Skip to main content

शिवसेना - युद्धात हरले आणि तहातही हरले

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 12/11/2014 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
सुरूवातीपासून शेवटपर्यंत उद्धव ठाकर्‍यांनी व पर्यायाने शिवसेनेने अत्यंत चुकीची पावले टाकली आणि त्यातूनच आज शिवसेनेची अवस्था 'युद्धात हरले आणि तहातही हरले' अशी केविलवाणी झाली आहे. १५ वर्षे सत्तेपासून लांब राहिल्यावर सत्ता अगदी हातातोंडाशी येऊनही आपल्याच चुकीमुळे घास तोंडात जाताजाता हातातून पडून मातीत मिळावा आणि पुन्हा एकदा उपाशी रहावे लागण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. आणि ही वेळ शिवसेनेनेच स्वतःवर ओढवून घेतली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लगेचच भाजपने जागावाटपाचा फॉर्म्युला बदलण्याची मागणी करायला सुरूवात केली होती. 'महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच असणार' असे त्यावेळी कै. गोपीनाथ मुंड्यांनी जाहीररित्या सांगितले होते. केंद्रात सेनेला अत्यंत बिनमहत्त्वाचं फक्त १ मंत्रीपद देऊन भाजपने आपलं भविष्यातील धोरण स्पष्ट केलं होतं. भाजपचे धोरण ओळखूनच शिवसेनेने आपल्या चाली आखायला हव्या होत्या. परंतु सेना नेते आपल्याच अहंकारात, भ्रमात व नसलेल्या ताकदीच्या जोषात राहिले. भाजप जास्त जागा लढविण्यासाठी दबाव आणणार हे मे २०१४ मध्येच स्पष्ट झाले होते. अशावेळी मे ते सप्टेंबर या काळात शिवसेनेने धोरणीपणे विचारमंथन करून आपले डावपेच आखायला हवे होते. ११९ पेक्षा थोड्या जास्त जागा देऊन भाजपचे समाधान करावे, आपण कधीच निवडून आलो नाही व ज्या जागा भाजपलाही जिंकणे अशक्य आहे अशा जागा देऊन त्याग केल्याचा आव आणावा, ११९ पेक्षा थोड्या जास्त जागा देऊन त्या बदल्यात महत्त्वाची मंत्रिपदे देण्याचे जाहीर आश्वासन भाजपकडून घ्यावे व त्या बदल्यात केंद्रात जास्त व महत्त्वाची मंत्रिपदे मागून घ्यावीत, हे सुरू असतानाच मनसे व इतर काही स्थानिक पक्षांशी बोलणी करून भाजपविरूद्ध पर्यायी आघाडी तयार करावी असे अनेक पर्यात शिवसेनेला उपलब्ध असताना शिवसेना नेते गाफील राहिले. भाजप कदापिही युती तोडणार नाही, ज्या भाजपला आपण २५ वर्षे आपल्या तालावर नाचविले आहे तो भाजप यापुढेही आपल्याच तालावर नाचत राहील, आपण म्हणू तसेच होईल या भ्रमात शिवसेना नेते राहिले. सुरेश प्रभू, मनोहर जोशी इ. समंजस नेत्यांना वाळीत टाकून उद्धव ठाकरे अत्यंत उथळ, वाचाळ, अविचारी असलेल्या व अजिबात दूरदृष्टी नसलेल्या संजय राऊत, रामदास कदम, रावते, प्रेम शुक्ला इ. नेत्यांवर विसंबून राहिले व त्याची फळे शिवसेनेला मिळाली. ४ सप्टेंबरला अमित शहा मुंबईत येणार होते. त्यांनी स्वतःहून मातोश्रीवर येऊन आपली भेट घ्यावी अशी उद्धव ठाकर्‍यांची इच्छा होती. परंतु त्यांनी अमित शहा व मोदी या जोडगोळीला ओळखण्यात चूक केली. हे दोघे भाजपच्या पूर्वीच्या नेत्यांप्रमाणे प्रादेशिक पक्षांपुढे झुकणारे नसून अत्यंत धोरणी व प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व सहन न करणारे आहेत हे त्यांच्या लक्षातच आले नाहीत. अमित शहा मुंबईत येऊन उद्धव ठाकर्‍यांना भेटणार नाहीत हे समजल्यावर तिळपापड होऊन शिवसेनेने 'शहाणा हो' ही पोस्टर्स सोशल मिडियातून पाठवायला सुरूवात करून त्यांना डिवचले. अमित शहांना डिवचणे म्हणजे थेट मोदींनाच डिवचण्यासारखं होतं हे सेना नेतृत्वाला कधी समजलंच नाही. अमित शहांनी शहाणपणा दाखवून याकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्यावर शेवटी उद्धव ठाकर्‍यांना अमित शहांना मातोश्री भेटीचे सन्मानपूर्वक निमंत्रण पाठवावं लागलं आणि इथेच शिवसेना झुकायला आणि डाव हरायला सुरूवात झाली. नंतर प्रत्यक्ष जागावाटपाची बोलणी सुरू असताना सुरवातीला भाजपने १३५-१३५-१८ असा फॉर्म्युला सुचविला होता. भाजपची ताकद शिवसेनेच्या तुलनेत दीडपट होती. त्यानुसार भाजप १६०-१७०, शिवसेना १००-११० व मित्रपक्ष १८ असेच जागावाटप हवे होते. असे असतानाही भाजपची मागणी जास्तीत जास्त १३५ जागांची होती. नंतरच्या चर्चेत भाजप १३०-१४०-१८ व त्यानंतर १२५-१४५-१८ इतका खाली उतरला होती. शिवसेनेला ही उत्कृष्ट संधी होती. भाजप १२५ जागा लढवत असल्याने भाजपला जास्तीत जास्त १०० जागा जिंकता आल्या असत्या व त्यामुळे भाजप बहुमतापासून खूप दूर राहिला असता (आता भाजपने १२२ जागा जिंकल्याने फार थोड्या जागांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज आहे.). शिवसेनेला १४५ जागा लढवून कदाचित भाजपपेक्षा जास्त जागा जिंकण्याची व पर्यायाने मुख्यमंत्रीपद मिळविण्याची संधी होती. जरी भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या तरी उपमुख्यमंत्रीपद व इतर अनेक महत्त्वाची मंत्रिपदे मिळाली असती. युती करून एकत्र लढल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी ला प्रत्येकी ३० पेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या व राष्ट्रवादीला खूप कमी जागा मिळाल्यामुळे भाजपला पाठिंबा देउन उपयोगच झाला नसता. पर्यायाने भाजपला सर्वार्थाने शिवसेनेवरच अवलंबून रहावे लागले असते. दुर्दैवाने उद्धव ठाकरे स्वतःच्या अहंकाराचे बळी ठरले. युती तुटल्यावर सुद्धा स्वतःच्या अहंकारामुळे मनसेबरोबर नवीन आघाडी त्यांना करता आली नाही. भाजपने आधीच योजना आखून सर्व मित्रपक्षांना स्वतःच्या बाजूला वळवून शिवसेनेला पूर्ण एकाकी पाडले. युती तुटली ही वस्तुस्थिती मान्य करून हे वास्तव समंजसपणे स्वीकारण्याऐवजी शिवसेनेने प्रचारात असभ्य पातळी गाठली. सामनातून व सभांमधून सातत्याने अमित शहा व मोदींना लक्ष्य करून त्यांच्याविरूद्ध अत्यंत असभ्य व नकारात्मक प्रचार केला गेला. त्यांच्याबरोबरीने मित्रपक्षांचे राजू शेट्टी, रामदास आठवले, जानकर इ. ना ही लक्ष्य केले. शेवटी खडसेंविरूद्धही अत्यंत नकारात्मक प्रचार केला. महाराष्ट्रातील लोकांना मोदी हवे आहेत व काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभारातून मुक्ती हवी आहे हे सेनेने न ओळखता काँग्रेस-राष्ट्रवादी ऐवजी भाजपलाच आपला मुख्य शत्रू मानण्याची घोडचूक केली. मोदींना अफझलखानाची उपमा देणे, अमित शहांना आदिलशहा-कुतुबशहाची उपमा देणे, मोदींच्या तीर्थरूपांचा उद्धार करणे, आदित्य ठाकरे सारख्या पोराला चर्चेसाठी पाठविणे अशा अनेक घोडचुका सेनेने केल्या. याउलट भाजपने समंजसपणे शिवसेनेच्या प्रचाराकडे दुर्लक्ष करून आपला सकारात्मक प्रचार सुरू ठेवला व सेनेचे आपोआप खच्चीकरण होत गेले. त्याचेच परीणाम निकालात दिसले. भाजपच्या तुलनेत जेमतेम निम्म्या जागा मिळवून युतीतला मोठा भाऊ खरोखर कोण होता याचे जनतेनेच उत्तर दिले. तरीही भाजपला स्पष्ट बहुमत न मिळणे व आपल्याकडे तब्बल ६३ आमदार असणे हे शिवसेनेकडे हुकमी एक्के होते. त्यांनी आपली पाने नीट खेळली असती तर त्यांना बर्‍याच गोष्टी मिळविता आल्या असत्या. कदाचित सेनेला अडीच वर्षांकरता मुख्यमंत्रीपदही मिळविता आले असते. ज्या दिवशी निकाल लागले त्याच दिवशी सेनेने भाजपला पाठिंबा जाहीर करून सर्वप्रथम भाजपला मिळू शकणारी राष्ट्रवादीची रसद रोखायला हवी होती. भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही हे एकदा नक्की करून नंतर भाजपकडून आपल्याला हवे ते सेनेला मिळविता आले असते. एकदा सेनेचा पाठिंबा घेतल्यावर त्यांना लाथाडून नंतर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणे भाजपला अत्यंत अवघड झाले असते. हे न करता शिवसेना पुन्हा एकदा गाफील राहिली. भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही व शेवटी त्यांना आपलेच पाय धरावे लागतील या भ्रमात सेना नेते राहिले. भाजपने चातुर्याने सेनेला बोलण्यात गुंतवून अपक्ष व इतर लहान पक्षांचा पाठिंबा मिळवून आपली गरज जेमतेम ७-८ आमदारांवर आणली व राज्यपाल व सभापती आपल्याच पाठीशी राहणार असे धोरण आखून शिवसेनेच्या मदतीशिवात विश्वासदर्शक ठराव मंजूर करुन घेऊन शिवसेनेचे मानेवरील जोखड कायमचे उतरविले. भारतीय मतदार व्यक्तिगत असभ्य टीका व नकारात्मक प्रचार कायमच नाकारतो हे शिवसेनेच्या पराभवामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले. शिवसेनेच्या जागी मायावती असती तर तिने अत्यंत चातुर्याने पत्ते खेळून स्वत:च्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद मिळविले असते. किंवा राकाँ, काँ बरोबर मोट बांधून स्वतःचाच मुख्यमंत्री बनविला असता. दुर्दैवाने शिवसेना नेत्यांकडे धोरणीपणाचा संपूर्ण अभाव व अहंकार, स्वतःच्या नसलेल्या ताकदीबद्दल भ्रम, उर्मटपणा, अविचारीपणा, प्रक्षोभक शब्द, उथळ्पणा व असंमजपणा याशिवाय दुसरे काहीच नसल्याने शिवसेना युद्ध हरलीच पण तहातही हरली. ही निवडणुक शिवसेनेच्या अंताचा प्रारंभ ठरणार असे आता वाटत आहे.

