महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकाल -2014
उद्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील.त्याच्या निकालाची चर्चा करण्यासाठी आणी निकालाचे अपडेट देण्यासाठी हा धागा.
माझा अंदाज.
भाजप-141
शिवसेना-60
काँग्रेस-33
राकाँ-30
मनसे -12
ईतर-12
वाचने
20753
वाचनखूण
प्रतिक्रिया
65
मी पयला.
निकाल काहीही येवो, एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर "महाराष्ट्राच्या हितासाठी" कुणीही कुणाबरोबरही पाट लावेल.
भक्तांच्या सर्वे नुसार २८९ भाजपा...!
In reply to नाही हो.... by बाबा पाटील
दोनशे एकोण नव्वदावी जागा शेजारच्या राज्यातून घेतली काय? :)
जोक्स अपार्ट, तुम्ही फारच ताणलंय. लोक इतकेही भ्रमात नसतात.
इंजिन एकटे त्याला डबे नाहीत
धनुष्य बाणाला एकलव्य नाही
पंजाला मनगटाचा आधार नाही
घड्याळ बांधायलाही मनगट नाही
सायकल चालवायला चांगले रस्ते नाहीत.
हत्ती पोसायला पैसा नाही
पण.............
कमळ फुलायला चिखल मात्र भरपूर आहे.
In reply to एक ढकलपत्र by खेडूत
+१
In reply to एक ढकलपत्र by खेडूत
छान जमलय
धन्या शेठ बरोबर सहमत. भाजपाला 289 मिळाल्या तर माझी (गोदरेजच्या) कपाटातील बंदुक सरकारजमा करीन.
In reply to धन्या शेठ बरोबर सहमत. भाजपाला by जेपी
रच्याकने, तुम्ही हे अंदाज कसे बांधलेत? कुठला विदा वापरला?
चिखलात लोळणे हा कमळाबाईचा आपद् धर्म आहे :lol:
In reply to चिखलात लोळणे हा कमळाबाईचा by नानासाहेब नेफळे
म्हणजे असंख्य डूआयडी वापरून परस्परविरोधी प्रतिक्रिया लिहिणे हा जसा तुमचा आपद् धर्म आहे तसंच का?
In reply to म्हणजे असंख्य डूआयडी वापरून by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी तुम्ही ट्रोलभैरवांना ईतका भाव का देता?
In reply to श्रीगुरुजी तुम्ही by सतिश गावडे
कारण आमच्या प्रतिसादात ज्ञानमुल्य असते.
णाणा, कमळ चिखलातच फुलते ध्यानात ठेवा.
धागा निकालासाठी आहे टाईमपास नाही हे ध्यानात ठेवा.
दोन पक्षांनी अगोदरच गाडी साइडिंगला घेतली आहे कारण ही शेवटची संधी आहे. यानंतर बुडते जहाज सोडून उंदिर पळणार आहेत.
रा०रा० येणार.
35/288
भाजपा-20
शिवसेना-10
काँग्रेस-5
राकाँ-1
मनसे-
0
इतर-0
सौजन्य-ABP MAZA आणी NDTV INDIA
राणे,सतेज पाटिल,रावसाहेब शेखावत मागे.
125/288
भाजपा-54
शिवसेना-
27
काँग्रेस-
25
राकाँ-
18
मनसे-
0
इतर-0
216/28
भाजपा-96
शिसे-46
काँ-44
राकाँ-31
मनसे-3
इतर-3
२५९- भाजप११२ ,सेना५८ ,काँग्रेस ४१, एनसीपी४० ,मनसे३,
abp majha 8.55 am.
288/288
भाजप-121
शिसे-58
काँ-46
राकाँ-42
मनसे-4
इतर-17
स्वबळावर एकमेकाचे कोथळे बाहेर काढल्यावर नंतर एकत्र येणे कठीणच आहे आणि यापुढे असंच होणार त्यापेक्षा रा०राजवट आलेली बरी.
शिवसेनेला आपण बुडाल्यापेक्षा आपल्याशिवाय भाजपाला सत्तेचं दार उघडणार नाही याचाच आनंद जास्त असेल सध्या.
