मी अनेक वर्षांपुर्वी एक सुंदर गझल जगजित सिंग च्या आवाजात ऐकली होती. ती प्रचंड आवडली होती. तीच्या मधुर चालीमुळे ती डोक्यात अधुनमधुन घुमत राहयची. नंतर ती कॅसेट (ती काळ्या फ़िल्म वाली) हरवली मात्र गझल डोक्यात रुतुन बसली. तिचे शब्द व त्यांचा एक मनात लागलेला अर्थ देखील तसाच फ़ीट्ट झाला. आपले गैरसमज जसे घट्ट होउन जातात तसाच. मी ती बेहोश गुणगुणत असे व मोठा आनंद मला ती गझल गुणगुणतांना व्हायचा. तिचा अर्थ त्यातले शब्द व सर्वात महत्वाच म्हणजे जगजित चित्रा चा आवाज तर खुपच पागल करायचा, प्रचंड आवडायचा. पुढे वय वाढल ( सध्या मी नव्वदीच्या घरात आहे, तब्येत ठणठणीत आहे, पाचन संस्था कायम चुर्णा शिवाय ही व्यवस्थीत काम करते, छान ५ कीलोमीटर फ़ीरतो, संध्यानंद नियमीत वाचतो, होणार सुन मी ह्या घरची नियमीत बघतो, रोहीणी ताइंचा अभिनय भावतो. नायिका फ़ारच.... असो जास्त लिहायला लागलो तर तोल ढळतो)
तर वयोमानामुळे काय होत की आम्हा वृध्दांचा एकात दुसर मिक्स होउन घोळ फ़ार वाढतो. आमचा नॉस्टेल्जीया भावना विचार या सर्वांचा एकत्रित गुंता होत असतो.( वन हंड्रेड इयर्स ऑफ़ सॉलिट्युड या मार्क्वेझ च्या महान कादंबरीतल्या ओल्ड बुकसेलर चा मुळ गावी परततांना उडतो तसा गोंधळ होतो तो उतारा फ़ार सुंदर आहे राव नॉस्टेल्जीया वरचा जरुर वाचा नसेल वाचला तर) त्यामुळे आम्हाला कधी कधी कळत नाही की काय होत की कुठल्या गाण्याचा काय अर्थ आहे ओळ काय होती त्यापेक्षा मुळ सोडुन दुसरच काहीतरी डोक्यात बसत व त्याने मोठी गंमत उडते एक स्वीट पोएटीक कन्फ़्युजन तयार होते. तर या गाण्याच इतकच माहीत होत की समवन समव्हेअर या जगजित चित्रा सिंग ने त्यांच्या एकुलत्या एक १८ वर्षा च्या कोवळ्या वयाच्या मुलाच्या अपघाती मृत्यु नंतर काढलेला हा सुंदर अलबम होता. ( त्या देखण्या मुलाचा त्या दोघांबरोबर चा फ़ोटो त्यावर होता तो अजुनही कसा काय कोण जाणे स्पष्ट आठवतो) तर गझल व त्याच्या मला आठवत असलेल्या ओळी अशा होत्या. आणि त्याचा अर्थ मला मोडका तोडका उमजलेला मी असा लावत होतो.
कोइ समझेगा क्या राज-ए-गुलशन
जब तलक ना उलझे काटो से दामन
गुलशन – बगिचा
अर्थ सहज लागतो. बगिचा उद्यान हे जीवनाच प्रतिक आहे. जीवनाचा खरा अर्थ तेव्हाच कळेल जेव्हा जीवनातील कठोर वास्तवाला सामोर जाल, जीवनातल्या काट्यांशी दु:ख वेदना मृत्यु नुकसान अपयश विरोध आदिंशी सामना होइल तेव्हाच जीवनाचा अर्थ गवसेल असे कवि म्हणतो. तोपर्यंत खर जीवन काय आहे कळणारच नाही. कळण शक्य नाही. एक आग का दरीया है गुजर के जाना है सारखा भाव.