वाचने 122342
प्रतिक्रिया 256

प्रतिक्रिया

राजकारण गेलं चुलीत. औषधांच्या किंमतीबद्दल अमेरिकी दबावाखाली बदललेले धोरण, पाकिस्तानला सबसिडाईज्ड गॅस द्यायचा प्रस्ताव, पर्यावरणविषयक धोरण इ. भाजपा सरकारचे गेल्या काही दिवसांतील काही निर्णय अजिबात पटत नाहीयेत. भाजपा म्हणजे स्वच्छ वगैरे काही गोड गैरसमज नसले तरी हे सगळे बरेच अनपेक्षित वाटले. प्रादेशिक पक्ष संपवायचा भाजपाचा विचार असेल तरीही त्यासाठी स्वीकारलेले मार्ग बरोबर वाटत नाहीयेत. आता राष्ट्रवादीकडे भाजपाने पाठिंबा कुठे मागितला वगैरे कोणी कृपया सांगू नका. ते सगळं इतकं सोपं नसतं हे तुम्हा आम्हाला माहित आहे. अजितदादा पवारांनी शिवसेनेचे सरकार आणि त्याला दोन्ही काँग्रेसचा पाठिबा असा प्रस्ताव नाकारल्याचे सांगितले. दुसरीकडे सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपद देणार अशा बातम्या येत होत्या, मात्र सुरेश प्रभूंना मंत्रीपद मिळाले आहे. ते साहेबांच्या अगदी जवळचे आहेत असेही लगेच सगळीकडे लिहून येत आहेच. दिल्लीत विधानसभा निवडणुकांत भाजपाने जे केले ते महाराष्ट्रात करायचे टाळले आहे. इथेही त्यांना तसे करता आले असते, कारण परिस्थिती अगदी तशीच होती. तसे काही झाले असते तर कदाचित पुढच्या निवडणुकांत लोकांनी त्यांना जास्त प्रमाणात मते दिली असती. आता ते कठीण वाटते. वाजपेयींची भाजपा आता नाही हे ठळकपणे दिसून येत आहे. त्याशिवाय बदलत्या परिस्थितीत रा.स्व.संघ आणि भाजपाचे समीकरण काय असेल याबद्दलही कुतुहल आहे. सामान्य लोक आशेने किंवा भावनेच्या भरात मतं देऊन एका किंवा दुसर्‍या पक्षाला निवडून आणत असतात, त्यां सगळ्या राजकारण्यांना मात्र या लोकांशी किंवा त्यांच्या भावनांशी काही देणेघेणे नसते हे अनेकदा दिसून आले आहे. चलता है. जसे आम्ही, तसेच आमचे नेते. लोकशाईचा जय हो !!

In reply to by पैसा

वाजपेयींची भाजपा आता नाही हे ठळकपणे दिसून येत आहे.
नाही हो. वाजपेयींच्याच भाजपाने १९९८ मध्ये जयललितांशी (आणि इतर अनेकांशी) युती केली नसती तर वाजपेयी पंतप्रधान बनूच शकणे शक्य नव्हते. अगदी काठावरचे बहुमत असलेल्या वाजपेयी सरकारला तामिळनाडूतून घसघशीत ३० खासदारांचा पाठिंबा मिळाला. जयललितांशी युती केली नसती तर ३९ पैकी अगदी एखाद्या जागी तरी भाजप उमेदवाराचे डिपॉझिट वाचले असते तरी ते भाजपने आपले मोठे यश मानले असते!! जयललितांविरूध्दच्या आरोपांचा तपास करणार्‍या अधिकार्‍यांची एकसाथ बदली वाजपेयी सरकारने जयललितांनी पाठिंबा काढून घ्यायच्या दोन महिने आधी केली होती.त्यावर 'प्रत्येक अधिकारी कोणत्या ना कोणत्या केसचा तपास करतच असतो आणि कोणीही अधिकारी आयुष्यभर एकाच ठिकाणी थोडीच काम करतो' असे स्पष्टीकरण प्रमोद महाजन यांनी दिले होते. उत्तर प्रदेशातील नेत्यांच्या विरोधाला न जुमानता मायावतींना तीन वेळा मुख्यमंत्री करून त्यांना मोठे करण्यात वाजपेयींचाच हात होता. कल्याणसिंगांच्या मंत्रीमंडळात ९५ मंत्री होते आणि त्यात अनेक गँगस्टरचाही समावेश होता.त्यावर 'ते जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांना मंत्री बनण्यापासून कोणीही अडवू शकत नाही' अशा स्वरूपाचे उत्तर वाजपेयींनीच दिले होते. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की वाजपेयींनी सुध्दा अशा तडजोडी अनेकवेळी केल्या होत्या.त्याची किंमत त्यांना भरायला लागली का? नक्कीच लागली. सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याविषयी आदर असूनही त्यांना २००४ मध्ये पंतप्रधान बनता आले नाही. यावेळीही राष्ट्रवादीशी तडजोड करून भाजपाने एक मोठी रिस्क घेतली आहे.पायात घुसलेला एक काटा काढायला दुसरा काटा वापरायचा आणि योग्य वेळ येताच दोन्ही काटे फेकून द्यायचे अशी रणनिती असावी असे एक भाजप समर्थक म्हणून मनापासून वाटते. तरीही जोपर्यंत दुसरा काटा हातात आहे तोपर्यंत अस्वस्थता राहणारच. पण भाजपाने एक काटा हातात घेतला हे मला आवडले नाही म्हणून त्यांच्या विरोधातील बाभळीच्या झाडाला मात्र मी मत देऊ शकणार नाही हे नक्कीच.

