Skip to main content

मिपादेवीची विनवणी?

लेखक आनन्दा यांनी गुरुवार, 30/10/2014 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक शतकी धागे पाहुनि, नावे मजला ठेवू नका। मीच विनविते हात जोडुनी उगाच मजला छळू नका।। जिलब्यांचा अतिदिव्य वारसा मिसळपाविनो तुम्हा मिळे। उणे कुणाचे दिसता किंचित दवंडी द्याया विसरू नका।| व्हा ज्ञानाचे वाढपी तुम्ही, जिलबीमारा करीत रहा । कलम चालवा सालभर तरी सण शिमग्याचा आणु नका।| जिलब्यांच्या उत्साहावरती कधीच विरजण घालू नका। टीआरपीच्या धाग्यांवरती मागे कोणी राहू नका।| जिलबी पाडा, काकू पाडा, जमले तर मग लेखही पाडा। पण काकूचे काश्मीर करताना बर्फामध्ये पडू नका।| मिपा आपुले करा नामांकित परी, इतरा नावे ठेवू नका। डु आयडी ने लिहिता लिहिता वरिजनलला विसरू नका ।| कंपू पेरा अपुल्या भवती, पिंक पिंकेने रंगतसे। हे ज्याच्या हृदयात ठसे, खरा मिपाकर तोच असे।|
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3324
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

आहा!!!! एकच नंबर. 'पन्नाशीची उमर गाठली' आणि 'बिकट वाट वहिवाट नसावी' या दोहोंची लक्षणे उत्तम उतरली आहेत. एक फर्मास विडंबन.

जबरद्स्त!!! (शेवटची ओळ वाचून डोळ्यात पाणी आले...कधी साधायचे हे!!)

"प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट"......!! मिपाचे राष्ट्रगीत करायला हवे ह्याला.. आम्ही प्रस्ताव मांडलेला हाये....आणुमोद्क हाय का कोनी ?

In reply to by टवाळ कार्टा

हे गीत धोरण या धाग्यात "मार्गदर्शनात्मक" लावावे ही विनंती

In reply to by मुक्त विहारि

पन हे जन गण मन आणि ते वंदे मातरम !