महाराष्ट्र - विश्वासदर्शक ठराव
प्रतिक्रिया
In reply to ४. काही खासदारांनी by प्रसाद१९७१
In reply to ४. काही खासदारांनी by प्रसाद१९७१
पण जय विदर्भ घोषणा दिल्या हे चांगलेच झाले. कोकणाला कधीपासुन विदर्भ मराठवाड्यापासुन सुटका हवी आहे.मग तुम्हीही जय कोकण म्हणा की ! :)
In reply to ४. काही खासदारांनी by प्रसाद१९७१
कोकणाला कधीपासुन विदर्भ मराठवाड्यापासुन सुटका हवी आहे.मग त्यांनी त्यांना हव्या तशा घोषणा द्याव्यात
४. काही खासदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत जय विदर्भ म्हणून घोषणा दिल्या त्या योग्य वाटतात काय ?हा मुद्दा वरील चर्चेत गैरलागू आहे असे नमूद करतो. तुमच्या इतर प्रश्नांची उत्तरे क्लिंटनसारखे अभ्यासूच देऊ शकतील. प्रतिक्रिया म्हणाल तर हे महाराष्ट्र व नवीन सरकार पहिल्या दिवसापासूनच मध्यावधी निवडणूकांकडे चालले आहे असे वाटतेय.
In reply to आवाजी मतदान by क्लिंटन
In reply to एक प्रामाणिक प्रश्न ! by धर्मराजमुटके
कोणत्या बाजूचा आवाज मोठा हे कसे ठरवितात ? म्हणजे त्याबाबतीत अध्य़क्षांच्या श्रवणक्षमतेवर अवलंबून असते की आवाजाची पातळी मोजणारे यंत्र लावलेले असते ?नाही या बाबतीत अध्यक्षांचे सब्जेक्टिव्ह जजमेन्टच महत्वाचे.प्रथेप्रमाणे (आणि बहुदा नियमांप्रमाणे सुध्दा) एका जरी सदस्याने मतविभाजनाची मागणी केली तरी मतदान घेणे गरजेचे असते.आणि अर्थात ते योग्यही आहे. वाजपेयींचे सरकार एका मताने पडले त्यावेळी पहिल्यांदा आवाजी मतदान झाले.अध्यक्ष बालयोगींनी आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव पास झाला असे जाहिर केले.पण त्यानंतर अर्थातच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मतविभाजनाची मागणी केली.पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मतदान झाले.त्यात काही सदस्यांचे मत नोंदले गेले नाही म्हणून मतपत्रिका देऊन मतदान झाले.त्यात वाजपेयींचे सरकार एका मताने पडले.
मात्र आजच्या कार्यक्रमात शंका घेण्यास पुरेपुर जागा आहे असे वाटते शिवाय अशा गोष्टींमध्ये सभागृह अध्यक्षांचा निर्णय अंतिम असला तरी जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो.नक्कीच. शिवसेना आणि काँग्रेस सदस्यांनी मतविभाजनाची मागणी केल्यानंतर ती मान्य करायला हवीच होती.विधानसभा अध्यक्ष या पदाच्या प्रतिष्ठेला साजेसे वर्तन हरिभाऊंचे नक्कीच नाही.या कारणासाठी तरी विरोधी पक्षांनी विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणायला हवा.तो पास होणार नाही ती गोष्ट वेगळी पण निदान हे वर्तन अयोग्य आहे हे दाखवायला तरी असा प्रस्ताव आणायला पाहिजे असे वाटते.