In reply to by क्लिंटन

वाजपेयी स्वतः अतिशय निस्पृह आणि आदरणीय होते . पण त्यांचे सरकार आणि मंत्री अनेक आरोपांनी घेरले गेले होते . किंबहुना आज जे भाजप चे कॉन्ग्रेसीकरण झाले आहे त्याची प्रक्रिया वाजपेयी यांच्या पंतप्रधान काळात सुरु झाली होती . वाजपेयी या सर्वासमोर हतबल झाले होते . अवांतर - आज भक्तांच्या आंखो का तारा असणारया आणि मोदी यांचे विश्वासू असणार्या सुब्रमन्यम स्वामी यांनी अटलजी यांच्या विरुद्ध इतके घाणेरडे आरोप केले आहेत कि अटलजी यांच्या बद्दल असणारया आदरामुळे त्याच्या लिंक इथे देण्याचा मोह टाळत आहे . ऋषितुल्य अटलजी बद्दल असले बिभित्स आरोप करणारा इसम आज भाजप च्या थिंक tank मध्ये आहे यावरून भाजप साठी अटलजी आज अडगळीत जमा झाले आहेत हेच अधोरेखित हते

In reply to by पिंपातला उंदीर

बाजपाईंचे उगाच कौतुक करु नका हो. कॉग्रेस चा माणुस असल्यासारखा वागणे कायम. निस्पृह कसले, मानलेली मुलगी आणी जावई धिंगाणा घालत होते सरकार मधे आणि बरोबर भाजपचे शरद पवार प्रमोद महाजन आणी ब्रिजेश नावाचा सरकारी अधिकारी. वाजपाईच्या जागी तेंव्हा मोदी सारखा कोणी असता तर पूर्ण बहुमतात भाजप आले असते निवडुन १९९९ सालीच.

In reply to by प्रसाद१९७१

>>> निस्पृह कसले, मानलेली मुलगी आणी जावई धिंगाणा घालत होते सरकार मधे हे माध्यमांनी निर्माण केलेले स्पेक्युलेशन आहे. त्यांच्या मानलेल्या मुलीच्या व जावयाच्या सरकारमधील धिंगाण्याचे काही पुरावे असतील तर कृपया ते उघड करावेत.

In reply to by श्रीगुरुजी

कदाचित राजकीय अपरिहार्यतेपोटी मानलेली मुलगी व जावयाने काही प्रताप केले असतील. मला तरी अपरिहार्यतेपोटी केलेले प्रकार क्षम्य वाटताहेत बुवा. निदान काँग्रेससारखा भ्रष्टाचार तरी केला नाही ना!

In reply to by आजानुकर्ण

तुम्हाला काही कळत नाही बघा आजानुकर्ण . जावई फ़क़्त गांधी घराण्याचा असेल तर कांही पुरावे द्यावे लागत नाहीत . भाजप सारख्या साधन शुचिता जपणारया पक्षाचे नेत्याचे जावई कसे भ्रष्टाचारी असतील ? तिथे मात्र पुरावे लागतात याना . लोक काहीही बोलतात . जळतात मेले त्यांच्या भरभराटी वर

In reply to by पिंपातला उंदीर

@ प्रसाद१९७१, आजानुकर्ण, पिंपातला उंदीर, वाजपेयींच्या मानलेल्या मुलीच्या व जावयाच्या सरकारमधील धिंगाण्याचे काही पुरावे असतील तर कृपया ते उघड करावेत. जाताजाता ... मोदींविरूद्ध कणभरही पुरावा नसताना काँग्रेसने त्यांना १० वर्षे प्रचंड त्रास दिला. वाजपेयींच्या मुलीविरूद्ध किंवा जावयाविरूद्ध कणभर पुरावा जरी असता तरी त्यांना किती त्रास झाला असता याची कल्पनाच केलेली बरी.

In reply to by श्रीगुरुजी

भाजपावर आरोप झाले की पुरावे मागणे आणि काँग्रेसवर बिना पुराव्याने बोंबलत गावभर फिरणे हे यांचे धंदे आहे

In reply to by श्रीगुरुजी

@गुरुजी - असे पुरावे कधी देता येतात का हो? आणि तुम्ही मी दिलेली दुसरी दोन नावे सोयीस्कर रीत्या विसरलात ( प्रम, आणी ब्रिजेश ), त्यांच्या बद्दल बोला की. कोलगेट आणि २जी ची प्रकरणे कोणी केली. माझे असे ही म्हणणे आहे की बाजपाईंच्या ऐवजी मोदींसारखा कोणी माणुस असता तर १९९७-९९ मधेच भाजपचे बहुमत आले असते. किंवा बाजपाई पेक्षा कोणी दुसरा माणुस असता तर २००४ साली भाजप हरली नसती. बाजपाईंनी भाजपला आतुन खाण्याचे काम ५० वर्ष केले. मनापासुन हिंदुत्ववादी मतदार कधीच बाजपाईंना मत द्यायला बाहेर पडले नाहीत. आज पण बाजपाई प्रचारात असते तर भाजपला बहुमत मिळणार नाही ह्याची त्यांनी बरोबर काळजी घेतली असती.

खुर्चीवरून माळ्यावर... ळ : मातोश्री महाल, वांद्रे. वेळ : ओढवलेली! प्रसंग : बेतलेला! पात्रे : चेपलेली! मिलिंदोजी फर्जंद : (लगबगीने अंत:पुरात प्रवेश करत) शतप्रतिशत मुजरा, म्हाराज?...आँ, अरीच्चा?... कुटं ग्येलं आमचं म्हाराज? आत्ता हितं होतं, ग्येलं कुटं? (इकडे तिकडे बघत) म्हाराज होऽऽऽ, असाल तसं भाईर या! मुजऱ्याला आलुया नव्हं! उधोजीराजे : (कुठून तरी खोल आवाज येतो...) क...क...कोण...आहे...रे...तिकडे? मिलिंदोजी : (खुळ्यासारखे आसपास बघत) कुटून आवाज येतोय, त्येच कळं ना झालंय, म्हाराज! मुजरा करावा, तर कुटल्या दिशेला त्वांड करावं आनि कुटल्या साइटला.. उधोजीराजे : (नुसताच आवाज...) खामोश! एकदम खामोश! बकबक केलीया मारले जाल! मिलिंदोजी : (अजिजीने) स्वॉरी! मुजरा कुटं करू, त्येवडं सांगावं! उधोजीराजे : (वैतागलेल्या सुरात) मरो तो मुजरा!..बाहेर आमच्या दरबारात कोण कोण आलंय? मिलिंदोजी : (मान हलवत) कुटलं कोन आलंया? होते ते येकेक उटून गेल्ये! वैशे भी तुमकू भीड अच्छी नै लगती थी नाऽऽऽ...आता कुनी न्हाई! बिनधास्त या भाईर! उधोजीराजे : (अदृश्‍य अवस्थेतच थयथयाट करत) तुला...तुला...चे-ची-न!! मिलिंदोजी : (जीभ काढत) माफी असावी म्हाराज! शांतवन करन्यासाटी आलो हुतो! उधोजीराजे : (अजूनही अदृश्‍यच) कसलं सांत्वन करतोस, फर्जंदा! मुलुखगिरीची हौस फिटली इतकंच! होतं-नव्हतं, तेही गेलं, हाती धुपाटणं राहिलं! सांत्वनच करायचं, तर उभ्या महाराष्ट्राचं कर! ज्या हातानं या मुलखात शिवशाही आणण्याचा बेलभंडार उचलला; कल्याणकारी राजवटीचं शिवबंधन बांधलं! भ्रष्ट, दुष्ट मोगलाईला चारी मुंड्या चीत करण्याची शपथ देवविली, त्याच हातांनी आता ढोकळा खायचा, ढोकळा? छे...जगदंब, जगदंब! मिलिंदोजी : (जीभ काढत)...लईच ब्यकार पोझिशन झाली, म्हाराज! उधोजीराजे : (संतापलेला सूर दालनात घुमतो..!) बेकार? निकाल यायला सुरवात झाल्यापासून इथं माळ्यावर चढून बसलोय! सिंहासनावर विराजमान व्हायची ज्याची क्षमता, त्याच्यावर माळ्यावरच्या भंगारात बसायची पाळी यावी? ज्यानं घोड्यावर मांड टाकून अवघा महाराष्ट्र पादाक्रांत करावा, त्याचे पाय माळ्यावर बसून अवघडावेत? जगदंब, जगदंब! मिलिंदोजी : (हळहळत) चुक-चुक...झक मारली आनि झुनका खाल्ला, रास्सारी धावत बसला!...(जीभ चावत) म्हंजी...असं झालंय नव्हं! पन आता त्ये जाऊ द्या! झालं, ग्येलं, मिठी नदीला मिळालं, थालीपिठं खाया लगीलगी या, असा मुदपाकखान्यातून वैनीसायबांचा मेसेज हाय! उधोजीराजे : (माळ्यावरून खोल आवाजात) या पराभवाचा बदला घेतल्याशिवाय आम्ही मुखात थालीपीठ काय, पाण्याचा थेंबसुद्धा घेणार नाही! किंबहुना या माळ्यावरून पायउतारही होणार नाही! त्रिवार नाही!! मिलिंदोजी : (मिनतवाऱ्या करत) कशापायी जिवाला तरास करून घेतायसा? या खाली, दोघं बी मिळून डझनभर थालीपिठं हानू! पराभवाचा बदला कोनाचा घेयाचा? आनि कशापायी? काय बारकंसारकं आसंल, तर या इमानी चाकराला सांगा! चटशिरी करतोय की न्हाई बघा! उधोजीराजे : (किंचित विचारात पडत) असं म्हणतोस? मग दोन कामं करा! मिलिंदोजी : (गुडघ्यावर बसत) निस्ता हुकूम करा, म्हाराज! तुमचा बोल फुलासारकं न्हाई उचिलला तर नावाचा फर्जंद न्हाई! उधोजीराजे : (माळ्यावरती धडपडाट!) घोडा या प्राण्यावर कायमस्वरूपी बंदी आणा! आणि दुसरं... (दात ओठ खात) पहिले त्या आमच्या युवराज विक्रमादित्यांना इथं घेऊन या!! "मिशन वन फिफ्टी‘ करतोय, लेकाचा!! - ब्रिटिश नंदी