-दिलीप बिरुटे
राष्ट्रवादी गरज पडल्यास आणी भाजपने मागितल्यास पाठिंबा देईल.- नवाब मलिक ,प्रवक्ता ,राकाँ.
मुख्यमंत्री सेनेचाच असेल- संजय राऊत
सेनेची कॅसेट आजुनही अडकलेलीच
गोट्याचा इंटरव्हु बघितला, तोंड पडलेले दिसले.
भाजपा राष्ट्रवादी एकत्र आले तर इथुन पुढं भाजपा वर कधीच विश्वास ठेवणार नाही.
In reply to भाजपा राष्ट्रवादी एकत्र आले by कॅप्टन जॅक स्पॅरो
तिकिटांसाठी राष्ट्रवादीतले बरेच जण भाजपात गेल्याच तुम्हाला ठाऊक नाही का?
In reply to तिकिटांसाठी राष्ट्रवादीतले by किसन शिंदे
माहित आहे. आणि त्यामागे काकासाहेबांचा हात आहे हे ही माहीत आहे. शिवसेना भाजप परत यावे हेचं म्हणण आहे. ऑफिशिअली राष्ट्रवादीशी आघाडी केली भाजपानी तर तो जनतेचा सर्वात मोठा विश्वासघात असेल.
In reply to भाजपा राष्ट्रवादी एकत्र आले by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१११११
प्रणिती शिंदे,नारायण राणे,सुरेश बागवे,सतेज पाटिल,सुरेश जैन ,सुभाष देसाई पिछाडीवर
नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र पडायला हवेत . महाराष्ट्राच्या राजकारणाचा सर्वात किळस वाणा चेहरा आहे तो
भाजप लैच खाली आला.
भाजप-107
शिसे-61
काँ-51
राकाँ-45
मनसे-4
ईतर-19
विधानसभेत भलताच गोंधळ उडालाय.
भाजप लैच खाली आला.
भाजप-107
शिसे-61
काँ-51
राकाँ-45
मनसे-4
ईतर-19
विधानसभेत भलताच गोंधळ उडालाय.
पर्वती पुणे मधुन भाजपाच्या माधुरी मिसाळ विजयी
कोथरुड पुणे मधुन भाजपाच्या मेधा कुलकर्णी विजयी
पैजारबुवा,
निफाड मधुन शिवसेनेचे अनिल कदम विजयी
पैजारबुवा,
कुडाळमध्ये नारायण राणे पराभुत ,सेनेच्या वैभव नाईक विजयी.
In reply to कुडाळमध्ये नारायण राणे पराभुत by जेपी
:)
म्हणे मुख्यमंत्री आमचाच...
भाजपा ला कोणत्यातरी पक्षाची कुबडी घ्यावी लागेल. शिवसेना जर भाजपाबरोबर आली तर भाजपासाठी अनावश्यक लोढणे ठरेल, राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तर शिवसेना आणि कॉग्रेस दोघांनाही ५ वर्षात गुंडाळता येईल.
भाजपाची खरी कसोटी आता सुरु होईल.
In reply to अपरिहार्यता. by कलंत्री
राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतलाम्हणजे पुन्हा ये रे माझ्या मागल्या...
चांगली बातमी नारायण राणे पराभूत ! त्यांचा मुलगा कदाचित जिंकू शकतो. सेनेचे सुरेश जैन आणि भाजपचे पाचपुते पण पडायला हवेत मात्र पाचपुते जिंकत आहेत.
भाजपशी कटुता नाही-अनिल देसाई शिवसेना,
युती तोडणारा मुख्यमंत्री नको,
पंकजा मुंडे चालतील.
बालीशपणाचा कहर.
कसबा पुणे भाजपचे गिरीश बापट विजयी
"post divorce, live-in couple"* जर शिवसेना आणि बिजेपी एकत्र आली तर! मला वाटतं पंकजा मुंडे पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. शिवसेने कडून होकार मिळेल असा भाजपाचा एकमेव चेहरा. अर्थात, शिवसेना स्वतःचा मुख्यमंत्री असावा यावर अडून राहिली नाही तर.