In reply to कोणत्या बाजूचा आवाज मोठा हे by क्लिंटन
In reply to आवाजी मतदान by धर्मराजमुटके
आवाजी मतदान घेण्याची कारणे काय असू शकतात ?आपल्याकडच्या बऱ्याच गोष्टी ब्रिटिश संसदेतील प्रथा आणि प्रॅक्टिसेसवरून घेतलेल्या आहेत.आवाजी मतदान ही गोष्टही आपल्याकडे हाऊस ऑफ कॉमन्सकडून आली आहे.मला वाटते की या पध्दतीत फारसे काही चुकीचे नाही.कारण सभागृहांमध्ये मतदान अनेकवेळा घ्यावे लागते.आणि बहुतांश वेळी सरकारमधील पक्षाचा विजय होणार हे स्पष्टच असते.अशावेळी मतदान घेऊन सभागृहाचा वेळ घालविण्यापेक्षा आवाजी मतदान घेऊन नियमाप्रमाणे प्रस्ताव सभागृहात मंजूर करून घेणे कधीही चांगले.त्यातूनही कोणाही सदस्याला जर मतविभाजन हवे असेल तर ते घेता येतेच.त्यामुळे या पध्दतीत अविश्वसनीय असे काही नाही.
"वाजपेयींचे सरकार एका मताने पडले त्यावेळी पहिल्यांदा आवाजी मतदान झाले." म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून जवळपास ५० वर्षांत अशा पद्धतीचे मतदान नगण्य वेळाच झाले आहे काय ?नाही.यातील ’पहिल्यांदा’ चा अर्थ ’सुरवातीला’ असा आहे. वरील वाक्याचा अर्थ १९९९ मध्ये सर्वप्रथम आवाजी मतदान झाले असा निघत असल्यास ते वाक्य अर्थ अधिक स्पष्ट होईल अशा पध्दतीने लिहायला हवे होते.सभागृहात कोणत्याही प्रस्तावावर मतदान होते त्यावेळी पहिल्यांदा आवाजी मतदानच होते.सरकारकडे चांगल्यापैकी बहुमत असेल तर बहुतांश वेळा विरोधी पक्ष मतविभाजनाची मागणी करत नाहीत. जसे इतर सर्व प्रस्तावांविषयी होते तसेच १९९९ मध्ये वाजपेयी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरही झाले-म्हणजे सुरवातीला आवाजी मतदान झाले. विरोधकांनी मतविभाजनाची मागणी केल्यानंतर मतदान झाले.
In reply to परत एकदा आवाजी मतदान by क्लिंटन
In reply to सभागृहाचा वेळ ...? by चौकटराजा
पण साठ वर्षात यावर एकाही विद्वानाने हरकत घेउ नये याचा भारा विस्मय व क्रोध वाटतो.हे समजले नाही. आवाजी मतदानात आक्षेप घेण्यासारखे काय आहे?राज्यघटनेत केवळ इतके म्हटले आहे की काही गोष्टींना (विधेयके, अर्थसंकल्प इत्यादी) सभागृहाची मान्यता लागते. ही मान्यता कशी घ्यावी हे राज्यघटनेत लिहिलेले नाही आणि सगळ्या गोष्टी राज्यघटनेत असायची गरजही नाही. एक तत्व राज्यघटनेत लिहिणे आणि त्याची अंमलबजावणी नक्की कशी करावी हे नियमांवर/प्रथांवर सोडणे यात चूक काय आहे? आवाजी मतदान हा सभागृहात मतदान घ्यायचा एक मार्ग झाला.त्यातूनही कोणा सदस्याने मतदानाची मागणी केली तर प्रत्यक्ष मतदान घ्यायची तरतूद आहेच की. परवा हरिभाऊ बागडेंनी नक्की काय केले याविषयी उलटसुलट बातम्या येत आहेत.त्यामुळे त्यांनी खरोखरच आवाजी मतदानानंतर काही सदस्यांनी केलेली मतदानाची मागणी नाकारली का हे अजूनही तितकेसे स्पष्ट नाही.पण हरिभाऊंनी अशी मागणी नाकारली असेल तर मात्र ते सर्वथैव अयोग्य आहे.पण म्हणून आवाजी मतदान ही मूळ कल्पनात रद्दबादल करता येणार नाही.