अरे कुठ नेउन ठेवलाय महाराष्ट्र माझा? गुरुजी याच समर्थन करून दाखवा पाहू 'वीजचोर' आमदाराकडेच वस्त्रोद्योग विकासाची जबाबदारी http://www.loksatta.com/mumbai-news/power-theft-accused-bjp-mla-suresh-…

In reply to by नाखु

त्यांचे काम च होते ना ते रुळ तपासायचे आणि काही प्रॉब्लेम असेल तर कळवायचे. जे काम करणे अपेक्षीत होते ते केले म्हणुन बक्षीस? काय वेळ आली आहे :-(

In reply to by पिंपातला उंदीर

ही अतिशय वाईट बातमी आहे. अश्या बातम्या सर्व पेपर नी पहील्या पानावर बॅनर हेडींग म्हणुन छापायला पाहीजेत.

In reply to by प्रसाद१९७१

बातमीत वाईट काय आहे? भाजपाची अपरिहार्यता तुमच्या लक्षात आलेली दिसत नाही. (इति श्रीगुरुजी!)

In reply to by पिंपातला उंदीर

तुमच्याकडे सफाईने दुर्लक्ष करण्यात येणार आहे . अमेरीकेसोबत मंजूर केलेले अन्नसुरक्षा विधेयक , औषधाम्च्या किमतीवरचे नियंत्रण ई ई बातम्या कोणी पुढे आणणार नाही. आणि आणले तरी दुर्लक्ष करणार

माझे आवडते वाक्य ( ते माझेच आहे नेहरू म्हणतात आराम हराम है या प्रमाणे नाही) ,काँग्रेस हा भाजपाचा राजकीय गुरू आहे. ! ( तो जनसंघाचा नसला तरी ) .

In reply to by चौकटराजा

आराम हराम है ? नाही हो. मुळ वाक्य असे आहे " आराम हा राम आहे". मात्र कोणीतरी शुद्धलेखनाची मोठीच चुक करुन ठेवलीय.

शतकाबद्दल शुभेच्छा!.. बाकी यावरून माझीच एक भविष्यवाणी आठवली -
माझ्यादृष्टीने भाजपा आता ११०-१२० मधे अडकणे अधिक धोकादायक आहे. एक तर त्यांना पूर्ण बहुमत मिळाले पाहिजे, किंवा मग ~९०, म्हणजे शिवसेनेची स्पष्ट गरज पडेल अश्या सीट्स. १२०-१३० हा आकडा फारच विचित्र आहे. तिथे भाजपा पोचणे फारच घातक आहे राज्याच्या दृष्टीने..

In reply to by आनन्दा

१२२ जागा हे फारसे घातक नाही. आगामी काही महिन्यातच शिवसेनेतील काही आमदार फुटुन भाजपत येऊन भाजप बहुमताचा आकडा गाठेल. फूट टाळण्यासाठी शिवसेनेला भाजपला पाठिंबा द्यावाच लागेल. कितीही मतभेद असले तरी भाजप शिवसेना पुन्हा एकदा एकत्र यावेत अशी इच्छा आहे. शिवसेनेने अजून वस्तुस्थिती स्वीकारलेली नाही. भाजपवर 'सामना'तून रोज टीकेचा भडीमार सुरू असतो. त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. सेनेने वस्तुस्थिती मान्य करून २०१७ मधील महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करावे, अन्यथा तिथेही वाट लागेल.

In reply to by श्रीगुरुजी

फुट तर भाजपात पडणार आहे म्हणे ४० आमदारांना नितीन गडकरीच मुख्यमंत्री हवेत ;) उगाच दुसर्याचे बघायचे वाकुन आणि स्वतःचे ठेवायचे झाकुन चालु आहे तुमचे

In reply to by दिवाकर देशमुख

>>> फुट तर भाजपात पडणार आहे म्हणे ४० आमदारांना नितीन गडकरीच मुख्यमंत्री हवेत स्वप्नांच्या हिंदोळ्यावर आनंदात झुलत रहा. *lol* *yahoo*

In reply to by श्रीगुरुजी

जसे तुम्ही झुलत आहे तसेच ;) छत्तीसगड मधे इतक्या महिला मृत्युमुखी पडल्या आणि आपले परिधान मंत्री वर्ल्डटुरला गेले आहे आणि तिथुन फोटो शेअर करत आहे. साधी ट्विट देखील नाही या गोष्टीवर हेच काँग्रेसच्या राज्यात झाले असते तर छाती बडवत ट्विटचा महापुर आणला असता रोज चॅनल्स वर चर्चेची झडी लावली असती. पण भाजपाच्या राज्यात घडल्याने सगळे चॅनलवाले शेपुट घालुन गुपचुप ऑस्ट्रेलियाला पळुन गेले आनि फालतु बातम्या दाखवायला सुरुवात केली


मला आशचर्य वाटते , युती तुटली नसती तर मिपाचे काय झाले असते ? इत्क्या महाचर्चा , आवेश , पुरावे शक्य तरी झाले असते का ? मला वाटते , युती तोडण्याचे जे कोणे शिल्प्कार असतील , त्यांना मिपातर्फे पुस्प्गुच्च पाठविण्यात यावा.

In reply to by पिंपातला उंदीर

अशी नौटंकी करण्याची पवारांची जुनी सवय आहे. तुम्ही फार लक्ष देऊ नका आणि अजिबात गांभीर्याने घेऊ नका.

In reply to by श्रीगुरुजी

शरद पवार एनडीएची वाट चालू लागल्याचं चित्र
हे फार काहि अशक्य नाहि. तसंही शिवसेना केंद्रसत्तेतुन बाहेर पडल्यावर भाजपला "भरभक्कम मराठी" आधाराची गरज पडणारच आहे. पवारांव्यतिरीक्त कोण घेणार हि जबाबदारी... राष्ट्रवादी काँ. आणि भाजपने मतदारांना फार गृहीत धरल्याचं दिसतय. यात रा.काँ.चं काहि नुकसान होणार नाहि, पण याची किम्मत भाजपला चुकवावी लागेल.

In reply to by अर्धवटराव

अशा पुड्यांवर आणि अपप्रचारावर विश्वास ठेवू नका. भाजपला जिथे शिवसेनेच्या तब्बल १८ खासदारांची गरज नाही, तिथे ते राष्ट्रवादीच्या जेमतेम ६ खासदारांना हिंग लावूनसुद्धा विचारणार नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

२००९ पासुन जेव्हा हारलात तुम्ही तेव्हापासुनच अप्रचार करायला सुरुवात केली आहे भाजपाने आता दुसर्याला तोंड वर करुन कुठे बोलत आहेत.? विसरलात काँग्रेस विरुध्द काय काय अप्रचार चालु होते. आता जळायला लागली का ?

