Skip to main content

मला काही सुचवायचे आहे

लेखक स न वि वि यांनी शनिवार, 15/11/2014 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा खास सल्लागार मंडळ , संपादक मंडळ आणि तांत्रीक समिती ह्या मंडळी करता आहे . मला काही सुचवायचे आहे. शक्य असल्यास बदल झाला किंवा होऊ शकला तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होइल ह्याची खात्री आहे. १. आपण एखादा धागा सुरु करतो आणि त्या धाग्यावर जेव्हा प्रतिसादांची रांग लागते म्हणजेच length वाढते तेव्हा मी एक पहिले कि सर्वात पहिला प्रतिसाद ज्याने कोणी लिहिला त्याचाच प्रतिसाद आपल्याला (पाने / प्रतिसाद वाढले तरी हि) दिसत रहतो . समजा तो धागा १ तारखेला चालू केला असेल आणि त्यावर १ च दिवसात ३० प्रतिसाद दिले असतील तर नवीन (म्हणजे recent reply) पाहण्या साठी आपल्याला त्या प्रतिसादाची ३० पाने उलटावी लागतातकिंवा क्लिक्लिकाट करावा लगतो. त्यापेक्षा जर recent आलेला प्रतिसाद आपल्याला पहिलाच दिसला तर शेवटच्या पानापर्यंत आपल्याला जावे लागणार नाही. त्यामुळे आपल्याला recent प्रतिसाद लगेच दिसेल. २. दुसरी गोष्ट अशी कि त्याच ३० प्रतिसादात जर का आपल्याला एखादा हवा असलेला किंवा एखाद्या मि . पा . करचा प्रतिसाद शोधायाचा असेल तर search option त्या धाग्यावर असणे फार गरजेचे आहे. बर्याच वेळेला मी पाक्रु विभागात एखादी पाक्रु शोधायचा प्रयत्न करते तेव्हा मला हवी असलेली पाक्रु नावाप्रमाणे किंवा पदार्थाप्रमाणे शोधायला प्रतेक पानावर क्लिक्लिकाट करत शोधावे लागते. बघा जमले काही बदल करायला तर ठीक नाही तर ……… जैसे थें *HELP*

वाचने 1703
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

हे मिपासाठी आहे का ? 30 पाने प्रतिसाद आलेला धागा मी पाहिला नाही. पहिली सोय नविन प्रतिसादवर टिचकी मारली होते. दुसरी सोय गुगल आणी मिपाच्या साहाय्याने मिळते.

काय करणार!मिपाची घरी येऊन धागे,प्रतिसाद उघडुन द्यायची,सर्च करुन द्यायची सोय होईपर्यंत जैसे थे च! तोपर्यंत अस्मिता ही मराठी सिरियल बघा.ती म्हणते म्हणे,"शोधा म्हणजे सापडेल"!! (कृ ह घे हे वे सां न.)

समजा तो धागा १ तारखेला चालू केला असेल आणि त्यावर १ च दिवसात ३० प्रतिसाद दिले असतील तर नवीन (म्हणजे recent reply) पाहण्या साठी आपल्याला त्या प्रतिसादाची ३० पाने उलटावी लागतातकिंवा क्लिक्लिकाट करावा लगतो.
३० प्रतिसाद वाचण्यासाठी ३० वेळा क्लिक करावे लागते?? हे नवीनच वाचतोय. मला तर ब्वा एका रांगेत सगळे प्रतिसाद दिसतात. नेमका मुद्दाच मला कळला नाही.
हा धागा खास सल्लागार मंडळ , संपादक मंडळ आणि तांत्रीक समिती ह्या मंडळी करता आहे . मला काही सुचवायचे आहे.
मग सरळ व्यनिसुविधा वापरायचीत ना.

In reply to by अन्या दातार

३० प्रतिसाद वाचण्यासाठी ३० वेळा क्लिक करावे लागते?? हे नवीनच वाचतोय. मला तर ब्वा एका रांगेत सगळे प्रतिसाद दिसतात. नेमका मुद्दाच मला कळला नाही.
मी असे म्हणालेच नाही क ३० वेळा क्लिक करावे लागते . मुद्दा नित वाचा कि :-) मला फक्त एवढेच म्हणायचे आहे कि जर नवीन प्रतिसाद हा पहिला दिसावा त्याने सोयच होईल सगळ्यांची. उदा. समजा मी एका धाग्यावर आज प्रतिसाद दिला तर तर तो आज पहिल्या पानावर दिसेल आणि त्याच धाग्यावर तुम्ही प्रतिसाद दुसर्या दिवशी दिला तर तो पुढच्या पानावर दिसणार, इथेच मला म्हणायचेय कि माझा प्रतिसाद १ दिवस जुना असून हि तो पहिल्या पानावरच दिसतो, जिथे तुमचा प्रतिसाद ताजा असून हि तो दुसर्या पानावर दिस्तो. … कळले का आता तरि.
हा धागा खास सल्लागार मंडळ , संपादक मंडळ आणि तांत्रीक समिती ह्या मंडळी करता आहे . मला काही सुचवायचे आहे.
तर हा धागा मी मुद्दामच इथे टाकला कि ज्यामुळे मला इतरांची मते हि जाणून घेत येतील .

