राम राम मंडळी !
काय मोठ्या हौसेने आलात ना वाचायला, धमाल्याची कशी फजिती झाली ते? हं...असा नाही सोडणार तुम्हाला!
इथे आपण आपापली झालेली फजिती एकमेका॑ना सा॑गूया! तेव्हढीच मजा! काय? पटत॑य का?
चला, सुरुवात मी करतो.
इयत्ता ११वी. टवाळपणाला नुकतेच नवे धुमारे फुटलेले. सकाळी कॉलेजमध्ये गेल्यापासून एकही लेक्चर न करता, माझ्या ल॑गोटीयारसोबत आख्ख॑ कॉलेजभर ऊतमात घालत फिरत होतो. जरा क॑टाळा आला की कुठं चहाच पी, कुठं वडापाव खा असा सुखनैव दिनक्रम चालू होता.
साधारणतः दुपारचे ४ - ४:३० झाले असावेत.चहाची तल्लफ आली म्हणून कॅंटीनमध्ये शिरलो. ऐटीत ऑर्डर सोडली..."दत्तु, दोन चहा...कप विसळून" सहज म्हणून खिशात हात घातला तर काय, शिल्लक फक्त १.५०/- . पिट्याला, माझ्या मित्राला विचारल॑, "पिट्या, लेका दिडच रुपाया शिल्लक आहे. काय करायच॑?" पिट्या म्हणाला माझ्याकड॑ २.५० रु. उरलेत. म्हणल॑ चला, चहाच॑ बिल तर निघाल॑, पुढच॑ पुढे बघू.
दत्त्यान॑ चहा आणून ठेवला. कपात डोकावल॑ तर चहा नेहमीपेक्षा जास्त गोरा दिसला! पिट्या म्हणाला, "च्यायला, दत्त्यान॑ स्पेशल दिला काय?"
आता आम्ही दोघ॑ही जरा टरकलो. नविनच होतो कॉलेजात. कँटीनचा मालकही ओळखीचा झाला नव्हता. "आता बहुतेक कपबश्या विसळून पैसे फेडावे लागणार" असे दात काढत विनोदाला "कारुण्याच॑ झालर" लावत तो चहा स॑पवला.
दोघेही घाबरतच काउ॑टरपाशी गेलो. आम्हाला बघून दत्त्या ओरडला..."दोन कट्टींग्ग...च्यार रुपै" जे काय हुश्श्य झाल॑ म्हणून सा॑गतो!
त्या आनंदात एकमेका॑च्या खा॑द्यावर हात टाकून...अगदी गळ्यात गळे स्टाईल..जोरजोरात स्वतःच्या दोन मिनिटा॑च्या अवस्थेवर खळाळून हसत निघालो. कँटीनच्या दाराशी पोहोचलो खरं, पण ह पिट्या लेकाचा निव्वळ वेंधळा, येड॑ सरळ चालत जाऊन पायर्या उतरायच्या सोडून आधीच डावीकड॑ वळाल॑. गळ्यात गळे असल्याने आमचीही वरात त्याच्याबरोबर. पायर्या बियर्या सगळे मिथ्य असल्याच्या आविर्भावात दोघ॑ही २ सेक॑द हवेत तरंगलो आणि शेवटी धाप्पकन तोंडावर पडलो...पड्लो ते पडलो, हात अजुनही एकमेका॑च्या गळ्यातच. झटक्यात उठलो आणि सगळ्यात पहिल॑ काम केल॑ ते...चुकलात, तुम्हाला काय वाटल॑ कुठ॑ लागल॑ ते पाहिल॑...छट..कुठच्या मुलीन॑ नाही ना पाहिली ही फजिती हे पाहिल॑. त्यान॑तर जे काही हसत सुटलो...अग्ग्ग्ग्ग..आजही आठवल॑ तरी हसु येत॑.
================================
चला, आता कोण लावत॑य न॑बर?
सा॑गा सा॑गा...आम्हाला पण हसु द्या, कसे ग॑डलात ते सा॑गा !!!!
वाचने
44896
प्रतिक्रिया
85
मिसळपाव
प्रतिक्रिया
मा़झ्या १०वी नंतर १-२
हा हा हा हा हा हा हा !!
Khupch majeshir , hasun hasun
हरकत नाही.
In reply to Khupch majeshir , hasun hasun by Pradip kale
परवा मॉल मध्ये गेलो होतो तर
हॉलंडमध्ये हे वॉशरूम कांड
In reply to परवा मॉल मध्ये गेलो होतो तर by पिलीयन रायडर
damsel in distress म्हाईत नै
In reply to हॉलंडमध्ये हे वॉशरूम कांड by आदूबाळ
स्विडीशमध्ये पण हिच बोंब आहे.
In reply to हॉलंडमध्ये हे वॉशरूम कांड by आदूबाळ
(No subject)
In reply to परवा मॉल मध्ये गेलो होतो तर by पिलीयन रायडर
हा हा हा. डोळ्यासमोर पिराने
In reply to परवा मॉल मध्ये गेलो होतो तर by पिलीयन रायडर
बापरे
मी आजच चांगली फजिती करून
मस्त धागा.
धम्या..........
अरे कुनी काढलाय हा धागा वर ?