अखेर भाजपने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव रडत खडत का होईना जिंकला, पण प्रश्न असा आहे कि शिवसेनेला इतके अपमानित करून या मोदी सेनेने काय साध्य केले ? ज्या सेनेच्या साथीत गेली २५ वर्ष तुम्ही गळ्यात गले घालून फिरत होतात ती यांना अचानक इतकी नकोशी का वाटू लागली ? मोदीसेना कदाचित ५ वर्ष इथे टीकेलही (ते पण आपल्या तथाकथित जाणत्या राजाच्या मनात असेल तर) पण जिथे स्वतः मोदी २७ सभा घेऊनही या लोकांना भ्रष्टाचार्वादी कॉंग्रेस (हे मोदींनी दिलेले नाव आहे )चा पाठींबा घ्यावा लागतोय तिथे पुढीलवेळी लोकांनी यांच्यावर का आणि कशासाठी विश्वास ठेवावा ? सेना चुकली असेल, नव्हे मी मान्य करतो कि सेना चुकली पण या मोदी लाटेत आणि बाळासाहेब हयात नसताना उद्धव ठाकरेंनी ६३ आमदार निवडून आणले हे हि काही कमी नाही. खरे तर याच उद्धव ठाकरेंची (मी धरून) सर्वांनी खिल्ली उडवली होती (खील्ली सम्राट राज ठाकरेंनी तर पार वडे आणि सुप बीप काढले होते ते त्यांच्यावर उलटलेच आहे.) पण जितका संयम उद्धावनी गेल्या २ महिन्यात दाखवला (जो सेनेच्या विचार (खरे तर आचार) सरणीत कधीच बसत नव्हता. वयक्तिक मला सेनेने विरोधात बसावे असे निकालापासून वाटत होते कारण साहजिकच भाजपसोबत सरकारमध्ये सेना गेली असती तरीही तिला कधीच तो आधीचा सन्मान मिळाला नसता. आता विरोधात बसून या कमकुवत सरकारविरुद राळ उठवून मान ताठ ठेवून वावरणे हेच खरे शहाणपणाचे ठरेल. खरे तर मी पक्का भाजपेयी माणूस ( भाजपेयी अशासाठी कि वाजपेयींचे विचार पटायचे पण मोदि चे पटतील असे नाही रादर ७०% मोदी विचार पटत नाहीत ) पण या तावडे, फडणीस, राजीव(प्रताप) रुडी, माधव भंडारी आणि खडसे मामांनी इतका माज करून ठेवला म्हणून वैतागून गेलोय कि साला भाजप नाही निवडून आले तरी चालेल पण या मंडळींचा माज कमी करा. असो साला गेल्या २ महिन्यातला राग बाहेर पडल्यामुळे आता कसे बरे वाटत आहे.

In reply to by गजानन५९

>>> अखेर भाजपने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव रडत खडत का होईना जिंकला, पण प्रश्न असा आहे कि शिवसेनेला इतके अपमानित करून या मोदी सेनेने काय साध्य केले ? ज्या सेनेच्या साथीत गेली २५ वर्ष तुम्ही गळ्यात गले घालून फिरत होतात ती यांना अचानक इतकी नकोशी का वाटू लागली ? शिवसेनेबरोबर तीन पायांची शर्यत होती. संधी मिळताच भाजपने त्यातून आपला पाय काढून घेतला. शिवसेना वाटते तेवढी सरळ नाही. १९९५-९९ या काळात शिवसेनेने भाजपची प्रचंड फरपट केली होती. अहंभावी व उपद्रवी शिवसेनेबरोबर महाराष्ट्रात सरकार चालविणे अत्यंत त्रासदायक ठरेल याची भाजपला कल्पना होती. ही युती तुटणारच होती. जागावाटप हे एक निमित्त झाले. >>> मोदीसेना कदाचित ५ वर्ष इथे टीकेलही (ते पण आपल्या तथाकथित जाणत्या राजाच्या मनात असेल तर) पण जिथे स्वतः मोदी २७ सभा घेऊनही या लोकांना भ्रष्टाचार्वादी कॉंग्रेस (हे मोदींनी दिलेले नाव आहे )चा पाठींबा घ्यावा लागतोय तिथे पुढीलवेळी लोकांनी यांच्यावर का आणि कशासाठी विश्वास ठेवावा ? जाणत्या राजाला कोणीच विचारत नाही म्हणून तर स्वतःहून न मागता पाठिंबा द्यायला पुढे आले. भाजपने याचा पुरेपूर उपयोग करून घेतला. मनसे संपलेलीच आहे. राष्ट्रवादीचा न मागता दिलेल्या पाठिंबा प्रत्यक्षात न स्वीकारून पण त्याचाह उपयोग करून शिवसेनेचे ब्लॅकमेल थांबविले व शिवसेनेला सरकार स्थापनेत सामील करून घेतले नाही. त्याचवेळी शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद देऊन काँग्रेसला उपाशी ठेवले. एकाचवेळी ३ विरोधी पक्षांना मॅनेज केल्यावर आता फक्त राष्ट्रवादीला संपविणे शिल्लक आहे. पुढील काळात राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येतील व राष्ट्रवादीला पाठिंबा काढून घ्यावाच लागेल. अशावेळी शिवसेनेला स्वतःहून पाठिंबा द्यावा लागेल. नाही दिला तर परत निवडणुक होऊन भाजपलाच फायदा होईल. >>> सेना चुकली असेल, नव्हे मी मान्य करतो कि सेना चुकली पण या मोदी लाटेत आणि बाळासाहेब हयात नसताना उद्धव ठाकरेंनी ६३ आमदार निवडून आणले हे हि काही कमी नाही. मान्य आहे. परंतु हातात ६३ आमदार असताना व भाजप बहुमतापासून बराच दूर असताना उद्धव ठाकर्‍यांनी योग्य ती पावले टाकली असती तर बरेच काही मिळविता आले असते (कदाचित अडीच वर्षांकरता मुख्यमंत्रीपद सुद्धा). >>> खरे तर याच उद्धव ठाकरेंची (मी धरून) सर्वांनी खिल्ली उडवली होती (खील्ली सम्राट राज ठाकरेंनी तर पार वडे आणि सुप बीप काढले होते ते त्यांच्यावर उलटलेच आहे.) पण जितका संयम उद्धावनी गेल्या २ महिन्यात दाखवला (जो सेनेच्या विचार (खरे तर आचार) सरणीत कधीच बसत नव्हता. उद्धव ठाकर्‍यांनी गेल्या २ महिन्यात संयम दाखविला?????????????? हहपुवा हा त्यांचा संयम असेल तर संयम सुटल्यावर काय होईल याची कल्पनाच केलेली बरी. >>> वयक्तिक मला सेनेने विरोधात बसावे असे निकालापासून वाटत होते कारण साहजिकच भाजपसोबत सरकारमध्ये सेना गेली असती तरीही तिला कधीच तो आधीचा सन्मान मिळाला नसता. आता विरोधात बसून या कमकुवत सरकारविरुद राळ उठवून मान ताठ ठेवून वावरणे हेच खरे शहाणपणाचे ठरेल. सहमत. परंतु अजूनही शिवसेनेचे तळ्यात/मळ्यात सुरू आहे.

