पांघरुणातच गुरगुटून रहावं, उठूच नये असं वाटायला लावणारी छान थंडी पडलीये. मी अंथरुणात पडल्या पडल्या परिस्थितीचा आढावा घेतेय. संगमरवरी फरशी, बुरशी लागलेल्या भिंती, वाळवीने पोखरलेला दरवाजा, डाग आणि भोकं पडलेली चादर असा एकंदर थाट. ३-४ फील्डवर्क्सचा अनुभव गाठीशी असल्याने याहून वाईट परिस्थितीत राहण्याची सवय मला आहे. प्रत्यक्षात मात्र, याहून कैक पटींनी चांगल्या अशा दुसर्या एका ठिकाणी आमची व्यवस्था करण्यात आली होती. पण ..... संदर्भ: ... आणि माझी काशी झाली! (एका फील्डवर्कचा वृत्तांत) उपरोक्त उधृत केलेल्या वाक्यावर जाऊ नका, भाषाविज्ञानासंबधी वाराणशीतील मराठी भाषेचा अभ्यास करतानाच्या प्रवासा दरम्यानचा लेखिका राधिका यांचा ऐसी अ़क्षरेवरील वाचनीय वृत्तांत आहे. अर्थातच उपरोक्त वाक्य मी मिपावर वेगळ्या चर्चेसाठी आणि येथे अधिक चर्चा होऊ शकेल म्हणून घेतले आहे हे ओघाने आलेच.असंख्य समस्या अशा असतात की ज्यांची आपण रोज दररोज चर्चा ही करत नाही. त्या स्विकारायच्या असतात असे समजून सोडून देण्या शिवाय खरेतर वेगळा पर्यायही रहात नाही. त्यातीलच एक म्हणजे भारतातील कोणत्याही प्रवासा दरम्यान येणारे लॉजींग आणि तत्सम प्रकारात येणारे चित्र विचीत्र अनुभव. रोजचं राहण पंचतारांकीत मध्ये परवडणार्या गटा पैकी तुम्ही नसाल किंवा प्रवासात हव तिथे पंचतारांकीत बुकींग मिळाले नाही तर तुमचा सर्व साधारण अनुभव कसा असतो ? एका मोठ्या कंपनीच्या मॅनेजींग डायरेक्टराने भारतातील तीन ते पंचतारांकीत हॉटेल्स तौलनीक दृष्ट्या कशी नफेखोरी करत अव्वाच्या सव्वा दर लावतात याची डॉलर रुपी कन्व्हर्शन आणि आंतरराष्ट्रीय हॉटेल दरांचा तौलनीक चार्ट समोर ठेवत माहिती दिली होती. अर्थात असे विषय क्वचीतच चर्चेत येतात आणि मग केव्हातरी विस्मरणात जातात. मला या पंचतारांकीत दरांची सध्याची तौलनीक स्थिती माहित नाही. अर्थात आपण प्रवासा दरम्यान आपल्याला अचानक कुठे मुक्काम करावा लागत असेल तर हॉटेल तीन किंवा पंचतारांकीत आहे हे बघण्याची संधी पण मिळत नाही. त्यात तुम्ही अपरात्री एखाद्या गावी पोहोचला असाल तर जे काही अकोमोडेशन उपलब्ध होईल ते पदरी आले आणि पवित्र झाले म्हणून स्विकारावे लागते. किंवा पेंगुळलेल्या अवस्ततेच चोखंदळपणा करत हे किंवा ते करत दोन तीन हॉटेलांपैकी एखाद्यात रुम बुक करून शरीरास काही आराम पडेल तर पहावे म्हणून काय असेल ते सकाळी पाहू म्हणून विचार करावा लागतो. त्यात तुम्ही कुणा रिक्षावाल्यांच्या तावडीत सापडले असाल तर तो तुम्हाला नेमके कसल्या दर्जाची हॉटेले दाखवेल ते विचारावयास नको. यातील छोट्या मोठ्या लॉजेसवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आणि कर आकारणी पुरते स्थानिक स्वराज्य संस्था काय ते लक्ष ठेवतात त्यांच्या सेवांच्या दर्जा बाबत तशी कोणती देखरेख असते असे कधी वाटले नाही. यातील छोट्या मोठ्या लॉजेसचेही दराचा वर्षातील ३०० दिवस जरी खोली भाड्याने गेली तर एकुण उत्पन्न तसे बरेच असते त्या मानाने सेवा सुविधा पाहिल्यास हाती काहीच लागत नाही. बाहेरून झकपक असलेल्या हॉटेलाच्या उंची सुट मध्ये विटलेले वासघाण जुने गालिचे पांढर्या शुभ्र चादरीतून अचानक येणारी झुरळे