यक बयक सामने आ न जाना
रुक ना जाए कही दिल की धडकन
यक बयक एकाएकी अचानक च जर जीवन तुमच्या समोर त्याच्या पुर्ण अक्राळविक्राळ स्वरुपात आलं, तर तुम्ही त्याला पेलु शकणार नाहे. यु कुड नॉट हॅन्डल इट. महाभारतात कृष्ण जसा अर्जुना ला विश्वरुप दर्शन घडवतो ते अर्जुनाला जस पेलवत नाही त्याने तो मुर्छीत होतो तस काहीस. म्हणजे स्टेप बाय स्टेप जीवनाचा एक एक पैलु तुमच्या समोर येत गेला तर तेच चांगल आहे. एक एक करुन तुम्ही ते आकलन करु शकता , चिंतन करु शकता पचवु शकता. हळुवारपणे राइप होण्यात मजा आहे. पण अचानक येउन आदळली जीवनातील वेदना दु,:ख आदि तर रुक ना जाए कही दिल की धडकन
गुल तो गुल खार तक चुन लिए है
फ़िर भी खाली है गुलची का दामन
ही ओळ ही तशी सरळ आहे जीवनात जाणवणारी सार्वकालीक व्यर्थता रीक्तता. सर्व फ़ुल जीवनरुपी उद्यानातली तोडली सर्व भोग भोगले तरीही अजुन एक पोकळी आहेच ती जाणवतेय थोडा है थोडे की जरुरत अभी है . कींवा हजारो ख्वाहीशे ऐसी की हर ख्वाइश पे दम निकले बहोत निकले मेरे अरमॉ फ़िर भी कम निकले. सनातन अतृप्ती त्या गुलची ला जाणवतेयं जी आपल्या सर्वांचाच अनुभव असतो.
आता इथे पुढील दोन शेर मध्ये माझ्या मेमरी ने सरमिसळ केली मी अशा ओळी डोक्यात बाळगुन होतो व गंमत म्हणजे एक अर्थ ही लावुन घेतला होता. तो शेर चुकीचा असा
कितनी आराइश-ए-आशियाना
बर्कं को दोस्त समझु के दुश्मन ?
गझल मध्ये एक एक शेर स्वयंपुर्ण असतो तो स्वतंत्र अर्थ असतो व त्यांचा गुछ म्हणजे गझल असते. या न्यायाने एक स्वतंत्र अर्थाचा हा शेर म्हणुन मला तो उर्दु तल्या नेहमीच्या प्रतिंका च्या आधारे असा वाटला किंबुहना मी असा चुकीचा अर्थ लावत होतो. तर मी असा अर्थ लावत होतो की हा एका पक्ष्याच्या पॉइंट ऑफ़ व्ह्यु लिहीलेला शेर आहे. जणु एक छोटा नाजुक पक्षी आपल्या घरट्या कदे आशियाना कडे बघुन म्हणतोय की
कितनी आराइश-ए-आशियाना
काय सुंदर रोशणाइ आहे माझ्या घरट्याची काय सुंदर दिसत आहे माझ घरटं या उजेडात या विजेच्या लखलखाटात. म्हणजे रात का वक्त है बिजली कडक के चमकी है और उसकी रोशनी मे क्या जगमगॉ के उठा है मेरा घरौंदा. मेरा आशियाना. तर तो पक्षी हरखुन गेलाय स्वत:च्या घरटुल्याच ते सुंदर रुप बघुन ती लकाकी बघुन. आणि हे सर्व कशामुळे घडुन आलय तर बर्कं मुळे बिजली मुळे बर्क हीच कारणीभुत आहे त्याच्या घरट्याच सौंदर्य वाढवण्यात. त्याची दिवाळी च साजरी केलीय जणु विजेने.
आणि पुढच्या ओळीत तो पक्षी दिल चिर के जाने वाला सवाल पुछता है की बर्कं को दोस्त समझु के दुश्मन ? की आता विज कडाडलेली आहे आणि ती माझ्या घरट्या वर पडणार आणि माझ घरटुल ही विज कायमच उध्वस्त करणार. मग तो विचारतो की माझ घर उजळवुन टाकणार्या मला अफ़ाट सौंदर्याचा प्रत्यय देणारया या विजेला यासाठी माझा मित्र समजु की पुढच्याच क्षणी माझ घरट कायमच उध्वस्त करेल म्हणुन माझा शत्रु समजु. ?
