मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुझी सोबत.......

माझं आभाळ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
तुझी सोबत....... भुरभुरणाऱ्या पावसाच्या श्रावण सरीसारखी क्षणात सोबत तर क्षणात कुठतरी गुडूप होणारी , हुरहूर लावणारी , हिरमुसले गेले कि अचानक बरसणारी , माझ्या मनी अन अंगणी ताल धरणारी पावसाची सरच ती , सर जुनं विसरून नव्याने जगायला शिकवणारी , कोवळ्या फुटलेल्या पालवी सारखी, तुझी सोबत....... आठवण पक्ष्यांचा नाच बनून राहिलेली , दूरवर कुठंतरी आभाळात रांगोळी सांडलेली . माझ्या ओंजळभर स्वप्नाचं चांदणं बनून राहिलेली, आठवणीतच गुंतलेली अन आठवणीतच उसवलेली तुझी सोबत....... भावनांचा हीशोब मांडणारी शब्दहीन कवितेची ओळ जशी , आभाळभर साठून हि बरसणं विसरलेली सर जशी.

वाचने 2697 वाचनखूण प्रतिक्रिया 12

विजुभाऊ Fri, 10/31/2014 - 14:20
सुंदर कविता आहे. एक सूचना
तुझी सोबत....... आठवण पक्षांचा नाच बनून राहिलेली ,
या इथे पक्षांचा या ऐवजी पक्ष्यांचा असे हवे होते. तुम्ही हा शब्द "पक्षी" या शब्दाची अनेक वचन म्हणूनच वापरलाय . "राजकीय पक्ष" यातील पक्षाचे अनेकवचन या अर्थाने खचितच वापरलेला नसावा अशी अपेक्षा आहे.

एस Fri, 10/31/2014 - 14:32
नेहमीच्या गुळगुळीत उपमा-रूपकांपेक्षा थोडे वेगळे काही करण्याचा प्रयत्न करा. पुलेशु.

माझं आभाळ Sat, 11/01/2014 - 11:00
मिपा वापरताना थोडा गोंधळ उडतोय, एकदा दिलेला प्रतिसाद तीन तीनदा का दिसत आहे आणि देलेली प्रतिक्रिया काढून टाकण्याची काही सोय आहे का ?