कैलाश, मलाला, बाल (कामगार/शिक्षण) , पारितोषिकांचे रंग - १
पुण्यातील छावणी(कँप) भागात महाराष्ट्र राज्य सरकारची उपायूक्त आणि संचालक स्तरीय बरीच शासकीय कार्यालय असलेली सेंट्रल बिल्डींग इ.स. १९९३-९४ असेल मी एक नियमीत व्हिजीटर होतो. तिथे मला वाटते दोन कँटीन होती. या कँटीनला सकाळी भेट द्या अथवा दुपारी बाल कामगार दिवसभर काम करत, सांगण्याचा उद्देश हा कि शाळा उरकली आणि मग कामाला लागले असेही नसावे. जाणवलं तरी इतरांवर टिका करण्याचा मला अधिकार आहे का ? समस्या जाणवली आणि त्याच्या सोडवणूकीसाठी मी काही केले नसेल तर माझा इतरांवर टिका करण्याचा हक्क बनतो का कदाचीत नाही. एनीवे या सेंट्रल बिल्डींग कँटीन्स मधील मुल केवळ कँटीन मध्ये काम करत होती का ? असेही नाही मोठ्या साहेबांच्या केबीन पर्यंत या छोटूंच्या हस्ते चहाही क्वचीत जेवणही पोचते होत असावे. हे बालकामगार या अधिकारी मंडळींना दिसत नसतील का ? ज्या काही गोष्टी दुकानात विकत मिळत नाहीत त्यात संवेदनशीलता आणि सकारात्मक कृतीशीलता यांचाही समावेश असावा.
१९९४-९५ असेल औरंगाबादेच्या एका भेटीत अदालत रोडवर संध्याकाळची वेळ उसाच्या रसाचा मंडप गिर्हाईक स्वतःस उसाच्या रसाने थंड तृप्त करत आहे आणि तेवढ्यात एक किंकाळी लक्षवेधल जातं तेव्हा उसाच्या रसाच्या मशिन मध्ये एका दहा वर्षाच्या लहानग्याचा हात गेलेला ! प्रसंग आठवला की आजही डोळे पाणावतात. आधीच्या परिच्छेदात बाजूची कार्यालय शासकीय होती. अदालत रोडवर कदाचित न्यायालयीन कार्यालये असावीत. म्हटलेतर विरोधाभास नाहीत का हे ?
याच औरंगाबादेतला प्रसंग रात्री ११ वाजलेत बाकीची रेस्टॉरंट बंद झालीत फक्त पावभाजीचा गाडा आहे. माझ्या पायात अजून शूज आहेत कुठूनसा एक लहानगा केविलवाण्या नजरेने येतो शूज पॉलीश करू का म्हणतो. मी त्याला नुसतेच पैसे घेऊन जा म्हणतो तो नकार देतो, मी काय करायच अशा वेळेस रात्री ११ वाजता ८-९ वर्षाच्या मूलाला शूज पॉलीश करावयास द्यायचे की नाही ? मी ते दिले. त्या मुलाने त्याचे होत होते त्या पेक्षा ना अधिक पैसे घेतले ना पावभाजी खाण्यास तयार झाला ! हां तो दूर गेला की पुढच्या दोन मिनीटात अजून त्यापेक्षाही एक लहानगा उगवला त्यानेही शूज पॉलीश करून घ्या म्हणून गळ घातली तसेही दोन मिनीटेही झालेली नव्हती पॉलीश करून माझी पावभाजी खाऊन होई पर्यंत माझे शूज दोनदा पॉलीश करून झालेले. या लहानग्यानेही वरचे पैसे आणि पावभाजी नाकारली. एकी कडे धावत्या गाड्यांचा पाठलाग करून भिक मागणारी मूल आणि धावत्या गाड्यांचा पाठलाग करून काही बाही विकू पहाणारी मूल आठवतात त्या पेक्षा शू पॉलीश करून सेफली हि मूल इज्जतीने उदर निर्वाहाच्या प्रयत्नात होती आई वडील समोर नसतानाही ती लहानगी आपल्या आईवडीलांनी शिकवलेल्या शिकवणीस जगत होती.