In reply to इतका आक्षेप का? by क्लिंटन
हे समजले नाही. आवाजी मतदानात आक्षेप घेण्यासारखे काय आहे?राज्यघटनेत केवळ इतके म्हटले आहे की काही गोष्टींना (विधेयके, अर्थसंकल्प इत्यादी) सभागृहाची मान्यता लागते. ही मान्यता कशी घ्यावी हे राज्यघटनेत लिहिलेले नाही आणि सगळ्या गोष्टी राज्यघटनेत असायची गरजही नाही. एक तत्व राज्यघटनेत लिहिणे आणि त्याची अंमलबजावणी नक्की कशी करावी हे नियमांवर/प्रथांवर सोडणे यात चूक काय आहे? आवाजी मतदान हा सभागृहात मतदान घ्यायचा एक मार्ग झाला.त्यातूनही कोणा सदस्याने मतदानाची मागणी केली तर प्रत्यक्ष मतदान घ्यायची तरतूद आहेच की.अहो पण चौ.रा. यांचेपण बरोबरच आहे की. जर आज काल जलद काम करण्यासाठीची साधने उपलब्ध असतील तर उगीच परंपरा वगैरे कारणे देऊन 'मोघम' असे अंदाजपंचे काम करणारी पद्धत फक्त आजवर चालू होती म्हणून चालू ठेवण्यात कोणता शहाणपणा आहे ? प्रतेक सदस्याच्या टेबलावर 'हो'/'नाही' ची बटणे बसवली तर ५ सेकंदात हे काम बिनबोभाट होईल की. (अर्थात हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे आणि झालेल्या प्रसंगात इथे तितकासा लागु नाही हे पण मान्य. तरीही तुम्ही आवाजी मतदानाच्या आक्षेपाबाबत इतक्या निरागसपणे विचारलेत म्हणून मांडतोय इतकेच.)
In reply to हे समजले नाही. आवाजी मतदानात by हाडक्या
तरीही तुम्ही आवाजी मतदानाच्या आक्षेपाबाबत इतक्या निरागसपणे विचारलेत म्हणून मांडतोय इतकेच.निरागसपणा कसला त्यात? गरजेप्रमाणे किती प्रिसिजनपर्यंत उत्तर हवे आहे हे शोधले तर त्यात चूक काय? समजा २,१९८,३०९,२३१ भागिले ३,२८९,४२७,८७१ हे उत्तर हवे असेल तर ते दोन तृतीयांशच्या आसपास आहे म्हणजे ०.६६ हे लगेचच कळू शकेल.पण प्रत्यक्ष भागाकार करून उत्तर ०.६६८२९५३ आहे हे समजायला बराच वेळ जाईल. ज्या परिस्थितीत ०.६६ हे उत्तर पुरेसे असेल तिथे ०.६६८२९५३ हे उत्तर काढायची गरज नाही. त्याचप्रमाणे एखाद्या प्रस्तावास सभागृहात जास्त सदस्यांचा पाठिंबा आहे की विरोध जास्त सदस्यांचा आहे हे बघायचे असेल म्हणजे २८८ पैकी १४४ पेक्षा जास्त की कमी एवढेच तपासायचे असेल आणि एखादी पध्दत ते उत्तर देऊ शकत असेल तर त्यात चुकीचे काय? समजा कोणाला नक्की किती सदस्यांचा पाठिंबा आहे-- १५२ की १५३ की १५४ हे तपासायचे असेल तर पूर्ण मतदान आहेच की. त्यातूनही आवाजी मतदानावर आक्षेप असतील तर पूर्ण मतदान घेता येतेच. आवाजी मतदान न घेता पूर्ण मतदान घेऊ नयेच असे मी म्हणत नाही. पण आवाजी मतदान म्हणजे एखादा फ्रॉड असल्याप्रमाणे गेल्या दोन दिवसांपासून चित्र उभे केले जात आहे ते चुकीचे आहे इतकेच. हा मुद्दा मी न वेळा मांडला आहे.परत त्याची पुनरावृत्ती नको.
