उत्तरभारतीय व्यक्ती नावांचे लेखनात वडीलांचे नाव नमुद करण्याची प्रथा कमी असावी. एक उदाहरण म्हणून हरयाणाचे नवे मुख्यमंत्री त्यांचे नाव मनोहर लाल खट्टर असे लिहितात. संदर्भ त्यांचे संकेत स्थळ http://manoharlalkhattar.in/ मराठी/महाराष्ट्रीय लेखन परंपरेने मनोहरलाल असे एकत्र न लिहिता, मनोहर आणि लाल हे शब्द वेगवेगळे लिहून नंतर आडनाव लिहिलेले आढळले जसे की मनोहर लाल खट्टर असे लिहिले तर आपण सर्व साधारण पणे मनोहर हे त्यांचे स्वतःचे नाव लाल हे मध्ये आले म्हणून वडलांचे नाव आणि मग आडनाव असे आपण सर्व साधारणपणे समजतो.
प्रत्यक्षात मनोहर लाल खट्टर यांच्या वडलांचे नाव हरबन्स लाल खट्टर असे आहे. (संदर्भ )
म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीने त्यांचे नाव सहसा मनोहरलाल हरबन्सलाल खट्टर असे लिहिले गेले असते. एकतर हिंदी पंजाबी बेल्ट मध्ये होणारे व्यक्ती नावांची प्रचलीत लेखन पद्धती आणि ती तशी का आहे, हे मी समजून घेऊ इच्छितो आहे. जाणकारांनी कृपया या विषयावर प्रकाश टाकावा हि विनंती.
दुसरे असे की, व्यक्ती नावांबद्दल मिपावर इतर चर्चा झाल्यात आहेत. खरे म्हणजे व्यक्तीच स्वतःच नाव आणि कतृत्व महत्वाच व्यक्तीच खानदान आणि वडील कोण आहेत या बाबी माझ्याही दृष्टीने तश्या गौण आहेत. तथापी दक्षीण भारतीय पद्धत असो वा ही उत्तर भारतीय पद्धत असो काही वेळा अडचणीच्या होतात. पोस्ट ग्रॅजूएशनच्या वेळी माझा एक मीत्र नाव नरेश एका दक्षीण भारतीय खेड्यातून माझ्या सोबत होता. वर्षाच्या शेवटी त्याने रिझल्ट लागल्यावर पत्राने कळवण्यास सांगितले आणि पत्ता म्हणजे केवळ त्याचे नाव आणि गावाचे नाव, अर्थातच मी त्याला गावात किती नरेश आहेत हे विचारले आणि त्याने सहा हे उत्तर दिल्या नंतर मी चक्क उडालोच, मग माझ पत्र तुझ्याकडेच पोहोचेल याची गॅरंटी काय ? या प्रश्नाला त्याने हसून पुहुंच जाता है एवढेच उत्तर दिले. मी तेवढ्या उत्तरावर समाधानी नसल्याने त्यास पत्र काही पाठवले नाही. त्या नंतर त्याची एकदा उभ्या उभ्या भेट झाली नंतर भेट काही होऊ शकली नाही. नंतर फेसबुकवर लिंकड्न इत्यादीवर ते नाव शोधण्याचा असंख्य वेळा प्रयत्न केला हजारो नरेश असलेल्या भारतातला माझा मित्र मला अद्याप शोधता आलेला नाही.
या अनुभवावरुन अती छोट्या नावाच्या वापरामुळे बँकींग, पोलीसदले यांच्या समोर कोणत्या समस्या उपस्थीत होत असतील याची मी केवळ कल्पनाच करू शकतो. समजा मिसळपाव संकेतस्थळावर सगळ्यां सदस्यांना खाते क्रमांक दिले. प्रवेश करताना खाते क्रमांकाने करा पण खाते क्रमांक इतरांना दिसणार नाही आणि प्रत्यक्षात एकमेकांसारखी नावे/टोपणनावे वापरता येतील अशी व्यवस्था करुन दिली नेमकी काय परिस्थिती होऊ शकेल. समजा बँकेत चेक डिपॉझीट करताना अकाऊंट नंबर लिहिण्यात चुकला आणि चुकलेल्या क्रमांक खात्यासही त्याच नावाची व्यक्ती असेल तर नेमके काय होत असते ? केवळ नामसाधर्म्याने पोलीसांकडून चुकीच्या व्यक्तीचा पाठपुरावा केला गेला किंवा योग्य व्यक्ती शोधण्यात वेळ गेला असे होत असेल का ?
ज्या प्रदेशात अशी कन्फ्यूजींग नावे असतात तेथील इतिहास संशोधनात आणि इतिहास लेखनात नेमक्या काय अडचणी येत असतील. उदाहरणार्थ मराठी विकिपीडियावर संभाजीराजे भोसले असे नाव आले की डोळे झाकून दुवा छ. शिवाजी महाराजांचे सुपूत्र संभाजीराजे यांच्या नावाकडेच जोडला जातो. छ. संभाजीराजांच्या काकांच म्हणजे छ. शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधूंचही नावसुद्धा संभाजीराजे भोसलेच होत ह्याची बहुतेकांना कल्पनाच नसते, काहींना असली तरीही विस्मरण झालेले असते.
