Skip to main content

भैया हलेना

लेखक मूखदूर्बळ यांनी बुधवार, 29/10/2008 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
(श्री. भा रा तांबे ह्यांची क्षमा मागून त्यांच्या 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे/ गीताचे स्वैर विडंबन ) भैया हलेना भैया चालेना भैया खंत करी काही केल्या परतेना गेले 'जोगेश्वरी' च्या गोठी म्हटली म्हशींसवे गाणी आम्ही दूधात पाणी मिळवून रे आले सप च्या मनी अबू बरळला जनी राजास पाहून गळाले हातपाय रे हा तर संजय निरूपम करी जिवाची तगमग म्हणे राहू आपण दोघे जण रे. चल ये रे मूलायमा घालू आपण छट पूजा लाठया काठ्यांनी करू दांडगाई रे अमर सिंगाचे किडे ह्यांचे लक्ष मतांकडे आपण करू एकगठ्ठा मतदान रे भैया फूली (xxx) आला खूलून गेल्या सर्व दिशा आटून इथे भैया मग कुठे मुंबईकर रे. . (तळ टीप : ह्या विडंबनाचा 'चाफा' ह्या व्यकीरेखेशी दूरान्वयेही संबंध नाही) चू. भू. द्या. घ्या
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3858
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

विडंबन छान झाले आहे. दुसरोंके साथ बातां : चला, चतुरंगांच्या जोडीला आले मुखदुर्बळभाऊ. रेवती

सद्य परिस्थितीवर झकास विडंबन !!!

मी आत्ता तेच लिहीणार होते माझ्या आय.डी. वरुन सुचले का म्हणुन ! पण तळटीप वाचली :) छान आहे विडंबन.

खुप छान विडंबन सरजोशि

विडंबन क्लासच..! :)

एकदम ढिंगच्याक विडंबन! आवडलं. (खुद के साथ बातां : रंग्या, हा मुखदुर्बळ नवीनच दिसतोय बरं का खिलाडी विडंबनप्रांती. जरा लक्ष ठेवायला हवं काय काय करतोय ते! ;) चतुरंग

In reply to by चतुरंग

>>हा मुखदुर्बळ नवीनच दिसतोय बरं का खिलाडी विडंबनप्रांती. जरा लक्ष ठेवायला हवं काय काय करतोय ते! सहमत!! रंगराव, तसेही तुम्ही सध्या एकटेच लढताय....बाकी विडंबकांची फौज दिसत नाही आजकाल...म्हणजे नवीन भरती बंद आणि वर ले ऑफ्स अशी परिस्थिती मिपावरही निर्माण झाली की काय?

In reply to by घाटावरचे भट

आमचे गुरुजी केसूशेठ निवृत्त झाल्यामुळे निर्माण झालेली 'पोकळी' भरुन काढायचा मी आटोकाट प्रयत्न करतो आहे! ;) (कोण रे तो 'पोकळी' भरुन काढतोय म्हटल्यावर फिस्स्कन दात दाखवतोय? :D ) चतुरंग

क्या बात है! तात्या चालीवर म्हणुन मिपावर ऐकवाच बघा जमतका!

In reply to by चन्द्रशेखर गोखले

विडंबन झकास झाले आहे व समयोचित सुद्धा. पण मला ते गाता येत नाहीये. अर्थात न्हाणीतल्या चालीवर! मी पण तात्यांना विचारणारच होतो की या विडंबणात गेयता आहे का? आपला, (भासाड्या गळ्याचा) भास्कर

झकास... (भय्यावळीला कंटाळलेला ठाणेकर) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

सहीच रे !! येउ द्यात अजुन ही !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

लईच बहारी झालयां दादा ह्ये !

मस्त आपला (हसरा) आजानुकर्ण