गेले कित्येक महिने "मिपा"वर ह्या ना त्या स्वरूपात डू.आय.डीं.चा विषय निघतो.
मला अद्याप तरी मिपाच्या अंगणातून बाद करण्यात आलेले नाही.किंबहूना, असे अपमान सहन करायची पाळी आणू नये, असेच संस्कार झालेले असावेत.पण काय तो एकदा सोक्षमोक्ष लावूनच टाकू या, म्हणून नेहमीप्रमाणे बाबांकडे गेलो.(आमचे बाबा जरा बरे सल्ले देतात.)
नेहमीचा नमस्कार झाला आणि आम्ही विषयाला सुरुवात केली.
मी : बाबा एक शंका होती,
बाबा: बोल..ऐकतोय.
मी : आजकाल आमच्या मिपावरती डू.आय.डींचे प्रमाण फारच वाढले आहे.तर काही उपाय सुचतोय का ते बघा ना?
बाबा : तुला रे लेका कसला त्रास?
मी : अहो, परवाच तर मुंज झाली आणि आत्ता भीक मागायला सुरुवात केलीच आहे.तर उगाच कुणी नासकी भीक घालायला नको.म्हणून विचारले.
बाबा : अरे बाबा, साधे सोपे सरळ आहे.राजाकडे भीक मागायला जात जा.
मी : बाबा, असे कोड्यांत बोलू नका.काय ते स्पष्ट बोला.
बाबा : थांब.तुला एक गोष्टच सांगतो.
एका गावांत २ भिकारी रहात होते.गांव तसे छोटेच.त्यामुळे भीक घालणारे पण कमीच.तरी पण एक भिकारी मात्र जास्त तग धरून असायचा.दुसर्याला नेहमी प्रश्र्न पडायचा, की आपल्यापेक्षा हा अधिक तग कसा काय धरून राहतो?त्यामुळे तो जी काही भीक मिळेल ती खायचा.पण त्यामुळे तर त्याची शक्ती अजूनच कमी व्हायला लागली.शेवटी एक वेळ अशी आली की, तो आसन्नमरण अवस्थेत पोहोचला.जगायची काहीच शास्वती नसल्याने, त्याने धीर करून दुसर्या भिकार्याला विचारले, की बाबारे मी अशा अवस्थेला कसा काय पोहोचलो?
दुसरा भिकारी म्हणाला, तू जे मिळत होते ते खात होतास.मी मात्र मला जे योग्य वाटत होते तेच खात होतो.
मी : म्हणजे काय? कथा संपली.
बाबा : हो.
मी : मला नाही कळाली.
बाबा : ह्यात न कळण्यासारखे काय आहे? आपल्या संसारात पण असेच असते.एक साधी चप्पल घ्यायची तरी आपण चार दुकाने हिंडतोच ना?मग तसेच आपण शिक्षणाच्या बाबतीत किंवा माणसे जोडण्याच्या बाबतीत का नाही करू शकत्?याहू,रेडीफच्या वेळीच जी-मेलचा प्रवेश झाला.पण जी-मेल जास्त विश्वासार्ह का ठरले? तर एखादा जी-मेल धारकच दुसर्या व्यक्तीसाठी अर्ज करू शकत होता किंवा दुसर्या व्यक्तीसाठी जामीन राहू शकत होता.ज्या बँका किंवा ज्या संस्था जामीनदारीवर चालतात, त्याच संस्था टिकतात.भल्या वाढत नसतील पण काळाप्रमाणे बदलल्या तर टिकतात आणि अशाच उत्तम कार्यकर्त्यांमुळे वाढतात देखील.मनोगत-उपक्रम जवळपास बंद पडले.पण त्याच सुमारास आलेले "मिपा" अद्याप तग धरून आहे."मिपा"चा हा चिवटपणा बर्याच लोकांना बघवत नाही आणि मग ह्या ना त्या रुपाने "मिपाकरांचे" आणि पर्यायाने "मिपा"चे खच्चीकरण करण्याचा हा विचित्र मार्ग ते अवलंबतात.
त्रासदायक कर्मचार्यांची भरती केलेला कारखाना जास्त दिवस टिकत नाही.किंवा खोगीर भरती केलेले सैन्य पण जास्त काळ तग धरू शकत नाही.कर्मचार्यांची भरती जशी भक्कम पुराव्याने केली जाते, तशीच भरती ज्या संस्था करतात त्याच टिकतात.
आज तू माझ्या पाशी आलास आणि मन मोकळे केलेस, हे उत्तम.तसेच मन तू संपादक मंडळापाशी पण मोकळे करू शकला असतास.
मी : तूमचे म्हणणे खरे आहे.पण मिपाच्या संपादकांना तसाही भरपूर त्रास होत असतो."बिन-पगारी, बिन-अधिकारी आणि फुल्ल्ल्ल्ल्ल हमाली" म्हणजे कोण? तर मिपाचे संपादक.त्यांच्या त्या त्रासाला खतपाणी घालण्यापेक्षा आणि त्यात भर घालण्यापेक्षा, तुमच्याशी बोललो.
बाबा : झाले तुझे समाधान.म्हणजे उद्या जर "मिपा"च्या संपादकांनी तुझे ओळखपत्र आणि मोबाइल नंबर मागीतला, तर तुला भीड मानायला नको.
मी : एका पायावर."कर नाही त्याला डर कशाला?"आणि एक शंका होती.तुम्ही,"राजा पाशी भीक मागायला जा"असे का सांगीतलेत?
