Skip to main content

शेजवान बिट्टे

लेखक hitesh यांनी रविवार, 16/11/2014 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १ बिट्टे करण्यासाठी : १ वाटी कणीक , पाणी , तेल किंवा तूप २ बाजारात मिळणारी शेजवान चटणी ३ दही : अर्धी वाटी. चपातीसाठी मळतो तशी कणीक मळुन घ्यावी. त्याचा गोळा करुन पोळपाटावर एक चपाती लाटावी. त्याला तेल किंवा तुप लावावे आणि बाकरवडीला करतात तसा रोल करावा. रॉल थोडा दाबुन करावा म्हणजे त्याचे थर सुटणार नाहीत. अशा प्रकारे रोल करावेत. माणशी दोन रोल पुरतात. चाकूने त्याच्या बाकरवड्या कापाव्यात. मग प्यानमध्ये दोन चमचे तुप गरम करावे आणि हे बिट्टे शॅलो फ्राय करावेत. थोडा रंग बदलला की झाकण लावुन ठेवावे. गरम करावे. मध्येच उघडुन हलवुन पुन्हा गरम करावे. व्यवस्थीत शिजले की ताटात घ्यावेत. त्यावर गरजेनुसार दही , शेजवान चटणी व मीठ घालुन कालवावे व खावे. याबरोबर तिखट आमटी , पातळ पालक भाजी वगैरे गोष्टी छान लागतात. हे डीप फ्रायही करतात.. कणकेतच तिखट मीठ वगैरे घालता येते. बिट्ट्यासोबत तुप गूळ खातात असेही ऐकिवात आहे.

वाचने 14738
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

ऑं.... हितेश भाय एकदम हिकड.चांगलय. आमच्या नानाला.... जाऊ दे आज त्याची आठवण नको.

In reply to by विश्वजीत भोसले पाटील

हा नाना मिपावर जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी सर्वत्र आढळणारा प्राणी (पक्षीः माणूस) आहे. सर्वत्र वावर असतो...वेगवेगळ्या रुपात.

In reply to by विश्वजीत भोसले पाटील

हा नाना कोण मिपाचा चालकमालक हाये काय ?? आमच्या नानासाहेबाबद्द्ल काय सांगु ? येत जा नाना समजुन जातील नाना काय चिज आहेत.

In reply to by जेपी

तुम्हाला चीज म्हणायचेय काय? नानांना चीज म्हणताय होय? पाकृचा धागा असला म्हणून काय झाले!

In reply to by नाखु

बरोबरे. सगळ्या गोष्टींचे चीज व्हायला तसाही वेळ लागतो.......त्यामुळे तुम्ही तसे समजू शकता.

In reply to by hitesh

जेप्या, नाना वायलां. ह्ये डॉक्टर आहेत. हितेश, पाकृ आवडली.

रेसिपी चांगली वाटते. पण फोटो असा टाकलाय की. ताटातले पदार्थ नावडते असल्यावर माणुस ताटाची जी अवस्था करतो तसा आला आहे. फोटो पाहिल्यावर असे वाटते की " रेसिपी " आवडलेली नाही.

In reply to by हरकाम्या

एक माणसापुरतेच केले होते. म्हणुन त्याच ताटात कालवले व खाल्ले.म्।रेसिपी छान होती.

हे रोल आधी वाफवुन किंवा शिजवुन घेऊन मग बिट्टे करता येतील.. पुढच्या रविवारी नवे वेरिएशन करणार आहे.

नाना - माई ह्यांच्यावर खमंग वादावादि करण्यात चटचट संपतील.... पण ती भेंडिची भाजी बिट्ट्यांना कशी लावून खाल्लीत ते जरा सांगाल का? सचित्र दाखवलत तर फारच सोप जाईल समजायला...

In reply to by दिपक.कुवेत

दही व चटणी लावलेला एक बिट्टा व एक भेंडीचा तुकडा असे खाणे. पण याच्याबरोबर पातळ भाजीच हवी. कालचा बेत अचानक ठरल्यानेभेंडीबरोबर खावे लागले.

र् रोल केले. http://postimg.org/image/i7fj7f5z5/ रोल वाफवले . म्ग तुकडे करुन शॅलो फ्राय केले. http://postimg.org/image/497js72zf/ सोबत पालकाची पातळ भाजी http://postimg.org/image/pbpzu76yd/

डीप फ्राय करुन कुरकुरीत केले तर शेजवान चटणीसोबत चकणा म्हणुन खाता येईल ता क . आम्हे दारु पीत नै.

In reply to by hitesh

हितेस भाय, दारु पेत नायतर चांगली सवय हाय. आमचा नानाला मात्र लै वैट्ट सवय.गेला बिचारा.

In reply to by दिपक.कुवेत

शिरा पडो मेल्या. आधी पाह्यला नको? नीट जमलेत न जमलेत ते?

In reply to by प्यारे१

तुला भारी रे काळजी :).... हे आप्लं बिट्ट्यांची रे!!