अलिकडे व्ही.गीता या नावाने स्त्रीवादी लेखीके बद्दल मराठी विकिपीडियावर एक लेख अर्धवट लिहून सोडून दिला गेला. अधिक माहितीने लेख पुर्ण करावा म्हणून आंतरजालावर शोध घेतला तर किमान डझनभर व्ही.गीता आंतरजालावर होत्याच पण त्यातील किमान तीन केवळ स्त्री विषयक कामे करत होत्या आंतरजावर तिघींच्याही कार्याची माहिती आढळते, पण कोणती माहिती कोणत्या व्ही.गीताच्या लेखात टाकायची हा प्रश्न शिल्लक राहतोच. माझ्यासारखी व्यक्ती कन्फर्म होत नाही तो पर्यंत कोणतीच माहिती लेखात जोडणार नाही. परंतु सर्व सामान्य विकिपीडियन एवढा शोधही घेत नाही फक्त माहिती भरत सुटलेला असतो.
असो. सध्यातरी उत्तरभारतीय व्यक्ती नावांचे लेखन पद्धतीतही मला त्याच समस्या दिसतात एकाच नावाच्या दोन व्यक्ती काळाच्या ओघात प्रसिद्ध झाल्या त्यांच्या कार्याची वृत्तपत्रातून शोधून नोंद घ्यावयाची झाली तर संभ्रम आणि गोंधळ टाळून माहितीची वस्तुनिष्ठता कशी जपावी (माहितीचा नेमके पणा कसा जपावा) हा माझ्या पुढील एक मोठा यक्ष प्रश्न आहे.
वाचने
13389
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय मोठ्या मोठ्या जिलब्या
माहितगार= मोमोजिवा = मोठ्या
In reply to काय मोठ्या मोठ्या जिलब्या by स्पा
गप रांव रे!! वशाड मेलो!!
In reply to काय मोठ्या मोठ्या जिलब्या by स्पा
नाव-आडनाव
उत्तरेत {स्वतःचे नाव} +
In reply to नाव-आडनाव by सुनील
जाॅर्ज बुश (थोरले) यांचे नाव
In reply to नाव-आडनाव by सुनील
चंद्रगुप्तांपैकी पहिला हा
In reply to नाव-आडनाव by सुनील
अवांतर ४ ला अनुमोदन!
In reply to नाव-आडनाव by सुनील
मजेदार गोष्टी. व्ही गीता या
माझ्या मित्राचे नाव - संदीप
माझ्या एका दाक्षिणात्य
या साउथवाल्यांनी तर वात आनलाय राव...
नाव अन पुढे किंवा मागे पॅन
परंपरा
उ०भा०लोक वडिलांचे नाव का लावत
या पेक्षाही येडपटपणा म्हणजे
'कुवेंपु' या कन्नड कवीचे नाव
...
वडिलांचे आडनाव आणि मुलाचे
माझ्या एका आंध्रप्रदेशातील
नंबर सांगा -घोळ टाळा
एक शंका
In reply to नंबर सांगा -घोळ टाळा by आर्य
प्राणी - वाघ , बकरे , कोल्हे
In reply to नंबर सांगा -घोळ टाळा by आर्य
प्राणी - वाघ , बकरे , कोल्हे , लांडगे , बोके , ससे इ.यावरुन कशी आडनावे आली? पाळणारे?/ खाणारे?/ त्याच वंशातले? ;) / त्याच गल्लीतले? / का अजुन काही?का स्वभावावरुन ??
In reply to प्राणी - वाघ , बकरे , कोल्हे by यसवायजी
त्याच गल्लीतले? >>
In reply to प्राणी - वाघ , बकरे , कोल्हे by यसवायजी
आपल्याकडे बायकांनी आधी आपले
रवी शंकर प्रसाद
शी. सा. न.
In reply to रवी शंकर प्रसाद by माहितगार
? नेमके समजले नाही .
In reply to शी. सा. न. by सुनील
शी. सा. न.
In reply to ? नेमके समजले नाही . by माहितगार
शी. सा. न.उत्तर द्या ? नेमके समजले नाही . माहितगार - Tue, 11/11/2014 - 09:56 नवीन ?नेमके समजले नाही .तुमच्या चिकाटिला दाद देत आहेत.तुमच्या चिकाटिला दाद देत आहेत
In reply to शी. सा. न. by जेपी
ठाकूर प्रसाद नाव असलेली हिंदीत बरीच मंडळी दिसतात
In reply to रवी शंकर प्रसाद by माहितगार
ठाकुर प्रसाद नाव असलेली हिंदीत अजूनही बरीच मंडळी दिसताहेत
In reply to ठाकूर प्रसाद नाव असलेली हिंदीत बरीच मंडळी दिसतात by माहितगार
कश्यप परिवार म्हणजे आडनाव की गोत्र ?
In reply to रवी शंकर प्रसाद by माहितगार
अवांतर: या पायोनीयर मधील
In reply to कश्यप परिवार म्हणजे आडनाव की गोत्र ? by माहितगार
उत्तर भारतीय नवे आणी आडनावे
या धाग्यास प्रतिसादातून बरिच
In reply to उत्तर भारतीय नवे आणी आडनावे by सुबोध खरे
फक्त शिख
In reply to उत्तर भारतीय नवे आणी आडनावे by सुबोध खरे
एक करेक्शन- गुरमुखी लिपीत क्क
In reply to उत्तर भारतीय नवे आणी आडनावे by सुबोध खरे
त्यातही एक करेक्शन. द्वित्त
In reply to एक करेक्शन- गुरमुखी लिपीत क्क by बॅटमॅन
ब्रार, प्राजी.. पण असतात की ?
In reply to एक करेक्शन- गुरमुखी लिपीत क्क by बॅटमॅन
प्राठा?
In reply to ब्रार, प्राजी.. पण असतात की ? by बाळ सप्रे
विकिपीडियातील माहितीत घोळ कसे होतात
माहितगार ,एखाद्या नावाचा शोध
असे खरेच होऊ शकते ?