बाबा : अरे, ह्या मिपावर अनेक राजा माणसे लेख लिहीतात.प्रसंगी एकमेकांत युद्ध पण खेळतात.पण तह करून परत एकत्र पण येतात.त्या राजा माणसांचे लेख वाचत जा.जमल्यास पुर्वी "मिपा"वर जे अनेक उत्तम लेख लिहील्या गेले त्यांचा शोध घे आणि आपले मन आनंदी कर.निर्मळ आणि उत्तम मन, हेच खरे आरोग्य.
मी : हो पण त्या डू.आय.डींचे काय?
बाबा : ती काळजी तू करू नकोस.हे जग ३ वाक्यांवरच चालते.
१. ज्या गोष्टी तुझ्या हातात आहेत, त्याच कर.
२. ज्या गोष्टी तुझ्या हातात नाहीत, त्याची चिंता भगवंतापाशी घेवून जा,भगवंत काय करायचे ते बघेल.
३. कूठल्या गोष्टी तुझ्या हातात आहेत आणि कुठल्या गोष्टी तुझ्या हातात नाहीत, हे ओळखायचे तारतम्य ठेव.
मी : चला निघतो मी.आत्ता पासूनच राजा लोकांच्या लेखांच्या मागे लागतो.
तर मंडळी, आज पासून आम्ही भीक मागणार ती राजालोकांकडेच.आमच्या परीने आम्ही डू.आय.डीं.चा प्रश्र्न, निदान आमच्या पुरता तरी सोडवला आहे.
अर्थात आम्ही जरी बाबांचे भक्त असलो, तरी... मिपाच्या जाणकार लोकांचे सल्ले ऐकण्याची आमची तयारी आहे.
वाचने
10791
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरचं काही बरं लिहीले आहे बर
मिपा हा लोकांच्या मनातुन वाहणारा खळ्खळ झरा आहे....
In reply to बरचं काही बरं लिहीले आहे बर by स्पंदना
या काठीला आवाज नसतो मुवि पण
In reply to मिपा हा लोकांच्या मनातुन वाहणारा खळ्खळ झरा आहे.... by मुक्त विहारि
या काठीला आवाज नसतो मुवि पण
In reply to या काठीला आवाज नसतो मुवि पण by स्पंदना
(No subject)
In reply to या काठीला आवाज नसतो मुवि पण by जेपी
चांगले लिहीलेय.
प्रत्येक क्षेत्रात प्रस्थापित
मस्तच
.
@हितेशभाऊ
.
In reply to @हितेशभाऊ by बोका-ए-आझम
बोकाभौ,चोराच्या मनात चांदणे
In reply to @हितेशभाऊ by बोका-ए-आझम
अजयातै, जो ड्यु अायडी लोकांचं
In reply to बोकाभौ,चोराच्या मनात चांदणे by अजया
(No subject)
In reply to अजयातै, जो ड्यु अायडी लोकांचं by बोका-ए-आझम
(No subject)
In reply to अजयातै, जो ड्यु अायडी लोकांचं by बोका-ए-आझम
आहे की.. म्हणुअच आम्ही
आहे की.. म्हणुअच आम्ही सर्वांचे स्वागत करतो. वर्जिनल डु , राजा रंक असा भेद करत नाही.आमीपण करतो.पण चपटी टाकुन आल्यासारखे बरळत नाही..
In reply to आहे की.. म्हणुअच आम्ही by जेपी
दारु पिलेला माणुस खरे बोलतो
In reply to . by hitesh
दारु पिलेला माणुस खरे बोलतो असे म्हणतात . खरे आहे का हो ?आसेल. पण ते खर कमी आनि थापा जास्त आसतात.माई नी माई आयडी पे तेरे
.
In reply to माई नी माई आयडी पे तेरे by बोका-ए-आझम
(No subject)
In reply to . by hitesh
हा हा हा ...
In reply to . by hitesh
हा हा हा
In reply to माई नी माई आयडी पे तेरे by बोका-ए-आझम
सुरेख दवणीय...
काय करणार बाबा....
In reply to सुरेख दवणीय... by स्पा
मूवी काका आपण डोम्बोलीत भेटलो
In reply to काय करणार बाबा.... by मुक्त विहारि
का नाही?
In reply to मूवी काका आपण डोम्बोलीत भेटलो by स्पा
सत्यनारायणासाठी मेहूण
In reply to का नाही? by मुक्त विहारि
@ सुधांशू भाऊ...
In reply to सत्यनारायणासाठी मेहूण by सुधांशुनूलकर
@मोठा सत्यनारायण घालायचा
In reply to का नाही? by मुक्त विहारि
मागच्या वेळीस पुण्यात सत्यनारायण घालायचा होता....
In reply to @मोठा सत्यनारायण घालायचा by अत्रुप्त आत्मा
मूवी काका आपण डोम्बोलीत भेटलो कि विचार मंथन करूच
In reply to मूवी काका आपण डोम्बोलीत भेटलो by स्पा
ऑ??????
In reply to काय करणार बाबा.... by मुक्त विहारि
नाही हो....
In reply to ऑ?????? by स्पंदना
सत्यनारायणाची कथा आमाला किमान
जेपी
In reply to सत्यनारायणाची कथा आमाला किमान by जेपी
आमचा हा सत्यनारायण सह-कुटुंब आणि सहपरीवार असल्याने....
In reply to जेपी by दिपक.कुवेत
तर उगाच कुणी नासकी भीक
ह्म्म्म...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnershipमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnershipमुवि, तुम्हाला छळणारा एक
तुस्सी छा गये मुवि
पारखी च्या जागी गुराखी कसा