्यांकेत गेलो.
सुदैवाने "सिस्टिम डाउन "अश्या सबबी न मिळता पास बुक जुळवून घेतले.
तश्या फारश्या एंट्री नव्हत्याच म्हणा…कारण बाकीचे व्यवहार भार्या बघते……
येताना ते दुकान लागले अन रस्त्यावर स्कूटर लावली अन "शेंगदाण्याची भजी" याबद्दल विचारणा केली
त्यावर तयार नाही...माल भरला नाही अशी त्याने छापील उत्तरे दिली…।
यावर त्याला म्हणालो अरे मागच्या २-३ वेळी पण तू असेच म्हणाला..काही अडचण आहे का? का आयटम बंद केला आहेस???
असे म्हणताच तो म्हणाल" काय सांगू साहेब..भांडवल कमी पडत आहे..लई ओढा ताण चालू आहे"
"का भांडवल दुस-या धंद्यात फिरवले का?
ह्या छोटी ला नर्सरीत प्रवेश घ्यायचा आहे २५ हजार रु डोनेशन आहे ते जमवत आहे त्या मुळे ओढाताण होत आहे"
किती जमले?"
"१३ हजार जमले आहेत बाकीचे मित्र नातेवाई देईन म्हणत आहेत पण हातात पडेल तेव्हा खरे.."
कितिची गरज आहे>?
"२५ डोनेशन+ ३ हजार ड्रेस.पुस्तके..खाऊचा डबा पाण्याची बाटली आदी साठी"
मी त्याचे नाव विचारले व शांतपणे पाऊच मधून चेक बुक काढले व त्याच्या नांवाने १५ हजाराचा चेक लिहून त्याला दिला..
माझ्या ह्या अनपेक्षित कृतीने तो भांबावला..व खुर्ची वरुन उठला व चेक स्वीकारतं माझे हात धरले व "साहेब तुमचे उपकार जन्मभर विसरू शकत नाही..पाहिजे तर व्याज घ्या तारण म्हणून शॉप अक्ट लायसन्स घ्या "असे गदगदलेल्या स्वराने म्हणाला...
तो असे करणार ह्यात मला आश्चर्य वाटले नाही..कारण मी म्यान्युफ्याकचरिंग व्यवसायात असल्याने लाखो रुपयाची उचल ब्यांक व खाजगी सावकाराकडून घेतेलेली होती..त्याचे हप्ते व्याज फेडणे त्यात येणारे ताण तणाव ह्या ८४ लक्ष योनीतून प्रवास झालेला होता...
हात सोडवत म्हणालो व्याज वगैरे नको..जमेल तशी परत फेड कर मात्र चेक नी रक्कम माझ्या खात्यात भरत जा.. मला फोन करत जा...
पुढे त्याचा फोन आला दीड हजार ..कधी १ हजार असे करत तो रक्कम फेडत होता...
३-४ महिन्याने त्याच्या दुकानात गेलो..तो नव्हता.
मला पहाताच त्याची बायको पटकन उठली मी २० रु ची भजी घेतली..
बाजुला कोप-यात छोटी खेळत होति..२ वेण्या..शाळेचा ड्रेस..कोप-यात दप्तर..पाण्याची बाटली दिसत होति..
तिचि आई म्हणालि.."काकांना नमस्कार कर छोटी"
मुलीने बसूनच आपला चिमुकला हात हालवला...
मला एकदम माझ्या मुलीची बाल मूर्ती आठवली..त्या पण अश्याच २ वेण्या शाळेचा ड्रेस..लंच बॉक्स घेऊन सेंट हेलेना शाळेत जात असत..
ता.क.(त्याने सर्व पैसे फेडले)
प्रतिक्रिया
खरे आहे आपले.
खूप छान अनुभव !!
दंडवत.
हेच म्हणतो.
+१
नेमक्या गरजेच्या क्षणी मदत
नेमक्या गरजेच्या क्षणी मदत दिल्याने तो खारीचा वाटा न राहता सिंहाचा वाटा झाला.हेच मनात आले ! शिवाय हे मनात आले तरी ऐन वेळेवर किती जणांचा हात खिशात जाईल याबाबत साशंक आहे त्यामुळे अकुंना __/\__ !.
खूप खूप अभिनंदन
(No subject)
अकुकाका झिंदाबाद....
+1
कौतुक आहे तुमचं!
किस्सा आवडला.
छान
.
अभिनंदन!
मानल आपल्याल
वा! मस्तच.
शेंगदाण्याची भजी पण करतात? का
चांगला अनुभव मांडलात..
बोधकथा
@ पैसा ताई - असेच प्रश्न पडले
नाही इतकी जुनी घटना वाटत नाही
नाय रे!
किस्सा म्हणून छान आहे.
खरं सांगू?