मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मॅक्रो फोटोग्राफी - भाग १

हुकुमीएक्का · · मिपा कलादालन
मॅक्रो फोटोग्राफीचा प्रयत्न. . .       दिवाळीत खुप बिझी असल्याने "उत्सव प्रकाशाचा" या स्पर्धेत सहभागी होता आले नाही. सर्व स्पर्धकांचे व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व फोटो पाहून फोटोग्राफीसाठी नवीन जोश आला.       पावसाळ्यानंतर पहिल्यांदा कॅमेरा हातात घेतला तो म्हणजे दिवाळीत. दिवाळीनंतर जो वेळ मिळाला त्यात थोडा वेळ काढून मॅक्रो फोटोग्राफीवर जास्त वेळ दिला. माझा कॅमेरा Canon SX50 HS आहे. अर्थात Point n Shoot कॅमेरा असल्याने DSLR ची सर त्याला येउच शकत नाही. परंतू तरीही कॅमेराच्या किमान features चा कमाल वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. या धाग्यात गेल्या आठवड्यात काढलेले मॅक्रो-फोटो आहेत. फोटो १ - फुलपाखरू ButterFly Camera - Canon PowerShot SX50 HS Shutter Speed - 1/501 ISO - ISO-100 Camera Mode - Manual         वरील फोटो काढताना पाहिलेला प्रसंग सांगावासा वाटतो. हे फुलपाखरू प्रत्येक फुलावर बसत होते. आणि एका फुलावर बसताच त्याला उडता येईनासे झाले. नीट पाहिल्यावर कळले ते ज्या फुलावर बसले होते त्याच्या फांदीला चिकटून एक नाकतोडा दबा धरून बसला होता त्याने अलगद त्याला पकडले. नाकतोड्याने फांदीशी चिकटून एक फांदीच असल्याचा 'आव' आणला होता. शेवटी मीच त्या फुलपाखराला सोडवले. शेवटी त्यानेही मला एक छान फोटो दिला होताच की.! फोटो २ - Fly Fly Camera - Canon PowerShot SX50 HS Shutter Speed - 1/251 ISO - ISO-100 Camera Mode - Manual फोटो ३ - Fly Fly Camera - Canon PowerShot SX50 HS Shutter Speed - 1/251 ISO - ISO-800 Camera Mode - Manual फोटो ४ - Fly Fly Camera - Canon PowerShot SX50 HS Shutter Speed - 1/251 ISO - ISO-800 Camera Mode - Manual फोटो ५ - Fly Fly Camera - Canon PowerShot SX50 HS Shutter Speed - 1/251 ISO - ISO-800 Camera Mode - Manual फोटो ६ - Macro Water Drops Water Drops Camera - Canon PowerShot SX50 HS Shutter Speed - 1/251 ISO - ISO-100 Camera Mode - Manual फोटो ७ - Macro Water Drops Water Drops Camera - Canon PowerShot SX50 HS Shutter Speed - 1/251 ISO - ISO-100 Camera Mode - Manual Note - वरील सर्व फोटो Tripod चा वापर न करता काढले आहेत.

वाचने 6383 वाचनखूण प्रतिक्रिया 29

In reply to by कहर

हुकुमीएक्का Fri, 11/14/2014 - 21:54
छान आलाय फोटो. थोडा Blur आलाय पण Macro मध्ये हाच प्रॉब्लेम होतो. मलाही खुप फोटो घ्यावे लागले. तुमचे Luck छान होते की तिथे पाण्याचे थेंब होते. मी पण २-३ थेंब टाकले होते. पण त्या माशीने ते पाणी पिऊन मलाच पाणी "पाजले" *lol*

स्पा Wed, 11/12/2014 - 12:00
फोटो आवडलेच पण एक उगाच सूचना सब्जेक्ट वेगळा निवडला असतात तर अजून मजा आली असती, पाण्याचे थेंब, माशी, किडे, हे खूप कॉमन आहेत . रंगीत दोर्याची रिळे, वेगवेगळ्या पेन्सिली, मशीनचे पार्ट, गालिच्याचे फर, अशा वेगळ्या ऑब्जेक्ट चे पण मॅक्रो भारी येतात

In reply to by चौकटराजा

एस गुरुवार, 11/13/2014 - 13:03
राईट. पहिले छायाचित्र आवडले. चौथ्यातला रचनाविचारही मस्त. मॅक्रोमध्ये अजून काही करता येईल का ते पहा. उदा. फ्लॉवर वगैरे भाज्यांचा वापर पार्श्वभूमीसारखा करून वेगळ्याच पर्स्पेक्टिवने क्लोजअप घेता येतील. आउट ऑफ फोकस असल्याने ते फारच वेगळे आणि ड्रामॅटिक वाटेल. शुभेच्छा! :-)