In reply to ?? by क्लिंटन
समजा २,१९८,३०९,२३१ भागिले ३,२८९,४२७,८७१ हे उत्तर हवे असेल तर ते दोन तृतीयांशच्या आसपास आहे म्हणजे ०.६६ हे लगेचच कळू शकेल.पण प्रत्यक्ष भागाकार करून उत्तर ०.६६८२९५३ आहे हे समजायला बराच वेळ जाईल. ज्या परिस्थितीत ०.६६ हे उत्तर पुरेसे असेल तिथे ०.६६८२९५३ हे उत्तर काढायची गरज नाही.क्लिंटन भौ, with all due respect, उदाहरण गंडले आहे असे नमूद करतो पण तो इथे मुद्दा नाही म्हणून मी आधी खालच्या प्रतिसादाबद्दल बोलतो.
चप्रमाणे एखाद्या प्रस्तावास सभागृहात जास्त सदस्यांचा पाठिंबा आहे की विरोध जास्त सदस्यांचा आहे हे बघायचे असेल म्हणजे २८८ पैकी १४४ पेक्षा जास्त की कमी एवढेच तपासायचे असेल आणि एखादी पध्दत ते उत्तर देऊ शकत असेल तर त्यात चुकीचे काय? समजा कोणाला नक्की किती सदस्यांचा पाठिंबा आहे-- १५२ की १५३ की १५४ हे तपासायचे असेल तर पूर्ण मतदान आहेच की.आपला आवाजी मतदानाच्या उपयुक्ततेचा मुद्दा पतलाय, ते फ्रॉड नाही हे पण या चर्चेच्या आधीच मान्य आहे. पण आता हे बघा, आपल्याकडचे बहुतांश भ्रष्टाचार कसे होतात ? तर नियमात बसवून.. म्हणजे वाढवलेल्या निविदा या नियमात बसतात म्हणून त्या बरोबर होतात का ? तर नाही. इथे सरकार बहुमतात आहे की नाही यासाठी १४४ हवे आहेत. 'मोघम' १४४ नव्हे तर बंदे १४४. १४३ देखील चालणार नाहीत (म्हणून आधी सरकारे पडली आहेत). अशा वेळेस तुम्हीच तुमच्या पक्षाचा व्यक्ती न्यायाधीश म्हणून बसवणर आणि 'आवाज कुणाचा?' म्हणून बहुमत ठरवणार ही पद्धत जरी तांत्रिकदृष्ट्या बरोबर ठरत असली तरी ती बरोबर नाही हे तुम्हाला देखील मान्य असेल. म्हणून तो अर्थाअर्थी फसवणूक ठरते एवढेच. 'आवाजी मतदान' जरी फसवणूक नसली तरी तुम्ही बहुतेक संसदीय संकेत हे जसे राबवणार्याकडून सारासार विवेक आणि विचाराची अपेक्षा करतात त्याप्रमाणे विवेकानेच वापरायची सोय आहे. काँग्रेस असो वा कोणी इतर, कोणी आधी पण गैर फायदा घेतला असेल तर गैरच आणि त्यानी घेतलाय म्हणून आम्ही पण घेणार असे म्हणून कोणी घेणार असेल तरी ते गैरच (वरून मग तुम्ही काय वेगळे हा प्रश्न उरतोच).. या व्यतिरिक्त, (ज्यामुळे हा प्रतिसाद सुरु झाला) जो मुद्दा चौ.