(*कुमार केतकरांनी इकॉनॉमिक्स टाइम्स मध्ये लिहिलेल्या एक लेखात केलेला नव्या संभाव्य युतीचा उल्लेख)
"आमच्यात कुठल्याही प्रकारची कटूता नाही"
शिवसेनेच्या साडेतीन शहाण्यांची डोकी ठिकाणावर यावी.
भाजपला शिसे पेक्षा दुप्पट जागा मिळत आहेत.
ते मिळतंय what they deserve..
च्यायला इथे मनसेला २ जागांवर आघाडी, आणि ओवेसीच्या पार्टीला ४!!!!!!!!!!!!!!!
द्येवा... वाचिव रे बाबा माज्या म्हाराष्ट्राला...
दिल्ली विधानसभेत बहुमत नव्हते तेव्हा भाजप गप्प बसले होते तसेच आता केले तर ठीक. कोणतीही युती करायला अजिबात पुढाकार घेऊ नये, तरच भाजपावर थोडा तरी विश्वास राहील.
भाजपा स्वबळावर सरकार बनवु शकत नाही.आता कोणाची मदत घेतील हे पाहणे रोचक ठरेल.हरियाणात स्पष्ट बहुमत मिळाले आहे.आणखीन एक राज्य काँग्रेसमुक्त झाल.आता टाटा.
काळ्या जगातील दुसरा थोर माणुस पाहतो.
शिवसेना जास्त ताणणार नाही किंवा ताणू नये अशी अपेक्षा. मी सेनेला भाजप पेक्षा झुकत माप या निवडणुकीत दिल तरीही सेनेने आता निकाल मान्य करावा. त्यांना काय वाटत, कुणी खंजीर खुपसला वगैरे काही असल तरी जनेतेने कौल दिलाय तो मान्य करावा. देवेंद्र / खडसे नकोत तर पंकज हा काही पर्याय होवू शकत नाही. खडसे तर असेही नकोच व्हायला. पण सुधीर मुंगुटीवार हा डार्क हॉर्स असू शकतो आणि काहीच नाही जमल तर गडकरी. गडकरींचे सर्व पक्षात बर्यापैकी चांगले संबंध आहेत.
काहीच नाही जमल तर गडकरी. गडकरींचे सर्व पक्षात बर्यापैकी चांगले संबंध आहेत.परफेक्ट - मला तीच लक्षणे दिसत आहेत...
...सेनेने प्रथम बालिश वाचाळवीर संजय राऊत ला हाकलावे .या मूर्ख प्राण्यामुळे सेनेचे प्रचंड नुकसान होत आहे ...
आतल्या गोटातील खबरीनुसार बाळराजे आदित्य चा बालहट्ट आणि संजय राऊत नामक अतिशहाण्यामुळेच युती तुटली होती. आता सरकारात सहभागी व्हायचे असेल तर या महाभागांना आवरावे उधोजी राजांनी !
शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याची खेळी.
केंद्रात आणी राज्यात एकाच पक्षाचे सरकार असावे यासाठी राकाँचा भाजपला बाहेरुन पाठिंबा-प्रफुल्ल पटेल.
In reply to शिवसेनेला सत्तेबाहेर by जेपी
राकाँ आणि भाजपची पूर्वीपासून या विषयावर मिलीभगत असावी इतकं संशयास्पद विधानं नेत्याची वाटत आहेत.
आपले मेटे आणि गावित यांच्यासारखे अनेक समर्थक पुढे भाजप मध्ये पाठवले हा सत्ता नाट्याचा पहिला अंक . यांच्यातल्या अनेकांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप . मोदी आणि शहा कंपनी ने या सगळ्याना पावन करून घेतलं आणि त्यांच्यासाठी अनेक सभा पण घेतल्या . अंक दुसरा . आणि राष्ट्रवादी ने भाजप ला पाठींबा देऊन तिसरया अंका वरचा पडदा उठवला . राष्ट्रवादी आणि भाजप हिअभद्र युती होणार अशी आशंका अनेक लोकांनी व्यक्त केली होती . कॉंग्रेस आणि शिवसेना पण फार वेगळे नसले तरी राष्ट्रवादी आणि भाजप हि युती झाली तर ती मतदारांच्या गालावर दिलेली सणसणीत थप्पड असेल . या दोघांचाही स्वतंत्र विदर्भाला पाठींबा असल्याने महाराष्ट्राचा अजून एक तुकडा पडणार हे निश्चित . सिंचन घोटाळा मधल्या अजित पवार यांच्यासारख्या 'बिभीषण ' पण रावणाचा (शिवसेना ??) पराभव करण्यासाठी पावन करून घेतल्या जातील का ? का आमच्या मनात असणार्या बिभीषण आणि रावण कोण याच कल्पना बौद्धिक देऊन बदल्या जातील ?
देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री होण्यास सर्वार्थाने लायक आहेत आणि ते मुख्यमंत्री व्हावेत अशी खूप इच्छा आहे पण राष्ट्रवादीचा पाठींबा घेऊन खचितच नको .
बाकी राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपाने सरकार स्थापन केल्यास श्रीगुरुजी आणि नाना नेफ़ळे त्या सरकारच्या समर्थनार्थ खांद्या ला खांदा लावून मिपा वर लढतील या नुसत्या कल्पनेनेच ड्वाले पाणावले . ह. घ्या
भिकेचे डोहाळे.
बाहेरून बिनशर्त पाठींबा वगैरे काही नसतं. त्यात आतून काय काय सेटिंगच असतात ते लोकांना ठावूक असते (जुनी प्रकरण, केसेस बाहेर काढू नये, हव्या त्या फाईली पुढे सरकाव्यात वगैरे वगैरे). तेव्हा भाजप राष्ट्रवादीची आतून अशी सेटिंग झाली असेलच तर दोघांचे पितळ उघडे पडेल. शिवसेनेने सरळ विरोधी बाकावर बसून मजा पहावी. विरोधी पक्षनेतेपद (कॅबिनेट दर्जा) शिवसेनेकडेच राहील.
मात्र पवारांची हि एक खेळी आहे. सेना भाजप एक होतीलच. शिवसेनेने आता मुख्यमंत्रीपदच द्या असला बालिश हट्ट करू नये. जी काही महत्वाची खाती/ महामंडले येतील ती घेवून सरकारमध्ये यावे. एकंदर सेनेला सरकारमध्ये सहभागी होणे किंवा विरोधी पक्षनेतेपद हे दोन्ही पर्याय आहेत.भाजपकडचे धुरीण आणि संघ एनसीपीचा पाठींबा घ्यायला विरोधच करतील.
रा.कॉ.च्या पाठिंब्यावर सरकार बनवले भाजपाने तर मात्र अनेक मिपाकरांची पंचाईत होणार आहे.असो ह्यांना गाणे आठवले ते झूठा कहीं का मधले- शरद पवार व नितिन गडकरी एक्त्र गात आहेत -राष्ट्रवादीच्या घड्याळात पाहून
बारा बजे की सुईयों जैसे हम दोनो मिल जाये |
देख के हमको सेना-कॉन्ग्रेसवाले जलते है जल जाये|
नव्न पिढीसाठी ते गाणे ऐकता येइल -
http://www.dailymotion.com/video/xomuoh_baarah-baje-kee-suiyon-jaise-ham-donon-jhootha-kahin-ka-1979-asha-kishore_music
र.काँ. पैसे घेउन गावभर कोणाबरोबरही झोपणार्या रं* पेक्क्षा खालच्या पातळीची आहे
उध्दवनी निवडणूक लढवायला हवी होती.
पन्नास जागा वाढल्या असत्या. लोकशाहीत घाबरटपणा केला की लोकांचा विश्वास उडतो.
त्यांना वाटले ९० ते १०० जागा आल्या की कोणाला तरी माघार घ्यायला लावून तिकडून ते पुन्हा लढणार. असं थोडीच चालतं? लढाईत वार तर होणारच.
BJP-123
SHIVSENA-63
CONGRESS-42
NCP-41
MNS-1
OTHER-18
मनसे चा रोल संपला.
भाजप शिवसेना एकत्र यावी किंवा तटस्थ राहावी.उधोदी आजुनही स्वत:चा इगो सांभाळत आहेत.