कविने एक अतिशय नाजुक क्षण चिमटीत पकडलाय असे मी समजत होतो. हा वरील दोन क्रमांकाची चुकीची ओळ लावल्याने बदललेला अर्थ होता. मुळ ओळ काळाच्या ओघात विसरल्याने खाली वर ओळ लागल्याने भलताच अर्थ मी लावुन बसलेलो होतो. वरील चुकीचा सेकंड इफ़ेक्ट शेवटाच्या लाइनलाही लागलाच
शेवटची ओळ मी अशी चुकीची डोक्यात घालुन बसलो होतो. ती अशी की
अजमत ए आशियाना बढा दी
टुट जाए ना शाख ए नशेमन
साहजिकच या ओळीचा अर्थ लागत नव्हता अडखळत होतो. कारण ती ऒळ मुळात अशी नाहीच तर अर्थ कुठुन लागणार ? वरती चुकुन अपघाताने अर्थ लागला होता इथे जमतच नव्हत. मी ही सोडुन दिल कारण अजमत शब्दाच आकलन नव्हत पुढे एक सुंदर मराठी उर्दु डीकशनरी मिळाली श्रीपाद जोशी यांची( अत्यंत उत्कृष्ट अप्रतिम उर्दु मराठी डिक्शनरी) त्यात वरील कीडा वळवळत च होता म्हणुन अगोदर अजमत शब्दाचा अर्थ बघितला तर तो श्रेष्ठत्व महत्व प्रताप आदर असा निघाला अर्थ जोडुन बघितला तर काहीच अर्थबोध होत नव्हता एका विक्षीप्त दर्दी जाणकार मित्राकडे गेलो त्याला सांगितल तो नेहमीच्या शैलीत म्हणाला अरे ..... तु ते सोड वो तेरे बस की बात नही उसके लिए डीफ़्रंट सेन्सीबिलीटी मंगता है. मी त्याला सोडुन तो विषय ही सोडुन दिला.
नंतर एक दिवस रेल्वे स्टेशनवर एक जगजित चित्रा च्या गजल च्या लिरीक्स च पुस्तक मिळाल ते वाचतांना ही गझल सापडली उत्सुकतेने ते वाचु लागलो तर धक्काच बसला मुळ ऒळी ची मी केलेली भयंकर सरमिसळ लक्षात आली. थोडा वेळ घाबरलो च्यायला आपल आता कस व्हायच मेमरी तर फ़ारच धोका द्यायला लागली राव. ओरीजीनल ओळी अशा क्रमात होत्या
कितनी आराइश ए आशियाना
टुट जाए ना शाख-ए-नशेमन
ही मुळ बरोबर ची ओळ होती
दुसरा शेर असा होता
अजमत- ए-आशिया ना बढा दी.
बर्क को दोस्त समझु के दुश्मन ?
तर असे पोएटीक कन्फ़्युजन झाले मग मी म्हटल जाउ द्या बघु आता बरोबरीचा काय अर्थ आहे तो आणि या वेळेस ठरवल की जाणकारांनाच विचारु
तुम्ही प्लिज मला सांगाल का योग्य अर्थ काय आहे तो ?
कारण नव्याने अर्थ लावण्याच वय आता माझ राहील नाही. व मेमरी वर तर अजिबात भरवसा करता येत नाही. विक्षिप्त मित्र मला लायकच समजत नाही तो
जाए तो जाए कहॉ ?
वाचने
19850
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह... मारवाश्री... वाह...
'विसरलोय' म्हणत म्हणत सुंदर रसग्रहणच केलंत की, वा!
हा फोटो एका ब्लॉगवर पाहीला
In reply to 'विसरलोय' म्हणत म्हणत सुंदर रसग्रहणच केलंत की, वा! by बहुगुणी
यादो की बौछारों से जब पलकें भीगने लगती है.....................
मारवाश्री,
धन्यवाद संजय जी
In reply to मारवाश्री, by संजय क्षीरसागर
ती फ़ना निज़ामीची गज़ल आहे
In reply to धन्यवाद संजय जी by मारवा
संजय जी !
In reply to ती फ़ना निज़ामीची गज़ल आहे by संजय क्षीरसागर
प्रत्येक रसिक वाचक कवितेची एक प्रकारे पुनर्निमीतीच करत असतो!
In reply to संजय जी ! by मारवा
इथे पोहोचायला युगे लागतील
संजय जी
एकच शब्द एकच भाषा इतकी भिन्न भावानुभुती कशी देउ शकते ?