रा. नी मांडला आहे की 'सोयीची साधने असताना ही आवाजी मतदानासारखी 'मोघम पद्धत' उगीच (सगळ्यांचीच) स्वार्थी सोय म्हणून चालू ठेवायची हे ठीक नाही' तो बरोबरच आहे. तुमचे त्या 'मोघम'पणाच्या समर्थनार्थ उत्तर पटण्याजोगे नाही. इथे थोडक्यात, तुमच्या मित्रांच्या बर्यापैकी मोठ्या ग्रुपमध्ये तुम्हाला किती लोक 'मिसळ' आणि किती लोक 'वडा-पाव' असे ठरवायचे असेल आणि बहुमताने एकच पदार्थ सगळ्याना मागवावा लागणार असेल तर तुम्ही आवाजी मतदान करून शेवटी तुम्हीच निर्णय देण्यासारखे आहे. सोपा मार्ग हा किती लोकांनबहुमताने/'वडा' हवा हे विचारायचा असताना तुम्ही (तुम्हाला 'मिसळ' हवी म्हणून कदाचित ;) ) तुमची सोय पाहीली तर ते तांत्रिकदृष्ट्या बरोबर ठरवालही पण ते तसे नाही हे तुम्हाला मनोमन मान्य असेलच आणि तुम्ही तुमची सोय नाही पाहीली तरी ते (तुमचा निवाडा प्रामाणिक आहे ते) इतरांना मान्य होईलच असेही नाही हे ही तुम्हाला मनोमन मान्य असेलच. असो, थोडक्यात, १. 'आवाजी मतदान हे फ्रॉड नाही पण वापर करताना तारतम्य आणि विवेक अपेक्षित. २. 'आवाजी मतदानासारखे प्रकार नवीन पद्धती, तंत्रज्ञान वापरून सुधारायला काहीच हरकत नसावी. जर आपण प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता अपेक्षित धरतो तर संसदीय कामात का नको ? उगीच नको तिथे परंपरांचे अवडंबर नको.
In reply to समजा २,१९८,३०९,२३१ भागिले ३ by हाडक्या
In reply to >>> इथे सरकार बहुमतात आहे की by श्रीगुरुजी
महाराष्ट्र विधानसभेत (किंवा इतर कोणत्याही विधानसभेत/विधानपरीषदेत/लोकसभेत/राज्यसभेत/नगरपालिकेत इ. सभागृहात) बहुमतासाठी सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येपैकी निम्म्याहून अधिक मतांची गरज नसून एकूण जितके मतदान झाले आहे त्यापैकी निम्म्याहून अधिक मतांची गरज असते.हो बरोबर. १९९३ मध्ये नरसिंह राव सरकारविरूध्दचा अविश्वास ठराव (झारखंड मुक्ती मोर्चा लाच प्रकरणामुळे बदनाम झालेला) फेटाळला गेला त्यावेळी सरकारच्या बाजूने २६५ आणि विरोधात २५१ मते दिली गेली होती. २७३ मते न मिळाल्यामुळे सरकार पडले नव्हते.कोणत्याही सभागृहात मतदान करणार्या सदस्यांपैकी अर्ध्याहून जास्त असा नियम आहे हे मलाही माहित आहे :) तरीही या प्रतिसादात १४४+ असे लिहिले याचे एक कारण आहे. आवाजी मतदान कित्येक वर्षांपासून चालत आले आहे तरीही फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावानंतर आवाजी मतदान हा प्रकारच फ्रॉड आहे अशाप्रकारचे अत्यंत चुकीचे चित्र उभे केले जात आहे.ते चित्र चुकीचे आहे हे दाखवून देण्यावर माझा भर होता.आणि तीच गोष्ट अनेकवेळा लिहून खरे सांगायचे तर मला कंटाळाही आला होता. तेव्हा भर आवाजी मतदानावर होता सभागृहात नक्की बहुमत म्हणजे काय या तांत्रिकतेवर नव्हता.
