Skip to main content

अमेरिकन चिकन

लेखक रवीराज यांनी बुधवार, 15/10/2014 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरराष्ट्रीय राजकारणात रशिया - युक्रेन वादामधे अमेरिका आणि यूरोपने रशियावर आर्थिक निर्बंध लादले त्याला प्रत्युत्तर म्हणुन रशियानेही अमेरिका आणि यूरोपमधुन आयात होणाऱ्या पोल्ट्री आणि डेअरी उत्पादनावर निर्बंध लादले. त्यामुळे अमेरिकेतील उत्पादकांचे मोठे नुकसान होउ लागले त्यातही पोल्ट्री उत्पादकांचे फारच नुकसान होउ लागले कारण अमेरिकेतील पोल्ट्री व्यवसाय मुख्यत: निर्यातीसाठी असल्याने आणि रशिया मोठ्या प्रमाणावर पोल्ट्री उत्पादन आयातदार होता तो निर्बंधामुळे आयात बंद केल्याने पोल्ट्री व्यवसायिकांचे आर्थिक नुकसान हे अटळ होतेच . आता अमेरिका हा भांडवलदारांचा देश, गुंतवणुकदार आणि उद्योगपतींचे नुकसान होऊ लागले म्हणताना अमेरिकेचे राज्यकर्ते काहीतरी उपाययोजना करणार हे आलेच, तर ती उपाययोजना काय असणार याबाबत उत्सुकता होती आणि आजच बातमी वाचली की, "WTO मधे भारत आणि अमेरिकेमधे चाललेल्या केसमधे भारत हरला" बर्ड फ्लुच्या आशंकेने भारताने अमेरिकेच्या पोल्ट्री उत्पादनावर निर्बंध लावले होते आणि त्याविरोधात अमेरिकेने भारताला WTO च्या लवादामधे खेचले होते आणि त्याचा निकाल भारताच्या विरोधात गेला. आता भारतात खाणारी तोंडे भरपुर म्हणजे लोकसंख्या भरपुर परिणामी मागणी भरपुर आणि अमेरिकेत चिकन तंगड्या भरपुर मग काय अमेरिकन चिकन जाऊदे भारतात. बोला आता.....

वाचने 4533
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

स्वदेशीचा मंत्र जागवा...

In reply to by प्रभाकर पेठकर

तुम्हाला परकीय गुंतवणूक तेवढी चालते ...बाकी सगळे स्वदेशी लागते.

विचार कुठला करताय घ्या " तंगड्या " हाणुन.