भाजप नी कुठल्याही खांग्रेसशी युती केली तर पुढच्या निवडणुकीमधे मी त्यांना हेट लिस्ट मधे टाकीन. शिवसेना आणि भाजपनी सगळे वाद विसरुन एकत्र यावं. आख्खी निवडणुक ज्यांना शिव्या दिल्या त्या मोदींच्या पक्षाबरोबर काका आघाडी कशी करणार म्हणे? त्यांच्याएवढा हुशार आणि मुत्सद्दी राजकारणी परत होणे नाही. ह्या निमित्तानी सत्ता तिथे पवार किंवा पॉवर तिथे पवार हा मुद्दा परत अधोरेखीत झालाय हेचं म्हणतो.
च्यायला १४४ -१४४ वर लढले असते तर शिवसेनेला निश्चित १०० जागा तरी मिळाल्या असत्या, किंबहुना मुख्यमंत्री पद ही मिळाले असते.
आता पुढचे इलेक्शन कांग्रेस आणि एन सी पी मिळून लढतील (१४४ + १४४) जागांवर लढतील पण शिवसेनेला ११७ जागांवर समाधान मानावे लागेल अन्यथा पुढे ६३ जागा ही मिळणार नाही.
आता द्वेषाच्या राजकारणाला जागा नाही, पहिले दक्षिण भारतीयांविरुद्ध, मग उत्तर भारतीयांविरुद्ध आणि या वेळी गुजराती विरुद्ध. हे सोडावे लागेल, अन्यथा मुंबई ही हातातून जाईल.
यह अजीबसी बात आज कैसे हो गई है
वह दुश्मनी भुला, गजब यह बात हो गई है
अब क्यू शोर हर गल्ली नुक्कड पे हो रहा है
किसकी वतन बेवफाई, गला फाड गई है
हम तो वही अपनी राजनिती कर रहे है
आवाम बस, आईना देख घबरा गई है - Raj Nivedita Jain-Patil
विवेकपटाईत +१
द्वेषाचे राजकारण केले की पक्षाचा मतदार आवाकाच कमी होत जातो. पुन्हा त्यातले काही टक्केच लोक मत त्यांच्याबाजूने देणार.
सार्क अथवा दिल्ली{रा० पातळीवर} सोडा बऱ्याच नेत्यांचे विचार त्यांच्या चौथ्या गल्लीत कोणी ऐकत नाही.
आता व्यापक विचार मांडणाऱ्या पक्षांची गरज आहे.
मी का घाग्यात जे चित्र रंगविले होते बरोबर तसेच चित्र निकालात दिसते आहे. भाजपावर संघाचे जसे काही संस्कार असतात तसे संस्कार असणारी कोणतीही समांतर संघटना इतर कोणत्याही पक्षाला नाही. संघात अगदी रोज ध्वज लावणारा व उतरवणाराही माणूस वेगळा असू शकतो.सबब वेगवेगळ्या जणाना पक्षाध्यक्ष पदाची संधी भाजपात मिळू शकते. संघातील संस्काराने उद्धटपणा व माज कमी होतो . मोदी जरी हुकुमशहा मनोवृतीचे वाटले तरी ते चटकन निर्णय घेण्यास काही वेळेस योग्यच असते.लोकशाही पद्धत ही काहीशी लकवा भरलेली पद्धत असू शकते.तरीही लोकांच्या मनातील प्रधानमंत्री मोदी व मनातील पक्ष भाजपा नव्हे. भाजपाचे महाराष्ट्रातील नवे सरकार २००० टक्के अजित पवाराना तुरुंगात धाडणार नाही व आदर्श प्रकरण उकरून काढणार नाही.
"भाजपाचे महाराष्ट्रातील नवे सरकार २००० टक्के अजित पवाराना तुरुंगात धाडणार नाही व आदर्श प्रकरण उकरून काढणार नाही."
अगदी बरोब्बर. त्या बदल्यात ते वेगळे काही वसूल करतील असा माझा अंदाज.सुरुवातीचे काही दिवस 'कारवाई करत आहोत' असा आभास निर्माण करतील.एका चॅनेलवर देवेण्द्रला "गडकरी-पवारांचे संबंध आहेत त्याचे काय?" असे विचारल्यावर देवेंद्र गालातल्या गालात हसला,लाजला व म्हणाला- "तरी कारवाई होईलच."
मी पयला.