फेसबुक सभारः- वो एक असाधारण भक्त था, 16 मई से पहले उसका एक ही काम था, दुसरो के ट्वीट्स पे जाके गालियां देना, फेसबुक पे सबके पोस्ट पे जा नमो- नमो लिखना! उसका मानना था, अगर मोदीजी बने प्रधान मंत्री, उसे मिलेंगे 15 लाख, सिलिंडर 100 रुपये में भरा जाएगा, पेट्रोल 20 रुपए लीटर! सारे कोंग्रेसी नेता जेल के अंदर होंगे, मोदी जी भारत को अमेरिका बना देंगे, एक-एक कर टूट रहे उस के सपने, मोदी के वादे सारे छूट रहे हैं! अब कभी-कभी वो सोशल साइट्स पर आता है, और चुपके से निकल जाता है, वो आज अंदर से दुखी है, पर अभी भी हारा नहीं है! मोदीजी की हर बात का बचाव करता है, लोगो से बोलता फिरता है “समय दो मोदी जी को”, वो आज दुखी है मोदीजी उसी रोबर्ट वाड्रा को बचा रहे हैं, जिसकी उसने 400 फोटो राष्ट्रीय दामाद वाली शेयर की थी! वो रिपोर्टरों को अब गाली भी नहीं दे सकता, कल तक वो जिन रिपोर्टरो को बिका बोलता था, आज वो मोदी के भजन गा रहे हैं, समझ नहीं आता वो आज किसे गाली दे! कभी किसी को आपटार्ड की गाली दे के निकल लेता है, वो आज कल अपने पुराने ट्वीट्स डिलीट करने में लगा है, मोदी जी के u -टर्न से तंग आकर, अब उसने ट्वीटना ही छोड़ दिया है! ये थी एक भक्त की व्यथा, अथ श्री नमो-भक्तम् कथा! ---- वरील लेखन कपोकल्पित आहे इथल्या कुणाशी संबंध लागल्यास तो केवळ योगायोग समजावा

राष्ट्रवादीने न मागता दिलेल्या पाठिंब्याचा भाजप पुरेपूर उपयोग करून घेईल असं वाटतंय. ४ प्रमुख विरोधी पक्षांपैकी मनसे संपलेली आहे. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचा थेट स्वीकार न करता किंवा स्पष्टपणे न नाकारता त्याचा उपयोग करून भाजपने शिवसेनेचे ब्लॅकमेलिंग मोडून काढले व शिवसेनेला सरकारमध्ये येऊन न देता आपली डोकेदुखी थांबविली. त्याचवेळी शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद देऊन काँग्रेसला पूर्ण उपाशी ठेवले. आता काँग्रेसकडे विधानपरीषदेचे सभापतीपद हा एकमेव लाल दिवा आहे. तोसुद्धा काँग्रेसकडून काढून घेऊन राष्ट्रवादीकडे सोपविला जाईल व नंतर राष्ट्रवादीविरूद्धची भ्रष्टाचाराची प्रकरणे उकरून काढून राष्ट्रवादीच्या अंताचा प्रारंभ केला जाईल.

In reply to by श्रीगुरुजी

भाजपाने निर्लज्जपणे जनतेचा विश्वासघात करुन राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला आणि त्यावर उत्तर द्यायला भक्तगण सोडले काल अमित शहा देखील पाय लावुन पळुन गेले उत्तर द्यायला हिंमत झाली नाही बहुतेक त्यांच्याकडे गुरुजी नव्हते :)

In reply to by श्रीगुरुजी

राष्ट्रवादी हे सगळे गपपणे बघत बसतील असं वाटतं तुम्हाला? शरदराव पवार तुमच्या माझ्या वयापेक्षा जास्त वर्षे राजकारण करत आहेत आणि काँग्रेसलाही १८८५ पासूनचा इतिहास आहे. तुम्ही म्हणता तसं काहीही होणार नाही. हे सगळे मिळून आम्हाला खड्ड्यात गाडणार आहेत.

आजची बातमी (सकाळमधील) हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार होऊन भाजपा - शिवसेना युती होण्याची शक्यता.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार होऊन भाजपा - शिवसेना युती होण्याची शक्यता.
सुरवातीला प्रत्येक ठिकाणी चुकणार्‍या शिवसेनेने विरोधी पक्षातच बसायचा निर्णय घेऊन त्यावर ठाम राहिल्यामुळे पक्षाची बार्गेनिंग पॉवर वाढू शकेल.एक तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरून भाजपच्या मतदारांमध्ये प्रचंड प्रमाणावर नाराजी पसरली आहे.तसेच शिवसेना-भाजप यांच्यात परत बोलणी सुरू होऊ शकतील अशा बातम्याही आहेत. अशा वेळी "आम्हाला पाहिजे ती पदे द्या नाहीतर आम्ही विरोधी पक्षात बसतो" हा हुकमी एक्का शिवसेनेकडे असेल.विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा दौरा करून त्यात सरकारवर हल्ला चढविला आहेच.त्यातून शिवसेना एक आक्रमक विरोधी पक्ष बनू शकेल ही चिन्हे नक्कीच दिसली.राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन फार काळ सरकार चालल्यास भाजपविरोधी नाराजी अजून वाढेल आणि ते भाजपला परवडणार्‍यातले नाही. अशा वेळी शिवसेनेच्या आमदारांमध्ये फाटाफूट न झाल्यास इतक्या दिवसात चुकलेल्या खेळ्यांची भरपाई करायची संधी शिवसेनेकडे असेल. बघू त्याचा ते उपयोग करतात का ते. शिवसेना विरोधी पक्षात बसण्यावर ठाम आहे हे दाखवून द्यायला केंद्रात अनंत गीतेंचा राजीनामा देणे हे एक अजून प्रभावी पाऊल ठरू शकेल.

सेनेने विरोधातच बसावे. एनसीपीची साथ घेवून त्यांनी एनसीपीला बदल्यात काय दिले ते समजून येईलच.अनेक मुद्द्यवर सभागृहात भाजपचे पितळ उघडे पडायची संधी आहे. आवाजी मतदान करून तात्पुरती विल मारून नेली आहे मात्र मोठी विधेयके पास करायला एनसीपी किंवा शिवसेनेकडे त्यांना हात पसरावाच लागेल. आता हिवाळी अधिवेशनात मराठा-मुस्लिम आरक्षण प्रश्न येणारच आहे. मराठा आरक्षणावर सगळे प्रश्न एक होतील पण मुस्लिम आरक्षणासाठी पण सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे असा आग्रह कॉंग्रेस-एनसीपी धरतील शिवसेना अर्थातच विरोध करणार. भाजपने देशात आत्तापर्यंत इतरत्र मुस्लिम आरक्षणाला विरोध केला आहे आता नवीन जोडीदाराचे (एनसीपी) ऐकणार की जुनी भूमिका घेणार हे दिसेलच. असे अनेक प्रसंग येतील जिथे शिवसेनेला सोडून एनसीपी जवळ केल्याने भाजपला अडचणीचे ठरणार आहे. आणि वर लोकांना/ मतदारांना पण यातून जायचा तो संदेश जाणार आहे.

श्रीगुरुजी यांना खरच मनापासून विनंती इतके लांगुलचालन बरे नव्हे भाऊ बास आता :( मान्य आहे कि तुम्ही मोदी भक्त आहात पण जिथे चूक तिथे चूक काबुल करा ना राव जसे मैत्री मध्ये फ़क़्त गोड बोलणारा खरा मित्र नसतो वेळप्रसंगी आपण चुकत असू तिथे कान ओढणारा हाच खरा मित्र तसेच काहीसे इथेहि लागू पडेल. वर म्हंटल्याप्रमाणे अहो मी पण भाजपेयीच पण जिथे पक्ष चुकतो तिथे आपण आंधळेपणाने जर समर्थन करत बसलो तर मग बोलण्यासारखे काय राहते ? पक्षांना करू देना राजकारण पण निदान तुम्ही आम्ही (किमान चर्चेत तरी) तत्वांना चिकटून राहुयात न ? काय हरकत आहे ?

एकवेळ मोदी काँग्रेस मधे येतील परंतु

गुरुजींना भाजप्यांच्या चुका दिसणार नाही


शिवसेना श्रीगुरूजीनी मांडलेल्या लेखा प्रमाणे सध्याच्या तत्कालीन राजकीय घडामोडीमध्ये हरली असेल परंतु ही शिवसेनेच्या अंताची सुरूवात मात्र नक्कीच नसणार आहे, किंबहुना भविष्यकाळात शिवसेनाच हिंदूची एक कडवट संघटना म्हणून देशव्यापी होऊ शकते, याला आधार आहे आइसिस, एम आइ एम ह्या सारख्या संघटनांचा अन्य धर्मियामध्ये वाढत चाललेले आकर्षण तसेच जागतिक खिलाफत स्थापन करण्याचे पडू लागलेले स्वप्न ह्या मुळे कोठे तरी हिंदू समाज पण एका झेंड्याखाली एकत्र येईल असे वाटते. भाजप कॉंग्रेस प्रमाणे मवाळ भूमिके मध्ये जाऊ शकतो सत्ता आल्यामुळे.