In reply to हो बरोबर by क्लिंटन
In reply to हे समजले नाही. आवाजी मतदानात by हाडक्या
In reply to राज्यघटनेत गरज नाही ....? by चौकटराजा
In reply to कोणत्या बाजूचा आवाज मोठा हे by क्लिंटन
In reply to गुप्त मतदान काँग्रेस, by श्रीगुरुजी
विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर लगेचच मतविभाजनाची मागणी करता येते. परंतु त्यानंतर विरोधी पक्षनेता निवडण्याचा विषय पार पडल्यानंतर त्यापूर्वीच मंजूर झालेल्या ठरावावर मतविभाजनाची मागणी नियमानुसार मान्य करता येत नाही. त्यामुळे नूतन अध्यक्षांनी ती मागणी फेटाळण्याचा योग्य तोच निर्णय घेतला.हो. अशाच स्वरूपाची चर्चा न्यूज चॅनेलवर चालू आहे. यावेळी हरिभाऊ बागडेंनी योग्य निर्णय घेतला असे मान्य केले तरी लवकरच राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर मतदान होईल त्यावेळी नक्की काय ती परिस्थिती कळून येईल. त्यावेळी मात्र मतविभाजन व्हावे ही अपेक्षा.
In reply to कोणत्या बाजूचा आवाज मोठा हे by क्लिंटन
विरोधी पक्षांनी विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणायला हवा.तो पास होणार नाही ती गोष्ट वेगळीविधानसभा अध्यक्षांवरचा अविश्वास ठराव म्हणजे सरकारवरचा अविश्वास ठराव असल्या सारखे असते. तो जर पास होणार नाही हे माहीतिय तर सरकारचा विश्वासदर्शक ठराव नक्कीच पास होणार.
In reply to विरोधी पक्षांनी विधानसभा by प्रसाद१९७१
विधानसभा अध्यक्षांवरचा अविश्वास ठराव म्हणजे सरकारवरचा अविश्वास ठराव असल्या सारखे असते.तांत्रिकदृष्ट्या हो कारण विधानसभा अध्यक्ष हे बहुतांश वेळा बहुमतवाल्या पक्षाचेच असतात.त्यामुळे अध्यक्षांवर अविश्वास ठराव पास झाला तर त्याचा अर्थ सरकारने बहुमत गमावले असा होईल. तरीही अध्यक्षांवर अविश्वास ठराव पास झाला म्हणून सरकार लगेच पडत नाही.
तो जर पास होणार नाही हे माहीतिय तर सरकारचा विश्वासदर्शक ठराव नक्कीच पास होणार.हो बरोबर. तरीही अध्यक्षांवर अविश्वास ठराव मांडावा याचे कारण जास्त प्रतिकात्मक आहे.त्यांचा निर्णय योग्य की अयोग्य याविषयी वेगवेगळ्या बातम्या येत आहेत त्यामुळे नक्की काय ते समजत नाही.जर त्यांचा निर्णय अयोग्य असला तर त्याला विधानसभेत विरोध होणार आहे आणि आपल्याला पाहिजे तसे अध्यक्ष वागू शकत नाहीत हे दाखवून द्यायला तरी विरोधी पक्षांनी त्यांच्याविरूध्द अविश्वास ठराव आणायला हवा असे मला वाटते. बहुतेकवेळा हे अविश्वास ठराव प्रतिकात्मकच असतात. इंदिरा गांधींच्या सरकारविरूध्द तब्बल १५ वेळा अविश्वास ठराव आले होते.ते पास व्हायची सुतराम शक्यता नाही हे विरोधी पक्षांना माहित नव्हते किंवा कळत नव्हते असे नाही.तरीही आपला विरोध दाखवायचा एक मार्ग म्हणून ते अविश्वास ठराव आणत होते.तसेच नागपूरला नोव्हेंबर १९९४ मध्ये गोवारी समाजाच्या मोर्चावर लाठीमार आणि त्यात १२३ जणांचा मृत्यू झाल्यानंतरही भाजपने शरद पवारांच्या सरकारविरूध्द अविश्वास ठराव आणला होता--तो पास होणार नाही हे माहित असूनही.
