मनोगती कौंतेयराव,
तुम्हाला कसा वाटला मनोगतचा दिवाळी अंक ते जरुर कळवा!
हो, अवश्य कळवू. संपादक मंडळाला अन् शक्तिवेलूला म्हणावं, 'काळजी करू नकोस..'! :)
पुढच्या दिवाळी पासुन मिसळपावने देखिल खास त्यांच्याच शैलीत चटपटीत चमचमीत अंक काढून आम्हा वाचकांना मेजवानी द्यावी.
तसा प्रयत्न मिपा करेल. मात्र मिपाने जर दिवाळी अंक काढलाच तर तो निमंत्रित लेखकांकडून लेखन मागवूनच काढला जाईल. या अंकात कुंणालाही आपले लेखन पाठवण्याची मुभा नसेल. याचे मुख्य कारण एकच, ते म्हणजे दिवाळी अंकाकरता एखाद्याने उत्साहाने, आपुलकीने पाठवलेले लेखन नाकारले गेलेले मिपाला आवडणार नाही! त्यापरीस, दिवाळी अंकात कुणाचे लेखन आवश्यक आहे ते मिपाच ठरवील आणि त्या त्या मंडळींना मिपा-दिवाळी अंकात लेखन करण्याकरता रीतसर निमंत्रित करेल...
त्याचप्रमाणे अन्य संस्थळावर जाऊन 'दिवाळी अंकाकरता लेखन मागणारे..' मिपाचे कुणीही अधिकृत/अनधिकृत एजंट नसतील! ;)
आम्ही स्वत:च काही लोकांना मिपावर लेखन करण्याकरता येथे मिपावरच निमंत्रण देऊ! :)
असो,
तात्या.
तात्या,भारी प्रतिसाद दिलात.आवडला.
''मात्र मिपाने जर दिवाळी अंक काढलाच तर तो निमंत्रित लेखकांकडून लेखन मागवूनच काढला जाईल. या अंकात कुंणालाही आपले लेखन पाठवण्याची मुभा नसेल. याचे मुख्य कारण एकच, ते म्हणजे दिवाळी अंकाकरता एखाद्याने उत्साहाने, आपुलकीने पाठवलेले लेखन नाकारले गेलेले मिपाला आवडणार नाही! त्यापरीस, दिवाळी अंकात कुणाचे लेखन आवश्यक आहे ते मिपाच ठरवील आणि त्या त्या मंडळींना मिपा-दिवाळी अंकात लेखन करण्याकरता रीतसर निमंत्रित करेल...
त्याचप्रमाणे अन्य संस्थळावर जाऊन 'दिवाळी अंकाकरता लेखन मागणारे..' मिपाचे कुणीही अधिकृत/अनधिकृत एजंट नसतील! ''
एकदम मान्य !तात्या,आपण यापेक्षाही चांगला दिवाळी अंक काढून दाखवू.आपले विचार फार पटले,आवडले.
तात्या भावना पोहचल्या. प्रतिसादा बद्दल आभारी आहे. बाकिचांच्या प्रतिक्रियेचा रोख मात्र समजला नाही. इतका राग कशावर आहे? कृपया दिवाळी अंकाविषयीच टीप्पणी केली तर विषयाला धरुन होईल.
दुव्याबद्दल धन्यवाद!
कृपया दिवाळी अंकाविषयीच टीप्पणी केली तर विषयाला धरुन होईल.
हे समजले नाही. दिवाळी अंकातील ज्या कुठल्या लेखाला भर्या-बुर्या प्रतिक्रिया द्यायच्या त्या तिथे जाउनच देऊ की! इथे कशाला?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
ओ कौंतेयसाहेब,
आधी मिपासंबंधी, येथील एखाद्या लेखासंबंधी मनोगतावर अशी एखादी चर्चा घडवून आणून दाखवा पाहू! आहे का हिंमत तुमच्या मनोगताची मिपाविषयी काही छापण्याची?
आधी ते करा आणि मग विचारा कुणाचा कशावर राग आहे तो. आज मनोगताच्या दिवाळी अंकाविषयी येथे चर्चा होते आहे तशी उद्या समजा मिपाचा दिवाळी अंक निघला तर त्याची मनोगतावर चर्चा होऊ शकणारे का?
वैविध्यपुर्ण लेख/ कविता ह्यांची रेलचेल असणारा भरगच्च अंक वाचायला मिळतो आहे. अंकाची सजावट आणि तांत्रिक सफाई देखिल वखाणण्याजोगी आहे. येत्या काही दिवसांसाठीतर ही परवणीच असणारच आहे.
अरे अरे अरे! मनोगताला आपल्या दिवाळीअंकाची मिपावर जाहीरात करण्याची वेळ यावी? ए तात्या, मनोगताकडून या जाहिरातीचे पैसे घे रे! -: )
सर्वांचाच लाडका,
शेणगोळा.
प्रतिक्रिया
मनोगती
हाण त्याx xx!
जी.के.ड्ब्ल्यु
एक राहिले..
मस्त प्रतिसाद ----
+१
तात्या
धन्यवाद ... समजले नाही
ओ कौंतेयसाहेब,
>>ए तात्या,
दिवाळी अंक
सहमत