कैलाश आणि मलाला'ला मिळालेल्या शांतता पारितोषिकाने अस आठव्णींच्या राज्यात २० वर्षे मागे नेल पण वर्तमान बदलल असेल पण किती अलिकडच्या गणपतींच्या काळात डोंबार्यांचा खेळ लावून उंच दोरीवरून सात आठ वर्षाची मुलगी तिचा खेळ दाखवतेय तेही पुण्यात भर ट्रॅफिक मध्ये , मी धावत्या गाडीतन मोबाईलवर टिपण्याचा प्रयत्न केला पण नीटस जमलं नाही. त्याच रस्त्याच्या दोन्ही बाजू आयटी कंपन्यांची कार्यालये आणि मॉल्सनी दाटीवाटी करून असतात, आहे की नाही इंडीया आणि भारतात फरक ? माझ्या वाणी आणि भाजीवाल्या मारवाडी दुकानात राजस्थानातून आलेल्या लहानग्यांचा कायमचाच वावर मी मिठाईच्या दुकानात माशी दिसली की दुकानदाराला लगेच नाराजी व्यक्त करतो पण बालकामगार विषयाबद्दल आतन संवेदनशील असलो तरी कधी दुकानदारा जवळ नाराजी दाखवत नाही. पण अशात भाज्यांचे भाव वाढलेत आणि माझा भाजीवाला अंमळ जास्तच नफ्याने विकतो तोही तिथेच लहानाचा मोठा होताना मी पाहिलेला म्हणून अशात एकदा त्याला एकदा टोकला 'क्या है अभि सब्जीमे अच्छा कमाभी तो लेते हो ! आप को किसीने पढाया नही तो क्या आप अपने पास काम करनेवालो को पढाओगे नही ?' दुकानदार त्या क्षणी त्या बोलण्यावर वरमला नंतर कामवाला छोट्या त्या दुकानातून दिसेनासा झाला. तोच छोट्या पंधरावीस दिवसांनी अचानक एकदा एका मारवाडी दुकानावर काम भेटला हाकेच्या अंतरावर एक महात्मा गांधींच स्मारक, पुन्हा एक विरोधाभास. (स्टोरी देत नाहीए अगदी अलिकडची हकीकत सांगतोय) अगदी १० -१२ दिवसांपुर्वी एका वृत्तपत्राच्या स्टॉल पाशी उभाहोतो अंगावर फटके मारून घेत त्यांची टिपीकल वेषभूषाकरून एक १२-१४ वर्षांचा मुलगा आला त्याला मी पैसे देण्यास नकार देऊन शाळेत जाण्याचा सल्ला दिला. पैसे देण्यास नकार देण लोकांना नवीन नसतं पण मी शाळेत जाण्याचा न मागितलेला सल्ला दिलेला पाहून माझ्या आसपासची मंडळी जराशी नाही म्हटली तरी अचंबित झालेली होती.
माझ्या एका सहकार्याच्या मुलीला एकदा मलेरीया झाला आता त्यात विशेष काय ? म्हटल तर काही नाही म्हटल तर त्या मुलीला डेंग्यू आजोळी झाला आणि सहकार्याच्या म्हणण्यानुसार त्याचे सासरे मलेरिया विभागात अधिकारी आहेत अधिकार्याच्या घराच्या बाजूच्या पाण्यातच डासांची उत्पत्ती होऊन हा डेंग्यू झालेला. जिथे लोक हातात अधिकार असून स्वतःस आणि घरातल्या व्यक्तीसाठी काळजी घेत नाहीत ते लोक बाहेरच्या जगा बद्द्ल किती संवेदनशील असू शकतील ? हि कथा ऐकल्या नंतर मला सेंट्रल बिल्डींग मधल्या अधिकार्याच्यां बालकामगार विषयातील अनास्थेच जे नवल वाटत असे ते वाटेनास झाल.
हे सर्व रामायण का सांगतोय ? जे वाचण्यात आलं, जाणवल ते शेअर करण्यासाठीच ! आणि त्याच कारण आहे कैलाश, मलाला, यांच्या अभिनंदनानी वृत्तपत्रे भरून गेलेली असतानाच, दिव्याखाली आंधाराच्या दोन बातम्या वाचल्या. फोर्बस मासिकातील वार्ताहर या वृत्तात बचपन बचाओ आंदोलनाच्या आकडेवारी बद्दल साशंकता व्यक्त करते आहे. आणि हे एनडीटीव्ही वृत्त कैलाश सत्यार्थींच्या मध्यप्रदेशातील त्यांच्या विदीशा येथील मूळगावी बालकामगारांच्या सध्याच्या दुर्दैवी स्थितीचे वर्णन करते. सोबतीला आज माझ्या मिपा दिवसाची सुरवात झाली होती ती निनाद मुक्काम यांचा मलाला विषयीचा धागा आज अचानक वर आल्याने. हाही योगायोग म्हणावयाचा. निनाद मुक्काम यांचा धागा मला लिहीतं करण्यात अल्पसा कारणीभूत ठरला हे खरे.
प्रतिक्रिया
गंभीर समस्या....
खरं आहे.
बाल कामगारविषयक चर्चा होईलच
कामकरी महीलांच्या मुलांसाठी
खरच गंभिर समस्या आहे पण...
(No subject)
डॉ साहेब, घरात जीभेवर ताबा
हा हा! भन्नाटच.
उत्तम धागा.
रात्रशाळेची वेगळीच कथा आहे
हम्म
रॅकेट....
निश:ब्द !!!
ह्या प्रकारावर मधुरच्या