===================================================================
जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७... ०८ (समाप्त)...
===================================================================
पुढच्या दिवशी सकाळी पेत्राहून आमचा प्रवास "वादी रम"च्या दिशेने सुरू झाला. अरबी भाषेत वादी म्हणजे दरी किंवा नदीचे (बहुतेक वेळेस कोरडे झालेले) पात्र. संपूर्ण अरबस्थान अनेक कोरड्या वाद्यांनी भरलेले आहे. फार पूर्वी कोरड्या पडलेल्या नद्यांची पात्रे किंवा आता क्वचितच पडणार्या पावसाच्या वेगाने वाहणार्या पाण्याच्या प्रवाहाने बनलेले वाळूचे आणि वालुकाश्माचे भूस्तरीय आकार असे त्यांचे स्वरूप असते. काही वाद्या जुन्या काळापासून प्रसिद्ध आहेत. ज्या वेळेस आजच्यासारखी वाहतुकीची व्यवस्था नव्हती तेव्हा व्यापाराचे आणि धार्मिक प्रवासांचे मार्ग या वाद्यांतून जात असत. प्राचीन काळी पाण्याने समृद्ध असलेल्या वाद्यांच्या काठी वस्ती होती. त्यातले एक मोठ्या राजकीय-आर्थिक-सांस्कृतिक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे "वादी पेत्रा उर्फ पेत्रा व्हॅली उर्फ पेत्रा दरी" हे एका मोठ्या नाबातियन साम्राज्याच्या राजधानीचे ठिकाण होते, तेथूनच आजचा प्रवास सुरू झाला होता.
पेत्राच्या जवळच असलेली "वादी रम" तिच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे आणि चित्रविचित्र नैसर्गिक भूस्तरीय रचनांमुळे एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण झाली आहे. या दरीचे नाव तिथल्या रम् नावाच्या जॉर्डनमधल्या सर्वात उंच डोंगरावरून (जबल रम्) पडले आहे. प्राचीन काळात इथे प्रचलित असलेल्या अरेमिक भाषेत रम् म्हणजे उंच आणि अरबीत जबल म्हणजे पर्वत / डोंगर.
या दरीचे अजून एक आकर्षण म्हणजे तिचे "लॉरेन्स ऑफ अरेबिया" शी असलेले नाते. पहिल्या महायुद्धाच्या काळातल्या लॉरेन्सच्या कहाण्या या दरीत आणि तिच्या आसपासच्या प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर घटलेल्या आहेत.
वादी रमला चंद्रदरी (वादी कमर उर्फ Valley of the Moon) असेही संबोधले जाते. ही जॉर्डनमधली क्षेत्रफळाने सर्वात मोठी (७२० चौ किमी) आणि समुद्रसपाटीपेक्षा बर्याच वर (सर्वात उंच ठिकाण समुद्रसपाटीपेक्षा १७०० मीटर) असलेली दरी आहे. वादी रम पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केलेली आहे. या दरीतले वाळवंट आणि त्यांत विखुरलेले वालुकाश्मांचे असंख्य नैसर्गिक आकार पाहत भटकायला (ट्रेकिंग करायला), गिर्यारोहण करायला, उंटांवरून किंवा चारचाकीतून सफर करायला आणि येथे असलेल्या पर्यटक छावण्यांत रात्रीची वस्ती करण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात.
सकाळची न्याहारी आटपून आमची वादी रमच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. वादीच्या परिसरात शिरल्याबरोबर लगेच वादी रमचे आकर्षण असणारे वाळवंट आणि वालुकाश्मांचे आकार दिसायला सुरुवात झाली...
वादी रम : ०१
वादी रम : ०२
वादी रम : ०३
वादी रम : ०४
वादी रम : ०५
वादी रम : ०६
वादी रम : ०७
वादी रम : ०८ : अरॅमिक भाषेतले प्राचीन प्रस्तरलेखन
वादी रम : ०९ : प्राचीन प्रस्तरचित्रे
वादी रम : १० : लॉरेन्स ऑफ अरेबियाने वस्ती केलेले ठिकाण
वादी रम : ११ : लॉरेन्सबरोबरची अस्मादिकांची भेट
वादी रम : १२ : राजपुत्र अब्दुल्लाचे वालुकाश्मावरचे कोरीव चित्र
वादी रम : १३ : सूर्यास्त ०१
वादी रम : १४ : सूर्यास्त ०२
वादी रम : १५ : सूर्यास्त ०३
वादी रम : १६ : सूर्यास्त ०४
वादी रम : १७ : उंटाची सफारी
वाचने
11620
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला
हेच म्हणतो !!
In reply to मी पयला by बॅटमॅन
मस्त मस्त मस्त
मस्त्च
जबरदस्त!
धन्यवाद !
In reply to जबरदस्त! by पैसा
ओह!
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
मूळ अरबी शब्द "बदू, badw,
In reply to ओह! by पैसा
चिचित्र ही वसुंधरा ...
अहाहा!
मस्त फोटो व वर्णन.
धन्यवाद !
In reply to मस्त फोटो व वर्णन. by शिद
अच्छा. धन्यवाद.
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
मस्त प्रवास वर्णन !!!
+++१११
In reply to मस्त प्रवास वर्णन !!! by सतिश गावडे
छान लेख आणी फोटो
नवा प्रवास चालु झाला तर...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- LIVE UPDATE - मी देवेंद्र गंगाधर फडणवीस... शपथ घेतो कीअद्भूत आहेत ही ठिकाणं.
वाळवंट रखरखीत असले तरी त्याचे
In reply to अद्भूत आहेत ही ठिकाणं. by प्रचेतस
अगदी रब अल् खाली या जगातल्या
In reply to वाळवंट रखरखीत असले तरी त्याचे by डॉ सुहास म्हात्रे
शिफ्टिंग सँड वाळूच्या
In reply to अगदी रब अल् खाली या जगातल्या by प्रचेतस
धन्यवाद !
बरेच दिवस मुद्दामच हे प्रवासवर्णन वाचत न्हवतो....