तर काही ठिकाणी चक्क ढेकुण हे वर्णन दिवसाचे ३५००/- दर असणार्या अहमदाबादेतील एका लॉजींगचा जवळपास चारेक वर्षापुर्वीचा अनुभव सांगतो आहे. माझा एक साएब प्रत्येक शहरातल उंची नव्हे तर नव्यातल नव लॉज कोणत त्याचीच माहिती ठेवायचा कारण तिथे रुम फर्नीचर इत्यादी जरा फ्रेश असतं. दुसरे मार्ग परिचया पैकी कुणाला चांगल लॉज माहित असल्यास विचारून ठेवणे. आपण स्वतः रहातो त्या शहरातील विशीष्ट लॉजची स्थिती काय असेल याची काही माहिती स्थानिकांनाही असेलच अशी स्थिती नसते. प्रत्येकवेळी प्रत्येकाला सर्व माहिती अॅडव्हान्स मधे मिळते असही नाही. त्यात तुम्ही परदेशी प्रवासी असाल तर रिक्षा, विक्रेते ते टूरगाईड सर्वजण लुटण्याचाच विचार करत असतात. प्रवासा दरम्यान शेजारचा एक इझ्राएली प्रवासी एकदा त्याच्या भारतातील प्रवासाच्या अनुभवा बद्दल म्हणाला, की मला उपलब्ध वेळेत तुमचा देश जास्तीत जास्त दूरवर फिरायचा आहे सर्व पैसा एकाच गावात खर्च करण्याची माझी इच्छा नाही पण माझे सर्व आर्थिक आडाखे इथे आल्या पासून चुकताहेत खुप सुविधा नको पण किमान टापटीप आणि स्वच्छ लॉजींग साठी मला अपेक्षेपेक्षा खूपच अधिक पैसे मोजावे लागताहेत, रिक्षा टॅक्सी यांच्याही परदेशी माणूस म्हटला की उकळा उकळी होते पाट्।ई मागे लागलेल्या दोनचार विक्रेत्यांकडून काही ना काही घ्यावेच लागते घेतले तर अजून विक्रेती मुले पाठी मागे लागतात नाही घेतले तर क्षणभर स्वस्थ बसूही देत नाहीत. हा एका परदेशी प्रवाशाचा किस्सा, असो. आपण मिपावर या समस्यांची चर्चा केल्याने समस्या कमी होतील असे नाही पण एकतर समस्या बोलून दाखवली की मन मोकळे होते, आणि मुख्यम्हणजे कुठे कोणते लॉजींग चांगले आहे आणि कोणते नाही याची थोडी फार कल्पना आल्यास आपापल्या अनुभवांचा सर्वांनाच फायदा होऊ शकेल.
वाचने
46819
प्रतिक्रिया
70
मिसळपाव
प्रतिक्रिया
यच्चावत सर्व लॉज मध्ये
कुठल्याही लॉज मधे / हॉटेल मधे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }अगदी अगदी म्हणजे मी रुम चेक
In reply to कुठल्याही लॉज मधे / हॉटेल मधे by मदनबाण
एकदा एका लॉजवर रुममध्ये घाण
मला वाटत गाव सांगायची गरज
In reply to एकदा एका लॉजवर रुममध्ये घाण by जेपी
... आणि माझी काशी झाली! (भाग
नेहमीचा अनुभव
सकाळी कामे लवकर उरकता यावीत
In reply to नेहमीचा अनुभव by विटेकर
तुळजापुर बद्दल सहमत...
In reply to नेहमीचा अनुभव by विटेकर
तुळजाभवानीची मूर्ती नेमकी कधी
In reply to नेहमीचा अनुभव by विटेकर
वल्लीदा मुळ मुर्ती लपवली गेली
In reply to तुळजाभवानीची मूर्ती नेमकी कधी by प्रचेतस
मूळ मूर्ती लपवली गेली हे
In reply to वल्लीदा मुळ मुर्ती लपवली गेली by जेपी
.
In reply to वल्लीदा मुळ मुर्ती लपवली गेली by जेपी
हितेस भाय आस बोलु नये.
In reply to . by hitesh
कणाकणात ईश्वर आहे. मग ही काय
In reply to . by hitesh
अफझुलखान कधी गेलेला तुळजापूर
In reply to तुळजाभवानीची मूर्ती नेमकी कधी by प्रचेतस
बरोबर अफझुलखान हा हल्ली
In reply to अफझुलखान कधी गेलेला तुळजापूर by मालोजीराव
अबे मग ते वाचलेलं खोटंच की
In reply to अफझुलखान कधी गेलेला तुळजापूर by मालोजीराव
महाबळेश्वराचा अनूभव.