In reply to संजय जी by मारवा
गालिबचा अॅज अ प्रियकर असा या गझल मधील भाव अहंमन्य वाटला
In reply to एकच शब्द एकच भाषा इतकी भिन्न भावानुभुती कशी देउ शकते ? by संजय क्षीरसागर
बाकी प्रतिसाद नंतर देतो पण
In reply to गालिबचा अॅज अ प्रियकर असा या गझल मधील भाव अहंमन्य वाटला by मारवा
संक्षी..
In reply to एकच शब्द एकच भाषा इतकी भिन्न भावानुभुती कशी देउ शकते ? by संजय क्षीरसागर
गवि,
In reply to संक्षी.. by गवि
आणि मेरे आगे यातून तुझ्या या
In reply to संक्षी.. by गवि
आगे चा अर्थ गालिब कसा लावत असावा
In reply to आणि मेरे आगे यातून तुझ्या या by मारवा
तुम्ही दिलेला हा शेर वेरिफाय केलेला नाही, पण पाहा :
In reply to आगे चा अर्थ गालिब कसा लावत असावा by मारवा
+/-
In reply to संक्षी.. by गवि
वाह.... आवडता विषय!
बाजीचा ए अत्फ़ाल है दुनिया मेरे आगे!
मी पण मी पण...
>>पिवळं कसं करायचं हे माहिती
In reply to मी पण मी पण... by सतिश गावडे
पिवळं कसं करायचं हे माहिती
जेपीभाऊ, तुम्हीही स्वत:च
In reply to पिवळं कसं करायचं हे माहिती by जेपी
माझ्या मते या ओळींचा सरळ अर्थ
मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पिछे"तू सोडून गेल्यावर माझे काय झाले ते विचारू नकोस (तू सोडून गेल्यावर माझे काय झाले ते काय विचारतेस ?)." अहंमन्य असलेला गालिब स्वतःच्या दुखावलेल्या मनःस्थितीची चर्चा करणार नाही, उलट तो प्रश्न झटकून टाकणार हे सहाजिकच आहे.तू देख के क्या रंग, तेरा मेरे आगे |"त्याऐवजी तू आता माझ्या समोर आल्यावर (माझ्याविना असल्याने) तुझाच नखरा माझ्यासमोर किती फिका पडलाय ते पहा जरा !" त्याला दुखावून सोडून गेलेली प्रेयसी समोर आल्यावर तिची विनवणी वगैरे करण्यापेक्षा "मी मस्त मजेत आहे, उलट तुझीच अवस्था कशी दयनीय झालीय बघ." अशी शेखी मारणे ही पण अहमन्य स्वभावाची एक सहज प्रतिक्रिया आहे. "मियाँ गिरा फिर भी टांग उपर है" याचे हे उदाहरण केवळ गालिबच दाखवतो असे नाही, हे जरा आजूबाजूला नजर टाकली तरी सहज दिसून येईल :) ;)मुळात "बता" तेरा रंग असा शेर
In reply to माझ्या मते या ओळींचा सरळ अर्थ by डॉ सुहास म्हात्रे
विचारसरणीत किती फरक आहे !
In reply to मुळात "बता" तेरा रंग असा शेर by गवि
गवि मियॉ क्या यार शहद की उंगली चटा के खिसक गये !
In reply to मुळात "बता" तेरा रंग असा शेर by गवि
एडीटर मोहतरमा जरा गौर फरमाइए
In reply to गवि मियॉ क्या यार शहद की उंगली चटा के खिसक गये ! by मारवा
गझलेचा नाद फार वाईट. सुटता
In reply to गवि मियॉ क्या यार शहद की उंगली चटा के खिसक गये ! by मारवा
गवि मजा आ गया यार !
In reply to गझलेचा नाद फार वाईट. सुटता by गवि
एक जगजित एक बेगम अख्तर एक मेहंदी हसन- आए कुछ अब्र
... वाचतेय.
@पैसा
माफ करा पण प्रतापराव गुर्जर कोण आहेत कोणी सांगेल का ?
इतिहासातलं सोनेरी पान
In reply to माफ करा पण प्रतापराव गुर्जर कोण आहेत कोणी सांगेल का ? by मारवा
कुसुमाग्रजांची कविता माहीत होती पण या घटनेची माहीती नव्हती.
In reply to इतिहासातलं सोनेरी पान by पैसा
वाखू साठवतो.
न राहवून आणखी काही.. जड