मला एक गोष्ट समजत नाही. सगळे जण तावातावाने हे सांगत आहेत कि शिवसेनेने विरोधात बसायचे. भाजपने राष्ट्रवादीचा पाठींबा घ्यायचा नाही मग सरकार कोणी चालवायचे ? राज्यपालांनी( राष्ट्रपती राजवट म्हणून). शेवटी ४२ टक्के आमदार असलेल्या पक्षाने नाही तर कुणी चालवायचे सरकार? हा जनादेश ज्यांना पटलेला नाही ( सर्व भाजप विरोधी लोकांना) त्यांनी एक गोष्ट का विसरली आहे कि ते समर्थन करीत असलेल्या एकही पक्षांला जनादेश नाहीच (२१ टक्के आणि कमी) आणि त्या जवळ जवळ सर्व पक्षांची मोट वळली तरी १४४ पार होत नाहीत. मग हा काथ्याकूट कशासाठी? कांग्रेस/ राष्ट्रवादीचे समर्थक तर असे बोलत आहेत कि आम्ही ९९ गुन्हे केले तरी चालतील तुम्ही एकही गुन्हा करायचा नाही. येथे मला महाभारतात श्रीकृष्णाने कर्णाला रथाचे चाक पृथ्वीने गिळलेला असताना विचारलेला प्रश्न आठवतो, द्रौपदी वस्त्रहरण पासून लाक्षागृहात पांडवांना जाळ्ण्य़ाच्या वेळेस तू कौरवांना दिलेला सहकार विसरलास, तेंव्हा कुठे गेला होता तुझा धर्म? आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला अशी त्यांची परिस्थिती आहे? एक सुस्पष्ट असा पर्याय कोणी सुचवेल काय? शिवसेनेचे पाय धरून सरकार स्थापन झाले असते तर चालले असते पण त्यांना त्यांची जागा दाखविल्यामुळे काही लोकांच्या शेपटीवर पाय पडला आहे.विरोधासाठी विरोध याला काय अर्थ आहे? आदर्श पासून न्यायालयात असलेले घोटाळे अजून तडीला लागलेले नाहीत त्यामुळे नवीन लफडी काढून त्यात वेळ घालवण्यापेक्षा विधायक कामाला लागा असा स्पष्ट आदेश मोदी साहेबांनी दिला आहे. त्यामुळे कॉंग्रेस/ राष्ट्रवादीची लफडी बाहेर का काढत नाही अशी कोल्हेकुई करण्यात काय हशील आहे.आधीची घाण साफ केल्यावर ते काम येणारच आहे. मोदी साहेब, लोक समजतात तेवढे दुधखुळे नाहीत- हे लोक का विसरतात. हि सगळी लफडी पुढची निवडणूक यायच्या अगोदर सहा महिने असताना बाहेर येतील. पवार साहेब "स्थिर" सरकर स्थापण्यासाठी उदार का झाले हे यातून समजते. जर सरकार आता पडले तरी काळजीवाहू सरकार म्हणून सहा महिने हातात येतात.उत्तम प्रशासन आणी सुशासन देऊ आणी मग काढू लफडी बाहेर म्हणजे पुढच्या वेळेस १४४ पार होतील इतका साधा सरळ विचार आहे भाजप हा स्वच्छ आणि निष्कलंक आहे असे मी तरी मानीत नाही. अडचणीच्या वेळेस गाढवाला बाप म्हणणे हा शहाणपणा असू शकतो. शिवाजी महाराजांनीसुद्धा औरंगजेबाशी लढण्यासाठी आदिलशहा आणी निजामशहाशी संधान बांधले होते हे आपला इतिहास सांगतो पण केवळ साधनशुचिता मानण्यासाठी आलेली संधी घालवणे हा मूर्खपणा ठरेल एवढे समजण्याइतके ते हुशार आहेत. राहिली गोष्ट समर्थकांची ते थोडे दिवस नाराज राहतील पण जर सहा महिन्यात उत्कृष्ट काम केले तर समर्थन वाढेल हेही माहिती आहे. IT IS BETTER TO BE PRAGMATIST THAN PURIST शुद्धतावादी होण्यापेक्षा समंजस होणे चांगले. मराठा आरक्षण कोणत्याही सामाजिक निकषावर टिकणार नाही हे कांग्रेस / राष्ट्रवादीलाहि माहित होते (आणि भाजपलाही) मग हात दाखवून अवलक्षण का करा? त्याला आमचाही पाठींबा म्हणून देवेन्द्रानि म्हटले आहे. निदान विरोधकांचे शस्त्र बोथट होते आणि आतले लोक ( तावडे आणि इतर)हि खुश होतात .

In reply to by सुबोध खरे

हे सगळे मान्य हो.. आमच्यासारखे लोक जे ना काँग्रेसचे ना भाजपचे ना आपचे समर्थन करतात त्यांच्या दृष्टीने पाहीले तर एक प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे हेच लॉजिक जेव्हा मनसेने रा.कॉ चा नाशिकमध्ये अथवा आपने दिल्लीत कॉ.चा पाठिंबा घेतला तेव्हा का नाही पटले? स्वतःवर वेळ आली की त्याच गोष्टी बरोबर सांगायच्या वरून त्यांचा हेतूच वाईट आणि आमचा हेतूच कसा चांगला असा 'holier than thou' पवित्रा घ्यायचा हे जास्त खटकते. इथे क्लिंटन वगळता बहुतेक लोकांनी (समर्थक खासकरून) जशा तर्‍हेचे समर्थन चालवलेय ते नक्कीच योग्य नाही. या पार्श्वभूमीवर क्लिंटनने सुस्पष्ट भुमिका मांडली आहे ती जास्त पटते. असो, योग्य अयोग्य भविष्यच ठरवेल तरीही.

In reply to by हाडक्या

हाडक्याचे म्हणणे पटते . आणि , राष्ट्रवादीला १७६० नावे ठेउन त्यांचा पाठिंबा चालतो .. हे म्हणजे घरच्या बाईचा एक पाउल वाकडा पडला म्हणून गणिकेसोबत संसार थाटल्यासारखा आहे हो ! या भुमिकेचा बर्‍याच भाजपाप्रेमींनी सुद्धा विरोध केला आहे.

In reply to by कपिलमुनी

आपले म्हणणे मान्य आहे. मला विचारलं तर भाजपने एकवेळ कान्ग्रेसचा पाठींबा घेतला असता तरी चालला असता पण राष्ट्रवादीचा नको असे वाटते. परंतु कोणाचाही पाठींबा न घेता निर्नायकी अवस्थेत राज्य चालवणे ( राष्ट्रपती राजवट) यात राज्याचे नुकसानच होते. कारण सनदी नोकर किंवा राज्यपाल हे बहुधा बाहेरच्या राज्यातील असतात आणि त्यांना राज्याच्या प्रत्यक्ष प्रश्नाबद्दल तितकी आस्था असते असे नाही. ( उदा वसंत दादा पाटील सारख्या माणसावर सुद्धा राजस्थान चे राज्यपाल असताना महाराष्ट्राकडेच "जास्त" लक्ष देतात असा आरोप झाला होता ( अर्थात काही सन्माननीय अपवाद वगळता राजकारण्यांची परिस्थिती सुद्धा वेगळी नसावी एवढेच त्यांना स्वतःच्या प्रश्नाबद्दल जास्त आस्था असते)

भाजप ला ५ आमदार सापडले की जे मतदान झाले तर अनुपस्थित रहातिल आणी वेळ पडली तर राजीनामा देउन पुन्हा निवडुन येतील. म्.टा. ची बातमी.

एवढे प्रतिसाद वाचण्याचं सार्थक झालं. दोन मोती मिळाले - भारतीय राजकारणातून नैतिकता तर कधीचीच बासनात गुंडाळली आहे. दुवा १ नैतिक/अनैतिक या सापेक्ष कल्पना आहेत. घटनेत नैतिक/अनैतिकतेची व्याख्या नाही. दुवा २ विशेषतः दुसरा मोती फारच आवडला. फारच पोटंट आणि स्फोटक आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तु हे विचार मौक्तिक वाचल नहिस अजुन? http://www.misalpav.com/comment/631101#comment-631101 माझ्या मते तो धाग्याचा पर्मोच्च बिन्दु होता ; )

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला तर आपण सगळेच, व्यकिशः आणि समूहांमधून, हमाममधे आहोत, असे वाटू लागले आहे. त्यातील सिनीसिझम जाऊदेत, पण "भारतीय राजकारणातून नैतिकता तर कधीचीच बासनात गुंडाळली आहे" ह्यात धक्का बसण्यासारखे काय आहे, हे समजले नाही. वास्तविक मी तर म्हणेन की भारतीयच काय जागतिक राजकारणातूनच नैतिकता कधीचीच हद्दपार झाली आहे. ह्याविषयी वेगळा धागा काढून सविस्तर चर्चा व्हावी.

