पुण्याचे उणे
(श्रीरंग जोशी यांनी चेपुवरील एक ढकल संदेश खफवर टाकला आहे पुण्याची महती सांगणारा ! त्यावरुन थोडे चिन्तन घडले, त्यातून हे मुक्तक प्रसवले आहे.)
पुण्याची मुम्बई झाली आहे हो ! छाती फुटेस्तोर पळावे लागते आज काल पुण्यात देखील!
आय टी वाल्यांनी वाट लावली आहे पुण्याची ! हिन्जवडी आणि हडपसर या दोनी दिशांना २४ तासाचा जाम करुन ठेवला आहे. घरांचे भाव गगनाला भिडले आहेत. इतके की, आता त्यांना देखील ते परवडेनासे झाले आहेत. मला व्यक्तिशः सकाळ संध्याकाळ दिड तास-दिड तास प्रवास करावा लागतो. आणि विकेण्डला देखील मुंबै च्या लोकांनी पुणे जाम करुन ठेवले आहे.
पुणे हे मुंबई नसल्याने हा असला भार पुण्याला पेलवत नाही. सार्वजनिक वाहतूकीचा बोजवारा उडाला आहे. लोकल ची सोय कधीच नव्हती आणि पी एम टी चालण्यापेक्षा त्या विषयावर वारेमाप बोलण्यासाठी अधिक प्रसिद्ध !
जुने कोथरुड आणि सिंहगड रस्ता भागातील सोसायटयातील अरुन्द रस्ते फक्त सायकली आणि स्कूटरी जाण्याच्या लायकिचे ! तिथे हल्ली मर्सिदेस आणि बीएमडब्ल्यु सारख्या अजस्त्र गाड्या पार्क करुन ठेवतात. पार्किगची पुण्यात महाबोंब आहे ! ती रस्त्यावर , सार्वजनिक ठिकाणी आणि सोसायट्यातदेखील आहे. पुढचे पानपत पुण्यातच पार्किन्ग वरुन होईल असा अन्दाज आहे.
पुणे अधिकाधिक बकाल होत चालले आहे. बकालपणा समावून घेण्याची मुंबईची सहनशीलता आणि सक्षमता पुण्यात नाही. दिवसेंदिवस पुणे अधिकाधिक व्याकुळ आणि केविलवाणे होत चालले आहे. शान गेली पुण्याची महाराजा !!
विद्येचे माहेरघर म्हणून पुण्याचा लौकिक ! तो काही नामांकित संस्थांमुळे होता आज त्यांची काय शान आहे ? सी ई ओ पी मध्ये पुण्याची किती अडमिशन्स होतात ? महाराष्ट्रातील? पुणे विद्यापिठीतील दर्जावर बोलायलाच नको! बोरी / दादोजी कोंडदेव पुतळा या प्रकरणांनी पुण्यातील शैक्षणिक वातावरण पुण्याच्याच कारभार्यांनी पार ढ्वळून काढले. हे वातावरण संशोधनाला पोषक वातावरण आहे काय? एस पी / फर्ग्युसन आपला दाब ठेवून आहेत पण एमआयटी , भारती , सिंबायसीस , सिंहगड, या खासगी संस्थानी पुण्याच्या शैक्षणिक विश्वावर आक्रमण केले आहे. त्या संस्था शिक्षणासाठी किती आणि अर्थकारणासाठी किती हा विषय इतका स्पष्ट आहे की त्याची चर्चा देखील होणार नाही. या अर्थकारणासाठी पुणे सोडाच अमराठी विद्यार्थ्यांचा भरणा पुण्यात वाढला. त्याबरोबर गुन्हेगारी आली. कसले विद्येचे माहेरघर ?
आणि सांस्कृतिक पुणे ?? किती नवीन लेखक / कवी / गायक पुण्यात गेल्या १५-२० वर्षात आले? सलील आणि संदिप खरे वगळता फारसे आशादायक काही नाही !! अपवाद असतील ही पण त्या अपवादाने नियमच सिद्ध होतो. सदाशिवात वसंतराव देशपांडे रहात होते, त्या माडीच्या खालून , रस्त्यावरुन जाताना देखील भारावल्यासारखे व्हायचे ! तीच गोष्ट नव्या पेठेतील भिमाण्णांच्या बंगल्याच्या आसपास ! आता काय शिल्लक आहे पुण्यात ?