गोवा टूरीझमच्या रिसोर्टचा
In reply to महाबळेश्वराचा अनूभव. by कलंत्री
लॉजचा विषय निघाला, त्यात
कलकत्त्यात होतो तेव्हा
In reply to लॉजचा विषय निघाला, त्यात by बॅटमॅन
कालीघाटातले मंदिर आजिबात पाहू
In reply to कलकत्त्यात होतो तेव्हा by माहितगार
उत्तर कर्नाटकात बरीच छोटी
In reply to कालीघाटातले मंदिर आजिबात पाहू by बॅटमॅन
गौडकानडा
In reply to उत्तर कर्नाटकात बरीच छोटी by माहितगार
ओके ओके प्रसिद्ध मंदीरे आणि
In reply to गौडकानडा by नंदन
धन्यवादगळु सरजी.
In reply to गौडकानडा by नंदन
बॅट..
प्रश्न/शोध फार व्यापक आहे. अ
सेवांमध्ये सुधारणा होत आहेत
In reply to प्रश्न/शोध फार व्यापक आहे. अ by कंजूस
लॉज वरिल रूम मध्ये
लोनली प्लैनिट मालिकेच्या
अगदी महत्वाचा व उपयोगी धागा
आता बर्या पै़की माहिती
हॉटेल व्यवस्थापनातील बदल
तुम्ही अधिक काळ राहणार असाल
लॉजींग बोर्डींग मधे न राहिलेला माणूस कदाचित मिपावर नसेल
टाळ्या.
In reply to लॉजींग बोर्डींग मधे न राहिलेला माणूस कदाचित मिपावर नसेल by धर्मराजमुटके
+१...
In reply to लॉजींग बोर्डींग मधे न राहिलेला माणूस कदाचित मिपावर नसेल by धर्मराजमुटके
अतिशय सहमत
In reply to लॉजींग बोर्डींग मधे न राहिलेला माणूस कदाचित मिपावर नसेल by धर्मराजमुटके
हाहा.. एक नंबर! मागच्या एका
In reply to अतिशय सहमत by टवाळ कार्टा
हशा आणि टाळ्या...
In reply to लॉजींग बोर्डींग मधे न राहिलेला माणूस कदाचित मिपावर नसेल by धर्मराजमुटके
_/\_
In reply to लॉजींग बोर्डींग मधे न राहिलेला माणूस कदाचित मिपावर नसेल by धर्मराजमुटके
धर्मराजांचा मंत्र -संपूर्ण
धर्मराजांचा मंत्र -संपूर्ण सहमत+१
तुम्ही म्हणता तसा काही वाईट
युरोप वगैरे माहिती नाही,
In reply to तुम्ही म्हणता तसा काही वाईट by पिवळा डांबिस
हम्म!
In reply to युरोप वगैरे माहिती नाही, by बॅटमॅन
..
कलकत्ता बेंगलोर लॉजींगचे
In reply to .. by hitesh
खर्च दोनदा "मोजण्या"ची काय
In reply to कलकत्ता बेंगलोर लॉजींगचे by माहितगार
पूर्वी दीपा पब्लिकेशनचं
'कॉस्ट टू--'बद्दल गैरसमज झाला
नमस्कार
+१
In reply to नमस्कार by रघुपती.राज
जेव्हा प्रामाणिक व मेहनती माणसे पुढे येतील तेव्हाच गलिच्छ आणि चोर माणसे मागे पडतील. ..... न कंटाळता आम्ही रिव्यू लिहितो. जागेत झालेले चांगले वाईट बदल आम्ही लिहितो. ट्रीप अडवायझरचा फायदा तुम्हाला तेव्ह्याच होईल जेव्हा तुम्ही आधी इतरांना तुमचे अनुभव धन देऊ कराल.अगदी खरं आहे, कौतुकापद कामाबद्दल धन्यवाद! आपले रिव्ह्यूज कोणत्या संस्थ ळावर असतात तेही कळूद्यात. वाचायला आवडतील. धर्मराज मुटके यांनाही वाचनीय सूचनांबद्दल धन्यवाद.मस्त धागा...
रघुपतिराज आपला प्रयत्न
महाग...
अतिशय उपयुक्त असा धागा...
काऊचसर्फिग
In reply to अतिशय उपयुक्त असा धागा... by सुहास झेले
हो नक्कीच... म्हणून तर म्हटले
In reply to काऊचसर्फिग by टवाळ कार्टा
जरा तुलनात्मक सांगा. समजा
साडेतीन हजार युरोत airfare
In reply to जरा तुलनात्मक सांगा. समजा by कंजूस
वाचनखूण साठवली आहे.
माझे काही अनुभव....
धनबाद - झारखंड
In reply to माझे काही अनुभव.... by विटेकर
आमच्या (मित्रांबरोबरच्या)
हम्म...
In reply to आमच्या (मित्रांबरोबरच्या) by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
सहज तुनळी चाळताना एका
परदेशी पर्यटक