In reply to by स न वि वि

प्रतिसाद कालानुक्रमेच दिसायला हवेत. त्यामुळे चर्चा कशी होत गेली ते समजतं. तस्मात, मागणी योग्य वाटत नाही. पाभे आणि इतरांचं म्हणणं योग्य आहे कारण दुसर्‍या पानावर नव्या प्रतिसादांना टॅग येत नाही. त्यामुळे नव्या-जुन्याची सरमिसळ होऊन चर्चेत कोण कुणाशी काय (आणि आधी की नंतर) बोलतंय हे कळत नाही. यानं चर्चेतला रस निघून जातो.

सूचना क्र. १ - असहमत. सध्याची व्यवस्था योग्य आहे. सूचना क्र. २ - सहमत. 'सर्च' सुविधा आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे माझ्याही एकदोन सुचना: १) प्रतिसाद दुसर्‍या पानावर जातात. त्यानंतर नवीन प्रतिसादाचा टॅग फक्त पहील्या पानावर दिसतो. दुसर्‍या पानावर गेल्यास तो टॅग दिसत नाही. म्हणजे आज कोणते नवीन प्रतिसाद दुसर्‍या (किंवा त्यापुढील) पानावर आलेत ते लगेचच समजत नाही. त्यामुळे चर्चेचा- वाचनाचा रस निघून जावू शकतो. २) सभासदाची सही काय कारणामुळे रदबातल केलेली आहे? काही तांत्रीक अडचण असल्यास दूर करावी खर्चीक असल्यास टाळावी. - पाषाणभेद मधूमेहाविरूद्ध लढा (अशा प्रकारची सही सध्या येत नाही. वरील सही स्वत: लिहीलेली आहे.)

In reply to by पाषाणभेद

संपूर्ण सहमत, विषेशत :
त्यामुळे चर्चेचा- वाचनाचा रस निघून जावू शकतो.

In reply to by संजय क्षीरसागर

बरोबरे. समजा एकुण ३० प्रतिसाद नवीन आहेत आणि त्यातले १५ पहिल्या पानावर आहेत. तर पहील्या पानावरील नवीन प्रतिसादांना "नविन" असा लाल टॅग दिसतो. पण दुसर्‍या पानावर गेल्यास त्या पानावरील नवीन प्रतिसादांना "नविन" असा लाल टॅग दिसत नाही. हे फक्त माझ्याच बाबतीत होत नसावे अशी आशा करतो.

क्रोम एक्सटेन्शन लिहीत आहे जे तुम्ही लिहीलेल्या वेळेनंतर आलेले सर्व प्रतिसाद हायलाईट करेल. जमल्यास गेल्यावेळेस लॉगईन केले होते त्याची वेळही लक्षात ठेवेल. पूर्ण झाले की इथे लिंक देईनच.

In reply to by लंबूटांग

पण ते क्रोममध्येच चालेल अन क्रोममध्ये आम्हा लिहीणार्यांना त्रास होतो. बॅक कीज वैगेरे. मी काय म्हणतो, त्यापेत्यात्यापेक्षा २००० प्रतिसाद दिसतील अशी काही व्यवस्था नाही का करता येणार? जास्त् लोड येत असेल डिबी वर तर युजरला तसे ऑप्शन द्या. ऐसीअक्षरेवर तशी सुविधा आहे.

In reply to by पाषाणभेद

माझा मिपाच्या कोणत्याही तांत्रिक बाबींशी संबंध नाही. किंबहुना म्हणूनच हे एक्स्टेंशन लिहीण्याची कल्पना सुचली. एकदा क्रोममधे लिहीले की ते फाफॉवर पोर्ट करणे सोपे आहे. तेही करायचा मानस आहेच.

सध्या फक्त पानाच्या शेवटी पेजिनेशन किंवा पुढच्या पानांच्या लिंक्स दिसतात ...हीच सुविधा जर धागा संपल्यावर पण दिलीत तर प्रतिक्रिया वाचणे सोपे होईल. पूर्ण पान स्क्रोल करायला लागणार नाही. हा संदेश संपादक मंडळ आणि व्यवस्थापक यांना पाठवला होता ....परत इथे देत आहे ...