पुण्याच्या गणेशोत्सवाबद्दल काय लिहू ? उत्सव कमी आणि धागडधिन्गा जास्त ! अनेक वेळा लिहून झाले आहे. गेली १० वर्षे पुण्यात आहे , एकदाही तिकडे फिरकायची हिम्मत झाली नाही.
पार वाट लागली आहे पुण्याची! पुणे , मुम्बईच्या वाटेवर आहे ! हे कमी की काय, पण हल्ली पुण्याचे हवामान ही बदलले आहे. पूर्वीचे आल्हाददायक पुणे, आता तितके आल्हाददायक राहीले नाही. पुण्यात देखील प्रचंड उकडते, मुम्बई सारखा आता रात्रभर पंखा लावावा लागतो.
हे सारे पाहून खर्या पुणेकराचा जीव कुळकुळतो. मनापासून वाईट वाट्ते . महाराजांच्या पुणे जहागीरीला पुन्हा एकदा सोन्याचा नांगर फिरवला जाण्याची आवश्यकता वाटते आहे.
अरे , कुठे नेऊन ठेवले आहे महाराष्ट्राचे पुणे !
वाचने
23798
वाचनखूण
प्रतिक्रिया
70
आवडेश. पुण्याचं बाळसं जाऊन
च्यक.. पूर्वीचं पुणं राहिलं
विटुकाकाशी सहमत.
सहमत आहे...
ऊस गोड लागला म्हणून मुळासगट
..
In reply to .. by गवि
दुर्दैवाने आपले म्हणणे मुळीच
In reply to .. by गवि
अहों, गोठ्यांत निजणार्यान
छान लेख जमलाय.
In reply to छान लेख जमलाय. by आयुर्हित
कुळकुळतो नाहि हो, कळवळतो
In reply to कुळकुळतो नाहि हो, कळवळतो by मंदार दिलीप जोशी
कुळ्कुळणे वेगळे आणि कळवळणे वेगळे !
In reply to कुळ्कुळणे वेगळे आणि कळवळणे वेगळे ! by विटेकर
अरे बाप्रे. असे आहे होय!
In reply to छान लेख जमलाय. by आयुर्हित
अमराठी..
In reply to अमराठी.. by विटेकर
मराठी- अमराठी
In reply to मराठी- अमराठी by कपिलमुनी
@मराठी माज बघण्यासाठी पौड,
In reply to मराठी- अमराठी by कपिलमुनी
पुणे तिथे काय उणे?
In reply to पुणे तिथे काय उणे? by बापू नारू
ते खरे पुणे नाही.
In reply to अमराठी.. by विटेकर
आयला
अमृतांजन घाटात खाशे गारदी
खरंच, पूर्वीचं पुणं र्हायलं
In reply to खरंच, पूर्वीचं पुणं र्हायलं by डॉ सुहास म्हात्रे
तुमी म्हाराजांच्या टैमाचे का?
In reply to तुमी म्हाराजांच्या टैमाचे का? by गवि
नांही आम्ही त्यांच्या
... दुद दारात म्हस पिळून?असें हे भर रस्त्यावर अश्लींल काम पुण्यनगरीत होणें नाही... शिव, शिव. ते तसलें कोणत्यांतरी पुरांत करतात म्हणें. ;) +DIn reply to नांही आम्ही त्यांच्या by डॉ सुहास म्हात्रे
नांही आम्ही त्यांच्या
In reply to नांही आम्ही त्यांच्या by डॉ सुहास म्हात्रे
काय काडी टाकलिये राव !!!
विद्येचे माहेरघर म्हणून
In reply to विद्येचे माहेरघर म्हणून by बॅटमॅन
..
In reply to .. by गवि
एक सीओईपियन म्हणून त्या
In reply to एक सीओईपियन म्हणून त्या by बॅटमॅन
राग आला ?