In reply to by एस

हुकुमीएक्का गुरुवार, 11/13/2014 - 22:15
सर्व मतांशी सहमत. सब्जेक्ट निवडीचा, बॅकग्राऊंड सिलेक्शन आणि अनकवेनशनल सब्जेक्ट चा सल्ला खुप मोलाचा आहे... स्पा यांनी सुचवल्याप्रमाणे
चौथ्यातला रचनाविचारही मस्त. मॅक्रोमध्ये अजून काही करता येईल का ते पहा. उदा. फ्लॉवर वगैरे भाज्यांचा वापर पार्श्वभूमीसारखा करून वेगळ्याच पर्स्पेक्टिवने क्लोजअप घेता येतील. आउट ऑफ फोकस असल्याने ते फारच वेगळे आणि ड्रामॅटिक वाटेल.
पुढील फोटोग्राफीमध्ये त्याचा नक्कीच वापर करेन. बॅकग्राऊंड निवड करताना फारच कसरत झाली होती ती आता कमी होईल.

प्रचेतस Wed, 11/12/2014 - 15:30
फोटो आवडले. मी पण नुकतेच काही रिव्हर्स मॅक्रो तंत्राने काढण्याचा प्रयत्न केला होता पण तसा असफलच झाला.

In reply to by प्रचेतस

हुकुमीएक्का गुरुवार, 11/13/2014 - 22:22
रिव्हर्स मॅक्रो तंत्राबद्दल वाचले होते. खुप effective फोटो येतात. Depth of Field पण छान मिळते असे ऐकलेय. पण कधी पाहिले नाहीये कोणाला रिव्हर्स मॅक्रो use करताना.

वेल्लाभट Wed, 11/12/2014 - 15:53
एसएक्स ५० चे रिव्हूज भारी होतेच. आज रिझल्टही बघितले. मॅन्युअल मोडमुळे असेल कदाचित, एक्स्पोजर उणं अधिक झालंय पण काहीही असो पाण्याचे थेंब ए वन ! गुड वर्क भाऊ!

मदनबाण गुरुवार, 11/13/2014 - 12:38
फोटो आवडले ! अजुन येउद्या... :) जाता जाता :- तुम्ही म्हणताय पॉइंट अ‍ॅड शुट कॅमेराने फोटो काढले आहेत,मला जितके समजते त्यानुसार मॅक्रो लेन्स वापरुन काढलेलेच फोटो हे "मॅक्रो" समजले जातात. तज्ञ मंडळींनी यावर मार्गदर्शन केल्यास आनंद होइल.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership

In reply to by मदनबाण

एस गुरुवार, 11/13/2014 - 12:51
मी यातील तज्ञ वगैरे नाही, पण मॅक्रो छायाचित्रणावर एक लेख लिहिला होता. त्यातून काही उपयोग होतोय का पहा - http://misalpav.com/node/26239

In reply to by एस

हुकुमीएक्का गुरुवार, 11/13/2014 - 22:29
@स्वॅप्स - आपला लेख वाचला. मॅक्रो फोटोग्राफीबद्दलचे खुप समज आणि गैरसमज दुर झाले. सर्व Concepts अगदी सहज आणि सोप्या शब्दात असल्याने पटकन clear झाल्या.

In reply to by मदनबाण

वेल्लाभट गुरुवार, 11/13/2014 - 12:54
शिंपल शब्दात सांगायचं तर ऑब्जेक्ट जितक्यास तितकं; म्हणजे १:१ गुणोत्तरात जेंव्हा फोटोत टिपलं जातं, तेंव्हा त्यास मॅक्रो म्हणतात. आणि हे ट्रू मॅक्रो लेन्स नेच शक्य होऊ शकतं. परंतु नॉन मॅक्रो लेन्स किंवा पॉईंट अँड शूट च्या मॅक्रो मोड ने वगैरे जे फोटो काढले जातात त्यांना आपण क्लोजअप्स म्हणू शकतो कदाचित, तेही मॅक्रो च्या ब-यापैकी जवळ जातात. तांत्रिक निकष सोडले, तर सर्व क्लोजअप्स ना सरसकट मॅक्रोत गणलं जातं आता, तर... ठीक आहे, चालतंय.

मदनबाण गुरुवार, 11/13/2014 - 13:39
@स्वॅप्स धन्यवाद. :) तुमचे लेखन म्हणजे हा विषय आम्हाला नीट समजुन घेण्याची मोठी संधी असते. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership

कंजूस Fri, 11/14/2014 - 07:49
आवडले फोटो. कैमरा बऱ्यापैकी मैक्रो आहे. तीन फोटोंत सेटिंग आइएसओ१०० आहे- उत्तम. असल्यास ६४ ठेवा. 'आपल्याकडे मैक्रो फोटो घेऊ शकणारा कैमरा आहे' हे सारखे लक्षात ठेवले की योग्य विषय आपोआपच 'दिसू' लागतात. तुमचा फैन झालो आहे.उत्साही फोटोग्राफरला आणखी काही सांगावे लागत नाही.