In reply to by प्रदीप

उठसुठ बिचार्‍या राजकारण्यांनाच का बोलता? सामान्य आणि विचारवंत नैतिकता पाळतात असे म्हणायचे आहे का? त्यांच्यातून अथवा त्यांच्या पाठींब्यातूनच तर राजकारणी समाज तयार होतो ना?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भारतीय राजकारणातून नैतिकता तर कधीचीच बासनात गुंडाळली आहे. या जगात राजकारणात कोणत्या काळात, कोणत्या जागी स्वच्छ-शुद्ध नैतिकता होती ? किंबहुना हवे ते / फायद्याचे ते करणे आणि त्याला नैतिकतेचा मुलामा देऊन लोकांसमोर ठेवणे यालाच राजकारण म्हणतात :)

आजच महाराष्ट्र टाईम्समध्ये आले आहे की अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे इत्यादींची चौकशी सुरू करण्यासाठी गृहमंत्रालयाने हालचाल सुरू केली आहे . प्रत्यक्षात काय होते ते बघायचे पण अशी सुरवात खरोखरच झाली असेल तर ती एक नक्कीच चांगली बातमी आहे. सध्या तरी किंपींग फिंगर्स क्रॉस्ड!!

In reply to by क्लिंटन

हे फक्त जनतेला दाखवण्यासाठी आहे. मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर. सब घोडे बारा टक्के. आम्ही सामान्य मतदार आहोत. १५ वर्षांची अनागोंदी संपविण्यासाठी भाजपाला मत दिले. पण ते पण तों.. ची गां... करणारेच निघाले.

In reply to by बबन ताम्बे

हो ना म्हणूनच 'सध्या तरी किपींग फिंगर्स क्रॉस्ड' असे म्हटले आहे. नक्की परिस्थिती स्पष्ट झाल्यावर याविषयी अधिक लिहिता येईल.

आज पुन्हा भाजप अडचणीत सापडले आहे. राष्ट्रवादीच्या आणि पवारांच्या (आधीच माहिती असलेल्या) कोलांट्या उड्यांमुळे भाजप अस्वस्थ आहे. शिवसेनेचा भाव आता वधारणार आणि भाजपलाच नाक मुठीत धरून शिवसेनेचे पाय धरावे लागणार असं दिसतंय. म्हणजे सगळ्या प्रकारात अडचण भाजपचीच जास्त झाली. निरर्थक 'शिवसेनेला धडा शिकवू', 'त्यांचं जोखड काढून फेकू' वगैरे सारख्या राजकारणाने भाजपची सध्याची अवस्था खूपच अडचणीची झालेली आहे. याला कारण त्यांचा मूर्खपणा. आधीच शिवसेनेसोबत थोडे जुळवून घेतले असते तर भाजपची ही नाचक्की झाली नसती आणि त्यांना त्यांची अब्रू झाकता आली असती. शिवसेनेचं काय करायचं हे नंतर ठरवता आलं असतं. तो इतका तातडीचा मुद्दा नव्हता. तात्काळ सन्मानाने सरकार स्थापन करून मग त्यावर विचार करता आला असता. कदाचित नैसर्गिकरीत्याच पाच वर्षांनी तो प्रश्न निकालात निघाला असता कारण त्यावेळेस भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता वाढली असती. आता लगेच पुन्हा निवडणूक झाली तर भाजपची कामगिरी सुधारण्याऐवजी घसरेल असेच वाटते आहे. आजच्या घडीला शरद पवार अजून कुठल्या हीन थरापर्यंत जातात हेच बघणे मनोरंजक आहे. त्यांचे एक एक माकडचाळे बघून एका सो-कॉल्ड मुरब्बी नेत्याचे हावरट माकड झाल्यासारखे वाटते आणि खरोखर खेद वाटतो. अरे कुठे नेऊन ठेवलाय शरद पवारांचा कॉमन सेन्स? बरं त्यांचं तर ठीक आहे; तो त्यांचा धर्म आहे. सत्तेला चिकटून राहण्यासाठी ते कुठल्याही थराला (अतिहीन) जातील यात तिळमात्र शंका नाही. विंचू चावणारच, गाढव लाथा झाडणारच. पण भाजपने यशामुळे हुरळून जाऊन स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे हे मात्र खरे. ही चूक आता त्यांना भोवणारच. आणी शिवसेना त्याचा फायदा घेणारच. सध्या मुख्यमंत्री फडणवीस कुठेच दिसत नाहीत; सगळीकडे दिसतात पवार! काय गंमत आहे. :-) महाराष्ट्र भाजपचा सध्याचा चेहरा दीनवाणा दिसतोय.

In reply to by समीरसूर

+१. शिवसेनेला आपले आमदार एकत्र ठेवता आले तर भाजपला नमवायची उत्तम संधी आहे. याविषयी इथे लिहिले आहे.

भाजपची प्रतिमा शतपटींनी सुधारली असती जर भाजपने राष्ट्रवादीच्या पाठिंब्याला लगेच धुडकावून लावले असते आणि सत्ता स्थापन करायची तर आमचा मित्र पक्ष शिवसेना यांच्यासोबत करू अन्यथा आम्ही सत्ता स्थापन करणार नाही; पण कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही असे ठणकावून सांगीतले असते आणि त्याप्रमाणे वागले असते. फडणविसांनी शंभरदा 'राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही, नाही, नाही' असे वचन देऊन देखील त्यांनी त्यांच्याच पाठिंब्यावर रडीचा डाव खेळल्यासारखे करून सरकार स्थापन केले. जनता हा लगेचच झालेला विश्वासघात विसरेल काय? जर भाजपने वर सांगीतल्याप्रमाणे कणखर भूमिका घेतली असती आणि शिवसेनेशी थोडे जुळवून घेतले असते तर सगळ्यात जास्त फायदा भाजपचाच झाला असता आणि सध्या पवारांना मिळालेले अवास्तव महत्व मिळाले नसते. किंबहुना अशा कणखर भूमिकेमुळे शिवसेनेला सत्तेची आस लागून त्यांनी देखील थोडी पडती बाजू घेतली असती. सध्याची महाराष्ट्रातली दयनीय गोंधळाची अवस्था पूर्णपणे टळली असती. सध्या सगळे सत्ताकारणात मग्न आहेत. राज्याचा कारभार कसाबसा चालू आहे. महत्वाच्या प्रश्नांना भिडून ते हातावेगळे करण्यात सत्कारणी लावता येण्याजोगा वेळ निरर्थक आणि ओंगळ सत्ताकारणात व्यर्थ दवडला जात आहे. आणि हे सगळे भाजपच्या उतावळेपणामुळे! राजकारणात थोडा धीर धरायचा असतो हे भाजपला कुणी शिकवलेले दिसत नाही. तिरकस आणि कुजकट राजकारण फारसे कधी फळाला येत नाही हे शरद पवारांच्या उदाहरणावरून आपले नेते शिकले तरी महाराष्ट्रावर खूप उपकार होतील.

In reply to by समीरसूर

महत्वाच्या प्रश्नांना भिडून ते हातावेगळे करण्यात सत्कारणी लावता येण्याजोगा वेळ निरर्थक आणि ओंगळ सत्ताकारणात व्यर्थ दवडला जात आहे. आणि हे सगळे भाजपच्या उतावळेपणामुळे! राजकारणात थोडा धीर धरायचा असतो हे भाजपला कुणी शिकवलेले दिसत नाही.
मुख्यमंत्र्यांनी परवा पत्रकार परिषद घेत टंचाई जाहीर केली. त्यांनी आणि मुख्य सचिवानी केंद्राची भेट घेऊन पंचनामे रद्दच केले आहेत. पुढच्या ७ दिवसामध्ये एक Memorandum सादर केला जाणार आहे. आणि असे काही निर्णय त्यांनी जाहीर केले आहेत. कालच पोलिसांची बातचीत करून अजून एक पत्रकार परिषद घेत विकेंद्रीकरणाबद्दल विचार चालू आहे असे सांगितले. जलसंपदेमध्ये बदल्यांचे अधिकार आधीच विकेंद्रित केले आहेत. त्यामुळे सत्कारणी लागायचा वेळ ओंगळ राजकारणात जातो आहे हे कसे मला तरी अजून समजलेले नाही.

गुप्त मतदान टाळुन शिवसेनेनी आपली लाज वाचवली आहे. शिवसेनेचे आमदार फुटलेले जाहीर झाले असते. त्यामुळेच आवाजी मतदानाची कल्पना भाजप्, राकॉ, शिवसेना ह्यांनी सकाळीच ठरवली होती.