In reply to राग आला ? by विटेकर
अहो १८८१ सालीसुद्धा
पुण्याची भाषा
In reply to पुण्याची भाषा by कपिलमुनी
झालच तर आँध,बावधान,येरवाडा...
पूर्वीचं ..... राहील नाय
लिहिलेय चांगले, वाटतेय
लेख आवडला . मुख्य म्हणजे तो
In reply to लेख आवडला . मुख्य म्हणजे तो by पिंपातला उंदीर
पुणेकर चहाच काय, पाणी सुद्धा
In reply to पुणेकर चहाच काय, पाणी सुद्धा by मंदार दिलीप जोशी
दार पूर्ण उघडले होते का? की
In reply to दार पूर्ण उघडले होते का? की by गवि
@दार पूर्ण उघडले होते का? की
In reply to दार पूर्ण उघडले होते का? की by गवि
*lol* *lol*
In reply to दार पूर्ण उघडले होते का? की by गवि
(No subject)
In reply to दार पूर्ण उघडले होते का? की by गवि
(No subject)
In reply to पुणेकर चहाच काय, पाणी सुद्धा by मंदार दिलीप जोशी
"तुम्ही चहा पिउन आला असालच.
In reply to पुणेकर चहाच काय, पाणी सुद्धा by मंदार दिलीप जोशी
तुमचीच चूक आहे त्यात!! भर
In reply to तुमचीच चूक आहे त्यात!! भर by मोहनराव
भर दुपारी म्हणजे बारा
In reply to लेख आवडला . मुख्य म्हणजे तो by पिंपातला उंदीर
आणखी एक
In reply to आणखी एक by मंदार दिलीप जोशी
हे माझा माझ्याबाबत पण झालेले
In reply to हे माझा माझ्याबाबत पण झालेले by टवाळ कार्टा
आणखी एक गंमत
In reply to हे माझा माझ्याबाबत पण झालेले by टवाळ कार्टा
आणि हे मी कंडक्टरला विचारलेले
In reply to आणि हे मी कंडक्टरला विचारलेले by टवाळ कार्टा
अर्रर्रर्र
@जुने कोथरुड आणि सिंहगड रस्ता
दुचाकी वाल्यांनी पुरती वात
In reply to दुचाकी वाल्यांनी पुरती वात by मोहनराव
जाहीर निषेध !!
In reply to जाहीर निषेध !! by चिनार
छ्या
...
पुण्यावर खुल्या दिलाने टीका करणारे पुणेकर पाहिले... धन्य जाहलो
In reply to पुण्यावर खुल्या दिलाने टीका करणारे पुणेकर पाहिले... धन्य जाहलो by माम्लेदारचा पन्खा
नदीपलिकड्च काहीच पुण्यात धरत
एकदम खरं बोललात
In reply to एकदम खरं बोललात by खोंड
मला एक कळत नाही, लोक सारखे IT
In reply to मला एक कळत नाही, लोक सारखे IT by फोटोग्राफर243
पुणे...आयटी...परप्रांतिय..
श्या!!
In reply to श्या!! by मी-सौरभ
च् च् च्... पुर्वीचे पुणेकर
In reply to च् च् च्... पुर्वीचे पुणेकर by थॉर माणूस
पाणी
भारतातील जी शहरे पूर्वीसारखीच
In reply to भारतातील जी शहरे पूर्वीसारखीच by ऋषिकेश
नाही ऋषीकेश , पेठा अजुन
In reply to नाही ऋषीकेश , पेठा अजुन by सुहास..
अजुन ही पुणे म्हणजे पेठा हे
In reply to अजुन ही पुणे म्हणजे पेठा हे by बॅटमॅन
छे छे - सिलिकॉन व्ह्यालीत.
ज्या पेठांसाठी पुणे 'फेमस
पुन्यातल्या लोकानि आपल्या पोरा पोरिना
In reply to पुन्यातल्या लोकानि आपल्या पोरा पोरिना by सिरुसेरि
वेळच्या वेळि शिस्त
In reply to वेळच्या वेळि शिस्त by शिद
उदाहरणासाठी
पुन्यात दिडवर्स काढलय