हरयाना-महाराष्ट्र विधानसभा निवडणुक (२०१४) : प्रत्यक्ष निकाल
महाराष्ट्र व हरयानातील २०१४ मधील विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवार १९/१०/२०१४ या दिवशी लागतील. सकाळी ८ पासून मतमोजणी आहे. या निकालांसाठी हा धागा.
_________________________________________________________________________
____________________________________________________________________________
एबीपी-माझा-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार, भाजप १४४, शिवसेना ७७, काँग्रेस ३०, राष्ट्रवादी २९ अशी परिस्थिती असेल.
____________________________________________________________________________
अजून एक चित्रात्मक तुलना
__________________________________________________________________________
इंडिया-टुडे च्या सर्वेक्षणानुसार खालील परिस्थिती असेल.
http://indiatoday.intoday.in/story/maharashtra-india-today-cicero-exit-poll-bjp-shiv-sena-modi-uddhav/1/395919.html
____________________________________________________________________________
वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी केलेल्या महाराष्ट्रातील मतदानोत्तर सर्वेक्षणाचे निष्कर्ष असे आहेत.
http://www.rediff.com/news/report/exit-polls-bjp-clear-leader-in-maharashtra-haryana/20141015.htm
____________________________________________________________________________
एबीपी-माझा-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार, भाजप १४४, शिवसेना ७७, काँग्रेस ३०, राष्ट्रवादी २९ अशी परिस्थिती असेल.
____________________________________________________________________________
अजून एक चित्रात्मक तुलना
__________________________________________________________________________
इंडिया-टुडे च्या सर्वेक्षणानुसार खालील परिस्थिती असेल.
http://indiatoday.intoday.in/story/maharashtra-india-today-cicero-exit-poll-bjp-shiv-sena-modi-uddhav/1/395919.html
____________________________________________________________________________
वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी केलेल्या हरयानातील मतदानोत्तर सर्वेक्षणाचे निष्कर्ष असे आहेत.
चाणक्यच्या मतदानोत्तर चाचणीवर आधारीत हरयानातील निकालाचा अंदाज http://www.todayschanakya.com/haryana-assembly-elections-2014.html भाजपः ४५-५९ (२९-३५ टक्के मते), भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला): १६-३० (२३-२९ टक्के मते), काँग्रेस: ५-१५ (२०-२६ टक्के मते), इतर : २-८ (१६-२२ टक्के मते) हरयानातील मतदानोत्तर चाचणीच्या इतर काही वाहिन्यांच्या निष्कर्षानुसार, (१) सी-व्होटरः भाजप - ३७, भारालो - २८, काँग्रेस - १५, हरयाना जनहीत काँग्रेस - ६, इतर - ४ (२) एसी-नेल्सन : भाजप - ४६, भारालो - २९, काँग्रेस - १०, हरयाना जनहीत काँग्रेस - २, इतर - ३ _______________________________________________________________________________ १९८० पासून महाराष्ट्रात एकूण ७ वेळा विधानसभा निवडणुक झाली. २००४ चा अपवाद वगळता इतर सर्व निवडणुकात काँग्रेस हा प्रथम क्रमांकाचा पक्ष होता. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रथम क्रमांकाचा पक्ष होता. १९८० व १९८५ मध्ये शिवसेना महाराष्ट्रात दखल घेण्याजोगा पक्ष नव्हता. भाजपबरोबर युती झाल्यावर प्रथमच १९९० मध्ये शिवसेना दुसर्या क्रमांकावर पोहोचली. त्यानंतर १९९५, १९९९ व २००४ मध्ये शिवसेनेने दुसरा क्रमांक टिकविला. परंतु २००९ मध्ये शिवसेना ४ थ्या क्रमांकावर पोहोचली. १९९९ मध्ये जन्म झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने १९९९ मध्ये तिसरा, २००४ मध्ये पहिला व २००९ मध्ये तिसरा क्रमांक मिळविला. १९८० पासून भाजप कायमच तिसर्या किंवा चौथ्या क्रमांकावर राहिला. भाजपला कधीही पहिल्या दोन पक्षात स्थान मिळाले नव्हते. हरयानात सुद्धा भाजप १९८७ चा अपवाद वगळता कधीही पहिल्या दोन क्रमांकात नव्हता. १९८७ देवीलालांच्या भारालोबरोबर युती केल्यामुळे भाजपला ९० पैकी १५ जागा मिळाल्या होत्या. ही भाजपची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी. इतर सर्व निवडणुकात भाजपला कधीही दोन आकडी जागा मिळाल्या नव्हत्या. मावळत्या विधानसभेत महाराष्ट्रात भाजपकडे ४७ व हरयानात ६ जागा आहेत. सर्व मतदानोत्तर सर्वेक्षणांच्या निष्कर्षानुसार या दोन्ही राज्यात भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष असेल. कदाचित दोन्ही राज्यात किंवा एका राज्यात स्पष्ट बहुमत मिळण्याची देखील शक्यता आहे. कायम तिसर्या किंवा चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या भाजपने सर्व पक्षांना मागे सारून दोन्ही राज्यात स्वबळावर प्रथम क्रमांकाचा पक्ष बनणे ही फार मोठी कामगिरी असेल. या निकालानंतर पहिला बळी जाईल तो मनसेचा. मनसे स्थापन होऊन ९ वर्षे होऊन गेली. परंतु मनसे अजूनही ५ व्या क्रमांकावर आहे. पहिल्या किंवा दुसर्या क्रमांकावर येण्यासाठी मनसेला खूपच परीश्रम करावे लागतील व अजून अनेक वर्षे लागतील. मनसेत राहून फारसे काही मिळण्याची शक्यता नसल्याने मनसेचे नेते व कार्यकर्ते पक्ष सोडायला सुरूवात करतील. यातले बरेच जण शिवसेनेत परत जातील तर काही जण भाजपत जातील. काँग्रेस व राष्ट्रवादीचा या निवडणुकीत धुव्वा उडाला तर दोन्ही पक्षात फेररचना होईल. पक्ष बळकट करण्यासाठी कदाचित पवारांना काँग्रेसमध्ये परत येण्याचे निमंत्रण दिले जाईल. पक्षाध्यक्ष किंवा पक्षात अत्यंत वरचे स्थान मिळत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १९८६ मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये विलीन होईल. किंवा कदाचित राहुल मागे पडून प्रियांका वड्राला काँग्रेसमध्ये सक्रीय व्हावे लागेल. काँग्रेस सोडून गेलेल्या इतर नेत्यांना काँग्रेसमध्ये परत यायचे आमंत्रण दिले जाईल. पुढील निवडणुकात भाजपविरूद्ध काँग्रेस शक्य तेवढ्या सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणून आघाडी बनवायचा प्रयत्न करेल. असो. बघूया नक्की काय निकाल येतात ते.वर्गीकरण
प्रतिक्रिया
तपशीलात किंचित चूक आहे
मोजणी
भाजपाला विदर्भात दोन ठिकाणी
विदर्भात भाजपाला आघाडी.
भाजप्यांना बहुमत नाही,
परत युती व्हायला हवी णाणा...
घोडे
हरियाणा
मुंडे असते तर
अंतिम निकाल -
सेनेची मग्रुरी
सेनेचे डोके भविष्यात कधीही
सहमत
>>> हे शक्य होण्यासाठी
हे बरोबर नाही का ?
>>> विधानसभेत सर्व निवडून
हरयानातील मतदानोत्तर
महाराष्ट्रातील प्रत्यक्ष
श्री गुरूजी ..
(१) माध्यमांच्या संशोधनानुसार
@श्रीगुरुजी- बऱ्याच एक्झिट
चाणक्यचा हरयानाबद्दलचा अंदाज
गुरूजी ....
चाणक्यने भाजपला महाराष्ट्रात
निकाल लागेपर्यंत सर्वच पक्ष
निकाल लागला बेडूक आणि सर्प
तुम्ही जर बेडूक व सर्प हे