In reply to प्रतिकात्मक by क्लिंटन
In reply to आवाजी मतदान by क्लिंटन
यापैकी ज्या बाजूचा आवाज अधिक मोठा असेल त्याप्रमाणे अध्यक्ष तो प्रस्ताव मंजूर्/नामंजूर झाला असे जाहीर करतात.च्यायला, अजबच आहे हा प्रकार. धन्यवाद क्लिंटन. नविन माहीती मिळाली.
In reply to आवाज by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to . by hitesh
In reply to गडबड! कोलाहल! by भाते
In reply to गुप्त मतदान काँग्रेस, by श्रीगुरुजी
गुप्त मतदान काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेला अजिबात नको होते. भाजपने पूर्ण फिल्डिंग लावली होती. गुप्त मतदानात या तीनही पक्षांच्या काही आमदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केले असते व त्यांची पूर्ण नाचक्की होऊन पक्षात फूट पडली असती.मग अशावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने गप्प बसणे पसंत केले असते. मतविभाजनाची मागणी केली नसती. तसेच भाजपाने त्या मागणीस होकार देऊन सर्वच पक्षांना उघडे पाडायची संधी घेतली असती. भाजपाला सर्व पक्षांची अब्रू झाकण्यात रस होता असे तुम्हाला म्हणायचे आहे काय ?
In reply to विरोधाभास by धर्मराजमुटके
भाजपाला सर्व पक्षांची अब्रू झाकण्यात रस होता असे तुम्हाला म्हणायचे आहे काय ?इतर आमदार फुटले आहेत हे स्पष्ट झाले असते तर ते आमदार भाजपनेच फोडले आहेत हा आरोप झाला असता. बहुदा त्या कारणामुळे भाजपलाही झाकली मूठ ठेवायची असेल.
In reply to थोडा काळ तरी मिपावरुन राजकारण by जेपी
In reply to थोडा काळ तरी मिपावरुन राजकारण by जेपी
थोडा काळ तरी मिपावरुन राजकारण हद्दपार होउदे. यासाठी मी आवाजी मतदान घेत आहे. say 'yes' or 'no'no का हो माझ्या पोटावर पाय देताय? :)
काही आमदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत जय विदर्भ म्हणून घोषणा दिल्या त्या योग्य वाटतात काय ?मला स्वतःला तरी अशा घोषणा दिल्या असतील तर आणि सभागृहाच्या शिस्तीचा भंग होत नसेल तर त्यात काही चुकीचे वाटत नाही.काही आमदारांचे स्वतंत्र विदर्भ व्हावा असे मत असेल तर त्यात त्यांचे काय चुकले? जय विदर्भ असे म्ह्टले तर आपल्याच देशातल्या एका भागाचा जयजयकार केला जात आहे की शत्रूराष्ट्राचा उदोउदो केला जात आहे? आणि विदर्भ वेगळे राज्य केले जाणार असेल तर भारत-पाकिस्तानसारखी फाळणी का होणार आहे? मग जय विदर्भ म्हटले तर त्यांचे फार काही चुकले असे मला तरी वाटत नाही.
In reply to त्यांचे काय चुकले? by क्लिंटन
In reply to . by दिवाकर देशमुख
In reply to ओ देशमुख, रेकॉर्ड अडकली काय? by बॅटमॅन
In reply to ओ देशमुख, रेकॉर्ड अडकली काय? by बॅटमॅन
In reply to बॅटमॅना by दिवाकर देशमुख
In reply to बॅटमॅना by दिवाकर देशमुख
In reply to मला दि.दे. ची प्रतिक्रिया by हाडक्या
In reply to मला दि.दे. ची प्रतिक्रिया by हाडक्या
In reply to जर मतदान झाले असते तर by प्रसाद१९७१
In reply to भाजपाला सर्व पक्षांची अब्रू by दुश्यन्त
In reply to सर्वच एकमेकांची अब्रू वाचवत by प्रसाद१९७१
In reply to केंद्र by कपिलमुनी
In reply to आमदार फोडणे एवढे सोपे राहिले by दुश्यन्त
४. काही खासदारांनी